हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे .
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..
प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न
प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..
हे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक
ब्रेसलेट्स ..
प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..
प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..
प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन
क्विलींग चे चेन पेंडंट :
प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. काही पेंडंट्स
प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..
प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .
हॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी
प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..
प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स
हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय ..
जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..
आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि
अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..
प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .
आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत
यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न
हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..
फोटो फ्रेम्स एक्दम्च भारी
फोटो फ्रेम्स एक्दम्च भारी आहेत गं !
वॉव! मस्त सगळंच.
वॉव! मस्त सगळंच.
टीना, सुपर्ब आहे सर्व. वारली
टीना, सुपर्ब आहे सर्व. वारली फ्रेम खूप आवडली.
काय मस्तं आहेत. खूप
काय मस्तं आहेत.
खूप आवडले.
हॅपॉ चे पेंडंट भारी.
मी यातल्या फ्रेमच्या आयडियाज ढापणार आहे.
त्याबद्दल आधीच धन्यवाद!
चप्पलांचा मेक ओव्हर... टु
चप्पलांचा मेक ओव्हर... टु गुड..
वॉव! टिने....... काय सुंदर
वॉव! टिने....... काय सुंदर कलाकारी आहे गं! आणि काहीच सोडलं नाहीस ते........कानातली, गळ्यातली अगदी चपलाही!
मस्तच!
अप्रतिम
अप्रतिम
हॅपॉ चे पेंडंट आणि कानातले
हॅपॉ चे पेंडंट आणि कानातले मस्तच
प्रचि४ पेंडंट घुबडासारखे वाटतायेत, त्यामुळे तेही फेव्ह..
लगे रहो...
टिना .....मस्तच ग.. सगळेच
टिना .....मस्तच ग.. सगळेच कानातले खूप खूप् आवडले...फ्रेम्स पण छान.
टिना .....मस्तच ग.. सगळेच
टिना .....मस्तच ग.. सगळेच कानातले खूप खूप् आवडले...फ्रेम्स पण छान.
वा।ह!
वा।ह!
मस्त केल्यात सगळ्या वस्तू.
मस्त केल्यात सगळ्या वस्तू. काय काय करतेस ग बाई तू. एकदम ए १ कलाकार आहेस की..
आरती. >> मी विचार करतेय कि
आरती. >> मी विचार करतेय कि वारली चे इअररिंग्स आणि पेंडंट पन तयार करावे
सायली , मानुषी धन्यवाद
साती >> गो ऑन
प्रचि४ पेंडंट घुबडासारखे वाटतायेत >>.. घुबडच आहे ग ते चिमुरी ..
आई ग्गं.. किती गोड आहेत
आई ग्गं.. किती गोड आहेत सगळ्या क्विलींग्स!! ते रॅडिश पर्फेक्ट बरं का.. टीना लवगूड
रांगोळी, मेहंदी, पाकक्रिया
रांगोळी, मेहंदी, पाकक्रिया आणि आता हे....
खरच निव्वळ अप्रतिम जमलय.
क्विलींग मस्तच . मी
क्विलींग मस्तच . मी क्विलींग करायचा खुप प्रयत्न केला पण काहिहि जमले नाहि. पण तुझे मस्तच झाले आहे.
आत्मधून .. That's so kind of
आत्मधून .. That's so kind of you.. पण मी अजुन एकदा जरा शेप मधे बसवायचा प्रयत्न करेल त्यांना.. रंग सोडला तर व्यक्तिशः माझ्या मनासारख नाही झाल ते पण टाकण्याची घाईच जास्त .. नविन तयार केले कि डकवते इथं
निरा, अनघा धन्यवाद .
टिना मस्त मस्त मस्त खूप
टिना मस्त मस्त मस्त
खूप अप्रतिम जमलय सगळंच.
टीना, अगं तु तिथे स्पेसिफिकली
टीना, अगं तु तिथे स्पेसिफिकली मेंशन केलं नव्हतंस ना हॅपॉ स्पेशल म्हणुन वाटलं दुसरं काहीतरी असायचं अन मी घुबड म्हटलं तर उगाच गैरसमज व्हायचा.. म्हणुन तसं म्हटलं..
सगळा धिंगाणा आवडला.
सगळा धिंगाणा आवडला.
मुजरा सरकार! तूसी ग्रेट हो!
मुजरा सरकार!
तूसी ग्रेट हो!
अप्रतीम! सगळेच खुप छान
अप्रतीम! सगळेच खुप छान
सही मस्तच
सही मस्तच
पिहु, मधु , मनुरुची, धनुडी
पिहु, मधु , मनुरुची, धनुडी धन्यवाद...
रीया, काहिही हं री
चिमुरी.. लक्षातच आला नाही हा पॉईंट मला .. कदाचित डोक्यात हॅपॉ मधल फक्त पांढर हेडवीग आहे आणि हे इतर रंगांचे आहेत म्हणुन मी तस लिहिलं नाही .. बरय मग तर, डेथली हॉलोज, घुबडं, मांजर आणि रॅडिश इअररिंग्ज अनायसे झालेच आहे तर आता रॉन चा उंदिर पन करुन टाकावा का?
पण नकोच.. मला नाही आवडत तो पीटर पेटीग्र्यु.. कमीना..
उंदीर नको.. चॉकलेट फ्रॉग कर
उंदीर नको.. चॉकलेट फ्रॉग कर
डेथली हॉलोज ची रिंग, ब्रेसलेट पण मस्त वाटेल
अप्रतीम...
अप्रतीम...
चॉकलेत फ्रॉग .. इइइइइ.. पण
चॉकलेत फ्रॉग .. इइइइइ.. पण मला बेडूक हा प्राणी किळसवाणा वाटतो ना ..
२ ३ दिवस झाले या हॅपॉ शब्दांचा प्रचंड प्रमाणात मारा होतोय..इतक कंट्रोल करतेय पुस्तक वाचायचं.. लपवुन ठेवले माझे मीच.. बघु किती सावरु शकते स्वतःला ते..
रिंग , ब्रेसलेट कल्पना छाने पण त्यांना खुप सांभाळून वापराव लागत म्हणुन क्विलींग व्यतिरिक्त पर्याय शोधावे लागतील
अप्रतिम! सगळेच कलेक्शन एकदम
अप्रतिम! सगळेच कलेक्शन एकदम मस्त!
अतिशय सुंदर आहे. वारली चित्र
अतिशय सुंदर आहे.
वारली चित्र पण मस्त जमलय
बरेच फसलेयत पण जमवून घ्या
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे
खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल
ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या
>> एवढ्या भारी कामाला असं सगळं म्हटल्याचा जाहीर निषेध.
टिना
Pages