Submitted by मुग्धा केदार on 1 December, 2015 - 07:27
माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे. पेडी.ला विचारल तर ते सांगतात ती सवय आपोआप जाईल.
सगळे घरातले म्हणतात की त्याचा खालचा ओठ बारीक होईल.
मला आता काळजी वाटतेय कृपया मदत करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इलॅस्टीक काढले तरी पॅन्ट च्या
इलॅस्टीक काढले तरी पॅन्ट च्या नेफ्यात नाडी नव्हती का?>>
नाही गं. पूर्वी त्या फक्त इलॅस्टीक घालून शिवलेल्या पॅन्ट असायच्या ना त्यातल्या होत्या.
साधारण पंधरा वर्षे पूर्वीची घटना.
हा धागा लवकरच मामीच्या धम्माल
हा धागा लवकरच मामीच्या धम्माल विनोदी धाग्यांमध्ये जागा पटकवणार असं दिसतंय

म्हणजे दोन्ही अंगठे तोंडात
म्हणजे दोन्ही अंगठे तोंडात घालायचा का? कारण एक अंगठा तोंडात घातला तरी दुसर्या हाताने पँट वर पकडुन ठेवणं शक्य आहे.
अगं एका बाजूने पकडली तरी
अगं एका बाजूने पकडली तरी दुसर्या बाजुने खाली यायची ना ती. त्यामुळे सतत पकडूनच रहावी लागायची. आत्ता सारख्या मापात शिवलेल्या नसायच्या ना तेव्हा पॅन्ट जरा वाढत्या अंगाच्याच असायच्या.
या बाया इलॅस्टिक लईच ताणुन
या बाया इलॅस्टिक लईच ताणुन राहिल्यात की

माझ्या पुतण्याला झोपताना त्याच्या आईचे केस पकडुन झोपायची सवय होती. तो ६ वर्षाचा झाला तेव्हा आपोआप सवय सुटली ती.
सेम सवय नंतर नणंदेच्या मुलीलापण लागली आहे. सात वर्षे झाले पण केस पकडल्याशिवाय ती झोपतच नाही. ती झोपल्यावर नणंदेने तिच्या हातातुन केस सोडवुन घेतले की ती झोपेतच चाचपडत पुन्हा पकडते
नणंद बिचारी वैतागली आहे नीट झोपायला पण नाही मिळत म्हणुन.
माझ्या लेकाला, हातावर
माझ्या लेकाला, हातावर झोपण्यची सवय आहे. मी आणी त्याचा बाबा आलटुन पालटुन Traffic Police होतो कारण त्याला आमच्या सरळ हाताची उशी करुन झोपण्यची सवय आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
माझ्या लेकाला पण ही सवय आहे.
निल्सन माझ्या भाचीला पण
निल्सन माझ्या भाचीला पण तिच्या आईची वेणी पकडून झोपायची सवय होती. पण ती नंतर गेली.
>>निल्सन माझ्या भाचीला पण
>>निल्सन माझ्या भाचीला पण तिच्या आईची वेणी पकडून झोपायची सवय होती. पण ती नंतर गेली.

काय ? सवय की वेणी ?
सवय हो .
सवय हो :हाहा:.
इलॅस्टीक काढायचा उपाय भारी
इलॅस्टीक काढायचा उपाय भारी आहे... साष्टान्ग दंडवत त्या माऊलीला.
माझ्या लेकीलाही अंगठा चोखायची
माझ्या लेकीलाही अंगठा चोखायची सवय हो ती, कितीही वेळा बाहेर काढला की लगेच टुपुक करुन परत तोंडात.
मग कधी कधी तिला चेंज म्हणुन माझा अंगठा किंवा बोट द्यायचो पण ते चालयचे नाही बाजुने स्वतःचा अंगठा परत टुपुक.......
आणी आजुन एक , नाकात सुतवाल्या
आणी आजुन एक , नाकात सुतवाल्या बहीणीचा मुलाला देखिल ती सवय आहे. दुसर्या बहीणीला केस उपटुन उपटुन ४ थ्या वर्श्यापर्यन्त १ रुपायाच्या आकाराचे ट्क्कल पडले होते.
माझ्या पुतण्याची सध्याची
माझ्या पुतण्याची सध्याची सवय... आई जेवायला बसली की ह्याला शी येणारच.. मग ती कुठलीही वेळ असो.अगदी रात्रीचे ११ वाजता जरी त्या जेवायला बसल्या तरी हा मी छीछी ला जातोय ग अस सांगुन जाणार.की त्या बिचार्या उठतात जेवणावरुन.
कधी जाईन सवय काय्य्य माहीत ??
सगळे प्रतिसाद वाचले, टेन्शन
सगळे प्रतिसाद वाचले, टेन्शन कुठल्या कुठे पळाले. खुप खुप आभार.
निधी....अंगठा तोंडात घातला की पँट खाली. फिदीफिदी ....ऑफिस मधे बसुन अशक्य हसलेय.
तशी माझ्या नवर्याला एक सवय अजुन आहे, तो झोपताना पोटावर म्हणजे उपडा झोपतो आणि एक हात चेहर्यावर स्वत:च्याच. त्याशिवाय म्हणे त्याला झोपचं येत नाही.
तरीही अजुन एक शंका आहे, माझ्या मुलाचा खालचा ओठ जाड किंवा बारीक होईल का?
सवय कशी लागली हे कळत नाहिये. आधी काही वाटत नव्हत माझी आई म्हणायची कि तो नीट बोलायला लागल्यावर सवय जाईल पण तो झोपताना पण तसचं करतो म्हणुन काळजी वाटतेय.
ओठ धरुन ठेवला की मोठा होतो..
ओठ धरुन ठेवला की मोठा होतो.. छोटा शक्यतो नाही.. माझ्या मुलाला जीभ बाहेर काढून झोपायची सवय आहे. अर्धवट झोपेत असताना तशी जीभ बाहेर असते. एकदा शांत झोपला की आपोआप जीभ आत गेलेली असते.. दुसरी सवय म्हणजे त्याचं एक पांघरुण आहे.. तेच घेऊन झोपतो.. आणि त्याच्या कोपर्यात बोट घालून ठेवतो.. सगळ्या बाजूनी उसवले आहे ते आता
सगळे प्रतिसाद वाचुन खुप हसले.
सगळे प्रतिसाद वाचुन खुप हसले.:हाहा:
आई जेवायला बसली की ह्याला शी
आई जेवायला बसली की ह्याला शी येणारच.. >>> ही सवय बहुतेक लहान मुलांना असते असे माझी आई बोलते कारण माझी लेकीला पण मी जेवायला बसली की शी यायची ती अगदी १ दिवसाची होते तेव्हापासुन (तेव्हा सांगत नव्हती आता सांगते). वर्षभर तर रोज असायचा हा कार्यक्रम नंतर कमीमकी होत गेला, हल्ली अधुनमधुन असतो.
खरंच मजेशीर सवयी आहेत.
खरंच मजेशीर सवयी आहेत.
आता गेलीये ती सवय अर्थातच.
माझ्या भाचीला झोपताना डाव्या हाताचा अंगठा तोंडात आणि उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने उजव्या डोळ्याच्या अर्धवट मिटलेल्या पापण्यांना स्पर्श करत राहायची सवय होती. हुश्श किती अवघड आहे ती स्टेप लिहीणे.
अजुनही किचकट बारकाईचे काम
अजुनही किचकट बारकाईचे काम करताना आपसुक जीभेचा शेन्डा ओठाबाहेर येतो.... फिदीफिदी >> ही सवय तर मलापण होती आताआतापर्यंत :फिदीफिदी:
तेव्हापासुन मी अगदी काळजीपुर्वक ती सवय मोडली. जर एकटीच काही करत असेल तर गाणं गुणगुणत राहते म्हंजे तोंड बंद राहुन उघडायचा चान्सच नाही 
नवरा चिडवुन चिडवुन हैराण करायचा पण सवय जातच नव्हती. जर मी शांत/कामात असेल तर तोंड थोडं उघडुन जीभेचा शेंडा बाहेर यायचा. एके दिवशी नवर्याने माझा त्या पोझिशनमधे फोटो काढुन मला दाखवला. शी याक्क! किती बावळट दिसत होते मी
माझ्या मुलीला झोपताना डाव्या
माझ्या मुलीला झोपताना डाव्या हाताचा अंगठा तोंडात आणि उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने एका विशिष्ठ कपड्याच्या (आईच्या सुती साडीचा तुकडा) टोकाची वात वळायची सवय होती
माझ्या मामेभावाला ओठ खायची
माझ्या मामेभावाला ओठ खायची सवय होती. बराच मोठा होईपर्यंत सवय होती. नातेवाईकांना त्याने धूप घातली नाही पण मित्रमंडळी हसायला लागल्यावर आणि पिकनिक इत्यादींचे फोटो पाहून आपण किती बावळट दिसतो हे त्याच्या ध्यानात आल्यावर सवय बरीचशी सुटली. सवय सुटल्यावर चावून चावून सुजलेला ओठ पूर्ववत झाला. पण अजूनही तो तंद्रित असला किंवा ट्रान्समधे गेल्यावर आपोआप खालचा ओठ चावला जातो.
दुसर्या एका बहिणीला अंगठा चोखायची भन्नाट सवय होती. तिचा अंगठा मात्र खाऊन खाऊन बारीक झाला होतालातिची ती सवय सुटावी म्हणून कित्येकांनी किती प्रयत्न/ उपाय योजना केल्या. अंगठ्याला कोरफडीचा गर लावणे, कडू कफ सिरप लावणे, बँडेज गुंडाळणे इत्यादी... ती शांतपणे स्वतःचा अंगठा त्या सगळ्या संकटांतून सोडवून घेऊन तोंडात घालत असे
ती शाळेत जाऊ लागल्यावर, साधारण चौथी-पाचवीत गेल्यावर ती सवय आपोआप सुटली आणि मग अंगठाही पूर्ववत झाला.
माझ्या सख्या मोठ्या बहिणीला झोपताना आईचं पोट लागत असे. आई-बाबा आम्हाला वेगळं झोपवू लागल्यावर ती गधडी माझ्या केसांत हात खुपसून झोपायला लागली. मग दोघींच्या गाद्यांमध्ये अंतर ठेवण्याचा उपाय आईबाबांनी सुचवला. तर रात्रीत ती ते अंतर पार करून माझ्या गादीवर येऊन माझ्या केसांत हात खुपसून झोपायची. माझे केस कुरळे तिच्या ह्या सवयीमुळेच झाले अशी माझी ठाम समजूत आहे.
>> माझे केस कुरळे तिच्या ह्या
>> माझे केस कुरळे तिच्या ह्या सवयीमुळेच

मला लहानपणी डाव्या हाताचे पहिले बोट तोंडात ठेवायची सवय होती. लोकांच्या (आणि आईबाबांच्या) विविध उपायांचा मला फार राग यायचा. दुसरीत असताना शेवटी एका डॉक्टरांनी त्या बोटाला प्लास्टर घातले. आणि मग ती सवय गेली. ते बोट थोडे लहान होते इतर बोटांच्या मानाने, पण आता नीट झाले आहे.
लेकीला मधली दोन बोटे तोंडात
लेकीला मधली दोन बोटे तोंडात घालून चोखयाची सवय आहे. अगदी पहिल्या दिवसापासून.
मी तरी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिने तोंडात बोटे घातली की तिला एखादं काम सांगायचं असं ठरवलंय. आता सवय बर्यापैकी कमी झाली आहे. पण झोपेत मात्र बोटं तोंडात जातातच.
माझ्यामते आई जेवायला
माझ्यामते आई जेवायला बसण्यापूर्वी बाळाला भरवते, त्यामुळे पोट भरलं की बाळं शी करतात, ती नेमकी आई जेवायला बसली की! अर्थात थोडी मोठी मुलं खरंच सवय लागल्याने करत असतीलही!
म्हणजे तोंडात बोट घालायची सवय
म्हणजे तोंडात बोट घालायची सवय कॉमन आहे तर. माझ्या लेकीला अंगठा तोंडात घालायची सवय आहे. झोपेत मध्येच माझ्या दंडावर हळु हळु हात फिरवते ती. टीशर्ट/ गाऊन असेल तर स्लीव्हज मध्येही हात घालते झोपेतच. कधी जायची ही सवय देव जाणे.. नेहमी झोपेचं खोबरं होतं माझ्या..
चेंबूरला सरोजच्या दुकानात एक
चेंबूरला सरोजच्या दुकानात एक घडलेला किस्सा. श्रीखंडासाठी रांग होती. माझ्यापुढे एक आजोबा आणि त्यांच्या खांद्यावर एक गोड्डूला मुलगा होता. अंगठा तोंडात. आजोबांचे लक्ष नव्हते. मी त्याला माझा अंगठा दाखवत म्हणालो, माझा अंगठा गोड आहे, हवाय का ? तर त्याने पटकन माझा अंगठा धरला आणि तोंडात घातला, मला काही कळायच्या आतच बाहेर काढला आणि म्हणाला, माझाच अंगठा गोड आहे, तूला हवाय ??
जरा सिरिअस धागा असला तरी सवयी
जरा सिरिअस धागा असला तरी सवयी वाचून हसु येतय
माझे केस कुरळे तिच्या ह्या
माझे केस कुरळे तिच्या ह्या सवयीमुळेच झाले >>>
काय एक से बढकर एक सवयी आहेत. माझ्या भाचीला पण अनेक वर्षं तिच्या आईच्या पोटावर डोकं ठेवून पालथं झोपायची सवय होती. तसं झोपलेलं तिचं ध्यान फार गोड दिसायचं
एका बहीणीला चादरीचे सुत नाकात
एका बहीणीला चादरीचे सुत नाकात घातल्याशिवाय झोप यायची नाही. >>
काय सवयी आहेत..
माझ्या एका भावाला पाच-सहा
माझ्या एका भावाला पाच-सहा वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईच्या गाऊनच्या बाहीत हात घालून झोपायची सवय होती. त्यामुळे तिला स्लीव्हलेस गाऊन घालता येत नसे
Pages