Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16
सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्वानद्वेष्टे नका हो म्हणू
श्वानद्वेष्टे नका हो म्हणू त्यांना........ उद्दाम, माजलेल्या, गलिच्छ श्वानप्रेमींच्या बेजबाबदार वर्तनाने त्रस्त झालेले, अत्यंत जबाबदार व सुजाण नागरीक आहेत ते.
(No subject)
कायदेशीर बाबींचा तपास केला
कायदेशीर बाबींचा तपास केला असता असे आढळून आले की कोर्टाच्या निर्णयानुसार
१. कुत्र्याला फिरवताना त्याचे तोंड बांधून फिरवणे हे क्रूरपणाचे असून असे करण्यास भाग पाडण्यासाठी कायद्यात दंडाची तरतूद आहे....
२. सोसायटी कुत्रेमालकाना व कुत्र्याना लिफ्टचा वापर करण्यापासून रोखू शकत नाही. सोसायटीला तसा अधिकार नाही तसेच हे ही प्राण्यांना क्रूरपणे वागवणे ह्या सदराखाली येते व अश्या दोन केसेस मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार सोसायटीला ५०००/- चा दंड भरावा लागला आहे.
३. पाळीव कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याबाबत, कायदा थुंकणे, कचरा टाकणे हाच लागू होतो. शिक्षा / दंड मालकास भरावा लागतो, कुत्र्यास नाही.
प्राणी पाळणार्यांस कोणी त्रास दिल्यास जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवता येऊ शकते. सेक्शन ११९-२२-५१ अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.
येस्स.......
आमच्या सोसायटीतील अर्ध्या
आमच्या सोसायटीतील अर्ध्या भागाचा चेअरमन पण टोकाचा श्वानद्वेषी आहे. त्याने एका पपीला मारले आहे व
जनरली उखडून असतो. त्याचा संपर्क होउ नये म्हणून मी त्याच्या बाहेर फिरण्याच्या वेळा चुकवून कुत्रे फिरवून आणते. पूर्वी वॉचमन्सशी हॅलो हाय विश करणे इत्यादी क रत असे पण आम्हाला नीट वागवल्यास किंवा थोडीशी देखील सवलत दिल्यास ( जसे एक कचर्या सारखा भाग आहे तिथे कुत्र्यांना जाउ देणे इत्यादि) तर तो चेअरमन त्यांना रागवतो. म्हणजे शि व्याच देतो. } म्हणून वॉचमन्स शी संपर्क बंद केला आहे. अगदी कामा पुरतेच बोलते. चेअरमन लिफ्ट घे णार असल्यास बाजूला थांबते किंवा तो असल्यास काही तरी स्तोत्र डोळे मि टून म्हणते. तो वस्स करून अंगावर आला नाही म्हणजे जिंकली असे आमचे डॉग वॉकचे पॅरामिटर आहे. डॉग्स आर ब्लिस फुली अन अवेर ऑफ ऑल धिस.
आमची व्हेट फार स्मार्ट आत्मविश्वास असलेली अशी आहे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की सोसायटी प्रिमायसेस मध्ये तुम चे कुत्रे लीश वर पाहिजेत, लीश तुमच्या हातात पाहिजे व त्यांची इंजेक्षने व्यवस्थित दिलीली असली पाहिजेत . ते पाळते. आता यीअरली शॉट्स चे एकच इंजेक्षन असते.
अमा, व्हेट फक्त हायजिनविषयी
अमा, व्हेट फक्त हायजिनविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात. बाकी ज्ञान शून्य असते बहुत्येक वेळा त्यान्चे. चेअरमनने काहिही त्रास दिल्यास सांगा. आता मी ह्या क्षेत्रात काम करणार्या वकिलांचे कॉन्टॅक्ट्स जमवत आहे.
समजुतदारपणा न दाखवणार्या मनुष्यप्राण्यास कायद्याची वेसण घालण्याची जास्त गरज आहे.
>>>सोसायटी कुत्रेमालकाना व
>>>सोसायटी कुत्रेमालकाना व कुत्र्याना लिफ्टचा वापर करण्यापासून रोखू शकत नाही. सोसायटीला तसा अधिकार नाही तसेच हे ही प्राण्यांना क्रूरपणे वागवणे ह्या सदराखाली येते व अश्या दोन केसेस मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार सोसायटीला ५०००/- चा दंड भरावा लागला आहे.<<<
अमित,
तुम्ही कायदेशीर बाबी शोधून त्या येथे दिल्यात ह्याचे आभार! मात्र शेवटी 'येस्स - फिदी' असे का लिहिले आहेत ते समजले नाही. मूळ वाद 'ह्या कायदेशीर बाबी अस्तित्त्वात आहेत की नाहीत' ह्यावर किंवा 'हे कायदे चुकीचे की बरोबर' ह्यावर नाहीच आहे. कुत्रेमालकांचे बेजबाबदार वर्तन हा मूळ मुद्दा आहे.
आता वर कोट केलेल्या परिच्छेदाबाबतः
लिफ्टमधून जाणार्या कुत्र्याने तेथे मलमूत्रविसर्जन केले तर कदाचित सोसायटी कुत्रेमालकाकडून दंड व स्वच्छता अपेक्षित करू शकत असेल, पण नंतरही काही काळ राहिलेली दुर्गंधी, ह्या लिफ्टमध्ये असे काही होऊ शकते ही किळसवाणी भावना मनात ठेवून लिफ्टमधून जायला लागणे हे इतरांनी का सोसावे?
दुसरा मुद्दा! माझ्या माहितीनुसार कुत्रे (कुत्रे व इतर अनेक प्राणी) ह्यांचे मसल्स खूपच अधिक ताकदवान असतात. पाच मजले चढायला एका सत्तर किलोच्या माणसाला दरवेळी जमेल असे नाही, पण कुत्रा अगदी आरामात (व बहुधा अजिबात दुखावला वगैरे न जाता) तो जिना चढू शकेल. ते क्रौर्य का ठरावे? कुत्र्यासोबत कुत्रेमालकालाही जिना चढावा लागत असेल व ते त्या मालकाला कष्टदायक वाटत असेल तर निराळे!
कुत्ते की मौत द्या त्या
कुत्ते की मौत द्या त्या सगळ्यांना
https://www.youtube.com/watch?v=Tj4j1u8QLbI&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
हाही धागा वाचला
हाही धागा वाचला
माझ्याही काही जुन्या पोस्ट सापडल्या
एक कुत्रा पालक म्हणून काय आवश्यक आहे हे ज्यांना कुत्रा अजिबात आवडत नाही त्यांच्या पोस्ट वाचून लक्षात आले
आणि ते सगळे पॅरामीटर स्वतःला लावून पाहिले असता आपण अगदी 90 टक्क्याने नाही पण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतोय हे लक्षात आले
आमचा लाब्राडोर चांगल्या
आमचा लाब्राडोर चांगल्या ब्रीडर कडून घेतला आहे
त्याच्या आई वडिलांची रेकॉर्ड आहेत
याचेही जन्मापासून सगळ्या लसीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळलेले आहे
त्याला गादी सोफ्यावर बसायला परवानगी नाही आणि तो तसा हट्ट पण करत नाही
एरवी घरात मोकळाच सोडलेला असतो आणि आमचा स्वतंत्र बंगला असल्याने मागे पुढे त्याला खेळायला जागा आहे, वरती गच्ची आहे
त्याला पॉटी गच्चीत करायची सवय आहे जी मी स्वच्छ करून टाकतो
आणि फिरायला जाताना एक वर्तमानपत्र सोबत नेतो
ट्रॅक वर किंवा रस्त्यात शी केली तर पेपरमध्ये उचलून केरात टाकतो किंवा झाडी असेल तर तिथे
शु ला मात्र काही नाही पण अनेकदा तो झाडीत जाऊनच करतो शु
जास्त गर्दी असलेल्या किंवा जिथे लोकं चालायला येतात आशा ठिकाणी त्याला लीश बांधून फिरवतो पण मोकळ्या जागी त्याला खुले सोडतो आणि त्यालाही मस्त बागडत रहायला आवडते
कुठल्याही माणसाच्या अंगावर भुंकत जात नाही, चावणे तर फार लांब पण तरीही त्याला मी मोकळा सोडलेला असताना कायम नजरेच्या टप्प्यात ठेवतो आणि नो म्हणताच तो जागीच थांबून राहतो इतपत ट्रेन केलं आहे
लहान मुले सुद्धा येऊन त्याला हात लावू शकतात
अर्थात लीश लावलेला असतानाच त्यांना परवानगी देतो, चुकून काही झालं तर मला आणि त्यांना दोघांनाही मनस्ताप
भटक्या कुत्र्यांचा मात्र फार व्याप होतो ते एकतर अंगावर येतात आणि इकडून हा भुंकत जातो त्यामुळे आवरताना तारांबळ उडते त्यामुळे जिथे अशी कुत्री नाहीत किंवा कमी आहेत अशा ठिकाणी फिरायला नेतो
कोरोना असल्याने कोणी घरी येतच नाहीत पण कोणी आलं तर त्याला वेगळं डॉग गेट केलं आहे त्यात ठेवतो, तो मस्त जीभ बाहेर काढून दोन्ही पाय गेट वर ठेऊन बघत बसतो, त्यावेळी फारच कॉमेडी दिसतो
आणि इथल्या चर्चेतून इतके समजले की कुत्र्याची भयंकर भीती असणारे लोक जगात आहेत
ते कधी काळी माझ्या घरी आले तर त्यांना ह्या काय नाही करत तो असे म्हणणार नाही, दोघांना वेगळे ठेवणे शक्य आहे आणि ते केले जाईल
तुर्तास इतके पुरे
कुत्र्याची भयंकर भीती असणारे
कुत्र्याची भयंकर भीती असणारे लोक जगात आहेत...
मी आहे. लांबून जरी कुत्रा दिसला तरी मी अजून दुर जाते त्यामुळे मुले ही कुत्र्याला घाबरायला शिकताएत आणि मी नवर्याचा ओरडा खाते
मी आहे. लांबून जरी कुत्रा
मी आहे. लांबून जरी कुत्रा दिसला तरी मी अजून दुर जाते त्यामुळे मुले ही कुत्र्याला घाबरायला शिकताएत
>>>
कुत्र्यांना घाबरणेच योग्य.
कारण ते आपल्याला चावतात. आपण पलटून त्यांना चावू शकत नाही.
बागेत एखाद्या बाकड्यावर बसले असताना तिथे मुंग्या दिसल्या की कसे तुम्ही पटकन बाक बदलाल. मग कुत्र्यांबाबतही तसेच वागायची लाज कश्याला...
त्यात रस्त्यावरच्या कुत्र्यांचा काही भरवसा नसतो कधी एखादा पिसाळेल. कोण ग्यारण्टी घेणार. आणि खाजगी कुत्रेही जर मालक माजोरडा अस्स्ल तर तो मनुष्यस्वभाव कुत्र्यात उतरण्याची शक्यता असतेच.
असं झाले होतं
कारण ते आपल्याला चावतात.
असं झाले होतं
मी आणि शेजारीण मुलांना शाळेच्या बस स्टॉप वरून घरी घेऊन येत असताना घराजवळ झोपलेले कुत्रे, मुलांच्या आवाजाने उठले आणि शेजारणीच्या 2.5 वर्षाच्या मुलीला चावून माझ्या मुलाच्या मागे आले, मुलाला नाही चावले पण त्या छोट्या मुलीला इंजेक्शन चा पूर्ण कोर्स करावा लागला होता.
मग घाबरुन रहा
मग घाबरुन रहा
तेच योग्य
पुन्हा कधीच असा प्रसंग येऊ नये तुमच्या वाट्याला
हा धागा वर आला म्हणून सहज
हा धागा वर आला म्हणून सहज आठवले. सोसायटीत मास्क घालून चालणारे आमचे नातेवाईक (अँजिओप्लास्टी साठी पुण्यात यावे लागून नंतर लॉक डाऊन मुळे मूळ घरी जाता न आलेले आणि सर्जरी नंतर ४५ मिनिटे चालण्याचे पथ्य असलेले) आणि कुत्रा समोरासमोर आले. आणि बाजुने कार जात होती. रस्ता अरुंद नव्हता. आणि हे नातेवाईक आणि ते कुत्रं एकमेकांना रोज चालताना बघायचे. ओळखीतले होते. कुत्र्याला धरलेल्या बाई समोर कोणाशी तरी गप्पा मारत होत्या. लक्ष नव्हतं. कुत्रा लीश ओढून पुढे धावून नातेवाईकांना कडकडून चावला. कोपराला. २ दात उठले, रक्त गळले इतक्या जोरात. बाईंनी माफी मागितली वगैरे सर्व ठिक. पण नंतर हार्ट सर्जरी, डायबीटीस, बीपी हा इतिहास असलेल्या माणसाला आणि त्याच्याबरोबर अजून एकाला रॅबीज व्हॅक्सीनसाठी ५ वेळा हॉस्पिटल ला एक्स्पोज करणे, नंतर घरी आल्यावर आंघोळ, कपडे भिजवणे, हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन रिअॅक्शन वर लक्ष ठेवणे इतके व्याप करावे लागले.
हे सर्व फक्त एका 'सॉरी, माझं लक्ष नव्हतं' च्या किंमतीचं आहे का? स्वतःला फिरवायला आणि आवरायला झेपतील असे क्युट छोटे कुत्रे का पाळत नाहीत?
खरंय,मी पण आमच्या इथे बघतो
खरंय,मी पण आमच्या इथे बघतो
एक आजोबा वयाचे गृहस्थ त्यांच्या लाब्राडोर ला फिरवायला येतात
लॅब अतिशय ऍक्टिव्ह आहे त्यामुळे तो अक्षरशः आजोबांना फरफटत नेतो
मला ते फार रिस्की वाटत
मी त्यांना विचारलं की घरात अजून कोणी नाही का फिरवायला तर म्हणे मुलगा उशिरा येतो कामावरून त्यामुले मलाच न्यावं लागतं
भाऊ त्याच्या मित्राच्या
भाऊ त्याच्या मित्राच्या कुत्र्याबरोबर खेळत असताना, तो तोंडावर चावला होता लाडाने पण दात लागले होते आणि हकनाक इंजेक्शन्स घ्यावे लागले होते.
बहिणीने सरकारी हॉस्पिटलमध्ये, रेबिजचे भयानक पेशंट्स पाहिले आहेत गावाकडचे वगैरे ज्यांना कुत्रा चावला आणि इंजेक्शन्सही न घेतलेले..
भाऊ त्याच्या मित्राच्या
ड पो
माझ्या मुलालाही घ्यावे लागले
माझ्या मुलालाही घ्यावे लागले
खेळताना दात लागला आमच्या भुभु चा
आणि त्यावेळी त्याचे लसीकरण पूर्ण झाले नव्हते
पपीज चे दात जास्त शार्प असतात कारण चवयाची ताकद कमी असते
त्यामुळे कानाला दात लागून रक्त वगैरे आले
पोराने रडारड करायला सुरू केल्यामुळे आम्ही बावरून गेलो पण तो रडत होता कारण त्याला वाटलं।आम्ही आता भुभु देऊन टाकू म्हणून
तो रडत रडत त्याची काही चूक नाहीये हे सांगत होता
त्याला रेबीज ची एकूण 7 इंजेक्शने घ्यावी लागली
शेवटची तीन घेताना त्यांनी विचारले कुत्रा जिवंत आहे का
म्हणलं।आहे की चांगला।मस्त खेळतोय घरी
मग म्हणाले पुढची इंजेक्शने घ्यायची गरज नाही
एक जण म्हणले की पपीज मध्ये रेबीज नसतो स्पेशली घरीच पाळले असेल।आणि बाहेर कुठं कुत्र्यांमध्ये खेळत नसेल तर काहीच धोका नाही
ते मलाही पटले कारण मलाही हाताला दात लागला होता पण मी स्वच्छ पाण्याने साबण वगैरे लावून धुतले, वर मलम लावले काहीसुद्धा झाले नाही
तसे मला अनकेदा मांजरांच्या बोचकरण्याचा आणि चवण्याचा अनुभव आहे त्यामुळे।मी निर्धास्त होतो
पण पोरगे लहान असल्याने रिस्क घेतली नाही
रेबीज ची एकूण 7 इंजेक्शने
रेबीज ची एकूण 7 इंजेक्शने घ्यावी लागली
शेवटची तीन घेताना त्यांनी विचारले कुत्रा जिवंत आहे का >> सिरियसली????
हो, तो जर रेबीज होऊन मेला
हो, तो जर रेबीज होऊन मेला असता तर पुढची तीन घ्यावी लागली असती
त्यांच्यामते रेबीज झालेला कुत्रा आठवड्यापेक्षा जास्त जगत नाही
आणि ही इंजेक्शने आज एक तीन दिवसांनी दोन मग परत तीन दिवसांनी अशी विभागून दिली होती
त्यामुळे शेवटचे इंजेक्शन दहाव्या दिवशी होते बहुदा
माझ्याकडे आहे तो कागद तो सापडला तर माहिती टाकतो
ज्या अर्थी कुत्रा जिवंत आहे,
ज्या अर्थी कुत्रा जिवंत आहे, खेळतोय, घरी पाळलेला आहे आणि रेबीज असल्याची कसलीही लक्षणे नाहीत त्या अर्थी घाबरायचे काही कारण नाही असे ते म्हणाले
माझी Mumbai, आपली BMC
माझी Mumbai, आपली BMC
@mybmc
·
महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने २८/०९/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम आयोजित केली आहे
संबंधितांनी mcgm.arv@gmail.com या ईमेलवर माहिती(नाव,दूरध्वनी क्र.,परिसर,कुत्र्यांची संख्या) कळवावी
आज वर्ल्ड रेबीज डे आहे.
असाही दिवस असतो ?
असाही दिवस असतो ?
बेबीज डे आउट ऐकला होता. हा
बेबीज डे आउट ऐकला होता. हा रेबीज डे आउट नवीनच ऐकला.
हो ना
हो ना
एक जण म्हणले की पपीज मध्ये
एक जण म्हणले की पपीज मध्ये रेबीज नसतो स्पेशली घरीच पाळले असेल।आणि बाहेर कुठं कुत्र्यांमध्ये खेळत नसेल तर काहीच धोका नाही >>>> 100℅ बरोबर. ही माहिती माझ्या डॉगच्या व्हेट ( डॉ सागर भोंगले, पुणे) ने सांगितली होती. पपीज मध्ये जन्मतः रेबीज virus नसतात. दुसऱ्या कुत्र्याने चावलं तरच रेबीज होऊ शकतं. पपीच्या आईला रेबीज असतील तरी आईच्या पोटातून किंवा दुधातून पपीला रेबीज पास होतात याचा पुरावा नाही. आम्हाला आमच्या पपीने मस्ती करताना / खेळताना अनेकवेळा छोट्या जखमा केल्या होत्या तेव्हा आम्ही खात्री करून घेतली होती. (आता तो मोठा झाल्यावर दात बोथट झाले, जखम होत नाही. शिवाय मस्ती करताना कितपत दाताचा जोर द्यायचा, नाही तर 'बाऊ' होतो हे त्यांना चांगलंच कळतं. आम्ही बाऊ झाला अस म्हणत खोटं किंचाळलो किंवा नुसतं बाऊ झाला सांगितलं की तो खूप नर्व्हस होतो आणि खूप वेळ चाटत रहातो.
शिवाय मस्ती करताना कितपत
शिवाय मस्ती करताना कितपत दाताचा जोर द्यायचा, नाही तर 'बाऊ' होतो हे त्यांना चांगलंच कळतं>>>>>
अगदी सेम
कडकन हाडे फोडून खातो तो इतकी ताकद आहे
पण तोंडात हात दिला तरी अगदी हळुवारपणे धरतो
माझा मुलगा तर अक्षरशः त्याचा जबडा उघडून त्याला औषध पाजतो पण एकदाही तो फटकन तोंड बंद करत नाही
औषध आवडत नसले तरी
आशुचँप नाव काय आहे तुमच्या
आशुचँप नाव काय आहे तुमच्या भूभूच ? त्याचा फोटोपण येऊद्या की
भुभु च नाव आहे ओडीन
भुभु च नाव आहे ओडीन
हे पोराने ठेवलेलं नाव आहे
हा वायकिंग चा देव, थोर चा बाप
थोर is God of Thunder
म्हणून आमचा ओडीन
God of Hunger
ओडीन , युनिक आणि भन्नाट
ओडीन , युनिक आहे
Pages