विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंडिया जिंकण्यासाठी, शक्यतो पहिली बॅटिंग यायला हवी. धवन, कोहली, पैकी एकजण तरी मोठी ईनिंग खेळायला हवा आणी रहाणे, रैना पैकी कुणीतरी मोठी साथ द्यायला हवी. कदाचित, धवन /कोहली मोठी ईनिंग खेळून कोहली / धवन, रहाणे आणी रैना बरोबर ३ मोठ्या भागीदार्या होतील. बॉलिंग ने आत्तापर्यंतचा फॉर्म टिकवला पाहिजे. मी माझ्या आधीच्या भाकितावर ठाम रहाणार आहे. 'नो'हिट नाही चालणार ह्या मॅच ला and I would be the happiest person in the world, if proven wrong. पहिली बॅटिंग करताना धोनी ला मोठी ईनिंग खेळायला लागणं हे पराभवाचं सुतोवाच ठरू शकतं. किंबहूना धोनी ला ४७ व्या ओव्हर च्या आधी यायला लागू नये (पहिली बॅटिंग असताना). चेस करताना धोनी ला आधी यायला लागलं, तर ते तितकसं वाईट नाहीये.

ईंडिया जिंकण्यासाठी, शक्यतो पहिली बॅटिंग यायला हवी. धवन, कोहली, पैकी एकजण तरी मोठी ईनिंग खेळायला हवा आणी रहाणे, रैना पैकी कुणीतरी मोठी साथ द्यायला हवी. कदाचित, धवन /कोहली मोठी ईनिंग खेळून कोहली / धवन, रहाणे आणी रैना बरोबर ३ मोठ्या भागीदार्या होतील. >>> आमेन!!

मला वाटतं रोहित चालेल अर्थातच त्यानी त्याचं टेंपरामेंट तसच ठेवलं पाहिजे जसं मागच्या मॅच ला होतं कारण उद्या खुप खुप बॉल जस्ट आउट्साईड ऑफस्टंप अशी स्वीट रंभा/मेनका लाईन ठेवून येणार आहेत आणि त्यांना भाळून त्यानी (फॉर दॅट मॅटर कोणीच) आपली बॅट भस्स्कन मध्ये घालू नये!
सिच्विश्न फार टाईट झाली बॉलिंग पायी तर अगदी २०-२५ ओवर पर्यंत ५ चा रनरेट जरी ठेवला तरी चालेल. किपिंग विकेट्स इन हँड इज जस्ट की!
(हे सगळं पहिल्या बॅटिंग करता)

सी Happy

पहिली बॉलिग आली तर गणीत तसं सोपं आहे (मांडायला), फक्त सोडवणं कठिण होऊन बसू शकतं.
मला वाटतं ३०० च्या पुढे गेले ते तर प्रेशर येणार पबलिकवर.
होम पीच, क्राऊड असताना त्यांना ब्याटी मोकळ्या सोडायला जमू नये हे साध्य करणं जरा मुश्किल आहे पण इथेच आपलं सीमर त्रिकुट क्लिक झालं पाहिजे. तिघंही टाईट टाकायला लागले तर हमखास प्रेशर येणार त्यांचावर पण!

अरर्र फॅन्स ना असं कॅटॅगोराईझ करू नये. सगळे फॅन्स प्राऊड आणि ईमोशनल असतात त्यांच्या आनंदाला आणि एक्साईमेंटला कंटेन्ड करायला बघू नये. प्रत्येक जण आपापल्या परीने एक्स्प्रेस होत असतो.

ईथे काही लिहायला संध्याकाळशिवाय वेळ मिळणं आज अशक्य वाटतंय. तूर्तास काही भाषांतरित जोक्स

मेल्यानंतर स्वर्गाच्या दारावर ऊभा एकजण चित्रगुप्ताला म्हणाला 'धन्यवाद मला स्वर्गात स्थान दिल्याबद्दल पण मला नरक पहायची ईच्छा आहे'
चित्रगुप्त म्हणाला ही लिफ्ट घेवून १०९ मजले खाली जा आणि बघ. एका तासानंतर तो माणून १०९ मजले ऊतरून खाली गेला आणि लिफ्टचे दार ऊघडल्यावर त्याने बघितले की बाहेर फक्त हिरवेगार मैदान आणि त्यावर धबाबा पाऊस कोसळत आहे. पुन्हा वरती येऊन त्याने चित्रगुप्ताला विचारले 'मला वाटले नरक म्हणजे आग आणि राख असेल पण तिथे तर हिरवे मैदान आणि धबाबा पाऊस कोसळत होता.
चित्रगुप्त म्हणाला 'पाऊस काय...हं....बहूतेक अफ्रिका वर्ल्डकपच्या फायनलला पोचली वाटते."

ईंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळी आनंदाने ऊड्या मारणार्‍या नवर्‍याला..
रागावलेली बायको - तुमचं धोणी आणि विराटवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे.
नवरा - (बायकोकडे कटाक्ष टाकत) माझं पाकिस्तानी क्रिकेट टीमरवही तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे.

अमेरिकन - तुम्ही भारतीय लोक पाकिस्तान मॅचच्या वेळी एवढे आनंदी का असतात?
भारतीय - कारण आम्ही फक्त त्याचवेळी पाकिस्तान्यांना पाहिजे तेवढं बदडू शकतो आणि यु एन आम्हाला 'थांबा, आता पुरे' म्हणू शकत नाही.

सिडनीच्या माझ्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत.. मोठे लोक बोलायचे इथे स्पिनर चालतात, ऑस्ट्रेलियामधील एकमेव फिरकीला मदत करणारी खेळपट्टी, इथे भारताला चान्स आहे.. मग मी मोठ्या आशेने तो सामना बघायचो.. सोबत ऑस्ट्रेलियाच्या मुर्खपणाचे कौतुकही वाटायचे, अरे वेडेच आहेत, भारताबरोबर सामना इथेच ठेवायचा होता.. आणि मग भारत हरायचा.. मग मी प्रचंड दुखी व्हायचो, छ्या सिडनीला हरलो म्हणजे आता हे कुठेच जिंकू नाही शकत ..

असो.. या झाल्या आठवणी..

पण येस्स हा ऑस्ट्रेलियाच्या संघाची वॉर्नी गिल्ली फंटर की हंटर मॅकग्राथ वगैरेच्या संघाशी तुलना नक्कीच नाही होऊ शकत.. पण मॉडर्न डे क्रिकेटला व्यवस्थित आत्मसात केलेले दोन संघ उद्या आपसात भिडणार आहेत.. होमएडवाण्टेज अर्थातच ऑस्ट्रेलियाला असला तरी सिडनीची खेळपट्टी भले फिरकीला ज्यादा मदत न् करेना पण जर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजानाही मदत केली नाही तर सामना रंगणार.. आणि रंगला तर भारत विजयाची मिळालेली संधी सहजी सोडणार नाही..

अमेरिकन - तुम्ही भारतीय लोक पाकिस्तान मॅचच्या वेळी एवढे आनंदी का असतात?
भारतीय - कारण आम्ही फक्त त्याचवेळी पाकिस्तान्यांना पाहिजे तेवढं बदडू शकतो आणि यु एन आम्हाला 'थांबा, आता पुरे' म्हणू शकत नाही.>> Lol मस्त

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजानाही मदत केली नाही तर सामना रंगणार..>>>>> धिस वोंट हॅपन. एस सी जी माझ्यामते फास्ट बॉलरना प्रचंड मदत करेल. अन्लेस खुप जास्त स्विंग व्हायला लागला तर.

इथे मला लोचा असा वाटतो की पहिली बॅटिंग आली तर पीच खुप रिस्पॉन्सिव असल्यामुळे आपल्याला त्रास होईल आणि बॉलिंग येऊ पर्यंत पीच मधलं ज्युस तसं कमी झालं असेल थोडं त्यामुळे आपल्याला परत बॉलिंगला इतका रिस्पॉन्स मिळायचा नाही पिच कडून.
थोडक्यात टॉस जो जिंकेल तो बॉलिंग घेइल का?
माझं मत अहे आपण पहिली बॉलिंग घ्यावी टॉस जिंकला तर. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या बॉलिंग वर (फारच) भरोसा आहे आणि ते जिंकले टॉस तर कदाचित बॅटिंग घेतील.

मला आजकाल त्यांची फिल्डिंग पाहून श्री श्री श्री रवीन्द्र जडेजा सर आवडू लागले आहेत. परवा इमरूल केयास ला केलेला रन आउट आठवतो का? बॉल अडवताना खाली बसला होता तो पण फक्त गुडघ्यावर जोर देउन काय फायर केलाय थ्रो उमेश यादव कडे. निव्वळ बसलेला असताना थ्रो जोरात जात नाही, पण याने लगेच अ‍ॅडजस्ट केले. इतरही एक दोन दा पाहिले होते.

फा, जाडेजा हा आपला सर्वात बेस्ट फिल्डर आहे. त्याच्या आसपास येउ शकेल असा म्हणजे रैना पण जाडेजाचे direct throw अधिक बसतात. (असे शेन वॉर्न म्हणाला होता).

सिडनी बद्दल तू लिहिलेस ते interesting आहे. बहुधा down under ODI मधे स्पिन चा अधिक उपयोग होत नसल्यामूळे फारसा फरक पडत नसेल. तसेही शिवराम कृष्णण वगळता आपला तिथे दणकून चालेला स्पिनर पटकन आठवत नाही. (शिवाही गावसकर च्या जबरदस्त captaincy मूळे असेल). कुंबळे नि भज्जी ठिकठाक आहेत ODI मधे. सहज कुतूहल म्हणून अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, पर्थ, MCG वगैरे मधे बघितले तरी फारशी वेगळी स्थिती नाहिये. (थोडक्यात ODI मधे down under ते आपले बाप ठरले आहेत) Happy
सिडनी
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;ground=...
MCG
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;ground=...
अ‍ॅडलेड ओव्हल
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;ground=...
पर्थ
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;ground=...
ब्रिस्बेन
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=2;ground=...

हो ते खरे आहे. कसोटीत स्पिनर ला जुना बॉल, जुनी खेळपट्टी, थोडे धावा देण्याचे स्वातंत्र्य ई मिळते ते वन डे त मिळत नाही. आता तर दोन्ही बाजूने वेगळा बॉल असल्याने नवीन बॉल नेच बोलिंग केल्यासारखे आहे.

बघायला पाहिजे तो रन आउट परत. तो फंबल झाल्यासारखा वाटला पण मागे वळून गुडघ्यावर बसून यादव कडे दिला तोच बहुतेक. अफलातून होता खरच! गुडघ्यावर बसून मानूस गारद केला म्हणजे जिवा महाला, सैय्यद बंडा, दांडपट्टा वगैरेच तपशील आठवतो. Lol

तर मग! सगळे ष्टेडियमात एकत्र बसू डोक्याला रुमाल बांधून हाताला हात धरुन साखळी करुन देव ऑफ चॉईसचे नामस्मरण करत बसू मॅच सुरु होऊ पर्यंत.
Lol

ऑसीज खे़ळण्यातले बाप पूर्वी होते. आता राहिले नाहीत. आज जिंकण्याएवढे भारी आहेत हे खरे, पण इंडिया सुद्धा दोन महिन्यांपूर्वी त्यांना भेटली तेवढी पुचाट नाही >> हे मी आधीही कुठंतरी वाचल्यासारखं का वाटतंय? Happy देजावू?

मागचा वल्डकप चालू असताना मी बेल्जियममधे होतो. आताही आहे. यावेळीही आपण कप घेउनच येणार Wink Happy

हे मी आधीही कुठंतरी वाचल्यासारखं का वाटतंय? >> बहुतेक क्रिकइन्फो च्या आर्टिकल मधे होते.

आपल्याला इतकं अस्वस्थं तर धोनी अँड टिम मेंबर्सना झोप लागली असेल का ?

पल पल पल पल हर पल हर पल
कैसे कटेगा पल हर पल पल
ओ हमसफर लगता है डर
रात कटेना कभी हो सहर

व्यवस्थित झोपा आणि ऑसीज ची झोप उडवा कायमची :).

माझ्या मते ऑसी टीम बॅटिंग फर्स्ट स्ट्रॅटेजी वर भारतापेक्षा खूपच जास्त डिपेंडंट आहे. त्यांच्या बॅटिंग फर्स्ट आणि चेसिंगच्या पर्फॉर्मन्स मध्ये खूप फरक आहे. भारताचेही पूर्वी असेच होते पण धोनी आणि विराट ह्यांनी चेसिंगला एवढी प्रचंड स्ट्रेन्ग्थ दिली आहे की बस्स.

पीच च्या बाबतीत ... जेवढे ड्राय आणि हार्ड तेवढे चांगले, स्पीनर्स साठी ऊपयुक्त. मला थोडीफार जर कश्याची चिंता वाटत असेल तर ती म्हणजे पहिल्याने बॅटिंग आल्यास आपल्या डेथ ओवर बॅटिंगची, बोलिंग पेक्षाही कैक पटींनी ह्याची चिंता मला जस्त वाटते. डेथ ओवर हिटिंग मध्ये (स्कोरिंग आणि चेसिंग) दोन्हींमध्ये ऑसी तुलनेने आपल्यापेक्षा बरेच भक्कम आहेत, खासकरून मॅक्सवेल आणि फॉकनर मुळे. ह्यासाठी,धोनीकडे प्लॅन असेल म्हणा. पण आपली डेथ वोवर बॅटिंग अजून म्हणावी तशी क्लिक झालेली नाही. हा फॅक्टर कदाचित आर या पार फरक करू शकेन. पीच बघता जॉन्सन, स्टार्क आणि फॉकनर अगदी फारच कमाल करू शकणार नाहीत असे वाटते निदान तशी अपेक्षा तरी आहे.
फिंच ऑर वॉर्नर विल ट्राय टू डू मॅक्युलन फॉर शुअर. त्यांना कंन्टेड ठेवणे तेवढे अवघड नाही जाणार जेवढे स्मिथला आणि क्लार्कला मोठी भागिदारी करण्यापासून रोखणे जाईल, पण त्यावेळी आपले स्पिनर्स किंवा मोहित शर्मा कमाल करतील.

"अरर्र फॅन्स ना असं कॅटॅगोराईझ करू नये. सगळे फॅन्स प्राऊड आणि ईमोशनल असतात त्यांच्या आनंदाला आणि एक्साईमेंटला कंटेन्ड करायला बघू नये. प्रत्येक जण आपापल्या परीने एक्स्प्रेस होत असतो...."'.......... हायझेनबर्ग.. अगदी खर बोललास...

बूमरँग... मैत्रेयीने फार फार समर्पक उत्तर दिले आहे तुम्हाला..

बिसाइड्स.. आय थिंक यु आर मिसिंग द पॉइंट.. जसे वन डे क्रिकेट गेल्या काही वर्षात झपाट्याने इव्हॉल्व्ह झाले आहे तसेच सोशल मिडियासुद्धा त्याहीपेक्षा जास्त झपाट्याने इव्हॉल्व्ह झाले आहे.. त्यामुळे इथे येउन जे टेक्निकल अ‍ॅनलिसिस समजावयचे किंवा लिहायचे त्यातला एकही टॉपिक किंवा अँगल हा ट्विटर्,फेसबू़क्,क्रिकईन्फो,किंवा प्रत्यक्ष टीव्हीवर ज्यांनी पाहीले किंवा वाचले नसेल असे फारच कमी क्रिकेट्प्रेमी लोक असतील.त्यामुळे इथे तेच रिपिट करण्यात काहीच हशील नाही.

आणी एक.. इथल्या वन लाइनर्स मागच्या किंवा या साइटवरच्या लोकांनी लिहीलेल्या .. मारला चौका.. गेला... अश्या शब्दामागच्या त्यांच्या इमोशन्स ...इथे या बीबीवर जे नेहमी येतात... त्यांच्यापर्यंत जरुर पोहोचतात व म्हणुनच सगळ्यांना एकत्र मैदानावर असल्याचा व्हर्च्युअल फील येतो.

असा फील आम्हाला अमेरिकेत तरी ....इथे या साइटवर जे ३०-४० लिहीणारे(व बहुतेक हजारो फक्त वाचणारे!) व वत्सला व पेरुसारखे प्रत्यक्ष मॅचला जाउन मैदानावरुन इथे पार्टीसिपेट होणारे जे डाय हार्ड फॅन्स आहेत्... तसे फॅन्स प्रत्येक मॅचला घरी बोलवुन... आणता येत नाही..त्यामुळे हा बीबीच आपल्या घराचे एक्स्टेन्शन आहे असे समजुन.. या बीबीवरचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा आपल्या घरात आलेला आपला मित्रच आहे या भावनेने व इमोशनने मी (व बहुतेक या बीबीवरचे सगळेच!) मॅच बघता बघता... इथे डोकवायला येतात व पार्टिसिपेट करतात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला तरी वैद्यबुवाच्या व या बीबीवरच्या तमाम क्रिकेट्प्रेमिंच्या इथल्या.. अबे.. मेरे चिते!...... किंवा ऐसा बॅट नही रे लटकवनेका ऑफ स्टंपके बाहरके बॉल कु!.... वगैरेसारख्या अगदी मनापासुन आलेल्या कॉमेंट्स.. कोणाच्याही टेक्निकल अ‍ॅनालिसिस पेक्षा लाख पटीने मोलाच्या वाटतात.. हे माझे प्रांजळ मत!

ऋन्मेष.. प्लिज राग नको मानुस.. पण मला एवढेच म्हणायचे होते की.. चुक ही चुकच असते.. जरी ती महान टीमने केली..

Pages