वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाईल्ड हे काय नाव आहे का?त्यात त्या बियरच्या ब चे पोट पण फोडलेले दिसत नाहीये. Lol

इतक बी कळना व्हय. म्याच लिवलाय तो बोर्ड.
त्यातला 'ईट' आहे ना तो आय. टि. मधला आहे. इन्फोर्माशन टेक्नोलोजी इज क्लोज्ड. Happy

हजार पोस्टी पूर्ण करण्याबद्दल. Proud

(अजून बारावंच पान चालू आहे, अशाने जीएसने एवेएठिशी संबंधित पोस्टी कुठे टाकायच्या?! :P)

ती डोक्याला तीन टाके पडलेली स्त्री यावेळीही येणार आहे का? तेवढाच यावेळी नविन येणार्‍यांना तिचा आधार! आणि बुवा ते चावरं कुत्रं घेऊन येणार नाहीयेत ना?

मंडळी, काल आम्ही, "वरातीमागून घोडं" चा एक भाग उरकला. तुमच्या "वरातीमागून घोडं" चा हा मिनी प्रकार (फक्त दोन माबोकरणी) असल्यामुळे "वरातीमागून पोनी" म्हणा हवं तर! ( ह्याचा मैत्रेयीच्या चित्राशी काही संबंध नाही. चित्र भन्नाट आहे!)
एबाबांनी फक्त २० तासांची नोटीस व जास्त सुगरणपणा दाखवायला गेलात तरी ते मोजकंच खाणार अशी धमकी दिल्यामुळे आम्हीही हात आखडता घेतला. ( आम्ही दोघी विशिष्ट शहरातल्या आहोत हे सांगणे न लगे! पण एबाबांचा जावई पण "आमचेवाला" असल्यामुळे त्यांची "आपलेच दात व आपलेच ओठ" अशी अवस्था झालेली पाहून आम्हाला झालेला आनंद काय वर्णावा!) असो.
तर आमचा मेनू -
पेय- पाणी व रंपा
अ‍ॅपीटायझर- ढो़कळा
जेवण - कैरी-हळद लोणचं, कारळ्याची चटणी, टोमॅटोची कोशिंबीर, भो. मि.ची भाजी, कोबीची भाजी, पालकाची ताकातली पातळ भाजी, पोळ्या, भात, आणि शेवयाची आमरस घालून खीर

आमच्या "वरातीमागून......"ला एक चतुर्थांशच वर्‍हाड होतं तरी ते तुमच्या आधी झालं हे नम्रपणे नमूद करु इच्छिते. नव दांपत्य व नव साबा - साबु यांचे फोटो अप्रतिम आहेत. (सां. का. ला काय याची चिंता नको.)

तुमच्या ".... च्या घोड्या" ला शुभेच्छा.

त. टी. - एबाबांनी प्राचीच्या लग्नाचे लाडू दिले. ते न्यू जर्सीत बनलेले होते. बरे आहेत. पण तुम्हाला जर पुण्याहून आलेले लाडू मिळाले, तर सांगा. ह्या पक्षपातीपणाचा माफक सूड काढण्यात येईल. तसंच, मैत्रेयी, अजिंक्यला निरोप पोचव की डरनेका नय, हम तुम्हारे साथ है!

मै चं चित्र चुकलेलं आहे.... अश्वमेध असला तर..
काल फिनिक्स मधे दिसला, उद्या बारा त बारात..
परवा अजून कुठे... ? Proud

After reading the menu in header and ingredients of my dish I have decided to use कडुलिंब instead of mango pulp. Healthier.

बर्का, आपापले पदार्थ गरम/ थंड करायला आपापली भांडी किंवा डिस्पोजेबल ट्रेज आणा Happy Happy
माझ्या डिशवॉशर ने मान टाकली आहे नेमकी आत्ताच!

गरम करायला आपापले मायक्रोवेव्ह आणा असं पटकन डोक्यात आलं म्हणून परत वाचलं. Happy

Pages