ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबु,

तुम्ही सेल्फ प्रोक्लेम्ड श्वानवैद्य दिसताहात. शिवाय मी काय लिहिलंय ते तुम्हाला समजण्याच्या पलिकडचं दिसतंय. तेव्हा तुमच्या वैद्यकीय क्षेत्राबाबतच्या कोणत्याही स्टेटमेंटला फाटा.

अभ्यास वाढवा.

अन हे राहवत नाही म्हणूनः

कुत्र्याला फिरायला नेल्यावर प्रत्येक वेळी घरात आल्यावर ते हातपाय धुतं का?

बूट कोणत्या कंपनीचे वापरतं?

आपल्या बालकांना सत्रांदा हातपाय धुवायला लावणार्‍या अन जेवणाआधी हातावर सॅनिटायझर टाकणार्‍या आयांना जरा समजावून सांगा की बाहेर फिरून आलेले कुत्रे सरळ डायनिंग टेबलवर पाय ठेवून उभे राहून तुमच्या ताटात जेवले तर काहीच अनहायजिनिक नाही.

अन घरभर शेड झालेले कुत्र्याचे केस हे अत्यंत हायजिनिकच असतात.

Wink

चालू द्या.

दुसरी गोष्ट मला एक समजत नाही. की प्रेम करण्याची लिमिट आपण पाळतो का?

उथले सो कॉल्ड डॉक्टर "कुत्रे पाळल्याने रोगराई पसरते" असले बिनबुडाचे विधान करतो आणि तुम्ही त्याचे समर्थन म्हणून "कुत्र्याना होणार्‍या आजाराची लिस्ट" टाकता. आणि वर हे आजार माणसालाही होऊ शकतात ही मखलाशीही>>>>> बाबु इब्लिसनी कोणत्याच पोस्टमध्ये कुत्रे पाळल्याने रोगराई पसरते असं लिहिलं नाहीये.

ही त्यांची पोस्ट------

तो प्राणी नेहेमी तुमच्या सोबत असतो, तुमचा जिवलग मित्र आहे वगैरे ठीक. पण आपल्या बिछान्यात झोपायला अन आपल्या ताटात जेवायला घालणार्‍यांचा वेडेपणा मला समजतच नाही. कुत्रे कितीही हेल्दी असले तरी त्याचे केस गळत असतात. स्किन एक्स्फोलिएट होत असते. घाम, लाळेसारखे बायोलॉजिकल फ्लुइड्स एक्स्चेंज होत रहातात.

धिस इस सिंप्ली नॉट हेल्दी.

त्या प्राण्याला ज्या व्हायरस जंतूंनी आजार होतात, ते आपल्यात पसरू शकतात, त्याला ज्या जंतूंनी काहीच होत नाही, त्यामुळे तो हेल्दी असतो, असे कमेन्साल्स, आपल्यासाठी पॅथोजेनिक असू शकतात.

एका वाटीतून श्रीखंड चाटून खाऊ घालणार आहात का लाडक्या बाळाला? असेही पाहिलेले आहेत. पुन्हा, सिंप्ली नॉट हेल्दी. २ लशी दिल्या म्हणजे झाले, असे नसते.

ब्रिटीश स्टाईल पाहिजे त्यासाठी. सेपरेट केनेल ठेवा. घरात एका लिमिटपलिकडे त्याला फिरायला एंट्री देऊ नका. त्याचे खाणेपिणे वेगळे ठेवा. त्याला अंगावर पाय ठेऊ द्यायचे असेल, तर त्यासाठी वेगळा पोशाख ठेवा, जो स्वतःच्या जेवणाआधी, झोपायला जाण्याआधी बदला इ.

याचा मला लागलेला अर्थ हा..........

, की कुत्रे पाळत असला तरी काही बेसिक हेल्द हॅबिट्स ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचा कुत्र तुम्हाला चाटत असेल तर त्याची लाळ गळ्त असेल तर ती लागलेला हात आपल्या तोंडात जावू नये. कुत्रा जर तुमच्या बिछान्यातच असेल तर त्याची लाळ बिछान्यातल्या वस्तूंना लागू शकतेर आणि त्यामार्फत तुमच्या शरीरातही जावू शकते.

तुम्ही मागे कुठेतरी माणसांचे पण उत्सर्जन होतंच असतं आणि त्यातही जंतू असतात, मग आपण काय माणसांबरोबर ही रहायचं नाही का अशा अर्थाचं लिहिलंय... पण माणसाच्या लाळेत जरी जंतू असले तरी माण्साची लाळ घरातल्या सगळ्या वस्तूंना लागलेली नसते ना? आपल्याकडे तर माणसांच्या उष्ट्या ग्लासातून पाणी पित नाहीत, थालीतून जेवण करत नाहीत, एकमेकांचे टॉवेल्स वापरत नाहीत. हे बेसिक हायजीन जसं माण्सांच्या बाबतित पाळतो तसंच कुत्र्यांच्या बाब्तितही पाळायला हवं. ते बर्‍याच ठिकाणी पाळलं जात नाही. हे लिहिलंय डॉक्टरांनी.
उग

गुड, इब्लीस,
एकूणातच. कुत्रे पाळल्याने रोगराई पसरते असले सनसनाटी फतवे किती तकलादू आहेत ते समजलच आता सगळ्यांना.

विषय तुम्हीच सुरु केलात आणि उत्तर न देता मी पळून जातो असला पुचाट आरोपही तुम्हीच केलात. कोण पळ काढतय ते दिसलच आता.

अल्पना,

चांगला प्रतिसाद वाटला.

ह्या शिवाय आणखी एकः

अमित ह्यांनी वर आणखी एक विधान केलेले आहे की ते माणूस व कुत्रा ह्यांना समान मानतात, त्यावर लिहावेसे वाटत होते की मुळात निसर्गालाच त्यांच्यात साम्य अभिप्रेत नसताना आपण केवळ भूतदया म्हणून समान का मानायचे सर्वांना? प्रत्येक स्पेसीजमध्ये असलेला नैसर्गीक फरक, कोणी कमी कोणी जास्त असणे, हे मान्य करूनही प्राण्यांबाबत दयाळू असणे शक्य असावे. शिवाय, (मला माहीत नाही अमित मांसाहारी आहेत किंवा कसे) ही अशी भूमिका घेणारे मांसाहाराबाबत काय म्हणतात? (माझ्यामते तरी हे विषयांतर ठरू नये)

अमित,

सुमेधांना उत्तर द्यायला जमेल तेव्हा जमेलच, पण तरीही तुमचे स्वतःचे असे काही खास मत आहे असे दिसत असल्यामुळे तुम्हाला विनंती करतो की सुमेधा ह्यांनी तेव्हा काय करायला हवे होते असे तुम्हाला वाटते?

इब्लिस, तुम्ही म्हणताय ते बरोबर जरी असलं तरी प्राणी पाळणार्‍यां मंडळींना ते कळत नसतं असं वाटतंय का तुम्हांला? पण प्राणीप्रेमाबरोबरच त्यांनी ते अ‍ॅक्सेप्ट केलेलंच असतं. ज्यांच्या घरात प्राणी असतात त्यांच्या घरात शिरल्याशिरल्या एक वेगळाच वास येतो. त्यांचे शेड झालेले केस अनहायजेनिक असतात हे ही आहेच. पण ज्यांना हे आवडत नसेल त्यांच्याकडे ह्या मंडळींकडे न जाणं हा उपाय आहेच की.

ज्यांच्या घरात प्राणी असतात त्यांच्या घरात शिरल्याशिरल्या एक वेगळाच वास येतो. त्यांचे शेड झालेले केस अनहायजेनिक असतात हे ही आहेच. पण ज्यांना हे आवडत नसेल त्यांच्याकडे ह्या मंडळींकडे न जाणं हा उपाय आहेच की.<<<

सहमत!

माझे अमेरिकेत वास्तव्यास असणारे एक काका येथे येतात तेव्हा माझ्या एका चुलत भावाच्या घरी जात नाहीत कारण तेथे मांजरे आहेत व तेथे गेल्यावर चक्क त्यांच्या नाकातून रक्त येते व असे दोनदा झालेले आहे. Uhoh

<< <<म्हणजे तुम्ही आम्ही नागरिकशास्त्र काय टाईम पास म्हणून शिकलो? नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार शिकलो आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रतिज्ञा घेतली आहे ना. तीही विसरला असल्यास तुमच्यासाठी त्यातला काही निवडक भाग ईथे देत आहे >>

ह्याचा "कुत्र्याला कायद्याने कुठले अधिकार प्राप्त आहेत ते सांगा" ह्याच्याशी काहीही संबंध नाही.

अरे माठा, तूला कुत्र्याचे कायदेशीर अधिकार समजावून सांगायचे पैसे दिले आहेत का मला तुझ्या तीर्थरुपानी ? Rofl की मी तूला प्रॉमिस केलय कधी, कुत्र्याचे सगळे कायदेशीर अधिकार तूला समजावून सांगेन म्हणून ? बळेच ?

<< असं सोयीस्कर रित्या 'वैयक्तिक प्रश्न', 'पर्सनल रिमार्क' म्हणत शेपटी पायात घालणे हे ऊत्तरं नसल्याचं स्पष्टं लक्षण आहे (तुमचं कुत्रप्रेम बघता हा 'शेपटी पायात घालणे' वाक्प्रचार तुम्हाला आजिबात ऑफेंडिंग वाटणार नाही ह्याची मला खात्री आहे) >>

नाहीच. तुमच्याकडून मुळातच सुसंकृतपणाची अपेक्षा नाही माझी.

<< जर तुम्ही तुमच्या कुत्र्याला अश्या प्रसंगी तुमच्या बरोबर नेत नसाल, पंगतीला बसवत नसाल तर तो ह्या सोसायटीचा एक गौण मेंबर आहे असे तुम्ही स्वतःच मान्य केले आहे. समाजातल्या माणूस प्राण्यांचा कन्वेनियन्स कुत्र्यापेक्षा मोठा आहे हे ही तुम्ही कुत्राला लग्न समरंभाला न नेऊन सिद्ध केले आहेत. मग ओळखीच्या माणसांमध्ये 'शेपटी घालणे' आणि अनोळखी माणासांमध्ये कुत्र्याला घेऊन अरेरावी करणे हे दुतोंडी वागणे(मराठीत 'हिप्पोक्रेटिक') झाले.>>

चमन, तुम्ही हा, आयडी का घेतला ह्याविषयी मला यत्किंचितही संभ्रम उरला नाहीये. तूम्ही लग्नालाच काय कोणाच्या मयतालाही घरातल्या सगळ्यांना बरोबरच घेऊनच जात असाल याची खात्री आहे मला. Proud

नाहितर घरातील ईतर सभासद गौण आहेत असे सिद्ध होईल ना.

असो, तुम्ही स्वतःच प्रश्न विचारुन, त्याची स्वतःलाच सोयिस्कर उतरे देऊन, आवडीचे निष्कर्ष काढत बसा. मुद्दे सोडून चर्चा करण्यात मला काडीचेही स्वारस्य नाही.

ता.क.: कायद्याची माहिती नसली तर फसवणूक होऊन, फसवणूक करणार्‍याविषयी नाव न घेता खडेफोड करावी लागते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

सायो, मला वाटतं मुळात या बाफची सुरवात प्राणी पाळणारी मंडळी हे सगळं (किमान इथे भारतात तरी) दुसर्‍या मंडळींवर सार्वजनिक ठिकाणी लादतात या कारणाने झाली आहे. बागेत बेंचवर कुत्रा बसलेला असेल तर तो उठल्यावर पण मला त्या बेंच्वर बसावं वाटणार नाही.

रोज सकाळी पोराला बसस्टॉपवर सोडायला नेताना पाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या घाणीला ओलांडून जावं लागतं. किमान १०-१५ जागी तरी असतेच घाण. पोरगा अंगावर धावून आलेल्या भल्या मोठ्या कुत्र्यामूळे दोन वेळा पडलाय सकाळी. आणि त्यावेळी मालकिणीच्या हातात पट्टा होता कुत्र्याचा.

नाही कळत लोकांना दुर्दैवाने. Sad

झिन्तामान नावाची सालस, गरीब बिच्चारी भारतीय नारी आपल्या भुभुबाळाला घेऊन दुकानात कुत्र्याची बिस्कीटे मागते. तिथे अमिताबच्चन नावाचा आगाऊ भारतीय युवक ती बिस्कीटे खाऊन टाकतो हा प्रसंग मी डोळ्याने पाहीलेला आहे. यावरून कुमांना सुद्धा त्रास असतो हे सिद्ध होतंय. त्यात ती गबिभाना दुस-या दिवशी आपल्या पपीला घेऊन रेस्तराँमधे जाते. तिथे पण अमिताबच्चन नावाचा आभायु आगाऊ पणा करून त्या पपीला मिर्ची खाऊ घाल्तो. ती बिचारी शिस्तप्रिय कुमा असल्याने सगळं बिल देते. तर हा लगेच अमीरी दिखा रही हो म्हणत एक गाणं म्हणतो. बिच्चारीने काहीही करावं आणि याने आगाऊपणा करत अर्थाचे अनर्थ करावेत हा प्रसंग आज पटला बै...

धाग्याचे नाव काय बरं...या श्वानप्रेमींचे काय करावे ?
शनिवारवाड्यावर सत्कार !

जयहिंद , जयभारत !

बाबु, काही मख्लाशी नाही.
तुमच्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर आहे.
आता तुम्हाला समजूनच घ्यायचे नसेल तर गोष्टं वेगळी.

असो, पण तुम्हाला आणि इतर कुणालाही समजून घ्यायची इच्छा झालीच तर ही खास एविएमए ची लिंक.
त्यापुढची लिंक माझ्यासारख्या भविष्यात कुत्र पाळण्याची इच्छा असणार्या लोकांसाठी आहे.

(आता छिद्रान्वेशीनी ही फक्त पेटच्या सोशल गॅदरिंग्जना होणू शकणर्या आजारांची लिस्ट आहे म्हणू नये. ;))
https://www.avma.org/public/PetCare/Pages/Disease-Risks-for-People.aspx

https://www.avma.org/public/PetCare/Pages/Pets-and-Zoonotic-Diseases-FAQ...

ही एकंदर साईटच छान आहे.
वर चर्चेत होऊन गेलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे जसे की कुत्र्यांच्या मालकांनी कुत्र्याची, स्वतःची आणि कुत्र्याच्या संपर्कात येणार्या इतरांची काळजी कशी घ्यावी हे यात लिहिलेले आहे.
जरा शोधाशोध करावी लागेल.

>>सायो, मला वाटतं मुळात या बाफची सुरवात प्राणी पाळणारी मंडळी हे सगळं (किमान इथे भारतात तरी) दुसर्‍या मंडळींवर सार्वजनिक ठिकाणी लादतात या कारणाने झाली आहे>> हो, ते कबूल. पण इब्लिस जे म्हणतायत (एका थाळीत जेवणं, बाहेरून आल्यावर पाय धुणं वगैरे) ही घरातली उदाहरणं आहेत. प्राण्यांचे केस शेड होणं हा प्रॉब्लेम आहे तर तो सगळ्याच प्राण्यांना लागू व्हावा.

ओक्स, सांगतो.

अश्या अरेरावी करणार्‍या कुत्रे मालकाविषयी, तक्रार करावी. बागेत व्यवस्थापन असेलच. त्यांच्याकडे नक्की माहिती मिळेल. मुळात बर्‍याचश्या बागेत कुत्रे फिरायला घेऊन येणे अलाऊड नसते. ते चेक करावे. कुत्रा बागेत घाण करत असेल तर सार्वजनिक स्वच्छता विभागाकडे (बाफ नव्हे) तक्रार करावी.

असा विचार करु, की कुत्र्याच्या ऐवजी बाकावर कुष्ठरोगी, गटार सफाई / मातीकाम करून आलेले कामगार, वेडा माणूस बसले असते तर काय केले असते ? तक्रार करणे शक्यच नाहीये, अ‍ॅक्सेप्ट करणे हाच उपाय ना ? मग तसच कुत्रं बसणं अलाऊड आहे का हे चेक करुन, नसल्यास योग्य ठिकाणी तक्रार करणे व असल्यास मान्य करणे हाच शहाणपणा नाही का ?

उगाच मानव हा पाळीव प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ वगैरे असल्याच्या कवीकल्पना न बाळगता, प्रॅक्टिकल दृष्टीकोन स्वीकारुन मोकळे व्हावे. चांगले पुष्कळ आहे जगात बघण्या करण्यासारखे....

अरे माठा, तूला कुत्र्याचे कायदेशीर अधिकार समजावून सांगायचे पैसे दिले आहेत का मला तुझ्या तीर्थरुपानी ?
<<

तुमच्या या अत्यंत सभ्य व सुसंस्कृत स्टेटमेंटमधे, 'कुत्र्याचे कायदेशीर अधिकार' ऐवजी 'वैद्यकशास्त्र' हा शब्द घालून स्वतःसाठी वाचावे. Wink
*
शिवाय, ती चर्चा, अन तिच्यातून पळ काढलेला तुम्हाला चांगलाच ठाऊक आहे, उगंच वेळ नसल्याचा आव किती दिवस आणणार आहात? सुरुवात मी नव्हती केली, मेल करून 'चर्चा' तुम्ही सुरु केली होती साहेब.

. पण इब्लिस जे म्हणतायत (एका थाळीत जेवणं, बाहेरून आल्यावर पाय धुणं वगैरे) ही घरातली उदाहरणं आहेत. प्राण्यांचे केस शेड होणं हा प्रॉब्लेम आहे तर तो सगळ्याच प्राण्यांना लागू व्हावा.>> अ‍ॅग्री

वरील लिंक्स पाहिल्या. विचारात घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. अश्या ';याहू अ‍ॅन्सर्स' वगैरे स्वरुपाच्या लिंक्स सोयीनुसार हव्या तश्या सापडू शकतात. ते असो!

कुत्रे न पाळल्यामुळे किंवा कुत्रे पाळणारे कोणीही भूतलावर नसल्यामुळे ह्यातले काहीही होणार नाही ह्याची खात्री देता येईल का असा प्रश्न केल्यास बहुधा उत्तर नाही असे असेल असे नुसतेच मनात वाटत आहे.

कृपया - कुत्र्यांमुळे होऊ शकणारे रोग ह्या वळणावर चर्चा जाऊ नये अशी विनंती! कुत्रेमालकांमुळे झालेल्या रोगांबाबत सदर बाफ असावा असे वाटत आहे.

अहो आधुनिक अश्विनीकुमार,

"त्या प्राण्याला ज्या व्हायरस जंतूंनी आजार होतात, ते आपल्यात पसरू शकतात, त्याला ज्या जंतूंनी काहीच होत नाही, त्यामुळे तो हेल्दी असतो, असे कमेन्साल्स, आपल्यासाठी पॅथोजेनिक असू शकतात."

ह्या आपल्या वाक्याचे उदाहरण, आमच्यासारखे सेल्फप्रोक्लेम्ड श्वानवैद्य कसे बरे देणार ? स्टेटमेन्ट आपलेच आहे, उदाहरण आपल्यालाच द्यावे लागणार. नका देऊ नसले तर.

अल्पना, पोस्ट नीट वाचा इब्लीस यांची.

साती, कुत्रे पाळणार्‍याना आजारांची कल्पना देण्यासाठी टाकला होतात का मग ती पोस्ट ?

बागुलबुवा
एवढेच म्हणेन तुम्हाला तुमच्या कुत्र्याकडूनच सामान्यज्ञान, नागरिकशास्त्र, माणूसकी, सुसंस्कृतपणा असे बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्याचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून रोज थोडे थोडे घेत चला बर्‍याच प्रश्नांची ऊत्तरे मिळण्यास थोडी तरी मदत होईल.

उगाच मानव हा पाळीव प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ वगैरे असल्याच्या कवीकल्पना न बाळगता<<<

हे विधान जर निव्वळ भूतदयेतून आलेले असेल तर तुम्ही मांसाहारी नस्णार हे नक्की समजतो.

(ह्या दोहोंचा संबंध काय असे कोणी विचारणार नाही अशी आशा आहे).

मानव श्रेष्ठ आहे वगैरे मुद्दाच नाही, माणसाला बसण्यासाठी माणसाने बाक बनवला असेल आणि सार्वजनिक ठिकाणी ठेवला असेल (बाक) तर त्या बाकावरील आपले लाडके श्वान एका अपरिचित माणसासाठी खाली उतरवणे हे निव्वळ सहकार्य आहे. Happy

बाबु, उगाच शाब्दिक चमत्कार करत उत्तरं देण्यापेक्षा प्रॅक्टिकल, सभ्य समाजात वावरण्याची, जबाबदार उत्तरे दिलीस तर फायदा आहे.

अश्या अरेरावी करणार्‍या कुत्रे मालकाविषयी, तक्रार करावी. बागेत व्यवस्थापन असेलच. त्यांच्याकडे नक्की माहिती मिळेल. मुळात बर्‍याचश्या बागेत कुत्रे फिरायला घेऊन येणे अलाऊड नसते. ते चेक करावे. कुत्रा बागेत घाण करत असेल तर सार्वजनिक स्वच्छता विभागाकडे (बाफ नव्हे) तक्रार करावी.

>>> हे खरंच प्रॅक्टिकल आहे का? बागेतील व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता विभाग आणि त्यांची कार्यक्षमता काय असते हे माहित आहे ना? त्यापेक्षा कुत्रामालकाने 'कुत्र्याच्या शेजारी बसण्याची भिती वाटते' अशी विनंती ऐकून सभ्यपणे कुत्र्याला खाली बसवले तर जास्त योग्य नाही का होणार?

असा विचार करु, की कुत्र्याच्या ऐवजी बाकावर कुष्ठरोगी, गटार सफाई / मातीकाम करून आलेले कामगार, वेडा माणूस बसले असते तर काय केले असते ? तक्रार करणे शक्यच नाहीये, अ‍ॅक्सेप्ट करणे हाच उपाय ना ? मग तसच कुत्रं बसणं अलाऊड आहे का हे चेक करुन, नसल्यास योग्य ठिकाणी तक्रार करणे व असल्यास मान्य करणे हाच शहाणपणा नाही का ? >>> हा बाफाचा विषय आहे का? बरं कुत्र्याची तुलना कुष्ठरोगी, भिकारी, वेडा माणूस यांच्याशी करून तुम्हीच त्यांना त्या लायनीत बसवताय. कुत्र्याबरोबरचा माणूस सभ्य, स्वच्छ असेल तर त्याला विनंती केली जाते. वेड्याला, भिकार्‍याला कोणी विनंती करत नाहीच. नुसता कुत्रा बेंचवर बसला असेल तरी त्याला कोणी विनंती करणार नाही - हाड म्हणतील किंवा गुरगुरला तर घाबरून निघून जातील. इथे मालकांबरोबर असलेल्या कुत्र्यांचा विषय आहे.

बेफि,

कोणत्या वरील लिंक्स म्हणताहात?
साती यांनी दिलेल्या लिंक्स अमेरिकन व्हेटरनरी मेडीकल असोसिएशनच्या आहेत.
आता व्हेटरनरी मेडिकल असोशिएशन म्हणजे नक्की काय आहे ते तुम्हाला समजलं असेलच?
नसेल, तर यापैकी कोणता आजार तुम्हाला झालेला चालेल असं तुम्हाला वाटतंय?

मी मांडलेला मुद्दा हा होता, की त्यातले धोके समजून उमजून मग कुत्रा पाळा. लोकांना होणारा त्रास जाऊ द्या, स्वतःची तरी काळजी करा. इथे वेगळीच गम्मत सुरू झालिये.

बेफिकीर ती याहु आन्सर टाईप लिस्ट नाही हे तुमच्या डोक्यात शिरणार नाही.
ती अतिशय सुप्रसिद्द अश्या अमेरिकन व्हेटरनरी मेडिकल फाऊंडेशनची साईट आहे.
इतक्या लवकर ती पाहून 'बेकार आहे' या निष्कर्षावर येण्याइतकी अफाट बुद्धिमत्तातुमच्याकडे आहे याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.
Wink

मी पुन्हा एकदा विचारते की कुत्रे पाळण्याचे आणि त्यांना सार्वजनिक जागेत घेऊन वावरण्याचे डूज आणि डोन्टस काय आहेत?

आपल्या देशांत अजूनपर्यंत तरी काही डिटेलमध्ये कायदा अस्तित्वात नाही. म्युनिसिपालिटीचे काही नियम, प्रत्येक सोसायटीचे काही नियम आणि काही डिस्प्युट्समध्ये दिले गेलेले निकाल इतकाच थोटका ऐवज आहे.

बेफि,

कोणत्या वरील लिंक्स म्हणताहात?
साती यांनी दिलेल्या लिंक्स अमेरिकन व्हेटरनरी मेडीकल असोसिएशनच्या आहेत.<<<

तुमच्या आमच्या देशात अमेरिकन नव्हे तर भारतीय नियमांनाही कोलतातच की लोकं इब्लिस?

नुसते पुण्यात कर्वेरोडवरून सलग पंधरा दिवस चाललात तर मरणाचा खोकला होईल! अमेरिकन लिंक्स गेल्या तेल लावत!

>>>त्यापेक्षा कुत्रामालकाने 'कुत्र्याच्या शेजारी बसण्याची भिती वाटते' अशी विनंती ऐकून सभ्यपणे कुत्र्याला खाली बसवले तर जास्त योग्य नाही का होणार?<<<

एक्झॅक्टली!

इतकाच प्रश्न आहे खरे तर!

तुम्हाला परत नीट समजत नाहिये. बेफि.

"त्यांच्या"कडून शिकवणीची फी मिळत नसली, तरी तुम्हाला जेन्युइन प्रश्न आहे, अन तुम्ही तर माझे जवळचे मित्र! म्हणून सांगतो नीट समजवून.

उदा.,
एक टेपवर्म (शास्त्रीय नांव :Echinococcus granulosus) नावाचा जंत असतो.
बाळांच्या पोटात जंत होतात ना?? त्यापैकी एक.
हा बेसिकली कुत्र्यांना अन मेंढ्यांना त्रास देतो.
पण तिथून कधी कधी माणसाकडे येतो. कसा?? हे त्या अमेरिकन लिंकवरूनः

>>Echinococcosis

People can be infected by several species of tapeworms. Echinococcus multilocularis and Echinococcus granulosus can infect people who come into contact with the infected animal's stool (or anything, including the animal's fur, that is contaminated with stool).
<<

अर्थात, कुत्र्याच्या विष्ठेशी संपर्क येऊन त्याद्वारे याची सूक्ष्म अंडी पोटात जातात. त्या कंसातलं वाक्य वाचा.
>> anything, including the animal's fur, that is contaminated with stool<<
म्हणजे, त्या विष्ठेचा स्पर्श झालेले कुत्र्याचे केस.

त्याने शी केलेली आवरली तरी बस झाली असं इथे बोलणं सुरू आहे, आपण त्या लाडक्या बाळाची शी "धुतली" जाण्याबद्दल बोलतो आहोत. अन्यथा ते केस. जे माणसाप्रमाणे कुत्र्याचेही गळतात. अन त्याच केसांना चिकटलेली ती अंडी. समजलं, मी का त्या केसांबद्दल बोलतोय ते?

आता हा जंत, त्याची अंडी माणसाच्या पोटात गेल्यावर काय होते?

जेवण केले असेल, उलटी होणार नाही अशी खात्री असेल, तर ही गूगल लिंक पहा, त्यातल्या चित्रांसाठी.

हा झाला एक आजार.
असे बाकीचे अनेक आजार तिथे लिहिलेले आहेत.

शंका असतील तर बिन्धास्त विचारा.

शंका एकच आहे इब्लिस.

हे सगळे होऊनही भारतात ग्रामीण विभाग, निर्मनुष्य विभाग, शेत, बंगल्याची सुरक्षा, शौक अश्या विविध कारणांनी कुत्रे पाळणार्‍यांपैकी बहुतांशींना हे का होत नाही?

<< बाबु, उगाच शाब्दिक चमत्कार करत उत्तरं देण्यापेक्षा प्रॅक्टिकल, सभ्य समाजात वावरण्याची, जबाबदार उत्तरे दिलीस तर फायदा आहे. >> उत्तर माझ्यामते प्रॅक्टिकलच आहे. तुम्हाला तसं वाटत नसेल तर त्यापेक्षा जास्त प्रॅक्तिकल उत्तर मिळवून आचरणात आणा की. मी माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे उत्तर दिलेलेच आहे.

<<<<<अश्या अरेरावी करणार्‍या कुत्रे मालकाविषयी, तक्रार करावी. बागेत व्यवस्थापन असेलच. त्यांच्याकडे नक्की माहिती मिळेल. मुळात बर्‍याचश्या बागेत कुत्रे फिरायला घेऊन येणे अलाऊड नसते. ते चेक करावे. कुत्रा बागेत घाण करत असेल तर सार्वजनिक स्वच्छता विभागाकडे (बाफ नव्हे) तक्रार करावी.

>>> हे खरंच प्रॅक्टिकल आहे का? बागेतील व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता विभाग आणि त्यांची कार्यक्षमता काय असते हे माहित आहे ना? त्यापेक्षा कुत्रामालकाने 'कुत्र्याच्या शेजारी बसण्याची भिती वाटते' अशी विनंती ऐकून सभ्यपणे कुत्र्याला खाली बसवले तर जास्त योग्य नाही का होणार? >>>>>>

बसवतोय का तो ? इथे बाफ काढला, चर्चेच्या नावाखाली असंस्कृतपणा करुन झाला, त्याने काय फरक पडला प्रेक्टिकली "त्या" कुत्रेमालकाच्या वागण्यात ? उगाच लिहायचय म्हणून लिहू नका मामी.

<< हा बाफाचा विषय आहे का? >> भटके कुत्री, कुत्र्यांमुळे पसरणारी रोगराई हे ही बाफचे विषय नाहीतच. बादवे, मूळ प्रष्नाला मीच वर काढलय बहुत्येक.

<<बरं कुत्र्याची तुलना कुष्ठरोगी, भिकारी, वेडा माणूस यांच्याशी करून तुम्हीच त्यांना त्या लायनीत बसवताय. >> अजिबात नाही. बेन्च्वर ज्याच्या बाजूला बसणे ऑकवर्ड वाटू शकते ह्याची मला सुचलेली यादी आहे ती.

<<कुत्र्याबरोबरचा माणूस सभ्य, स्वच्छ असेल तर त्याला विनंती केली जाते. वेड्याला, भिकार्‍याला कोणी विनंती करत नाहीच. नुसता कुत्रा बेंचवर बसला असेल तरी त्याला कोणी विनंती करणार नाही - हाड म्हणतील किंवा गुरगुरला तर घाबरून निघून जातील. इथे मालकांबरोबर असलेल्या कुत्र्यांचा विषय आहे.>>

मी मालकाविषयीच कम्प्लेन्ट करायाला सांगतोय.

<< मी मांडलेला मुद्दा हा होता, की त्यातले धोके समजून उमजून मग कुत्रा पाळा. लोकांना होणारा त्रास जाऊ द्या, स्वतःची तरी काळजी करा. >>

अगदी योग्य मुद्दा आहे. पण इथे नक्कि कोणत्या कुत्रेमालकाने सल्ला विचारला आहे ? बादवे, तुम्ही जे लिहिले होते त्यातून मला तरी हा मुद्दा आहे हे जाणवले देखील नाही.

Pages