विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
गो इंडिया गो होप फॉर द बेस्ट
गो इंडिया गो
होप फॉर द बेस्ट
महागुरु कोठे आहे आहे? मिसिंग
महागुरु कोठे आहे आहे? मिसिंग हिम![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बुमरंग
बुमरंग![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजकी रात होना है क्या पाना है
आजकी रात होना है क्या
पाना है क्या, खोना है क्या !!!
मजा येणार गेमला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेम्स भारी आहेत बुवा. धनि
मेम्स भारी आहेत बुवा.
धनि एकदा डकवर्थ चांगली मेथड आहे वगैरे म्हणण्याअगोदर त्याचे limitations काय आहेत ते समजून घे नि मग BCCI Domestic Competitions साठी DL ऐवजी VJD का वापरते ते बघ. मी स्वःत ह्यावर भरपूर वाचलय नि follow केलय म्हणून आधीचे पोस्ट लिहिले होते. cricinfo पासून rediff कुठल्याही cricket च्या साईटवर तुला हि तुलना सापडेल नि त्यांचे conclusion.
माझा इथल्या कुणा विशिष्ठ
माझा इथल्या कुणा विशिष्ठ आयडींवर ठपका नाही आहे पण एक वाचक म्हणून जे जाणवले ते लिहले
मला फारसे अभ्यासपूर्ण लिहता येत नाही पण वाचायला नक्कीच आवडते पण सध्या होतय काय की संध्याकाळी घरी आल्यावर धागा उघडून पहावा तर सात आठ पाने भरुन पोस्ट्स असतात पण त्यातल्या ७०-८०% या फक्त "अरे व्वा टॉस जिंकला", "मस्त चौकार", कसला हाणलाय", "हुर्रे जिंकलो" टाइप्स असतात..... ball by ball commentry वाचायला cricinfo वगैरे आहेच की
आता यावर मायबोली ओपन फोरम आहे आम्हाला वाटते आम्ही लिहतो.... वाचा नाहीतर सोडुन द्या..... असा युक्तिवाद होवु शकतो आणि त्याचा मला प्रतिवाद करत बसण्यात मला फारसे स्वारस्य नाही आहे
मी जे मिस करतोय ते फक्त बोलुन दाखवले
इंडिया!! इंडिया!! आजही आपणच
इंडिया!! इंडिया!!
आजही आपणच जिंकणार.
विशिष्ट आयडींवर नाही पण
विशिष्ट आयडींवर नाही पण तुम्ही आम्हा सगळ्या दंगा करणार्या चमनायडीचमू वरच ठपका ठेवलात.
काही हरकत नाही, शेवटी तो ठेवून न ठेवून काय फरक पडतो हे ही तुम्ही जणताच त्यामुळे काही विषय तिथेच मिटला. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पब्लिक फोरम असताना, आपल्याला फटाफट पानं उलटून पुढे सरकायला काहीच वेळ लागत नाही आणि तसं असताना सुद्धा फार त्रास होतो वगैरे लिहायचे सोपस्कार करायचा सोस बघून हसत होतो.
बुमरँग, अहो हा बाफ तसा मॅच
बुमरँग, अहो हा बाफ तसा मॅच एन्जॉय करायलाच जास्त वापरला जातो. म्हणजे जे जसे जसे घडेल त्यावर कॉमेन्ट्स, त्यामुळे घरी बसून मॅच बघताना पण या सगळ्या ग्रुप बरोबर बघितल्याचा फील येतो !! संध्याकाळी मॅच होऊन गेल्यावर ही सगळी शेकड्याने पोस्ट वाचण्यात काहीच मजा नाही हे खरेच.
थोडक्यात आलात तर वेळेत या
थोडक्यात आलात तर वेळेत या नाहीतर येऊ नका.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
संध्याकाळी मॅच होऊन गेल्यावर
संध्याकाळी मॅच होऊन गेल्यावर ही सगळी शेकड्याने पोस्ट वाचण्यात काहीच मजा नाही हे खरेच. >> तसे नाही मै, मॅच च्या आधी लिहिलेली भाकिते नि नंतर लिहिलेली पोस्ट वाचायला मजा येते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असामी vjd ची लिंक दे ना. आणि
असामी vjd ची लिंक दे ना. आणि एखादा लेख चांगली कंपॅरिजन असेल तर ती पण दे!
बुवा सगळ्यांना हाकलायला निघाले काय इथून![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मुळे घरी बसून मॅच बघताना पण
मुळे घरी बसून मॅच बघताना पण या सगळ्या ग्रुप बरोबर बघितल्याचा फील येतो >> +१. त्या पोस्ट्स ओलांडून गेलंतर मुकुंद, बुवा, असामी महागुरू चमन यासारख्या पोस्ट्स दोन दोन्दा वाचाव्या लागण्याइतक्या अभ्यासपूर्ण आहेत.
( भाऊकाका दिसत नाहीयेत. त्यांच्या एक पोस्ट्स खतरा असतात)
आता प्रतीक्षा उद्याच्या सकाळची. टॉस आयएस्टीनुसार नक्की किती वाजता आहे?
अलिकडच्या पानावर आहे लिंक
अलिकडच्या पानावर आहे लिंक धनि.
मी हाकलणारा कोण? करता करविता तो अॅड्मीन आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण तो बोंब नाही मारली त्यामुळे तुला काही म्हणणार नाही.
मला आवडतं इथलं समालोचन
मला आवडतं इथलं समालोचन वाचायला! चालू ठेवा सर्वांनी उदयापण!
टेक्निकल अॅनालिसिस टीव्हीवरही मिळत असतोच की!
मैत्रेयी..... sensible पोस्ट!
मैत्रेयी..... sensible पोस्ट!
सापडली एक क्रिकेट कंट्री ()
सापडली एक क्रिकेट कंट्री (:हाहा:) ची लिंक. अजुन एक क्रिक इन्फो वर पण सापडलीये.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/513596.html
बुवा, आज गोधडी का आज साहेब झाला म्हणून बड लाईट सोबत हॉट टब मध्ये मॅच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धनी जयदेवनच्या मुलाखतीची
धनी जयदेवनच्या मुलाखतीची लिंक मी काल टाकलेली बघ.
हे त्याचे presentation
http://www.slideshare.net/jayadevanvjd/how-accurate-is-the-icc-decision-...
रेडीफवर खूप detail article होते पण ती लिंक गायब झाली आहे पण ते ज्याने लिहिले होते त्या श्रीनिवास भोगले चा हा लेख पहा
https://cricket.yahoo.com/blogs/yahoo-cricket-columns/exit-d-l-enter-vjd...
ह्या लिंक्स मधे बरीच नीट माहिती दिली आहे.
http://sports.ndtv.com/cricket/blogs/saurabh-somani/191367-d-l-method-vs...
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/513596.html
http://shashindrasri.blogspot.com/2012/06/vjd-system-alternative-to-duck...
वाचतोय असामी धन्यु याच्यावर
वाचतोय असामी धन्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याच्यावर एक लेख लिही ना! काही तरी अभ्यासू वाचायला मिळेल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुरीत पुरी ढोल्ल्लं
पुरीत पुरी ढोल्ल्लं पुरी!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मार्तुय उद्या सर्मा सेंचुरी!! >>>
असाम्या, ऑसीज खे़ळण्यातले बाप पूर्वी होते. आता राहिले नाहीत. आज जिंकण्याएवढे भारी आहेत हे खरे, पण इंडिया सुद्धा दोन महिन्यांपूर्वी त्यांना भेटली तेवढी पुचाट नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असाम्या, ऑसीज खे़ळण्यातले बाप
असाम्या, ऑसीज खे़ळण्यातले बाप पूर्वी होते. आता राहिले नाहीत >> हे तू World Cup च्या आधी बोलला नाहीस बे
याच्यावर एक लेख लिही ना! >> स्मायली नसता टाकलास तर लिहिणार होतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मुकुंद, बुवा, असामी महागुरू
मुकुंद, बुवा, असामी महागुरू चमन यासारख्या पोस्ट्स दोन दोन्दा वाचाव्या लागण्याइतक्या अभ्यासपूर्ण
आहेत.>> +1
ऑफ़ीसमध्ये match पाहता येत नाही . त्यांमुळे इथल्या बॉल टू बॉल कमेंट्री चा जाम फायदा होतो . match जणू मैदानात असून मित्रांबरोबर एन्जॉय करतोय अस फिलिंग येत . जिवंतपणा असतो या पोस्टित. भारत पाकिस्तानची match याच जिवंतपनामुळे मस्त एन्जॉय केलि होती . एकूणच सतत अभ्यासपूर्ण लिहिनही बोरिंग वाटत
स्मायली अभ्यासू साठी रे !! तू
स्मायली अभ्यासू साठी रे !! तू बिंदास लेख लिही - जो हासेन त्याचे दात पाडू आपण
मला आवडतं इथलं समालोचन
मला आवडतं इथलं समालोचन वाचायला! चालू ठेवा सर्वांनी उदयापण!
टेक्निकल अॅनालिसिस टीव्हीवरही मिळत असतोच की!
>>> +1
हे तू World Cup च्या आधी
हे तू World Cup च्या आधी बोलला नाहीस बे >>> हे कळले नाही. कृपया संत्रे सोलावे.
सिडनी ला आपला वन डे
सिडनी ला आपला वन डे परफॉर्मन्स चांगला नसेल तर आश्चर्य आहे (ती २००८ मधली सिरीज आपण जिंकली तेव्हा एक मॅच सिडनीला होती ना? बहुधा सचिनची ऑस्ट्रेलियातील एकमेव सेन्चुरी). कारण टेस्ट मधे आपली कामगिरी सर्वात चांगली सिडनीला आहे. सचिन, लक्ष्मण ची अनेक शतके आहेत तेथे, शास्त्रीची डबल सेन्चुरी. वॉर्न ला पहिल्या मॅच मधे १५० रन्स हाणले होते, २००४ मधे तब्बल ७०० स्कोअर वगैरे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. वन डे मधे फारशा नसाव्यात. ठळक मेमरी बहुधा ती सचिन चे शतक वाली मॅचच असेल.
सापडली. सचिनचे शतक वाली
सापडली. सचिनचे शतक वाली मॅच
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/291371.html
आता प्रतीक्षा उद्याच्या
आता प्रतीक्षा उद्याच्या सकाळची. टॉस आयएस्टीनुसार नक्की किती वाजता आहे?>> हे सांगा की लोकहो.
मी विचार करत होतो की कुठल्याच
मी विचार करत होतो की कुठल्याच टीमचा शियर डॉमिनन्स नाहीये आजिबात कारण मला वाटतय सगळ्याच टीम्स नी खेळाच्या लेवलचा बार खुप वर नेलाय. त्यामुळे सगळेच एकमेकांच्या वल्नरेबिलिटिज अक्षरशः खोदून काढत आहेत.
ज्या ठिकाणी कोणी गाफिल राहिलं तिथे त्यांना फटका बसला आहेच पण काही जेव्हा दोन्ही टीम चांगल्या खेळल्या तिथे शेवटपर्यंत स्थिती दोलायमान होती. ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यु झिलंड किंवा आपण विरुद्ध अफ्रिका. कालची अफ्रिका विरुद्ध न्यु झिलंड पण खरं टफ होती पण शेवटी अफ्रिकेनी चुका केल्या.
9 am IST
9 am IST
Pages