मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा.... Lol माझी एक बहिण सदमामधल गाणं म्हणते....ए जिंदगी गले लगा ले...हमने दो बूंदोसे मूंह धो लिया...(जे खरतरं आहे मन भर लिया)

अजून एक किस्सा माझ्या साबांचा....मुंबई पुणे मुंबई मध्ये गाणं आहे....कधी तू......थैमान वारा...जे त्यांना वाटायचं...हैवान वारा.... Proud

तू तू तू मेंडी .....मेंडी ....मेंडा तेरा होणे लगा (ओरिजिनल : तू तू मेरी मै तेरा होणे लगा) इति माझी जुनिअर केजी मुलगी (या गाण्यावर तिने 31st ला स्टेजवर डान्स केला होता):D Lol Lol

ओ लड्के कहासे आया हे रे तु?
शकल्से अच्छा,अकलसे मारा हे रे तु.
तुझे तो पेपरवाला बचा ले........ इति कन्यका. Happy

ही अजून काही गाणी.
मूळ गाणे => मला ऐकू आलेले
[मनात आलेले विचार]

१. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला => चिंधी बांधते द्रौपदी पहिल्या बोटाला
[काय झाले असेल बरे द्रौपदीच्या पहिल्या बोटाला?]

२. "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई" गाण्यातली ओळ:
मिट पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई => नीच पाखऱ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
[किती निर्दयी बाई असेल. लवकर झोपत नाही म्हणून मुलाला "नीच" म्हणते?]

३. जुलमी संग आंख लडी, जुलमी संग आंख लडी => बिजली संग आंख लडी, बिजली संग आंख लडी
[बहूदा विजा कडाडत असताना हिरोईन आकाशात बघून गाणे म्हणते, असे चित्रण असावे]

याआधी हा किस्सा सांगितलाय की नाही ते आठवत नाही. किस्सा माझ्या बाबांनी सांगितलेला आहे. ते लहान असताना 'चुप चुप खडी हो' गाणं आलं होतं. ते गाणं माझे बाबा असं ऐकायचे -

चुप चुप खडी हो जरूर कोई बात है
पहिली मुला खात है ये पहिली मुला खात है

पहिल्या मुलाला खाणारी ही कोण बाई असेल बरं याबद्दल जाम उत्सुकता वाटायची म्हणे त्यांना Proud

आमच्याकडे ऑफिसमद्धे बड्डे सेलिब्रेशन च्या वेळी बड्डे बॉय ने गाण म्हणायची प्रथा आहे
माझ्या एका मित्राने पुढील गाने म्हटले..

नको देवराया अंत आता पाहु प्राण हा सर्वथा जाउ पाहे

आता वेळ काय प्रसंग काय...आणि गाण काय...असो
ईथपर्यंत ठीक होतं
कडवं म्हणायला लागला...

हरीणीचे पाडस वाघ्रे घरी गेले
मजलाही जाहले तैसे देवा

हे असं आहे " हरिणिचे पाडस व्याघ्रे धरीयेले, मजलागी जाहले तैसे देवा" म्हणजे हरीनीच्या पाड्साला वाघाने धरल्यावर कसे वाटेल तशी सध्या माझी स्थिती आहे तरी देवा तु माझ्या अंत पाहु नको...

पण माझ्या मित्राने डायरेक्ट त्या पाडसाला वाघाच्या घरीच पाठवले... Happy

बाकी सगळे नॉर्थ किवा साउथ कडचे लोक..त्याना फार काही कळाले नाही...आणि मला मोठ्याने हासता पण येइइना....

हरीणीचे पाडस वाघ्रे घरी गेले>>>> Biggrin

ऑफिसात सर्वांना पार्टी दिली तशी त्याने त्या गाण्यातल्या वाघाला पण मेजवानी दिली. वाढदिवस होता ना त्याचा मग तुम्हाला त्याच्या भावनाच कळल्या नाहीत. Lol

वाघे घरी गेले Rofl

असेच काहीसे पंडीत भिमसेन जोशीच्या आवाजात इंद्रायणी काठी ऐकताना व्हायचे ,
त्यात "ज्ञानियांचा राजा भूंकतो राणिवर "असेच ऐकू यायचे, आणि राजा का भूंकतो असा गहन प्रश्न पडायचा Happy

ते खर तर "ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव" असे आहे , गुगलांती कळले

किशोरकुमारचे सुप्रसिद्ध गाणे...
'जिंदगी इक सफर है सुहाना,
यहाँ कल क्या हो? किसने जाना?'...

यातल्या एका कडव्याची शेवट्ची ओळ मी हल्ली पर्यन्त...
'मुस्कुराते हुवे जिन्दीस्ताना,
यहाँ कल क्या हो? किसने जाना?'... अशीच म्हणत होतो... एकदम कॉन्फीडन्सने...

काल रात्री 'बखर गीतकारांची' हे पुस्तक वाचताना, ती ओळ खरंतर...
'मुस्कुराते हुवे दिन बिताना' ... अशी आहे याचा शोध लागला...
Proud

असे धागे फक्त घरीच उघडतील अशी सोय माबोवर हवी. उगाच एखाद्याची नोकरी जायची. माबो उघडताच "घरीच अहात ना? " असा संवादडब्बा आणी "हो" "नाही" असे पर्याय असावेत.
आज मी बिझिनेस सेंटर मध्ये बसून लॅपटॉप वाचत फिदीफिदी हसतोय हे बघून इतर लोक मला अ‍ॅडमिट करतील की काय अशी भिती वाटते.

घरून काम करतेय म्हणून हा धागा उघडण्याचे धाडस केले.
हसून हसून डोळ्यातून पाणी आले आहे.

बेष्ट प्रकार म्हणजे आपल्याला जे ऐकू येते त्याचा आपण अर्थ लावतो एकदम पटेल असा.

जिन्दीस्ताना Rofl

बेष्ट प्रकार म्हणजे आपल्याला जे ऐकू येते त्याचा आपण अर्थ लावतो एकदम पटेल असा. >>> Lol हे आवडलं

असाच काहीसा प्रकार...

शादीके लिये रजा मंग कर ली,
मैने एक लडकी पसंद कर ली...

म्हणजे, आधी लग्नासाठी रजा मागून (मंग कर) घेतली, आणि मग एक मुलगी पसंद केली.. सगळे कसे रितसर...
काही चुकले असे वाटलेच नाही...

आज ह्जरो गाण्यांमधे हे गाणे लागले आणि लक्षात आले की 'रजामंद' या शब्दाचा अर्थ 'पटवणे' असा आहे.. Happy

शादीके लिये रजा मंग कर ली --> मस्त

शीला की जवानी - हे माझे बाबा असं म्हणायचे -

whats my name? माय नेम इस शीला ...शीला केजवानी!!!

त्यांनी video पाहीला नव्हताच, त्यांना वाटायचं - "whats my name" चं उत्तर " माझं नाव शीला केजवानी!!!"

त्यांना पटवून द्यावं लागलं की हे गाणं item song आहे आणि प्लिज म्हणू नका - Happy

मी एक गाणं ऐकलेलं ( फार पूर्वी..)

बटाटावडा.. बटाटावडा....
आजकाल आवडत नाही..ही लाडूपेढा..

खूप शोधलं गूगलवर पण हे गाणं सापडलंच नाही.. मी खूप स्पष्ट ऐकलं होतं.. चुकीचं की बरोबर ते माहित नाही..

Pages