Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16
सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ इथे वेगवेगळी स्टेशन्स
भाऊ
इथे वेगवेगळी स्टेशन्स लागलेली आहेत. त्यातून मामींनी मांडलेली आचारसंहीतेची कल्पना आणि मूळ धागाकर्तीचा प्रश्न याला अनुसरून असं म्हणावंसं वाटतं की कुत्र्याच्या मालकाला कुत्रा पालू द्यावा, पण त्याने इतरांना त्रास झायास दंड किंवा कायदेशीर शिक्षा असावी (अस्तित्वात आहे कि नाही माहीत नाही, गुगळता येईल नंतर...). मी सुद्धा कुत्री पाळली आहेत. त्यांचं खूप करावं लागतं. त्यांच्यावर अत्याचार होतो. तसंच त्याचे गळणारे केस, लाळ आणि उच्छवास यातून लहान मुलांना दम्यासारखे आजार होतात. रेबीज ची लस दिली म्हणजे झालं असंही नाही. काही कुत्र्यांच्या बाबतीत उघड्या जखमांची काळजी घ्यावी लागते. अंगावर केस असल्यास दिसून येत नाहीत. त्यात हिरवी माशी अंडी घालते. दोन दिवसात अळ्या होऊन जखम चिघळत जाते. एकदा असं कुत्रं टार्गेट झालं की पुन्हा पुन्हा जखमा होतात. कुत्रं हाल हाल होऊन मरेपर्यंत. याशिवाय जंत आणि पिसवा, खरूज व इतर अनेक त्वचारोग पसरण्यास पाळीव प्राणी कारणीभूत असतात. इतकं पुरेसं आहे. गावाकडे हे चालून जातं. शहरात मात्र बंदीस्त फ्लॅटमधे कुत्रं पाळणं हे इतरांचा विचार करूनच असावं.
सोसायटीला कुत्रा पाळणा-याकडून वेगळा मेंटेनन्स घेण्याची मुभा हवी.
कुत्र्याला धोकादायक स्थितीत मोकळा सोडणे, कुत्र्याने सोसायटीत घाण करणे यासाठी सोसायटीला कुत्रेमालकास जबरी दंड करणे शक्य व्हावे.
सोसायटीच्या बाहेर मनपा किंवा ग्रामपंचायत हद्दीत त्या त्या स्वराज्य संस्थेला दंड ठोठावण्याचे अधिकार हवेत, इतरांना धोका उत्पन्न झाल्यास मालकावर कायदेशीर कारवाई करता यावी. कुत्रा चावणे हा अजामीनपात्र गुन्हा (मालकासाठी) असावा. शिक्षा झाल्याशिवाय भारतात कुणी कायद्याला भीक घालत नाही. थोडक्यात कुत्रा पाळणे ही जबाबदारी मालकाची असावी. मोटार वाहन कायद्यात गाडीमुळे अपघात झाला तर कुणी का चालवत असेना मालकाला शिक्षा होतेच.
दुसरीकडे
कुत्र्याला शिक्षा देण्याचा अधिकार कुणाला नाही. इमर्जन्सी मधे स्वसंरक्षणासाठी तो आपोआप प्राप्त होतो.
कुत्रे भुंकतात म्हणून त्यांना विष घालणे हे क्रूर आहे. रस्त्यात उभे राहून मुलींना छेडणा-या गुंडांना, सरकारी जमिनी घशात घालणा-या राजकीय पुढारी, बडे बिल्डर यांना तुम्ही धडा शिकवला असेल तर कदाचित तुम्हाला तसं करण्यापासून रोखण्याचा विचार कुणाच्या मनात येणार नाही. जर आपल्यासारख्या माणसांना ते बलवान आहेत म्हणून आपण काही करू शकत नसू तर ज्याला काही समजत नाही त्या तुलनेने दुर्बल असलेल्या मुक्या प्राण्यावर सूडभावनेने अत्याचार करण्याचा आपल्याला काय हक्क आहे ? इथे आपलं नागरीकशास्त्र फेल नाही होत का ?
एव्हढं बोलून मी माझे दोनशे शब्दांच्या मर्यादेतलं भाषण संपवते. जयहिंद !
अवांतर : सुमेधातै, नगरसेवकाला सांगून एक बाकडं बसवून घ्या ना.. त्यावर फक्त कुत्र्यांसाठी राखीव असं लिहा म्हणजे कुत्री तिथे बसतील. मग इतर बाकावरून कुत्र्याला हक्काने उठवता येईल.
स्वसु... +१
स्वसु... +१
राखीव म्हणजे तिथे फक्त कुत्रे
राखीव म्हणजे तिथे फक्त कुत्रे बसतील. म्हणजे बाकी बाकांवर त्यांनी बसू नये असे नाही.माणसांसाठी राखीव असे बाकीच्या बाकांवर लिहिले तर उपयोग.
Pan mansala kuthe vachata
Pan mansala kuthe vachata yeta ?
थोडक्यात कुत्रा पाळणे ही
थोडक्यात कुत्रा पाळणे ही जबाबदारी मालकाची असावी. >>> हे कळीचं वाक्य आहे. पण तिथेच तर घोडं पेंड खातंय.
अर्रे.. तो प्रॉब्लेम लक्षात
अर्रे.. तो प्रॉब्लेम लक्षात नाही आला. मग शौचालय वगैरेंवर चित्र काढतात तशी चित्रे काढावीत. स्त्री-पुरूष आणि भूभू ची. माणसाला ती सगळी चित्रे समजतील. एवढी उत्क्रांती नसेल झाली तर त्यांना बसण्याचा काहीही अधिकार नाही.
(No subject)
(No subject)
सोनू टिंबं शिक्षणासाठी
सोनू टिंबं
शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका विशिष्ट शहरात बसमधे स्त्रियांसाठी राखीव असं लिहीलेल्या बाकांवर पुरूषच बसलेले असतात. (तुझी चित्रकल्पना कल्पूनच खूप बरं वाटलं). बायका कितीही भांडल्या तरी आम्ही पिढीजात बहीरे आहोत असं दाखवत ते बाहेर पाहत राहतात.
यावरून त्या शहरातल्या पुरुषांना वाचता येत नसावं असं म्हणता येईल का ? (यावर पण एखादा बाफ निघेल का ? )
अवांतर : या बाफचं असं झालंय की
आला आला तो उसळूनी वर श्वानबाफ आला
पूजा अर्चा सोडुनी जाते प्रतिसाद वाढायाला
बाकी, स्वतः अत्यंत इलॉजिकल
बाकी, स्वतः अत्यंत इलॉजिकल उत्तरं देऊन, दुसर्यांच लॉजिक काढणे, कुत्रे मालकांच्या वर्तणुकीबद्दल तक्रारी असतानाही सोईस्करपणे त्यांना कुत्रेद्वेषी ठरवणे, त्यांना ब्रिगेड वगैरे म्हणणे, हिटलर म्हणणे, कुत्रेमालकांनी सार्वजनिक ठिकाणी कसं वागायला हवं याचं उत्तर न देणे आणि वर शिवाय कायदे नाहीत ना मग आम्ही हे असंच वागणार अशी अरेरावी करणे हे वाचून अतिशयच खंत वाटली. आणि हो, ट्रॉमाही झाला.
हा सँपल डेटा धरला तर भारतातील इतरही कुत्रेमालकांची वृत्ती काय असेल ते उघड आहे.
सोनू.
सोनू.
हा सँपल डेटा धरला तर भारतातील
हा सँपल डेटा धरला तर भारतातील इतरही कुत्रेमालकांची वृत्ती काय असेल ते उघड आहे.
<<
ते फोटोतलं पाहिलंत का मामी तुम्ही? कस्लं क्यूटै
हा सँपल डेटा धरला तर भारतातील
हा सँपल डेटा धरला तर भारतातील इतरही कुत्रेमालकांची वृत्ती काय असेल ते उघड आहे.>>>>>
मामी, ह्या बाफवरील चर्चेदरम्यान एखाद-दुसर्या कुत्रेमालकांची सोडल्यास बहुतेकांची हीच वृत्ती आहे. आणि आपल्या अशा वर्तणुकीमुळे इतरांना होणार्या त्रासाबद्दल यांना जराही खंत नाही. उलटपक्षी ह्यांच्या लाडक्या कुत्र्यांमुळे जर तुम्हाला त्रास होतो तर तुमची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे त्याबद्दल ह्यांची जबाबदारी काहीच नाही असा पवित्रासुध्दा हे अत्यंत खेदजनक आहे.
काल बिल्डिन्गच्या
काल बिल्डिन्गच्या पार्किन्गमध्ये रात्री कुत्र्याचा सूरात गाण्याचा आवाज आला. म्हणून बघायला गेले तर एक कुत्र्याचे छोटेसे पिल्लु वॉन्वु वॉन्वु बाऊ बाऊ करत रडत होते. मला बघताच भौ भौ करुन जे वस्सकन्न अन्गावर आले , की मी घरात पळून आले. लहान पिल्लु अन्गावर धावते तर मोठे बॉव वॉव काय करेल?
भु भु ला काही काही गोष्टी
भु भु ला काही काही गोष्टी जाणवतात म्हणे फीअर फाईल्समधे पाहीलय.
लहान पिल्लु अन्गावर धावते तर
लहान पिल्लु अन्गावर धावते तर मोठे बॉव वॉव काय करेल? >> लहान मोठे भुभू जाऊद्या, कुत्रेमालक बॉव वॉव करतात त्याचे काय करायचे?
कुत्रेमालक बॉव वॉव करतात
कुत्रेमालक बॉव वॉव करतात त्याचे काय करायचे? --- सोप्प आहे हाड् हाड् करायच
सोप्प आहे हाड् हाड् करायच
सोप्प आहे हाड् हाड् करायच >>> तसं कायद्यात नाय म्हनत्यात! आनि आजूबाजूच्यांशी सभ्यपने वागने पन कायद्यात नाय त्यांच्या. मुनशीपाल्डीत जाऊन हाड हाड करा म्हनत्यात.
गोडविन चा नियम इथे कोणाला
गोडविन चा नियम इथे कोणाला माहित नाही बहुतेक. (http://en.wikipedia.org/wiki/Godwin's_law)
"As an online discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1"
there is a tradition in many newsgroups and other Internet discussion forums that once such a comparison is made, the thread is finished and whoever mentioned the Nazis has automatically lost whatever debate was in progress.
तर बागुलबुवा हरले असं जाहीर करायला हरकत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/50262
येथे माहिती लिहीली आहे.
How to Protect Yourself from
How to Protect Yourself from a Stray Dog
5 Non-Violent Tricks to Deal with Stray Dogs
Who let the dogs out–10 tips for dealing with street dogs
Dealing With Aggressive Dogs: Make Your Bark Worse than Your Bike
चमन, बिहेवियरल आणि लॉजिकल यात
चमन, बिहेवियरल आणि लॉजिकल यात गोंधळ झालाय तुमचा. आणि ते कंत्राट वगैरे जबराटच एकूणच तुमची लोजिकल लेव्हल एक्सप्लेन करतय ते. लगे रहो. >> कळीच्या प्रश्नांची ऊत्तरं टाळायची असतील तर तुम्ही वैयक्तिक आगपाखड करता हे ईथे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. मागच्या वेळी माफी मागून तुम्हाला त्याची ऊपरती झाली असे वाटले होते पण पुन्हा त्याच वळणावर गेले. असो.
'तुम्ही ह्या अमूक प्रसंगात कसे वागाल?' ह्याला बेहिविअरल म्हणायचं का लॉजिकल हे एखाद्याने इंग्रजी पाण्यात किती खोलवर डुबकी मारली होती ते सांगू शकेल पण मुद्दा तो नाही. 'पृथ्वीतलावर समान' ह मुद्दा तुम्ही आणला, 'ते कसे?' त्याचे पुढे स्पष्टीकरण तुम्ही द्यायला हवे.
(नोआ ची गोष्टं तुमच्या सामान्यज्ञानाच्या डिक्शनरीत नसेल तर सोडून द्या, ती महत्वाची नाहीये. त्याचे स्प्ष्टीकरण नाही दिले तरी चालेल.)
एकूण विचारांचा हाच प्रवास... माणूस श्रेष्ठ, अमूक जात, तमूक वंश, अमका धर्म आंणि तमका प्रांत अश्या वळणाने जात जात हिटलरशाही पर्यंत पोहोचतो. >> फार पुढे जाण्याची गरज नाही, तूर्तास माणूस आणि कुत्रा ईथवरच थांबूया. श्रेष्ठ्त्वाची श्रेणीही ठरवायची गरज नाही. (तुम्ही तुमच्यापुरता) फक्त बाकावर बसायचा अधिकार ठरवला (आणि आम्हाला ईथे सांगितला) तरी ईथला प्रश्न निकालात निघण्यासारखा आहे.
माझ्याकडे बघून तुझा कुत्रा भुंकला, माझ्या गाडीला तू हॉर्न मारलास मग तर मला तुला अद्दल घडवावीच लागेल..... ऑनर किलिंग सारख्या प्रश्नाच मूळ उत्तर देखील ह्या प्रश्नातच आहे. >> हिटलरशाही, ऑनर किलिंग मुद्दे आधी चर्चेत आलेले नसतांना तुम्ही गरज नसतांना ते चर्चेत आणून माझ्या मूळ प्रश्नाला (सुमेधाच्या प्रसंगातले कुत्रामालक तुम्ही असता तर काय केले असते) बगल देत आहात, कृपया तसे करू नका ही नम्र विनंती.
मामी अहो बाकीचे सोडा पण मला
मामी अहो बाकीचे सोडा पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटतय की किकु कुत्र्याशी जे काही वागले त्याबद्दल काही जणानी त्यान्ची वागणूक कशी माणुसकीहीन होती ते लिहीले आहे. पण मी जे सातारच्या लहान मुलाच्या घटनेबद्दल लिहीले आणी साऊथ अफ्रिकेतील त्या तरुण मुलान्च्या हालाविशयी लिहीले, त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही?
मला काही माझ्या लेखाविषयी प्रशन्सा नकोय, कौतुक नकोय. ( काहीन्चा तसा गैरसमज होऊ शकतो म्हणून लिहीले आहे हे ध्येनात घ्यावे) पण किकु कसे त्या कुत्र्याशी वाईट्ट वागले हे मात्र सगळ्याना जाणवले.
त्या लहान मुलाचा त्या वेळी टिव्हीवर फोटो बघुन खूप गलबलुन आले होते. माझी मुलगी म्हणते कुत्रा पाळु, मान्जर पाळु. कारण ती लहान असल्याने ( वय ७ ) तिला त्याचे गाम्भिर्य माहीत नाही. पण मला मात्र असल्या घटना आठवल्या तरी टेन्शन येते.
मुलीला लशीचे एक इन्जेक्श्न देताना जीव कळवळतो, इथे इब्लिस आणी काही अजून असतील त्यानी त्या १४ इन्जेक्शनाच्या यातना कशा भोगल्या असतील हे वाचुन किन्वा कल्पना करुन पण जीवाचा थरकाप होतो.
रश्मी अगदी बरोबर. डोळयावर आणि
रश्मी अगदी बरोबर. डोळयावर आणि बुद्धीवर कातडी पांघरून बसल्यावर हे शक्य होत असावं. नाहीतर या धाग्याची गरजच लागली नसती.
ह्या श्वानप्रेमी धाग्यावरच्या
ह्या श्वानप्रेमी धाग्यावरच्या लोकांच काय करायच ??????
असा एक धागा काढण्याच्या विचारात आहे .................
टग्या.... ता धाग्यावर हिटलर
टग्या.... ता धाग्यावर हिटलर सर्वात आधी कोणी आणलाय ते तपासा बघू एकदा
बादवे, मुद्दा हरले वा जिंकले हा नाहिये. मुद्दा असा आहे कि ज्या लोकांना आपली जबाबदारी कळत नाहिये त्यांच्याविरुद्ध सनदशीर कारवाई कशी घडवून आणावी ?
ह्या श्वानप्रेमी धाग्यावरच्या
ह्या श्वानप्रेमी धाग्यावरच्या लोकांच काय करायच ??????
असा एक धागा काढण्याच्या विचारात आहे .................>>>> मी धागा आत्ता निघल मग निघल याचीच वाट बघत बसले.:अओ:
<< बाकी, स्वतः अत्यंत इलॉजिकल
<< बाकी, स्वतः अत्यंत इलॉजिकल उत्तरं देऊन, दुसर्यांच लॉजिक काढणे, कुत्रे मालकांच्या वर्तणुकीबद्दल तक्रारी असतानाही सोईस्करपणे त्यांना कुत्रेद्वेषी ठरवणे, त्यांना ब्रिगेड वगैरे म्हणणे, हिटलर म्हणणे, कुत्रेमालकांनी सार्वजनिक ठिकाणी कसं वागायला हवं याचं उत्तर न देणे आणि वर शिवाय कायदे नाहीत ना मग आम्ही हे असंच वागणार अशी अरेरावी करणे हे वाचून अतिशयच खंत वाटली. आणि हो, ट्रॉमाही झाला.
हा सँपल डेटा धरला तर भारतातील इतरही कुत्रेमालकांची वृत्ती काय असेल ते उघड आहे. >>>
मामी, मी उगाच कोणालाही कुत्रेद्वेषी ठरवले नाहिये. दाखवा माझ्या स्टेटमेन्टस् मध्ये तसं लिहिलेलं.
आणि "कुत्र्यामुळे / पाळीव प्राण्यांमुळे रोगराई पसरते, कुत्रेमालक बेजबाबदार असतात, कुत्रे पाळणारे त्यांच्याबरोबर एका ताटात जेवतात / एका बिछान्यात झोपतात" असली बिनबुडाची / ईल्लॉजिकल स्टेटमेन्टस् माझी नाहीत. मी अत्यंत तर्क्शुद्धच बोलतोय... तेव्हढ जमत असेल तर पुढे बोला नाहितर तुमचं नथीतून तीर मारण चालू ठेवा.
<< कळीच्या प्रश्नांची ऊत्तरं
<< कळीच्या प्रश्नांची ऊत्तरं टाळायची असतील तर तुम्ही वैयक्तिक आगपाखड करता हे ईथे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. मागच्या वेळी माफी मागून तुम्हाला त्याची ऊपरती झाली असे वाटले होते पण पुन्हा त्याच वळणावर गेले. असो. >>
चमन, वैयक्तिक बोलण्याला सुरुवात कोणी केली होती ते आहे जऊनही तसच
<<'तुम्ही ह्या अमूक प्रसंगात कसे वागाल?' ह्याला बेहिविअरल म्हणायचं का लॉजिकल हे एखाद्याने इंग्रजी पाण्यात किती खोलवर डुबकी मारली होती ते सांगू शकेल पण मुद्दा तो नाही. 'पृथ्वीतलावर समान' ह मुद्दा तुम्ही आणला, 'ते कसे?' त्याचे पुढे स्पष्टीकरण तुम्ही द्यायला हवे. (नोआ ची गोष्टं तुमच्या सामान्यज्ञानाच्या डिक्शनरीत नसेल तर सोडून द्या, ती महत्वाची नाहीये. त्याचे स्प्ष्टीकरण नाही दिले तरी चालेल.) >>>
जसा कायदा सर्व माणसांना समान तसं पृथ्वीवर सर्वजण समान. ऑन वन लेव्हल. ह्याचे नेमके काय स्वष्टीकरण हवे आहे तुम्हाला ?
<<<एकूण विचारांचा हाच प्रवास... माणूस श्रेष्ठ, अमूक जात, तमूक वंश, अमका धर्म आंणि तमका प्रांत अश्या वळणाने जात जात हिटलरशाही पर्यंत पोहोचतो. >> फार पुढे जाण्याची गरज नाही, तूर्तास माणूस आणि कुत्रा ईथवरच थांबूया. श्रेष्ठ्त्वाची श्रेणीही ठरवायची गरज नाही. (तुम्ही तुमच्यापुरता) फक्त बाकावर बसायचा अधिकार ठरवला (आणि आम्हाला ईथे सांगितला) तरी ईथला प्रश्न निकालात निघण्यासारखा आहे.>>>
ह्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेल आहे. तरीही पुन्हा एकदा सांगतो. Unless and until approved and displayed by the concerned authority, public property is open of use for all.
<<माझ्याकडे बघून तुझा कुत्रा भुंकला, माझ्या गाडीला तू हॉर्न मारलास मग तर मला तुला अद्दल घडवावीच लागेल..... ऑनर किलिंग सारख्या प्रश्नाच मूळ उत्तर देखील ह्या प्रश्नातच आहे. >> हिटलरशाही, ऑनर किलिंग मुद्दे आधी चर्चेत आलेले नसतांना तुम्ही गरज नसतांना ते चर्चेत आणून माझ्या मूळ प्रश्नाला (सुमेधाच्या प्रसंगातले कुत्रामालक तुम्ही असता तर काय केले असते) बगल देत आहात, कृपया तसे करू नका ही नम्र विनंती. >>>
मी तिथे कसा वागलो असतो हा प्रश्न माझ्यासाठी वैयक्तिक असू शकतो ना ? एनिवेज, आय विल लाईक टू नो, व्हाय यू वॉन्ट धिस आन्सर फ्रॉम मी....
कुत्र्याला घरासमोरुन
कुत्र्याला घरासमोरुन फिरवण्यामुळे वाद होउन, शेजारच्या श्वानद्वेष्टाने श्वानप्रेमी महिलेला बदडले.
http://www.ndtv.com/article/cities/gurgaon-woman-allegedly-molested-in-f...
Pages