ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस, / कुत्रा आजारी पडल्यास कोणाला सिलेक्ट करून खर्च कराल ह्या प्रश्नाचे उत्तर लिहायला काल वेळ झाला नाही कारण अवेलेबल ऑफ वर्क वेळातले दोन तास कुत्र्यांबरोबर चालण्यात जात असतात.

हे फक्त मी एक कुत्रे मालक ह्या नात्याने लिहीत आहे. इतर काय करतात माहीत नाही.

घरातील माणसांसाठी हेल्थ इन्स्युरन्स आहे व कुत्र्यांसाठी पण आहे. प्रीमियम भरते. ह्या लिंक वर माहीती मिळेल. ह्युमन्ससाठी ऑफिसातून मिळतो तोच. तो आपल्याला माहीत असेल अशी आशा करते. अपोलो म्युनिक आहे.
http://newindia.co.in/Content.aspx?pageid=77 आपण स्वतः, माणसे व घरातील पाळीव प्राणी ह्यांच्या वेल बीइन्ग ची रीझनेबल काळजी घेतली आहे. ह्यापलीकडे कुत्रा अचानक हात सोडून गाडी खाली आल्यास ट्राफिक मध्ये पळायचे नाही इतपत मानसिक शिस्त आहे. कारन इतर जबाबदार्‍या असतात. मरून चाल णार नाही इत्यादी. आता ह्याला सिंपथी टूर म्हणू शकता.

अति श्रीमंत तसेच होमलेस होबो ह्या सर्व आर्थिक रेंज मध्ये कुत्रे मालक असतात. होमलेस माणसेपण त्यांच्या अ‍ॅसेट नसलेल्या अवस्थेतही कुत्र्याबरोबर सुखेनैव जगत असतात. एक पोळी मिळा ल्यास अर्धी शेअर करू इत्यादी. हे फालतू भावनीकरण नाही. कुठलाही कुत्रे मालक अ‍ॅग्री करेल.

बीएम सी चे कुत्रेपालनाचे नियम डॉग लायसन्स बरोबर मिळतात ते पाळ ले नाहीत तर फाइन असते.
शिक्षा पण असते. तुम्हाला त्रास देणार्‍या कुत्रे मालकाला तुम्ही लायसन्स आहे का हे विचारू शकता व सोसाय्टी तर्फे सक्ती करू शकता. व्हेट कडून कुत्र्याची जी फाइल मिळते त्यातील सर्व इंजेक्षने दिली आहेत कि नाही ते चेक करून मगच लायसन्स देतात. ७५० रु फी आहे प्रत्येकी. त्या फाइल्वरही हे नियम छापलेले असतात. जिथे मॅरेज लायसन्स मिळते त्याच काउंटरला मिळते. हे नियम मी वीकांताला इथे लिहून काढेन. ते तुम्ही सोसायटीत लागू करू शकता.

सिंपथी टूर पोस्ट ज्याला म्हटले जात आहे त्यातच मला कोणाला लेबल लावायचे नाही असे स्पष्ट लिहीले आहे. ऑफिसा तून मायबोली उघडल्यावर येथील प्रतिसाद इंगर्जीतच देता येत होता. त्यामुळे ती पोस्ट इंग्रजीत लिहीली आहे. लेबल लावण्याइतके येथील कोणीही माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग नाहीत त्यामुळे ती गरज वाटत नाही.

बे जबाबदार इतर कुत्रे मालक व स्ट्रेडॉग मेनास ह्या बद्दल मी काही बोलू शकत नाही. साउथ बाँ बे तील लोकांचा इतर बाबतीत रूड नेस आणि एंटायट्ल्ड बिहेविअर मी अनुभवले आहे तसेच काही अतिश य चां गले प्रेमळ लोकही भेटले आहेत. त्यामुळे जनरलायझेशन करता येत नाही. सर्व कुत्रे दत्तक कँप ग्रूमिन्ग कँप्स,
मी ट अप्स, कुत्र्यांसाठी पिकनिक इत्यादीचा उत्साह तिथेच दिसतो जास्त. येवढेच कि जित की मोठी श्वान द्वेषी कम्युनिटी आहे तितकीच श्वान प्रेमी कम्युनिटी देखील आहे. जालावर दोन्ही भेटता मुलांना इजा कर णा या कुत्र्यांना ज से मारले जाते तसे कुत्र्यांना डॉग फाइट मध्ये वगैरे अतिशय जखमी कर णार्‍या त्यांचे कान कापणार्‍या लोकांनाही कायदेशीर शिक्षा केली जाते.

कालच्याच मुंबई मिरर मध्ये एका डॉगवॉकर बाईने चाइल्ड अब्युज करणार्‍या मान्साला पकडल्याचे वाचले. लिंक द्यायला वेळ नाही आत्ता.

डिस्क्लेमरः कोणत्याही पो स्टीत सिंपथीची भीक मागायचा आजिबात उद्धेश नाही.

कुठल्याही प्रश्नाचे उत्तर यात नाही.
कुत्रेप्रेमी आणि कुत्रेद्वेष्टे एवढे दोनच प्रकार असतात अधलेमधले काही नसते हे क्लीअर केलेले आहे.
बेजबाबदार कुत्रेप्रेमीमालक खूप संख्येनेआहेत किंवाकसे याबद्दल अळिमिळी गुपचिळी धोरण.

लोक घरात घुसून आपले कुत्रे मार्तील अशी भिती वगैरे हे इथल्यांसाठी अपमानास्पदच आहे पण इथले लोक तुमच्यासाठी मह्त्वाचे नाहीत हे स्पष्ट केल्याने त्याची काहीच पडलेली नाही तुम्हाला हे स्पष्ट आहे.

स्वतःच्या जीवापेक्षा तुमचे कुत्रे किंवा कुठलेही कुत्रे आम्हाला मह्त्वाचे नाही आणि कुत्रेप्रेमी झापड लाव्ल्यासारखं प्रेमी नसलेल्या सर्वांनाच द्वेषी मानतात हे पर्त परत स्पष्ट झाल्याने प्रेमी लोकांच्या म्हणण्याला किंमत द्यायची गर्ज नाही हे मला परत एकदा कळले.

अमांनीच सगळी उत्तरे का द्यायला हवीत? जेवढी शक्य होती तेवढी त्यांनी दिली. आणि समजा सर्व मुद्दे अमांनी मान्य केले तर काय होईल? मुळात त्या जर त्यांच्या कुत्र्याची कायदेशीर व नियमात राहून काळजी घेत असतील तर एखाद्या कुत्र्याचे हाल बघून त्यांना (जास्तच) हळहळ वाटू शकते. तुम्हाला त्रास देणाऱ्या कुत्रेमालकांना विचारा ना ते प्रश्न. त्यांच्या काही पोस्टींमुळे त्या आन्सरेबल झाल्या हे मान्य आणि त्यांनी 'त्यांची' उत्तरेही दिलीत. 'सिंपथी टूर काढणारी' हे लेबलीकरण नाही का? बाह्य जगतातील बेजबाबदार कुमा साठी अमांना वेठीस धरणं म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखं आहे. प्लीज.

जबाबदार कुत्रे मालकांची लक्षणे काय असावीत?

ती सगळ्या कुत्रे मालकांत असतात का? नसतील तर त्यांचे उद्बोधन गरजेचे नाही का?

कुत्रे मालकांनी कसे वागावे याबद्दल काही नियम आहेत का?

नसतील तर नियम नाहीत म्हणून उद्धटपणे वागून इतरांचे कुत्र्याबद्दलचे मत अधिकच वाईट बानवल्याबद्दल कुतरे मालकांना का जबाबदार धरले जाऊ नए?

कोणीही वेठीस धरलेले नाहीये. इथले लोक घरात घुसून कुत्रे मारतील असली विधाने आहेत. का हे ऐकून घ्यायचेय?
उत्तरे देते म्हणून सांगत त्यांनी कुठलीच उत्त्रे दिली नाहियेत हेही म्हणायचे नाही असे असेल तर तुम्ही म्हणू नका.

हे बघ मामी... इथे कुणालाही पडलेली नाहीये कारण कुत्रेप्रेमीमालकांसाठी इतर माणसे मह्त्वाची नाहीत.

आशुडी, मंजुडी..... नवल वाटलं.

आधीच्या अनेक पोस्टीत कुत्र्यानी मुलाला चावालं, फाडलं असा उल्लेख असताना त्यावर भाष्य न करता फ़क्त एकक पोस्टीत कुत्र्याचे हाल केल्याचा उल्लेख आल्यावर traumatize झालं वगैरे भावनापूर्ण पोस्टी लिहिल्या तार त्याचा अर्थ simpathy गोळा करणे असा होतो.

ह्यापेक्षा जास्त काय लिहीणार. काम खूप आहे. इतर लोकांची जबाबदारी किंवा त्यांच्या वागण्याला मी काय व्हाउच करणार? मी त्यांचे किंवा त्यांच्या कुत्र्यांचे बिहेविअर कंट्रोल करू शकत नाही.

मला काय आणि कशाची भीती वाटू शकेल ह्याचे काय जस्तीफी़केशन. जगात कोठे ही काही अ‍ॅब्युझिव बिहेविअर पाहिले वाचले नेट वर तर आपल्या भीती वाट्ते तितपतच होते. पिट बुल आणि मॅस्टिफ पपीज चे व्हिडीओ बघते. Wink

अमा, मग तुझ्या या धाग्यावर येण्याचा आणि लिहिण्याचा संबंधच नाही येत. तू जबाबदार मालक आहेस आणि इतर कुत्रेमालकांनी कसं वागावं याच्याशी तुला देणं घेणं नाही. मग तसंच कोणी कुत्र्यांशी कसं वागावं याच्याशीही तुला देणं घेणं नसलं पाहिजे. 'येथील कोणीही माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग नाहीत' हे ही असल्याने या धाग्यावर तू का आलीस याबद्दल जेन्युईन प्रश्न पडला. असो.

जगात कोठे ही काही अ‍ॅब्युझिव बिहेविअर पाहिले वाचले नेट वर तर आपल्या भीती वाट्ते तितपतच होते. >>>> दु:ख हे आहे की कुत्रे आणि कुत्रेमालकांचे बिहेवियरही अ‍ॅब्युझिव असते याकडे सोईस्कररित्या काणाडोळा केला आहे.

थोडक्यात एवढेच की कुत्रेप्रेमीमालकांशी कुठल्याही प्रकारचा संवाद होऊ शकत नाही. त्यांच्या कुत्र्याचा उपद्रव कोणाला झाल्यास त्यांच्यासाठी ते कोणी महत्वाचेच नसल्याने ते काही लक्ष देणार नाहीत.
कुत्रे न आवडणारे, कुत्र्यांची भिती असणारे इत्यादींनी आपला जीव मुठीत ठेवून जायचे. आलाच कुत्रा अंगावर तर त्या क्षणाला स्वसंरक्षणाचा जो काय उपाय मिळेल/ सुचेल तो करायचा.
ज्यांच्या घरी कुत्रे असतील त्यांच्या घरी जायचे की नाही हे केस बाय केस बेसिस वर ठरवायचे पण आपली कुत्र्यांची नावड स्पष्ट करायची.
आणि सुमेधा बाकावर बसण्यासंदर्भातही तेच... ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीपेक्षा यांचे कुत्रे यांना महत्वाचे असल्याने ते कुत्र्याला बाजूला करणार नाहीत. कुत्रे अंगावर येऊ शकते चावू शकते त्यामुळे कुत्र्याला आपण बाजू करू शकणार नाही. तेव्हा कुत्र्यांच्या बळावर ही गुंडागर्दी चालूच रहाणार. त्याला आपण घाबरूनच रहायचे.
यातून आपल्याला कुत्रेद्वेषी म्हणले जाईल कारण कुत्रेप्रेमीमालकांच्या समजेची कक्षा प्रेमी वा द्वेषी एवढीच आहे. अधलंमधलं समजण्याची शक्यताच नाहीये. यांच्या अश्या विचित्र कट्टर वागण्यामुळेच लोक कुत्र्यांचा द्वेष करू लागत असावेत अशी शंका होती. आता खात्री झाली.

इथल्या कुत्रेप्रेमीमालकांच्या पोस्टींवरून मला हे आणि एवढेच जाणवलेले आहे. याहून काहीही इथे घडण्याची शक्यता नाहीये. तेव्हा आता कंटाळा आला.

अमा >> धन्यवाद.. आता रस्तात जर कोणी कुत्रामालक/ मालकिण कुत्राची शी साफ करत नसेल तर ही माहिती विचारुन तक्रार करीन नाहितर Whatsup/ fackbook local community वर Dirty fellows म्हणून त्या कुत्राचे शी करताना (कुत्रामालक/ मालकिणसोबत) काढलेले फोटो upload करीन..

यांच्या अश्या विचित्र कट्टर वागण्यामुळेच लोक कुत्र्यांचा द्वेष करू लागत असावेत अशी शंका होती. आता खात्री झाली. >>>> + १००००००००००००००००००००००००००००००००००००००००

कुत्रे प्रेम खरंच असते तर व्यवस्थित वागून इतरांच्या मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसले असते. मात्र आता लक्षात आलंय की कुत्र्यापेक्षा स्वतःचा इगो कुरवाळणे हे जास्त महत्त्वाचे वाटते कुत्रेमालकांना.

लोक भानावर आले असतील तर त्यांनी डॊ समीर कुलकर्णी यांचे श्वानद्वेष्टेपणाचे धर्मांतर कसे झाले यावर एप्रिल २०१४ च्या अनुभव च्या अंकातील लेख जरुर वाचाव. वर मी कुठेतरी लिहिले होतेच. परत लिहितो ही घ्या लिंक
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7ISUhKLUhNT3pzTGI0MWd6Z252UXQ...

इतक्या गरमागरम चर्चेनंतर हा धागा नुसताच बंद पडण्यापेक्षा यातून दोन्ही बाजूंनी काही एक सोल्युशन निघाले तर जास्त उत्तम होईल.

कुत्रे पाळणे : do and don'ts

असं काही कम्पायलेशन करता आलं तर ते सर्क्युलेट करून एकूणच सगळ्या समाजाच्या हिताचे ठरेल.

मामी, ते होणार नाही.
कारण जे डूज आणि डोन्टस आहेत ते बहुतांशी कुत्रेप्रेमीमालकांनी पाळायचे असणार आणि त्यांना ते पटणार नाहीत. मग कशाला आपला वेळ वाया घालवतेस?

तो लेख काय हेतूने दिलाय? ज्यांना कुत्रे आवडत नाहीत त्यांनी भक्तिभावाने कुत्रेपंथाला लागावे असा उद्देश आहे का?
जनरली कुठल्याही पंथाचे, बाबा-बुवा-बापू-स्वामीचे प्रचारकी साहित्य जसे कंटाळवाणे असते तितकीच लेखाची पहिली दोन पाने कंटाळवाणी झाली. माझा आधी अजिबात विश्वास नव्हता. मला मित्राने/ बायकोने/ बहिणीने/ आऊच्या काऊने सांगितले. मग मी त्या स्वामींच्या मठात/ मंदिरात गेलो/ पोथी वाचली/ अमुक मंत्र म्हणले वगैरे आणि मला अनुभव आला. अश्या पठडीतला लेख वाटतो.

कशासाठी ती लिंक सारखी चिकटवताय?

घाटपांडे,

हा धागा आणि तो लेख एकमेकांशी असंबद्ध आहेत असे मला वाटत आहे.

एकुणच लिंक्स देणार्‍या सर्वांना विनंती करावीशी वाटते की दिलेल्या लिंकचा गोषवाराही लिहावा, त्यावर स्वतःचे मतही लिहावे आणि त्या लिंकचा आणि मूळ धाग्याचा संबंधही असावा.

मुक्तेश्वर,

कळवळा असा दुसर्‍याला आणता येत नाही!

एकट्या अश्विनीमामींना धारेवर धरण्यात आले आहे असा बाफचा सूर नाही व मानला जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा! त्या त्यांची जबाबदारी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पार पाडतात.

एकुण लेखाखाली काही वेगळीच मते वाचायला मिळाली.

१. बाकावर कुत्र्याने का बसू नये, कुत्र्याला उठवावेसे माणसाला का वाटावे
२. घाटपांडेंचा लेख
३. कुत्र्याला मनुष्यापेक्षाही अधिक मूल्यवान मानल्यासारखे काही प्रतिसाद

बाकावर कुत्र्याने का बसू नये, कुत्र्याला उठवावेसे माणसाला का वाटावे>> मालक बाकावर बसला तेही मालकाचेच कुणीतरी ना. तो खाली बसला असता तर कुत्राही खाली बसला असता.
कुत्र्याला मनुष्यापेक्षाही अधिक मूल्यवान मानल्यासारखे काही प्रतिसाद>> हं मेरी मुर्गी की एक टांग

मलबार हिल्स वांद्रे जुहु यासारख्या उच्चभ्रु ठिकाणी राहणारे लोक रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जरी आला तर पोलिस स्टेशन ला फोन करतात... आणि तीच लोक धारावी, परळ सारख्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या समर्थनात पेटा संस्थेबरोबर आंदोलने करताना दिसतात.......

प्रकाश सर, ह्या एका लेखाने ह्या धाग्यावर रोमातून बाहेर यायला भाग पाडलं! हा लेख इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!

मी कुत्रा द्वेष्टी नाही पण फार कुत्रा प्रेमीही नाही. मी कुत्र्यांना आणि कुत्रे मला घाबरत नाहीत हे माझं आणि कुत्र्यांचं नातं! पण मुक्या प्राण्यांचं प्रेम फार निःस्वार्थी असतं हे मला माहिती आहे आणि थोडंफार अनुभवलेलं आहे. त्याचवेळी कुत्रे मालकांच्या attitude बद्दल असलेली तक्रार बरेचदा वाजवी असते हे ही माहिती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे मुद्दे मला पटतात (काही असंवेदनशील पोस्ट्स सोडल्या तर).

हे सर्व प्रॉब्लेम्स माणसांमुळे निर्माण झालेले आहेत ह्यात कुत्र्यांचा काहीच दोष नाही असे मला वाटते. अमा जे नियम टाकतील त्याचा नक्कीच फायदा होईल. अमा, तुमच्याकडे असलेल्या कागदाचा फोटो काढून टाकलात तरी चालेल (लिहीत बसायला वेळ नसेल तर). म्हणजे मग नियम पाळा तरच कुत्रा पाळा असे सुनावता येईल.

Pages