ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्या चर्चेतुन हा निष्कर्श काढायला हरकत नाहि - हि खालची क्लिप बघितल्यावर. कुत्रा शिस्तप्रिय आहे (शिस्त लावली तर) परंतु माणुस अज्जीबात नाहि (शिस्त लावुन सुध्धा).... Happy

http://www.oprah.com/oprahshow/Amazing-Dog-Tricks-Video

@ चमन, सॉरी उण्यादुण्या शब्दांबद्दल. अगदी मनापासून.

कुत्र्यांकडून बरच काही शिकण्यासारख आहे पण. खरच.

गेल्या दहा हजार वर्षात एकही प्राणी माणसाळला गेला नाहिये म्हणे. असो.

मी पुन्हा एकदा विचारते की कुत्रे पाळण्याचे आणि त्यांना सार्वजनिक जागेत घेऊन वावरण्याचे डूज आणि डोन्टस काय आहेत? >> मामी, एवढे का अवघड आहे ह्या प्रश्नाचे ऊत्तर.
आपल्या लाडक्यामुळे दुसर्‍यांना त्रास होणार नाही, दुसर्‍यांच्या अधिकार आणि स्वातंत्र्यावर गदा येणार नाही एवढेच तर बघायचे आहे ना?
पण जिथे 'माझ्या कुत्र्यापेक्षा बाकावर बसण्याचा तुमचा अधिकार मोठा कसा?' हे सिद्ध करावे लागते तिथे डूज आणि डोन्ट्सची यादी वाचण्याचे कष्टं मी तरी घेणार नाही.

हे सिद्ध करावे लागते तिथे डूज आणि डोन्ट्सची यादी वाचण्याचे कष्टं मी तरी घेणार नाही.<<<

मग तुम्ही काय करणार हे वाचायला आवडेल.

सुमेधा ह्यांना नेमके तेच करता आले नसावे. Happy

हे सगळे होऊनही भारतात ग्रामीण विभाग, निर्मनुष्य विभाग, शेत, बंगल्याची सुरक्षा, शौक अश्या विविध कारणांनी कुत्रे पाळणार्‍यांपैकी बहुतांशींना हे का होत नाही?
<<
Lol जंत होत नाहीत?
हायडॅटिड सिस्ट नामक आजार ऐकला तरी आहे का? किती कॉमन आहे ठाऊकेय?
बेफि, इतकं सोप्पं नाहिये ते.

*

बागुलबुवा,
वर मेडिसिन समजवून सांगितलंय. फुकटात वाचून घ्या. Wink

तुमच्या(कडे असलाच तर त्या) भुभूचे बूट/चप्पल कोणत्या कंपनीचे? नक्की कोणत्या रस्त्यांवरून फिरतो? फिरताना रस्त्यावर कुठे कुठे तोंड, हात/पाय इ. लावतो? दिवसातून कितीवेळा हातपाय धुतो? त्याची शी कोण धुतं? रोज आंघोळ करतो का? इ. सोप्प्या पर्सनल हायजीन प्रश्नांची उत्तरं दिलीत तर बरं होईल.

<< आपल्या लाडक्यामुळे दुसर्‍यांना त्रास होणार नाही, दुसर्‍यांच्या अधिकार आणि स्वातंत्र्यावर गदा येणार नाही एवढेच तर बघायचे आहे ना? >>

१००% अ‍ॅक्यूरेट चमन

<< पण जिथे 'माझ्या कुत्र्यापेक्षा बाकावर बसण्याचा तुमचा अधिकार मोठा कसा?' हे सिद्ध करावे लागते >>
अरे बाबा सिद्ध नाही करायला सांगत आहे कोणी. जर व्यवस्थापनाने तसा नियम केला नसेल तर अरेरावी करणार्‍या कुत्रेमालकाला कशात अडकवणार ?

कुत्रा पाळल्यामुळे झालेल्या रोगांमुळे व्याधीग्रस्त झालेल्या माणसांची संख्या जर लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक दराने वाढली असेल तर इब्लिसांचा मुद्दा पूर्ण मान्य!

तसे नसेल तर दुर्लक्ष!

असेल तर त्यांनी सिद्ध करणे योग्य ठरेल कारण मुद्दा त्यांनी सुरू केलेला आहे.

बाकी - अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत.

१. अमित जन्मापासून शाकाहारी आहेत का?
२. शाकाहार करतानाही एक वनस्पती मारली गेली असे त्यांना वाटते का?
३. सर्व कुत्रेप्रेमी मालक इतर माणसांना कुत्र्यांपेक्षा अधिक महत्वाचे मानतात का?
४. कुत्र्यामुळे पसरणारी / पसरू शकणारी रोगराई ज्ञात असूनही किंवा ज्ञात नसताना कुत्रे पाळणार्‍यांपैकी कितींना ती झाली?

'इत्यादी'

<<
जंत होत नाहीत?
हायडॅटिड सिस्ट नामक आजार ऐकला तरी आहे का? किती कॉमन आहे ठाऊकेय?
बेफि, इतकं सोप्पं नाहिये ते. >>>>

इब्लीस, विथ ऑल द ड्यू रिस्पेक्ट टू मेडिकल प्रोफेशन..... मी स्वत: कुत्र्यांबरोबर आयुष्य काढलय. मला जन्त झालेले आठवत नाहीत. आणि जन्त मांसाहारानेही होऊ शकतात अशी माझी माहिती आहे. खखोदेजा.

आणि

<<भुभूचे बूट/चप्पल कोणत्या कंपनीचे? नक्की कोणत्या रस्त्यांवरून फिरतो? फिरताना रस्त्यावर कुठे कुठे तोंड, हात/पाय इ. लावतो? दिवसातून कितीवेळा हातपाय धुतो? त्याची शी कोण धुतं? रोज आंघोळ करतो का? इ. सोप्प्या पर्सनल हायजीन प्रश्नांची उत्तरं दिलीत तर बरं होईल >>>

हे सगळं करत नसलेले कितीतरी भूभूज माहिती आहेत. काय प्रॉब्लेम आहे नक्की ?

बेफिकीर माझ्याकडे संख्याशास्त्रीय पुरावे नाहीत मात्र अनुभवांवरून सांगू इच्छितो की शेतावर कुत्र्यापासून होणार्‍या (तसेच इतरही जसे गाय/म्हैस/मेंढ्या) आजारांचे प्रमाण चांगल्यापैकी आहे. त्यात बाकी स्वच्छतेचा अभाव हे पण आहे (कुणी हगणदरी गेले असाल तर कळेल मी काय म्हणतोय ते).

ह्या बाफवर भारतात बहुतांशी कुत्र्यांचे मालक इतरांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने कुत्री सांभाळत नाहीत हा आरोप केला गेला आहे जो खरा आहे.
भटक्या कुत्र्यांना संपवणे (putting sick dogs to sleep), नसबंदी करणे ज्यायोगे उत्तरोत्तर त्यांची संख्या कमी कमी होत जाईल हे भारतात आवश्यक असलेले अजून एक काम.
कुत्रा पालनाचे नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही हे बघणे हे एक्झिक्युटिव्हचे काम. ती करणे हे जनतेचे काम.
कुत्रा पाळण्याचा हक्क नागरिकांस असणे हे मला वाटते सर्वांनीच मान्य केले आहे. शहराबाहेर / दाट लोकवस्तीबाहेर राहणार्‍यांना कुत्रा ही चैन नसून गरज असते.

बेफि,
सातीनी मघा केलं तेच तुम्हाला योग्य होतं. तुमची बुद्धीमत्ता खरंच कित्ती अफाऽट आहे!
कधी पाळताय मग दुसरा कुत्रा?

पुन्हा विनंती करत आहे की कुत्र्यांमुळे होऊ शकणारे आजार ह्या वळणावर बीबी जाऊ नये.

बाकी मर्जी ज्याची त्याची!

कुत्रेमालकांचे इतपत प्रबोधन व्हावे की आपल्या लडिवाळ कुत्र्यापेक्षा समोर आलेला माणूस आपल्याला कितीही तिरस्करणीय, घृणास्पद वाटत असला तरी तो अधिक महत्वाचा आहे. इतकाच मुद्दा आहे.

<<कुत्रा पाळल्यामुळे झालेल्या रोगांमुळे व्याधीग्रस्त झालेल्या माणसांची संख्या जर लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक दराने वाढली असेल तर इब्लिसांचा मुद्दा पूर्ण मान्य!

तसे नसेल तर दुर्लक्ष! > १०००% सहमत

<<असेल तर त्यांनी सिद्ध करणे योग्य ठरेल कारण मुद्दा त्यांनी सुरू केलेला आहे. >> मी काय तामिळमध्ये लिहितोय ?

१. अमित जन्मापासून शाकाहारी आहेत का?

फेजेस होत्या.

२. शाकाहार करतानाही एक वनस्पती मारली गेली असे त्यांना वाटते का?

शाकाहार आणि मांसाहार हे मनाचे खेळ आहेत असं मला वाटत

३. सर्व कुत्रेप्रेमी मालक इतर माणसांना कुत्र्यांपेक्षा अधिक महत्वाचे मानतात का?

हे "सगळ्या"ना विचारल्याशिवाय कसं सांगू ? माझ्यापुरतं म्हणायच झालं तर प्रायॉरिटी ही सिच्युएशननुसार ठरेल.

४. कुत्र्यामुळे पसरणारी / पसरू शकणारी रोगराई ज्ञात असूनही किंवा ज्ञात नसताना कुत्रे पाळणार्‍यांपैकी कितींना ती झाली?

माझ्या ओळखीच्या एकाही श्वानमालकाला एकही रोग श्वानामुळे झालेला नाही.

टण्या, आजार सोडून बाकिची पोस्ट मान्य. आजार हा ह्या बाफचा विषय नाही, पण जरूर महत्वाचा विषय आहे, चर्चा करण्याजोगा.

प्रश्न ३ आणि ४ तुमच्यासाठी नव्हते अमित!

आणि तुमची पहिल्या व दुसर्‍या प्रश्नाची उत्तरे वाचल्यानंतर 'फेजेस होत्या' हे पटत आहे पण 'मनाचे खेळ' वगैरे फारच कवीत्तिक वाटत आहे.

भूषण, बरेचसे प्रश्न / आरोप हे व्यक्तिगतच झाले आहेत. अमांवर तर नक्कीच.

आता कुत्रेमालक कुत्रा की फॅमिली मेम्बर ह्यापैकी कोणाला महत्वाचे मानतात हा त्याम्चा वैयक्तिक प्रश्न आहे की सार्वजनिक ?

इब्लीस, विथ ऑल द ड्यू रिस्पेक्ट टू मेडिकल प्रोफेशन..... मी स्वत: कुत्र्यांबरोबर आयुष्य काढलय. मला जन्त झालेले आठवत नाहीत. आणि जन्त मांसाहारानेही होऊ शकतात अशी माझी माहिती आहे. खखोदेजा.
<<
बागुलबुवा,
मी असंख्य रोगट पेशंटस्ना रोज भेटत, हात लावत, तोंडावर खोकून घेत, नको तिथे स्पर्ष करीत आयुष्य काढतो आहे. अन मला त्यापैकी हज्जारो आजार झालेले मला आठवत नाहियेत. अन मी लोखंडाचा बनलेलो नाहिये अशी माझी माहिती आहे. खखोदेजा. Wink

*
// <<भुभूचे बूट/चप्पल कोणत्या कंपनीचे? नक्की कोणत्या रस्त्यांवरून फिरतो? फिरताना रस्त्यावर कुठे कुठे तोंड, हात/पाय इ. लावतो? दिवसातून कितीवेळा हातपाय धुतो? त्याची शी कोण धुतं? रोज आंघोळ करतो का? इ. सोप्प्या पर्सनल हायजीन प्रश्नांची उत्तरं दिलीत तर बरं होईल >>>

हे सगळं करत नसलेले कितीतरी भूभूज माहिती आहेत. काय प्रॉब्लेम आहे नक्की ? //
<<

पळ काढू नका प्लीज.

कुत्रा हायजिनिक नसतो हे माझे स्टेटमेंट मी आधुनिक अश्विनीकुमार अस्ल्याने तुम्ही खारिज केलेत मघाशी.
तुमच्या पाळीव कुत्र्याच्या पर्सनल हायजिनबद्दल बोलतोय मी.
त्याच्या टूथब्रशची अन ब्रशिंग हॅबिट्सची माहीती राहिली त्यात विचारायची. प्लीज अ‍ॅड करून घ्या.

<< कुत्रा हायजिनिक नसतो हे माझे स्टेटमेंट मी आधुनिक अश्विनीकुमार अस्ल्याने तुम्ही खारिज केलेत मघाशी. तुमच्या पाळीव कुत्र्याच्या पर्सनल हायजिनबद्दल बोलतोय मी. >>

म्हणजे, ह्या सगळ्या स्वच्छतेच्या सवयी कुत्र्याला नाहीत असं म्हणायचय ना तुम्हाला ?

<< पळ काढू नका प्लीज.>> जराआआआआ काल्पनिक होतय इब्लीस,

<< हे सगळं करत नसलेले कितीतरी भूभूज माहिती आहेत. काय प्रॉब्लेम आहे नक्की ?>> हे वाक्य लिहिलय मी. दिसलं नाही का ?

असा प्राणी तुमच्या ताटात जेवणे, बिछान्यात सोबत झोपणे, हे हायजिनिक कसे, ते समजवून सांगा हे विचरतोय.

You know exactly what i am asking, and you know exactly what you are trying to evade.

ह्या बाफवर भारतात बहुतांशी कुत्र्यांचे मालक इतरांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने कुत्री सांभाळत नाहीत हा आरोप केला गेला आहे जो खरा आहे.<<<

हे खरे आहे टण्या तुमचे!

हरकत नाही बागुलबुवा, मी काही ते मनावर घेतले नाही.
मी काही बोललो असेन तर तुम्हीही ते मनाला लावून घेऊ नयेत ही विनंती.

बेफिकीर
स्पष्टं शब्दात सांगूनही समोरचा 'नाही देत जा' म्हणाला तर 'जीवन मरणाचा प्रश्न नसल्याने दुर्लक्ष करून पुढे जाणे हा राजमार्ग. दुसरा बाक ऊपलब्ध असल्यास ऊत्तम.
नाही तर रितसर कंप्लेंट करण्यापासून, फोटो काढून सोशल मिडियावर नाव गावा सहित टाकण्यापर्यंत आणि माणसाशी थेट कन्फ्रन्ट करण्यापासून ते पाच-सहा मित्रांचं टोळकं घेऊन येण्यापर्यंत माझ्या यथाशक्तीप्रमाणे आणि ईश्यूच्या सिरियसनेसच्या प्रमाणात मी निर्णय घेईन, अर्थात हे सगळं भारतात कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल एकंदर अनास्था असल्या कारण्याने.

परदेशात अशी अरेरावी (गुन्हेगारी नाही) सहन करण्याची वेळ फार म्हणजे फारच कमी वेळा येते आणि एका फोन कॉल वर पोलिस येऊन कायदा बजावण्याची बर्‍यापैकी खात्री असते.

अरे बाबा सिद्ध नाही करायला सांगत आहे कोणी. जर व्यवस्थापनाने तसा नियम केला नसेल तर अरेरावी करणार्‍या कुत्रेमालकाला कशात अडकवणार ? >>
चालून दमलेल्या माणसाला, बागेत मोकळी हवा खाण्यासाठी आलेल्या माणसाला, कोलाहलापासून दूर बागेत निवांत बसण्यासाठी आलेल्या माणसाला बाकावर बसण्यासाठी कुत्रेमालकाची मनधरणी करावी लागत असेल तर समाजमन निर्ढावले आहे ह्यासाठी पुरावा मागावा लागू नये.

<< हे सगळं करत नसलेले कितीतरी भूभूज माहिती आहेत. काय प्रॉब्लेम आहे नक्की ?>> हे वाक्य लिहिलय मी. दिसलं नाही का ?

<<<<

प्रॉब्लेम नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मी दिलीत. आता तुमची पाळी.
पळी करायची असेल तर तुमची विच्छा.
मला एक इमर्जन्सी. येईन थोड्यावेळाने.

हा मी निघालो.

>>>

असा प्राणी तुमच्या ताटात जेवणे, बिछान्यात सोबत झोपणे, हे हायजिनिक कसे, ते समजवून सांगा हे विचरतोय.

You know exactly what i am asking, and you know exactly what you are trying to evade.
<<<

अ‍ॅन्ड डॉक्टर, आय अ‍ॅम शुअर, यू नो, व्हॉट धिस थ्रेड इज ऑल अबाऊट!

कुत्रेप्रेमीमालकाच्या ताटात त्याचे कुत्रे जरूर जेवो, इतकेच नाही तर त्याच्या बिछान्यात झोपो, फक्त बाकीची माणसे समोर आल्यानंतर त्या माणसांचे माणूस म्हणून असलेले मूलभूत अधिकार शाबूत राहावेत इतपत 'कुत्रुसकी' तो मनुष्य दाखवो!

<< असा प्राणी तुमच्या ताटात जेवणे, बिछान्यात सोबत झोपणे, हे हायजिनिक कसे, ते समजवून सांगा हे विचरतोय.>> कोणं म्हणतं की सगळे पाळीव कुत्रे मालकाच्या ताटात त्याच्याबरोबर जेवतात आणि त्याच्या बिछान्यात झोपतात ?

>>>कोणं म्हणतं की सगळे पाळीव कुत्रे मालकाच्या ताटात त्याच्याबरोबर जेवतात आणि त्याच्या बिछान्यात झोपतात ?<<<

म्हणूनच म्हणतोय. आरोग्य हा विषय बाजूलाच ठेवा. माणसाने माणसाला महत्व द्यावे की स्वतःच्या कुत्र्याला इतकाच विषय चघळा!

Pages