चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.

वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्‍या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्‍या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.

अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!

सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.

पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.

तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुलांना अती आगाऊ दाखवणे चीड आणते. त्या बिचार्या मुलाच्या कामाचे कौतुक न वाटता त्याला दिलेल्या संवादांचा आणि हावभावांचाच राग येतो, उदा. कुछ कुछ होता है मधली फक्त ८ वर्षांची मुलगी वडील व त्यांच्या जुन्या मैत्रिणीला एकत्र आणायला इतके उपद्व्याप करेल हे मला आजही खरं वाटत नाही.

फारएण्ड,

काल रात्री हा धागा आला तेव्हाच मी तो विचार मांडून दाखवला की हे सगळे नीट विचारात घेणे गरजेचे आहे. माझा पहिला प्रतिसाद पुन्हा एकदा कृपया वाचावात.

ते सरसकट काढावे असे मी म्हणत नसून ते एकदा नीट विचारांत घ्यायला हवे आहे असे मी म्हणत आहे.

शाखाच्या त्या तीन चित्रपटांना रंजकमूल्य होते, पण त्याचे अनुकरण करणारे कोणाचे मनोरंजन करत नसून आयुष्याशी खेळ करत होते. इतकेच काय, एक दुजे के लिये हा चित्रपट पाहून ऐंशीच्या दशकात अनेक प्रेमी युगुलांनी आत्महत्या केलेल्या होत्या. तेव्हा हे सगळे दाखवूच नये की दाखवूनही त्यानंतर त्याचे काय भीषण परिणाम होतात तेही सोबतीला दाखवावे की सर्रास सगळे दाखवावे ह्यावर ब्रेनस्टॉर्मिंग आवश्यक आहे.

आता बघा - डरमध्ये शाहरुखला शिक्षा करते कोण? तर सनी देओल! तेथे पोलिसांनी शिक्षा केली असे वळण लावता येणे शक्य होते, पण मग सनी देवल छाटछुट ठरला असता व ते पब्लिकला पटले नसते. हे निव्वळ एक उदाहरण!

अनेक सिनेमातले प्रसंग हे अनेक केसेस मधे गुन्हेगारांनी ती कल्पना त्या सिनेमातुन उचलली असे मान्य केल्याचे वाचनात आले आहे. उदा. जोशी - अभ्यंकर हत्याकांडात सुंगंधी स्प्रे चा वापर करुन पोलीस डॉगला माग न काढता येइल ही कल्पना आम्हाला एक इंग्रजी सिनेमा पाहुन आल्याची कबुली गुन्हेगारांनी दिल्याचे स्मरते.

काही अचाट कल्पना गुन्हेगार फक्त सिनेमातुनच उचलतील असे नाही. पोलीस चातुर्य कथात अनेक गोंष्टी दिलेल्या असतात. ज्याचा वापर गुन्हेगार करु शकतात. खास करुन चेक्स फोर्जरी / बँकींग सारख्या गुन्हा शिकलेले लोक करतात. / करु शकतात.

यावर कसे नियंत्रण करावे ?

ते सरसकट काढावे असे मी म्हणत नसून ते एकदा नीट विचारांत घ्यायला हवे आहे असे मी म्हणत आहे. >> >नाही मी तसे तुम्ही म्हणत आहात अशा अर्थाने ते लिहीलेले नाही. माझ्या डोक्यात अनेकदा तो प्रश्न आलेला आहे तो मी लिहीला आहे.

येथे काउ ह्यांनी म्हंटलेल्या वाक्याचा टोन कसाही असला तरी ते एक चिंत्य विधान आहे.

काहीही वाईट दाखवायचेच नाही असे म्हंटले तर फारच अवघड होईल. किंबहुना, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो आणि समाजही चित्रपटातून अनेकदा काहीबाही शिकतो हे विचारात घेतले तर वाईट गोष्टी दाखवायला लागणे हे आवश्यकही आहे. जसे क्राईम पॅट्रोल किंवा इन्डिया फाईट्स बॅक ह्या मालिका गुन्हेगारी दाखवतात ती दाखवली जाणे आवश्यकही आहे. पण रंजकतेच्या नावाखाली काहीच्या काही दाखवणे हे मुळात आपल्या तात्त्विक अधिष्ठानाशी विसंगत आहे का व त्याचे काही दूरगामी परिणाम होतील का ह्याचा विचार व्हायलाच हवा.

उदाहरणार्थ - इस्लाम सबकुछ मानणार्‍या समाजात तुम्ही अल्लाह वगैरे काही नसते असा विचार प्रकाशित करायला गेलात तर तेथील सेन्सॉर बोर्डसारखी संस्था ते प्रकाशित होऊ देणार नाही. पण आपल्याकडे नटवरलालमध्ये किंवा दीवारमध्ये अमिताभ शंभरवेळा म्हणतो की मी भगवान मानत नाही तेव्हा आपल्याला राग येत नाही कारण मुळातच आपल्याकडे हे मान्य केले गेलेले आहे की काहीजण ते मानतील आणि काहीजण नाही. आपले वैचारीक अधिष्ठानच तसे आहे.

ओकल्याची दृश्ये.

हॅपी न्यू इअर मध्ये, प्रोब्लेम चाइल्ड टू मध्ये, आणि इतर काही सिनेमात आहेत.

उदाहरणार्थ - इस्लाम सबकुछ मानणार्‍या समाजात तुम्ही अल्लाह वगैरे काही नसते असा विचार प्रकाशित करायला गेलात तर तेथील सेन्सॉर बोर्डसारखी संस्था ते प्रकाशित होऊ देणार नाही. >>> तिथलीच काय, पण आपलीही :). याउलट जो समाज जास्त सहिष्णू आहे, ज्या समाजात लिबरल विचारांचे लोक प्रबळ आहेत त्या समाजाबद्दल लिबर्टी जास्त घेतली जाते. अमेरिकेतही ख्रिश्चन धर्मातील गोष्टींबाबत जितकी टीका, विनोद होतात तितके ज्यूंबद्दल होत नाहीत.

(हे खालचे वरच्या शी संबंधित नाही)
शोलेतील मूळ शेवट-ज्यात ठाकूर गब्बरला मारतो- सेन्सॉरनेच बदलायला लावला होता. विजय आनंदचा 'राम बलराम' हा आख्खा पिक्चर आणीबाणीच्या काळच्या सेन्सॉर च्या भयामुळे डम्ब डाउन करावा लागला होता.

अहो फार पूर्वी अमिताभ बच्चन पान खाऊन थोबाड लालेला करून ओठांवरून रंगित लाळ गाळत, रस्त्यावरच पचापचा थुंकताना दाखविला आहे. गाणे होते खैके पान बनारस वाला.....
त्यानंतर गल्लोगल्ली/रस्तोरस्ती पानांचे ठेले व थुंकणार्‍यांचे थवे यांचे पेव फुटले होते असे आजही स्मरते.
तिच गत त्या आधीच्या सिगारेटी फुंकुन दाखविणार्‍यांची.
याच अमिताभ बच्चनवर चित्रित झालेले गाणे आहे जे ऐकले की गीतकार/संगीतकार/दिग्दर्शक व नट यांचे कानाखाली जाळ काढावासा वाटतो. गाणे होते "मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है... जिसकी बिवी मोटी...."

चित्रपट (व हल्ली टीव्ही) हे माध्यम संस्कारक्षम असते तेव्हा सुयोग्य संस्कार होण्याकरताच ते वापरले जाणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही.

यावर पूर्वीही मी कुठेतरी लिहीले होते, की प्रेक्षकांच्या निव्वळ शारिरीक सेक्स्युअल भावना उद्दीपित करू पहाणारी शब्दरचना/दृष्ये समाजास विघातक परिस्थितीमधे नेऊन ठेवतील.

लहान मुलांना अती आगाऊ दाखवणे चीड आणते. त्या बिचार्या मुलाच्या कामाचे कौतुक न वाटता त्याला दिलेल्या संवादांचा आणि हावभावांचाच राग येतो, उदा. कुछ कुछ होता है मधली फक्त ८ वर्षांची मुलगी वडील व त्यांच्या जुन्या मैत्रिणीला एकत्र आणायला इतके उपद्व्याप करेल हे मला आजही खरं वाटत नाही. >>>

त्याच बरोबर पार्टनर मधला मुलगा इतका आगाव का दाखवला आहे ??? एक वेळ सलमानचे मर्कटलिला परवडल्या पण त्यामुलाच्या आवरा असे जोरात ओरडुन सांगावे वाटत होते

शोलेतील मूळ शेवट-ज्यात ठाकूर गब्बरला मारतो- सेन्सॉरनेच बदलायला लावला होता>>

ऑरिजिनल शूट केलेला सीन युट्युबवर पाहीला होता ते आठवलं. Happy

फारएण्ड - लेटेस्ट प्रतिसादाशी सहमत!

लिंबूभाऊ - मेरे अंगनेमे हे एक बीभत्स गीत होते (अमिताभचे व्हर्जन आणि गाण्याचे बोलही) (राखीने गायलेले व्हर्जन निदान बघायला ओके होते, पण बोल तसलेच)

अमिताभ जितका ग्रेट अभिनेता आहे तितकाच एक पिढी 'बच्चन' बनवण्यास कारणीभूतही आहे. आता तो स्वतः, त्याचे कथालेखक, दिग्दर्शक, निर्माते, संवादलेखक हे सगळे त्यात आले.

शोलेतील मूळ शेवट-ज्यात ठाकूर गब्बरला मारतो- सेन्सॉरनेच बदलायला लावला होता. >> तेव्हा पोलीसांची प्रतिमा जनमानसात चांगली होती आणि थोडाफार तरी दरारा होता. म्हणुन सेन्सॉर ने पोलिसांना महत्व द्यायला लावले.
(हे बहुदा त्याच्या पुस्तकामधे स्पष्टीकरण दिले आहे)

अनेक सिनेमातले प्रसंग हे अनेक केसेस मधे गुन्हेगारांनी ती कल्पना त्या सिनेमातुन उचलली असे मान्य केल्याचे वाचनात आले आहे. >>>>>
सिनेमाच कशाला ? क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया मध्ये गुन्हेगारांनी वापरलेली युक्ती वापरून गुन्हा केल्याच्या २-३ बातम्या पेपरमध्ये वाचल्या आहेत.

सुमार विनोदी अभिनेत्याला पोलिस अधिकारी म्हणून दाखवणे हेही तितकेच निंदनीय आहे. म्हणजे शासनाने जनतेच्या संरक्षणासाठी एक यंत्रणा उभारायची, त्या यंत्रणेतील काही किंवा मेबी बरेच अधिकारी भ्रष्ट आहेत हे जगजाहीर आहे म्हणून सिनेमावाल्यांनी त्यांची निंदा होईल अशी दृश्ये (धन्यवाद मयेकर) घ्यायची आणि पराकोटीची निंदा करायची. ह्यातून पुन्हा जनता म्हणणार की पोलिस असलेच असतात.

उदाहरण - पूर्वीच्या यह जो है जिंदगी मालिकेतील 'ये क्या हो रहा है' हा सुप्रसिद्ध संवाद म्हणणारा नट एका चित्रपटात एक फालतू इन्स्पेक्टर दाखवला आहे. बहुधा त्याचे नांव टिक्कू तलसानिया की असे काहीतरी आहे. तो त्या चित्रपटातही 'ये क्या हो रहा है'वाला टोनच वापरत वागत असतो.

(आणि हो, मुळात तो चित्रपट विनोदी नव्हता)

लीडिंग अ‍ॅक्टर कित्ती कित्ती महान माणूस आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांना क्षुद्र रंगवणे विचित्र आहे.

आपल्या सगळ्यांना 'हम' मध्ये अमिताभ जेव्हा रजनीकांतला खालील वाक्य ऐकवतो तेव्हा कुठेतरी फार बरे वगैरे वाटते.

"तुमने अपनी तालीम किताबोंसे हासिल की है, मैने अपनी तालीम उनके बीच रहकर हासिल की है! उनसे मैही निपटसकता हूं, तुम या तुम्हारी पुलिसफोर्स नही'

पण प्रत्यक्षात हे विधान किती अवास्तव आणि अतर्क्य आहे.

दिदे - हो. पण सलीम-जावेदच्या पटकथांमधे पोलिसांना कायमच चांगल्या शेड्स मधे दाखवलेले आहे. नंतरच्या अ‍ॅक्शन चित्रपटांनी पोलिसांचे कधी कधी कार्टून केले तसे सलीम जावेद नी सहसा केले नाही (बहुधा कधीच नाही). जंजीर, दीवार, शोले, शक्ती, शान, डॉन, दोस्ताना सगळीकडे तोच पॅटर्न आहे.

येथे पोलिस पोहोचेपर्यंत ठाकूर मारून टाकतो असा सीन होता. तो नसता बदलला तरी चालले असते.

बेफी तुम्हीच विचार करा जर ३ ईडियट्स मधले तेच प्रसंग तेव्हड्या टोकाचे दाखवले नसते तर तुमच्या पर्यंततरी त्यातले विचार पोहचले असते का? मला याच उत्तर नाही अस येतय.
चित्रपट पहाताना निखळ मनोरंजन व्हाव पण त्यातुन काहीतरी चांगले मेसेजपण मिळावेत.
आमचा कॉलेजमधला गृप असलेच आचरट उद्योग करणारा होता. जर ३ ईडियट्स हा चित्रपट आम्हाला त्याचवेळेस पहायला मिळाला असता तर नक्कीच फरक पडला असता. आणि हे आमच्या पुर्ण गृपने पण चित्रपट पाहिल्यानंतर लगेच मान्य केल होत.
रॅगिंगचा सीन खर्‍या आयुष्यातुन उचलेला आहे. आणि जे कॉलेजमधे १५-२० वर्षापुर्वी रॅगिंग द्यायचे / करायचे त्यांना तो त्याच वेळेस माहीत होता.
जर असाच अ‍ॅटीट्युड ठेवला तर रामायण तरी कस पहाणार त्यात पण रामाला कारण नसताना वनवासाला जाव लागतच ना? रावण सीतेला पळऊनच नेतो ना?
महाभारत पण कस पहाणार त्यात पण हे अस बरच काही आहे.

मला वाटत की अ‍ॅटलिस्ट आपण जेंव्हा अशे चित्रपट पहातो त्यावेळेस आपल्या मुलाबाळांना / आजुबाजुच्या पोराटोरांना त्यातला मेसेज काय आहे तो समजाऊन घेण्यासाठी मदत करावी. हे करताना त्यांच्यातलच होऊन केल तर ते त्यांना जास्त लवकर पटत.

पण सलीम-जावेदच्या पटकथांमधे पोलिसांना कायमच चांगल्या शेड्स मधे दाखवलेले आहे. >>

अन्यायच्या विरोधात उभे राहणे ठिक आहे पण एखाद्याला त्याअन्यायची शिक्षा स्वतःच देणे हे दाखवणे चुकिचे आहे त्यासाठी पोलिस आहेत बहुदा असे सुचवायचे असेल तेव्हा

सुशांत,

तुम्ही पुन्हा तेच लिहीत आहात. पण तरी ठीक आहे.

आता त्यावरचे आणखी एक उत्तर लिहितो.

आचरट प्रसंग दाखवायचेच असले तर त्या प्रसंगांनंतर संबंधितांना जबरदस्त अद्दल घडली हेही दाखवायला हवे.

दारू पिऊन रात्रभर वर्गात शेवटच्या बाकावर नशेत झोपलेला विद्यार्थी अचानक लेक्चरमध्ये जागा होतो हे अवास्तवही आहे आणि तसे केल्यास त्याला अद्दल घडलेली दाखवायला हवी होती. अद्दल घडू शकेल अशी फक्त समज देणे नव्हे!

पण रॅगिंग ला प्रत्युत्तर देताना कोणतेही पाणी वापरण्याचे दृश्य दाखवले असते तरी चालले असते. शॉक देणे हाच भाग महत्त्वाचा होता. पटकथा लेखक सहज काहीतरी करू शकला असता. लघवीच्या सीन ने उगाच ओंगळपणा आला त्यात.

सुशांत,

तुम्ही पुन्हा तेच लिहीत आहात. पण तरी ठीक आहे.

बेफी मी लिहीपर्यंत इथ पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेल.

अद्दल अट्ट्ल गुन्हेगारांना घडवावी ना की कॉलेज मधल्या वाट चुकलेल्या मुलांना.

फारएण्ड
मला नाही पटल तुमच मत. उत्तर तेच त्यातुन तेव्हडा परीणाम साधला गेला नसता.

३ईडीयत्ट विषय माझ्याकडुन बंद

तुम्ही हे ज्यांना सांगत आहात ते वाचक आणि तुम्ही स्वतः त्या सीनमधून काय सांगायचे होते हे समजण्याच्या क्षमतेचे मुळातच आहेत. त्यामुळे ते आपापसातच समजावून सांगण्याने काही साध्य होणार नाही.

विषय चालला आहे तो समाजातील अश्या घटकांवर होऊ शकणार्‍या परिणामांचा ज्यांना त्यात नेमके काय दाखवायचे होते हे न समजता ते कसे दाखवले गेले इतकेच लक्षात राहील. आशा आहे की ह्याउप्पर तुम्ही इतरांना अधिक काही कन्व्हिन्स करू पाहात नसाल.>>>>>>मला तो सीन खटकला .......कारण हमेशा कोणत्याही सिनेमात पुरुषाने स्त्री वेश धारण करून विनोद निर्मिती करणे हे मला पटत नाही. यातून स्त्री वेश धारण केलेला पुरुष म्हणजे अगदीच हा...वैगरे दाखवला जातो. मला कोणाला हि कन्विन्स करायचे नाही......आमच्या कॉलेज मध्ये ओड ड्रेसिंग डे ला एक मुलगा, सलमान खान हम आपके है कौन चित्रपटात दीदी तेरा देवर दिवाना मध्ये pregnent स्त्री सारखा घातलेला (हो अगदी तसाच) ड्रेस घालून आला होता तेव्हा आमच्या प्राध्यापकांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
आणि शीर्षकात लिहिले आहे न चित्रपटातील खटकलेली प्रसंग म्हणून मी प्रसंग येथे लिहिला.

कोणतेही पाणी वापरण्याचे दृश्य दाखवले असते तरी चालले असते<<<

हे मलाही नाही पटले. त्यात अद्दल घडवण्याचाच प्रसंग दाखवायचा होता व अपेक्षित परिणाम केवळ लघुशंका दाखवल्यामुळेच साधता आला ह्या सुशांत ह्यांच्या मताशी सहमत!

मला वेगळेच म्हणायचे आहे. एकुणच रॅगिंग करणार्‍यांना नंतर जबरदस्त अद्दल घडली हे दाखवणे ही त्या चित्रपट निर्मीती संचाची जबाबदारी नाही का? तसे सेन्सॉरने त्यांना कन्व्हिन्स करायला नको का, ह्यावर विचार व्हायला हवा आहे.

रेल्वे सुधारणांच्या धरतीवर आपण संबंधितांना पत्र पाठवून सुचवले तर? नाहीतरी सेन्सॉर बोर्ड अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला आहे. आता पुढचा कोण येईल त्याने तरी चांगले काम करावे असा आग्रह आपल्याला धरता येईल.

एकुणच रॅगिंग करणार्‍यांना नंतर जबरदस्त अद्दल घडली...
आहो जन्माची अद्दल घडलीये हेच दाखवलेय त्यात..... आठवा पाहु शॉक कुठे आणि कसा बसतो ते आणि नंतर्ची किंकाळी....

>>>आठवा पाहु शॉक कुठे आणि कसा बसतो ते आणि नंतर्ची किंकाळी....<<<

कर्म माझं! आता काय बोलू तुमच्यापुढे?

अहो त्या सगळ्यांना संस्थेने नंतर अद्दल घडवलेली दाखवायला हवे होते असे म्हणतोय. महान महान आमीर खान साहेबांनी अद्दल घडवली ते स्वतः हिरो ठरण्यासाठी, पण समाजात असे कोणी करू नये म्हणून जरब बसावी म्हणून संस्थेने सर्वांनाच नंतर शिक्षा केली हे दाखवणे आवश्यक आहे असे म्हणतोय.

संस्थेने, आमीर खानने नव्हे!

हिंदीमधल्या तद्दन गल्ल्भरू आणि मसाला चित्रपटात असले सीन्स ढिगाने असतात आणि आपण हे तर 'मासेस'चे चित्रपट म्हणून सोडून देतो . मात्र काही लोक ज्यांना चांगले अभिरुची संपन्न कलाकार/ दिग्दर्शक वगैरे म्हणतात त्यांच्या चित्रपटात असले सीन्स मुद्दाम दुर्लक्षित केले जातात. थ्री इडियट्स मधले भाषण '**त्कार, आणि धन ऐवजी स्तन' वगैरे मारून मुटकून केलेले उल्लेख तर अत्यंत थर्ड ग्रेड प्रकार होता मात्र प्रेक्षक लोक्स (स्त्री-पुरुष दोन्ही ) उगाचच हसत, चेकाळत होते. (कदाचित २५०-३०० रुपये घालवून 'क्लासवाला' पिक्चर पाहायला आलोय तर हसायलाच हवे या हेतूने!). तसेच तोहफा कबूल किजिये म्हणताना जे काही दाखवणे, प्रसूती होतानाचा प्रसंग आदी दृश्ये थिल्लर, चीप या प्रकारात मोडणारीच होती.

प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे, सुरुवातीला रॅगिंग केलेले दाखवणे, सतत पार्श्वभाग दाखवून 'तोहफा कबूल हो' म्हंटले जाणे हे सगळेच एक तर किळसवाणे किंवा तिरस्करणीय होते. +१

Pages