आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9
बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>
आणि, हा धागा सुचला.
सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.
वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.
अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!
सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.
पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.
तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये!
अंजाम चित्रपटात बीभत्स रस
अंजाम चित्रपटात बीभत्स रस ओसंडून वाहिला आहे.
कोणे एके काळी लोकसत्तात वाचक पत्रव्यवहारात एका मराठी चित्रपटातील एका दृश्याबद्दल आक्षेप नोंदवला गेला होता : नायक रवींद्र महाजनी हापिसला जाताना नायिका गाणे म्हणत म्हणत त्याची सगळी तयारी करून देते. त्याने पावलांत बूट चढवल्यावर ते आपल्या पदराने पुसते.
सिनेमातही कमी objectionable
सिनेमातही कमी objectionable प्रसंग असतील, एवढे शब्द आणि ओळी गाण्यांमधे आहेत. बाकी गाणी सोडा. फक्त 'My songs do not demean women' असा क्लेम करणार्या अत्यंत चीप यो यो हनी सिंगच्या गाण्यांवर एक थिसीस होवु शकतो. अत्यंत कॅची म्युझिक आणि सोपे (पण चीप आणि अर्थहीन) शब्द यामुळे लहान मुलांना याची गाणी खुप आवडतात असं दिसतं. चार बॉटल वोडका किंवा रातको होगा हंगामा ही गाणी केवढी लोकप्रिय आहेत. त्यातल्या ओळी जर वाचल्या तर हनी सिंगला फाशी द्यावीशी वाटते मला.
unfortunately मी गाणी कानापेक्षा शब्दाने जास्त ऐकते, म्हणुन या माणसाचा मला अतीव त्रास होतो.
ज्या नशीबवान जीवांना हनी सिंगची लिरिक माहीत नाहीत त्यांना मी इतकी over react का करते ते कळणार नाही म्हणुन फक्त दोनच उदाहरणे. ( तुम्ही पण सामील व्हाल माझ्या 'किल यो यो' अभियानात)
पैजामा लुज लुज,
बर्डस चिक्स अॅन्ड सम बुझ
कुडियोंका लगा है बफे
चाहे जो करलो चुझ (या लाइनसाठी गोळ्याच घालाव्याशा वाटतात फक्त)
याच गाण्यामधल्या ओळी आहेत - टिचरके लेक्चरको डर्टी पिक्चर बना दो.
दुसर्या गाण्यातलं 'बॉम्ब फिगर' आणि 'छोटी ड्रेसमें बॉम्ब लगदी मैनु' फारच इरिटेटिंग वाटायचं पण एका यो यो फॅनने दाखवुन दिलं कि अगदी इतकंच चीप वर्णन जुन्या हिंदी गाण्यात पण असायचं, पण मुलामा देवुन.
'Rapper Honey Singh says his songs are not to demean women and claims if a boy sings them to impress his daughter he has no problem with it. ' बेशरमी कि हाइट !
अत्यंत कॅची म्युझिक आणि सोपे
अत्यंत कॅची म्युझिक आणि सोपे (पण चीप आणि अर्थहीन) शब्द यामुळे लहान मुलांना याची गाणी खुप आवडतात असं दिसतं.
>>>>>>>
हो, अॅक्चुअली .. चिकणी चमेली गाण्यावर कॅची म्युजिकमुळे दिडदोन वर्षांची मुले माना डोलावतात, आणि ते शब्द त्यांच्या डोक्यात फिट बसतात.
लहान मुलांचेच का, माझेही असे होते. ग'फ्रेंड बरोबर चालत असताना समोरून दोन मुली आम्हाला पास झाल्या तेव्हाच नेमके मला गाणे गायचा मूड आला. मी गायलो ते देसी बॉइज चित्रपटातील "सुबह होने ना दे... एक दुसरे को हम सोने ना दे.." आता गाणे म्हटले की त्या टोनचा फील घेतच गाणार हे ही ओघाने आलेच.. बस्स, लगेच माझ्या ग'फ्रेंडने मला झापडवले, कुठे काय गायचे अक्कल नाहीये का तुला.. आणि हे असे दोन-तीन वेळा झालेय, जेव्हा साफसुधरे गाणे असते तेव्हा नो प्रॉब्लेम, पण गाण्याचे शब्द खटकणारे असले आणि आजूबाजुला कोणी मुलगी असली की माझी कत्तल.
आली.
आली.
<< लहान मुलांचेच का, माझेही
<< लहान मुलांचेच का, माझेही असे होते. >> त्या वेबसाईटच्या निष्कर्षाप्रमाणे दोन्हीत काय फरक आहे का?
<< लहान मुलांचेच का, माझेही
<< लहान मुलांचेच का, माझेही असे होते. >> त्या वेबसाईटच्या निष्कर्षाप्रमाणे दोन्हीत काय फरक आहे का?>>>. असेल की. लहान मुले चार चौघात माने डोलावतात, तरुण पोरे चार चौघात कम्बर हलवतात आणी गातात सुद्धा.:खोखो::दिवा:
वाचून या एकदा
वाचून या एकदा http://www.pahawemanache.com/review/lokmanya-ek-yugpurush
रात अकेली है ह्या गीतात देव
रात अकेली है ह्या गीतात देव आनंद ज्या प्रकारे मान हलवतो तशी मान माणूस तेव्हाच हलवू शकतो जेव्हा माणसाला हे मान्य झालेले असते की आपली फक्त मानच हलू शकत आहे. तसेच, तनुजा ज्या प्रकारे नाचते तशी एक स्त्री तेव्हाच नाचू शकते जेव्हा तिला हे मान्य झालेले असते की काय वाट्टेल ते केले तरी आपण नाचू शकत नाही.
हे संपूर्ण गीत मला खटकलेले आहे.
नॉर्मल माणूस अश्या हालचाली करत नाही.
हिन्दी चित्रपटात नॉर्मल
हिन्दी चित्रपटात नॉर्मल माणसे नसतात. अॅबनोर्मलच असतात. जेव्हा ती नॉर्मलसारखी वागू लागतात तेव्हा समजावे की चित्रपट आर्ट फिल्म, न्यू वेव्ह,प्रायोगिक, वास्तववादी वगैरे आहे::फिदी:
मला चित्रपट पाहण्याची आवड
मला चित्रपट पाहण्याची आवड नाही परंन्तुया धाग्या वरिल सगळ्या प्रतिक्रीया वाचुन काढल्या.
अजुन एक यशस्वी धागा काढल्या बद्द्ल.ऋन्मेऽऽष चे अभिनंद्न.
Raat Akeli Hai - Jewel Thief
Raat Akeli Hai - Jewel Thief हे गाणे आशा च्या स्वरातील लाजवाब फिरत आणि तनुजाचा सहजसुन्दर लाजवाब सदाबहार अभिनय यामुळे माझ्य आवडत्या गाण्यांत समाविष्ट आहे. त्यात आक्षेपार्ह काहीच जाणवले नाही . असो!
रच्याकने ॠन्मेष भाऊ ना "माबो"
रच्याकने ॠन्मेष भाऊ ना "माबो" चा सचिन तेंडुलकर ,किंवा किमानपक्षी विराट कोहली (गफ्रे अनुश्का सह ) असा किताब देण्यास् हरकत नसावी !
कोहली नको, तेंडुलकरच नांव
कोहली नको, तेंडुलकरच नांव द्या पुरस्काराला!
रिझल्टपेक्षा आकडेवारीला महत्व आहे इथे!
ग'फ्रे नाही येत ना सचिन या
ग'फ्रे नाही येत ना सचिन या कन्सेप्ट मध्ये
वाचून या एकदा
वाचून या एकदा http://www.pahawemanache.com/review/lokmanya-ek-yugpurushनीलम शजादी>>>>>>>>वाचल अगदीच भारी लिहिले आहे नीलम बाईंनी
किमानपक्षी विराट कोहली (गफ्रे
किमानपक्षी विराट कोहली (गफ्रे अनुश्का सह ) असा किताब देण्यास् हरकत नसावी ! >>>>>१०+ अनुमोदन
कोहली नको, तेंडुलकरच नांव
कोहली नको, तेंडुलकरच नांव द्या पुरस्काराला!
रिझल्टपेक्षा आकडेवारीला महत्व आहे इथे!
>>>>>>>>
माझ्या कौतुकाबद्दल नो कॉमेंटस, मात्र सचिनबद्दलचे मत सचिन फ्यॅन क्लब वर टाका, मजा येईल. मी तुमच्या मताच्या समर्थनार्थ उतरतो, धमाल उडवूया
हॉलिडे>>>+१ अतिशय भिक्कार
हॉलिडे>>>+१ अतिशय भिक्कार कॅरेक्टर वाटलं सोनाक्शीचं. चक्क स्वतःह्या वडीलांना कानफटते. खुपच बेक्कार. मी आधीच चिकवा वर लिहिलं होतं.
एंटरटेनमेंट काल लागला होता.
एंटरटेनमेंट काल लागला होता. चुकून (डिफाय्ब्रिलेटर म्हणून) जॉनी लिव्हरच्या छातीला इस्त्र्या चिकटवण्याचा सीन अत्यंत खटकला. आणि कुत्र्याला बर्फात टाकणे पण (म्हणजे कथेचा भाग म्हणून कुत्र्याने अक्षय;आ वाचवून स्वतः बर्फाळ खड्ड्यात उडी घेणे.)
आज रितेशचा "लय भारी" पाहिला
आज रितेशचा "लय भारी" पाहिला झी मराठी वर त्यातील एक प्रसंग पाहून हा धागा आठवला.
देवाकडे केलेल्या नवसाने मुलगा झाला हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, मात्र त्यानंतर तो मुलगा तुझ्या चरणी अर्पण करेन म्हणत मुसळधार पावसात अक्षरशा देवाच्या भरवश्यावरच त्या मुलाला मंदिराच्या पायरीवर सोडून जाताना दाखवले. हिरोची आई म्हणजे चित्रपटातील सकारात्मक कॅरेक्टर असे निर्दयी कृत्य करताना दाखवलेले खटकले कारण त्यामुळे त्या नाईलाजाचे समर्थन केल्यासारखे झाले.
कभि अलविदा मधे अमिताभ सारख्या
कभि अलविदा मधे अमिताभ सारख्या मातब्बर माणसा ने जे काही चाळे केलेत, त्यासाठी माफी नाही.
स्वतःच्याच मुलासमोर कॉलगर्ल सोबत चाळे करत बे.रूम मधून बाहेर येणे ई.
हनी सिंगचे लिरिक्स, चित्रपटात
हनी सिंगचे लिरिक्स, चित्रपटात उडवली जाणारी शिक्षकांची टर - मग ते प्रोफेसर धोंड असोत वा प्रोफेसर प्यारेलाल, वास्तवसारख्या चित्रपटात केलेले मवाल्यांचे उदात्तीकरण, सर्वच पोलिसांना लाचार वा लाचखोर दाखवणारे चित्रपट डोक्यात जातात..
चित्रपटात दाखवले जाणारे भड़क प्रणयप्रसंग, सुडप्रकरणे, रक्तरंजितपणा टाळता आला तर बरे होईल.
हनी सिंगचे लिरिक्स, चित्रपटात
हनी सिंगचे लिरिक्स, चित्रपटात उडवली जाणारी शिक्षकांची टर - मग ते प्रोफेसर धोंड असोत वा प्रोफेसर प्यारेलाल, वास्तवसारख्या चित्रपटात केलेले मवाल्यांचे उदात्तीकरण, सर्वच पोलिसांना लाचार वा लाचखोर दाखवणारे चित्रपट डोक्यात जातात..
चित्रपटात दाखवले जाणारे भड़क प्रणयप्रसंग, सुडप्रकरणे, रक्तरंजितपणा टाळता आला तर बरे होईल.
सलमान खानवर चित्रित झालेले
सलमान खानवर चित्रित झालेले ढिंक चिका हे गाणे. त्यात त्याने विजारीच्या दोन्ही खिशांमध्ये दोन्ही हात घालून अकरा बोटे हलवित जे काही केले आहे त्याला नृत्य म्हणावे तरी कसे? गांभीर्याची बाब ही की अनेक लहान मुले ह्या गाण्यावर हुबेहुब सलमान प्रमाणेच थिरकत असताना त्यांचे पालक त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहतात.
अकरा बोटे ? :
अकरा बोटे ? ::अओ:
Pages