मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या रामनवमीच्या पालखीला एका हौशी गायकाने म्हटलेली ओळ

(original song: तुझे रूप चित्ती राहो.. चे पुढचे कडवे)

तुझे नाम पांडूरंगा सर्व पापनाशी
वाट प्रवाशांशी देशी कुठे पाप खाशी?

actual:
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी

माझ्या जिममधे एक गाणे नेहमी लागते. ठेका छान आहे. पण एक शब्दसुद्धा कळत नाही. बहुधा हनी सिंगचे असावे..

"ईना मीना डॉग शॉट मारिया करो.." म्हणजे काय??? कुणाला खरे गाणे माहीती आहे का? मला गुगल मधे काय नावाने शोधावे तेसुद्धा कळत नाहीये.. Sad

"ईना मीना डॉग शॉट मारिया करो.." म्हणजे काय???
बहुतेक ते " एना विना डोप शोप मारिया करो " असावे
आता शोध गुगल मध्ये

ओह्ह्ह... येस्स्स.. मिळाले गाणे.. पण अर्थ नाहीच समजला.. _____
हनि सिंग च्या गाण्यांना अर्थ - काहीही हा
दारू , डोप , विड बिकिनी पार्टी & यो यो हनी सिंग अस म्हणल कि झाल गाण

मृणाल , आजकाल नवी वाक्य पण लागतात-
daddy किंवा पापा से नाही डरेंगे
आंटी पुलीस बुलाएगी
पार्टी चलती रहेगी
इत्यादी.
एकदा मी हनीची तीन गाणी सलग ऐकलेली आणि तीनही गाण्यात वरची वाक्य होतीच.

बाय डी वे ढोप शोप चा अर्थ shining असावा बहुदा

Ohhhh

हनी ऐकायचाच तर ब्लू आईज हिप्नोटाईज ऐका...

कपिल शर्माच्या तावडीत ही पोलीस बोलवणारी हनी ची आंटी सापडली कशी नाही अजून ??

गाणं नाही पण एक अ‍ॅड -

प्रेस्टीज प्रेशर कुकर मे खाना जलाना कितना आसान..!

खूप दिवसांनी कळलं - ते खाना चलाना आहे

पण "जेवण चालवायचं" म्हणजे नेमकं काय ते अजूनही अगम्य Happy

होणार सून मी ह्या घरची मालिकेचं शीर्षक गीत मी असंच एेकलं

अालीस सासूला सासूला अोलांडुन उंबरा…

मला कळेच ना की, ही उंबरा अोलांडता अोलांडता सासूला पण अोलांडून कशी काय येते? की ती येत असताना तिची सासू (किंवा सासवा) अडथळा शर्यतीसारखी अडथळा म्हणून उभी असते. तिला अोलांडूनच मग घरात पाय ठेवायचा असतो?

अात्ता अात्ता ते मला बरोबर म्हणजे

अालीस सासुरा सासुरा अोलांडुन उंबरा…

असं ऐकायला यायला लागलंय.

थोडंसं आवांतर...
माझ्या लहानपणी एक रबरबँड मिळायचं त्याचं नाव होतं दोबदन. मग बुधवारी रात्री चित्रहारला कधी कधी आशा पारेखचं जब चली ठंडी हवा, जब उठी काली घटा लागायचं तेव्हा चित्रपटाचं नाव 'दोबदन'
मी नेहमी गाणं लागलं की काहीतरी शोधत असे... आणि प्रश्न पडायचा की एका रबरबँडवर या लोकांनी सिनेमा कसा आणि काय म्हणून काढला असेल ? Uhoh Proud
नंतर कळलं की त्या सिनेमात आशा पारेखने लावलेले रबरबँड नंतर फॅशनीत आले म्हणून त्यांचं नाव दोबदन Lol
आशिकी रिबिन ही तरी कळत्या वयात आली म्हणून बरं Wink Proud

सध्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या गीतावरची आख्यायिका फार फिरतेय व्हॉट्सॅपवर त्यावरून आठवलं.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझे चमी गीत गात आहे

ही नायिका स्वतःला चमी का म्हणवून घेतेय ते कळलं नव्हतं बरेच दिवस Happy

`चमी नायिका.:फिदी: भारीच आहे.

कभी तेरा दामन न छोडेन्गे हम हे आशाचे गाणे मला विचीत्र पद्धतीने ऐकु यायचे

कभी तेरा दाम अण्णा छोडेन्गे हम असे.:फिदी:

"होली खेले रंग बीरा यवतमे होली खेले रंग बीरा" असं ऐकू यायचं.

म्हन्जे कुणीतरी बीरा नावाचा माणूस 'यवतमाळ' मध्ये जाऊन होली खेळतो

यवतमाललाही जायची गरज नाही , यवत नावाचे गाव पुणे सोलापूर रोडवर आहे
( होली खेले रघुबीरा अवधमे , होली खेले रघुबीरा...)

तेरे प्यारका नशा कभी आर कभी पार
तेरा प्यार प्यार प्यार धक्का मार..!!

( हुक्का बार आहे ते गुगल गुगलने सांगीतलं)

चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हमें तैयार करो
Proud

लहानपणी हे काही चुकीचंही वाटायचं नाही. आई बाहेर जाताना आपल्याला तयार करते तसंच काहीतरी असेल याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता Lol

Pages