चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,
शाहरूखचा विषय निघताच त्याचे ‘बादशाह’ या चित्रपटातील एक गाणे आठवले.. "मै तो हून पागल".. ज्यात तो गोंधळ घालून पळताना त्याला पोलिस गाठतात आणि मग तो गुणगुण गाणे गात त्यांना गुणगारा देऊन निसटतो. अर्थात हि जिम कॅरीच्या मास्क चित्रपटावरून केलेली उचलेगिरी आहे. पण यात एक महिला पोलिस अधिकारी, ज्या विनोदी कम उत्तान पद्धतीने नाचताना दाखवली आहे, ते नेहमीच मला हा चित्रपट पाहताना खटकते. (बादशाह मी किमान बारा वेळा पाहिला आहे), पण ते द्रुश्य तेवढे विनोदी कमी आणि आचरट जास्त वाटते.

वर बेफिकीर यांनी शाहरूख आणि प्राध्यापक जोडीचे उदाहरण दिल्याने सर्वप्रथम मला आठवतो तो, मै हू ना, चित्रपट!
चित्रपट तसा सुपरहिट! मात्र यातही एकूण एक प्राध्यापकवर्गाला मस्करीचा विषय बनवण्यात आले होते. एक असतो तो (सतीश शाह) मुलांच्या तोंडावर थुंकी उडवणारा, एक मॅडम असतात (बिंदू) त्या मुलांना पकडून पकवणार्‍या, शाहरूख हा आपला स्टुडन्ट आहे माहीत असूनही त्याच्याबद्दल मनात वेगळ्या भावना ठेवणार्‍या, प्रिन्सिपल (बोमन इराणी) कमालीचा धांदरट आणि विसरभोळा, हिरोईन मॅडम (सुश्मिता सेन) यांच्याबद्दल बोलायलाच नको. थोडक्यात प्राध्यापक नामक सॉफ्ट टारगेट यात पुरेपूर वापरले होते.

अर्थात नक्कीच हा कथा-पटकथा-कार, दिग्दर्शक, आणि कोरीओग्राफर यांचा भाग झाला. मात्र मुख्य अभिनेत्याचीही जबाबदारी असतेच. सहमत!

सेन्सॉर बोर्ड फक्त अश्लील आणि हिंसक द्रुष्यांना कात्री लावते, तसेच कोणा समूह वा संघटनेच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा अ‍ॅक्शन घेते. मात्र अशी द्रुष्ये कोणाला खटकू शकतात वा आक्षेपार्ह वाटू शकतात असा विचारही त्यांच्या डोक्याला शिवत नसेल, वा कदाचित समजून उमजूनही चलता है म्हणत कानाडोळा करत असतील.

पण आपल्याला अश्या आक्षेपार्ह द्रुष्यांची इथे यादी करत चर्चा करायला हरकत काय आहे. सर्वात मोठा सेन्सॉर बोर्ड जनता जनार्दन. तेवढेच प्रत्येकाचे चित्रपटांकडे बघण्याचे दुष्टीकोन समजतील.

तर येऊ द्या लोकहो, तुम्हाला चित्रपटातील खटकलेली, तरीही सेन्सॉर बोर्डाने न कापलेली, तुमच्यामते आक्षेपार्ह द्रुष्ये! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणी सुचवेल का या आधीच्या चर्चेतुन जे मुद्दे आलेले आहेत ते नसलेले मनोरंजक चित्रपट. आर्ट फिल्म्स / डॉक्युमेंटरी / बायोग्राफी टाईप फिल्म नसाव्यात.

मनोरंजक चित्रपट>सुशांत ह्रीषिकेश मुखर्जींचे सिनेमे. आता तसे नर्म विनोदी मध्यमवर्गीय जीवनावरचे चित्रपट बनतच नाहीत. एकतर राज रोहित एनाराय मसाला नाहीतर देशी हाणामारी व्ह्ल्गर पणा नाहीतर शिप ऑफ थीसस धोबीघाट सारखे.

>>>यात तुम्हीच पहा तुम्हाला कोणती भुमिका चांगली वाटते. जबाबदारी ढकलणे की चला आपण मिळुन करुयात.<<<

सुशांत,

तुम्ही दिशाहीनपणे चर्चा करत आहात असे खेदपूर्वक म्हणावे लागत आहे. आधी तुमचा मुद्दा थ्री इडियट्समधील ते दृश्य योग्य आहे हा होता. मग तुम्ही त्या दृश्याच अर्थ सांगत राहिलात. मग त्यातील मेसेज सांगत राहिलात. त्यानंतर तुम्ही योग्य मेसेज पालकही मुलांना देऊ शकतात म्हणालात. आता म्हणत आहात की पालकांनी देणे योग्य की सेन्सॉरने आणि पुढे म्हणत आहात की सरकारवर जबाबदारी ढकलू नये.

मी प्रथमपासून धाग्याच्या मूळ विषयाशी सुसंगत तितकेच बोलत आहे.

धागा 'चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये' ह्या विषयावर आहे व त्या धाग्याखाली कोणीतरी ह्या थ्री इडियट्समधील दृश्याचाही उल्लेख केलेला आहे. त्या अनुषंगाने मी इतकेच म्हणत आहे की सेन्सॉर बोर्डाने विचार करावा की रॅगिंगशी संबंधितांना कॉलेजने शिक्षा केली हे दाखवले जायला हवे की नको.

उगाच काय शाब्दिक खेळ करत बसला आहात?

>>>मला कोणी सुचवेल का या आधीच्या चर्चेतुन जे मुद्दे आलेले आहेत ते नसलेले मनोरंजक चित्रपट. आर्ट फिल्म्स / डॉक्युमेंटरी / बायोग्राफी टाईप फिल्म नसाव्यात.<<<

अभिमान

कभी कभी

आनंद

बावर्ची

असे अनेक आहेत.

तुम्ही राज कपूर नर्गीस ह्या जोडीचे चित्रपट पाहिले आहेत का? किंवा निव्वळ राज कपूरचे? तेही तुम्ही विचारलेल्या निकषांच्या यादीत बसतील.

आवारा
चोरी चोरी

ह्यासारखे अनेक!

१) मला टिपीकल सासु -सुन छळाचे सीन अजिबात आवडत नाहीत.कमॉन यार .. काहीतरी वेगळ दाखवा.. अस नेहमी वाटत मला.
२) आताही मराठी चित्रपटांमधे जर एखाद गाण बागेत शुट केलेल असेल आनि कोरीयोग्राफी आनि म्युझिक भलती कडेच जात असेल तर माझी जाम चिडचिड होते.
३) एखाद मुद्दाम तयार केलेल विनोदी पात्र ( बॉडीगार्ड चित्रपटांतला तो जाड माणुस (इथे ही मुद्दाम शारीरीक ठेवण ह्यातुन विनोद करायचा प्रयत्न )), जे काहीही बोलत्,खेळत्,उड्या मारत पण अजिबात हसु येत नाही.अश्या सगळ्या चित्रपटांमधले सगळे सीन्स.
४)अजुन बरीच लिस्ट वाढवता येइन.आता इतक पुरे.

बेफी तुमची लिस्ट
आवारा - मान्य
चोरी चोरी - मान्य
अभिमान - मान्य
कभी कभी - नाही सांगु शकत
आनंद - मान्य
बावर्ची - मान्य
अंगूर - नाही सांगु शकत
उमराव जान - मान्य नाही
एक रुका हुवा फैसला - नाही सांगु शकत
आराधना - मान्य
कटी पतंग - मान्य
मेरा नाम जोकर (त्यातले बोल्ड सीन्स सोडुन)

यात नविन चित्रपट - मला जे वाटत्तात ते
३ ईडीयट्स
जिंदगी ना मिलेगी दोबारा
मद्रास कॅफे
स्वदेस
चक दे
ईक्बाल
बर्फी
जुने जसे आठवतील तसे अ‍ॅड करतो
येक खाजगी प्रश्न. तुम्हाला चित्रपटांचे नाव विचारले तर पहिले तुम्ही राज कपुरचे सांगितलेत. तुम्ही सुद्धा राज कपुरच्या चित्रपटांचे चाहते आहात का? (सगळ्याच नाही)

कोकण्स्थ तुमच्या साठी ते बरोबरच होत.
मला आज विशेष वाटतय की तुम्ही फारच गप्प आहात या धाग्यावर. काहीच माहीतीपुर्ण प्रतिसाद नाहीत तुमचे.

<मी प्रथमपासून धाग्याच्या मूळ विषयाशी सुसंगत तितकेच बोलत आहे.> अस फक्त तुमच मत आहे.
माझ्या साठी ते वरवर विचार करण आहे.

>>>अस फक्त तुमच मत आहे.
माझ्या साठी ते वरवर विचार करण आहे.<<<

बरं! Happy

ह्यापुढे ह्या धाग्यावर तुमच्याशी चर्चा बंद! Happy

र्‍ऋन्मेष अजुन एक यशस्वी धागा काढल्याबद्दल अभिनंदन
काहींचा तिळपापड झाला असेल पण ते तसे दाखवत नाही बहुदा दुसरीकडे त्रागा करत आहेत तुम्ही दुर्लक्ष करा Wink त्यांना तुमचे यश बघवत नाही Rofl

सुशांत, यातल्या अनेक गोष्टी सापेक्ष आहेत. म्हणून फक्त वाचनमात्र आहे इथे. आणि मला असं वाटतं की आपणही आणि सेन्सॉर बोर्डही दोघांनीही पावले उचलायला हवीत. त्यामुळे बेफींचे पटते आणि थोडे तुमचे.

आणि तुमचे काही प्रतिसाद वाचून बेफी तुम्हालाच म्हणत आहेत "आवरा" असं मला वाटलं, जे योग्यच झालं असतं. Happy

बाकी मुलांच्यातलंच एक होऊन त्यांना सांगायला पाहीजे हा फार्रफार्र क्रांतीकारी उपाय सुचवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. म्हणजे सगळ्यांनी मुले बघत असताना त्यांच्या शेजारी बसुन मार्गदर्शन करायचे. म्हणजे सगळ्यांनी आधी सहकुटुंब तिकीटे काढून सिनेमा बघायचा. म्हणजे मुलांणी सिनेमा बघताना आई-बापाला शेजारू बसवून सिनेमा बघायचा. Proud

ह्यापुढे ह्या धाग्यावर तुमच्याशी चर्चा बंद!
गुड. म्हण्जे मी तुमचे मुद्दे खोडु शकतो / मान्य करु शकतो. पण तुम्ही काहीच म्हण्नार नाहीत. अनुल्लेख वगैरे पण म्हण्णार नाहीत.

अहो मी इथेच आहे की कोकणस्थ!

चित्रपटासारख्या निव्वळ विरंगुळ्याच्या आणि गप्पाटप्पांच्या धाग्यावरही आपापल्या राजकीय भूमिकांमधून बाहेर पडून वावरता येत नसल्याची उदाहरणे पाहात मौज घेत आहे. चिंता नसावी. Happy

रानी मुखर्जीचा राजा की आयेगी बारात
आक्षेपार्ह जास्त काही नसावे)बरेच पूर्वी पाहिला होता) पण कथा म्हणून पूर्ण पिक्चर जबरदस्त खटकण्यातला आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Raja_Ki_Aayegi_Baraat
अंजामः शा खा ने माधुरीचे इतके वाईट करुनही शेवटी त्याचा सूड घ्यायला तिला स्वतःलाच मरावे लागणे. तेही आधी सेवा इ.इ. करुन त्या नालायकाला माणसात आणून मग. (या चित्रपटात माधुरीचा जेलमधील गर्भपात इ. दृष्ये भयंकर आहेत. परीणामकारक दृष्ये आणि अनावश्यक भडक दृष्ये यातली सीमा बरीच धूसर आहे. )

परीणामकारक दृष्ये आणि अनावश्यक भडक दृष्ये यातली सीमा बरीच धूसर आहे.<<<

मुद्याशी सहमत, पण ती सीमारेषा धूसर नसून तिच्याकडे सर्रास कानाडोळा केला जातो. Happy

व्यक्तीसापेक्ष आहे म्हणायचं होतं.
मला जे भडक वाटेल तेच एखाद्याला 'असं आहे म्हणून तर लक्षात राहतं' वाटू शकतं.
पण एखादं सो कॉल्ड परीणामकारक दृष्य प्रेक्षकांच्या डोळ्यावर किती वेळपर्यंत मारत रहायचं हा चर्चेचा मुद्दा आहे.

त्याशिवाय, प्राचार्यांच्या दारासमोर नशेत लघुशंका करणे, सुरुवातीला रॅगिंग केलेले दाखवणे, सतत पार्श्वभाग दाखवून 'तोहफा कबूल हो' म्हंटले जाणे हे सगळेच एक तर किळसवाणे किंवा तिरस्करणीय होते. >> +१

पण ह्या पेक्षा बीभत्स scene आहे Student of the year सिनेमा मधे. ह्यात फुटबाल च्या मेडीकल exam साठी urine sample submit करायला सांगतात आणि ते नंतर रोनित रॉय च्या घरी नेउन देतात. रोनित रॉय त्याला गंगाजळ समजून आपल्या बायको आणि मुलावर शिंपडतो .
किती हीन पातळी वरचे विनोद आहेत हे.

मुझसे शादी करोगी चित्रपटात सलमान प्रियांका च्या वडिलांना (अमरीश पुरी) सारखा काही न काही कारणाने मारत असतो असं दाखवला आहे, आणि हे सगळा घडून गेल्यावर सुद्धा अमरीश पुरी त्यांच्या लग्नाला होकार देतात. ह्यातून पण खूप चुकीचा संदेश जातो

मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत अजून म्हणून माहिती नाही पण या दृष्टीने मला तो विकी डोनर तर फारच चीप वाटतो.

Pages