Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16
सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चमन, आशू
चमन, आशू
अकराव्या पानापर्यंत<<<
अकराव्या पानापर्यंत<<<
मामी, कुत्रे आणि
मामी, कुत्रे आणि कुत्रेमालकांबद्दलचा तुझा राग, तिरस्कार, घृणा मी समजून आहे. पण इथे सार्वजनिक फोरमवर लिहिताना भावना आणि शब्दांवर नियंत्रण हवे असे मला वाटते. आणि सध्या अकराव्या पानापर्यंत तुझ्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त झालेल्या, सर्वांपर्यंत पोचलेल्या आहेत तेव्हा आता पुरे असे मला वाटते.
>>> मंजूडी,
तू माझ्या पोस्टस न वाचताच सल्ले देत आहेस. मी कुठेही मला कुत्र्यांबद्दल राग, तिरस्कार, घृणा वाटते लिहिले आहे का?
माझी सगळी तक्रार असुसंकृत मालकांबद्दल आहे. हे जसं तुला अजूनही कळलेलं नाही तसंच बाकीच्या काहीजणांनीही कळून घेतलेलं नाही. त्यामुळे संताप झाला. मी जी भाषा वापरली आहे त्याबद्दल मला अजिबात खेद नाही.
चमन, आशुडी ... नीधप,
चमन, आशुडी ...
नीधप, परफेक्ट!
चमन आणि आशुडी ....मस्तच
चमन आणि आशुडी ....मस्तच
निधप परफेक्ट. उत्तरांच्या प्रतिक्षेत.
मी कुठेही मला कुत्र्यांबद्दल
मी कुठेही मला कुत्र्यांबद्दल राग, तिरस्कार, घृणा वाटते लिहिले आहे का?>>>
मामी | 22 May, 2014 - 17:20
आमच्या बिल्डिंगमध्ये असे अनेक मूर्ख श्वानमालक आहेत.
मला कुत्रे आवडत नाहीत असं सांगितल्यामुळे एका बाईनं माझ्याशी बोलणं टाकलं.
एका महान स्त्रीनं तिच्या वाह्यात कुत्र्याला ट्रेन करण्याऐवजी आम्हाला तिच्या घरी बोलावून तिच्या कुत्र्याशी मैत्री करून घेण्याची सुसंधी देऊ केली.
एकीनं सांगितलं की कुत्र्यानं बागेत सुसू केली तरी काही बिघडत नाही. पण त्याच बागेत लहान लहान मुलं खेळतात. त्यांचा बॉल वगैरे तिथे गेला आणि त्यांनी तो तोंडात घातला वगैरे असे काही मुद्दे तिच्या मठ्ठ डोक्यात जाईनात. विशेषतः स्वतःची मुलं जर मोठी झाली असतील तर अशा श्वानप्रेमींना बागेत खेळणार्या इतरांच्या लहान मुलांशी काहीही देणंघेणं नसतं. कुत्र्याचे विधी इतके पवित्र वाटत असतील त्यांनी आपल्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर ते साग्रसंगित होऊ द्यावे. इतरांच्या स्वच्छ परिसराच्या हक्कावर गदा आणू नये.
या विषयावर हे.मा.शे.पो.
आवडत नसणे म्हणजे राग,
आवडत नसणे म्हणजे राग, तिरस्कार, घृणा नाही हो.
भरत मयेकर अगदी बरोबर. पण हाच
भरत मयेकर अगदी बरोबर.
पण हाच तर प्रॉब्लेम आहे. दुसर्याला एखादी गोष्ट आवडत नाहीये इतकी साधी बाब समजून न घेता, त्यांना लेबलं लावायची.
आज पण आलेलं ते बावळट, मुर्ख,
आज पण आलेलं ते बावळट, मुर्ख, भिक्कार कुत्रं
त्या आजींना बावळट, मुर्ख, भिक्कार म्हणू शकत नाही म्हणून कुत्र्याला म्हणुन घेतेय
मला कुत्री आवडत नाहीत. मी त्यांचा तिरस्कार करायला लागायच्या आत कुत्रे मालकांनी चुका मान्य करुन सुधारा नाही तर तुम्ही एका श्वानद्वेष्टाच्या निर्मितीला कारणीभुत असाल
नी, तू सिरिअसली विचारतेयेस
नी, तू सिरिअसली विचारतेयेस का?
आमच्या सोसायटीतल्या एक काकू घरातल्या नोकरांना कमी जेवायला देतात आणि त्यांच्या कुत्र्यांना भरपेट....
पण कुत्रं हे त्यांच्या घरातलं आहे ना नोकर मंडळी काय उपाशी मेली तरी दुसरी मिळतील
ते जाऊ देत... पुन्हा आमच्या पैशाचं आमच्या कुत्र्यांना खायला घालतो म्हणायला बसलीयेत ही मंडळी...
आणि याच काकू कारमधे कुत्र्याला मांडीवर घेऊन बसतात आणि २ वर्षाच्या मुलाला सीट वर बसवतात ते ही सिट बेल्ट न बांधता
त्यामुळे यांचा काहीहीहीहीही भरोसा नाहीये
रिया, घरातले नोकर हे घरातले
रिया, घरातले नोकर हे घरातले मानवी सदस्य होतात का?
घरातले मानवी सदस्य हे घरात रहाणारे मानवप्राणी असतात जे जनरली एकमेकांच्या नात्याचे असतात.
आजी-आजोबा, आई-बाबा, बहिण-भाऊ, काका-काकू, आत्या,मावशी वगैरे...
अगं हो, शेवटी लिहिलेलंय ना मी
अगं हो, शेवटी लिहिलेलंय ना मी पण - की त्यांच्या २ वर्षाच्या मुलाच्या सेफ्टीपेक्षा त्यांना कुत्र्यांची सेफ्टी प्रिय आहे
त्यामुळे यांचा काहीहीहीहीही भरोसा नाहीये.
बाकी नोकरांना जेवायला न देणं ही माणुसकी नाहीच
पण तो बीबीचा विषय नाही
कारमधे मांडीवर घेऊन
कारमधे मांडीवर घेऊन बसण्यापेक्षा जास्त टोकाच्या सिच्युएशनमधे लोक काय वागतील असे प्रश्न आहेत फक्त.
म्हणजे तुमच्या घरात नवीन जन्मलेल्या बाळाला कुत्र्याच्या केसांची अॅलर्जी निर्माण झाली तर तुम्ही बाळाला होणार्या त्रासाची दखल घ्याल की दुर्लक्ष कराल?
तुमच्या घरातील कुणाच्या दम्याचे निदान कुत्र्याच्या केसांमुळे अॅटॅक येण्याची शक्यता जास्त असे झाले तर त्या व्यक्तीला कुत्रा इथेच राहील, तुम्ही जायचे तिकडे जा असे सांगाल की कुत्र्याची दुसरी सोय बघाल?
तुमच्या घरात नवीन स्त्री लग्न होऊन रहावयास आली आणि आल्या आल्या तिचे स्वागत तुमच्या कुत्र्याने जोरदार चावून केले. आता त्या स्त्रीला कुत्र्याची प्रचंड भिती निर्माण झाली आहे. रोज घरात वावरणे हे तिच्यासाठी ट्रॉमटायझिंग आहे. अश्या वेळेला त्या स्त्रीला घटस्फोट देणे (तुमची पत्नी असेल तर तुम्ही, भावाची असेल तर त्याने, मुलाची असेल तर त्याने!) हे तुम्ही योग्य समजता की कुत्र्याची दुसरीकडे सोय लावणे हे तुम्ही योग्य समजता?
तुमच्या घरातील व्यक्तीला काही दुर्धर आजार झालाय आणि त्यासाठीच्या ट्रीटमेंटचा खर्च प्रचंड आहे. त्याच वेळेला कुत्र्यालाही काही झालेय आणि ट्रीटमेंटचा खर्च भरपूर आहे. तुम्हाला एकाच कुणाचा तरी खर्च परवडू शकतो अश्या वेळेला घरातील व्यक्तीच्या ट्रीटमेंटला प्राधान्य द्याल की कुत्र्याच्या ट्रीटमेंटला?
रिया, तू कुत्रेप्रेमी वा
रिया, तू कुत्रेप्रेमी वा कुत्रेमालक आहेस का?
उत्तर कुत्रेप्रेमी वा कुत्रेमालकांकडूनच अपेक्षित आहे.
दुसर्याला एखादी गोष्ट आवडत
दुसर्याला एखादी गोष्ट आवडत नाहीये इतकी साधी बाब समजून न घेता, त्यांना लेबलं लावायची. <<<
याबाबत सहमत.
हा धागा श्वानप्रेमींच करायचे
हा धागा श्वानप्रेमींच करायचे काय असा असताना इथे कुत्र्याचे करायचे काय यावर जास्त चर्चा चालली आहे. असो.
रिया पुढच्या वेळी कुत्र्याने चप्पल चोरली तर त्या म्हातारीची चप्पल घालून जा , मोठी होईल पण घरी अनवाणी जावे लागणार नाही आणि म्हातारी अनवाणी गेली कि तीलाही कळेल चपलेचे महत्व ...
कुत्रा पाळणे यात काही गैर नाही पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून कुत्रामालकांनी योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे असाच सूर या एकंदरीत चर्चेतून निघतोय जो योग्यच आहे.
अनोळखी कुत्रा कसाही असला तरी आपण स्वतःहून त्याच्या जवळ जात नाही . याच मानसिकतेचा फायदा कुत्रामालक घेत असतात. उदा.
१) तुम्ही रस्त्याच्या डव्या बाजूने एखाद्या फूटपाथवरुन चालत असता , एखादा कुत्रा त्याच्या मालकासह उलट्या बाजूने समोरुन येतो तेव्हा कुत्रा आणि तो मालक कधीही फूटपाथ सोडून रस्त्यावरुन जाणार नाहीत शेवटी भितीने का होईना तुम्हीच रस्त्यावर जीव धोक्यात घालून उतरुन पुढे जाणार. (मी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून सायकल ट्रॅक ऐवजी कुत्रा ट्रॅक बनवावे अशी विनंती करणार आहे.
२) ब-याच वेळा एखाद्या कारमध्ये कुत्रा मागच्या सीटवर बसलेला असतो आणि एखादा चमन गाडी चालवत असतो तेव्हा मला खरोखरच मालक कोण याबाबत शंका येते. मग हा मागे बसलेला मालक सिग्नलला गाडी थाबवल्यावर अचानक खिडकीतून मुंडक बाहेर काढून तुमची पप्पी घ्यायला लागतो आणि मग त्रेधातिरपीट उडते.
३) तुम्ही तुमची गाडी पार्कींगला लावलेली असते आणि एखादे भटकायला आलेला कुत्रा नेमका गाडीच्या टायरवरच टंगडी वर करतो, मग ती गाडी पुन्हा चालवताना तुम्ही सारखा तोच विचार करत असता.
४ तुम्ही सकाळी सकाळी वॉकला जाता, अगदी चांगला रस्ता, जॉगींग ट्रॅक किंवा बागेत , आणि मग तिथे हे पाळलेले कुत्रे प्रातः विधीचे काम चालू करतात , अशा कुत्रामालकांना तर लकडीपुलावरुन ढकलून द्यायला हवे.
५) आणि त्याहीपेक्षा महत्वाचे काही कुत्र्यांना तर रात्र झाली तर उगाचच भूकायचे असते, त्याच्यामुळे आसपासच्या लोकांच्या झोपेचे खोबरे होते हे या कुत्रामालकांना कळत नाही का. माझ्या झोपेचे असे खूप वेळा खोबरे झाले आहे. शेवटी एक गिलोर ( मी त्याला गिल्व्हर म्हणतो) आणून ठेवली आहे घरात एखादा छोटा दगड भिरकवला तर मग बसतात शांत पण तो चूकून कोणाला लागला तर नविन नाटक नको म्हणून असे प्रयोग क्वचितच.
म्हणजे तुमच्या घरात नवीन
म्हणजे तुमच्या घरात नवीन जन्मलेल्या बाळाला कुत्र्याच्या केसांची अॅलर्जी निर्माण झाली तर तुम्ही बाळाला होणार्या त्रासाची दखल घ्याल की दुर्लक्ष कराल?
तुमच्या घरातील कुणाच्या दम्याचे निदान कुत्र्याच्या केसांमुळे अॅटॅक येण्याची शक्यता जास्त असे झाले तर त्या व्यक्तीला कुत्रा इथेच राहील, तुम्ही जायचे तिकडे जा असे सांगाल की कुत्र्याची दुसरी सोय बघाल?
>>
माझ्या नातेवाईकांकडे सेम दोन्ही केसेस आहेत. आम्ही हजारवेळा समजावून सांगितले. पण उपयोग शुन्य....
नी, मी दोन्ही नाही पण एक
नी, मी दोन्ही नाही पण एक कुत्रात्रस्त व्यक्ती आहे
असो! आता तुला अपेक्षित लोकांकडुन उत्तर मिळू देते मी (म्हणजे मी शांत बसते )
Mazi garaj lagalee tar
Mazi garaj lagalee tar sampark kara
रिया मी पण कुत्रात्रस्त व्यकी
रिया मी पण कुत्रात्रस्त व्यकी आहे त्यामुळे कुत्रात्रस्त व्यक्ती अश्या वेळेला काय करतील हे मला माहितीये ना. कुत्रेप्रेमी, कुत्रेमालक काय करतील याबद्दल कुतूहल आहे.
चमन आशू मस्त पोस्ट आणि मामी
चमन आशू मस्त पोस्ट
आणि मामी +1
कुत्रेमालकांच सर्वात राग का
कुत्रेमालकांच सर्वात राग का येत असेल तर स्वतच्या कुत्र्यामुळे इतरांना त्रास होत असेल हे ध्यान्यातच घेत नाहीत
माझ्या लहानपणी घडलेला किस्स्सा अजूनही आठवतो
मी , माझा भाऊ व आई आईच्या मैत्रीणीकडे गेलो होतो . त्या मावशीला आम्हाला कुत्र्यापासून भीती वाटते अस स्पष्ट सांगीतल होत फोनवर जाण्यापूर्वी . तिने त्याला बांधून ठेवेन अस आश्वासन दिलही होत . त्यांच्या घरात असच मोक्ळ सोडलेल असायच कुत्र्याला . पण तिथे गेलो तर तो कुत्रा तसाच फिरतोय . माझा त्या वयातही संताप झाला . शेवटी आईने परत त्या मावशिला बांधून ठेव अस सांगीतल . तर तिने दात दाखवत आतल्या खोलीत बांधून ठेवल .
नंतर आम्ही सर्व गप्पा मारत असताना त्या मावशीच्या मुलाने काय प्रताप दाखवल देव जाणे . आणि तो कुत्रा बाहेर आला . आला तो आला एकदम धावत आला आणि त्याने माझ्या भावाच्या अंगावर सरळ उडी घेतली
. माझा भाऊ एकदम घाबरला त्याच्या हातातल काचेच ग्लास फुटल आणि तो सोफ्यावारून उलट दिशेने खाली पडला .
तेवढ्यात हां कुत्रा त्याच्या अंगावर धावून गेला
माझ्या भावाने कसबस त्याला एक फटका देऊन बाजुला केल
या सगळ्या भानगडित त्याला काच लागली प्लस कुत्र्याची नखही
एवढ सगळ होऊन त्या मावशीन काही गंभीर झालेल नाही असा पवित्र घेतला वर आमचा कुत्रा निर्बिजीकरण केला अआहे अस बोलून दाखवल . सर्वात जास्त राग संताप त्याचा अअला . घरी जाऊन आईला बोलले कचांगलच . एकतर आम्ही तिथे जायला तयार नव्हतो कुत्र्यामुले .जबरदस्तिच लोढ़ण . :राग:े
असा राग आला होता . त्या दिवसापासून मी त्या घरात पाऊल ठेवत नाही
काही काम असेल आईच तर गेट मधुनच हाक देऊन खाली बोलावते
जाई, आता तू पण कुत्रेद्वेष्टी
जाई, आता तू पण कुत्रेद्वेष्टी गटात गेलीस.
या बाफवर कुत्रेप्रेमीमालकांच्या अॅटिट्यूडच्या एवढ्या कथा आल्यात पण तिथे कुत्रेमालकांची चूक आहे आणि असे वागणे चुकीचे आहे हे स्पार्टाकस सोडून कुणीच कुत्रेप्रेमीमालकाने मान्य केलेले नाही.
स्ट्रे डॉग्जनी रस्त्यावर लहान मुलांना फाडले वगैरे याबद्दल कुत्रेप्रेमीमालकांनी काहीच मत व्यक्त केलेले नाही
कि कु ने एका कुत्र्याचे काही जे हाल केले त्यावर मात्र कुत्रेप्रेमीमालक लगेच ट्रॉमटाइझ झाले.
कुत्रे आवडत नाहीत म्हणजे कुत्रेद्वेष नाही हे शंभरवेळा सांगून एकाही कुत्रेप्रेमीमालकाने तिकडे लक्ष दिलेले नाही. परत परत तुम्ही कुत्रेद्वेष्टे म्हणजे वाईट माणसे अश्याप्रकारचे रडणे चालले आहे.
मी विचारलेल्या प्रश्नांना कुणीच कुत्रेप्रेमीमालकांनी अजून तरी उत्तरे दिलेली नाहीत.
यानंतर कुत्रेप्रेमीमालकांबद्दल जे काय समज करून घ्यायचे आहेत ते करून घ्यायला हरकत नाही असे मला वाटते.
देवा. जाम विनोदी धागा झाला
देवा. जाम विनोदी धागा झाला आहे. मी कुत्र्याला फार्फार घाबरते. पण किकु यांचे किस्से ऐकुन मला हे कळाले नाही की कुत्र्याला मुंडके पकडुन गाडीतुन फिरविणे, रॉकेल चा कॅन फेकुन मारणे या क्रिया करायला लागणारे धैर्य कोठुन आणले?
माझे २ आणे- Author : Kavitha
माझे २ आणे-
Author : Kavitha Jayakumar
Posted 2 years ago
Our apartment hasnt been registered for the past 10 yrs and taken care by the same association leads. They want us to take away our dog from us. The reason they have is that our dog is urinating on the terrace. This incident accidently happened twice but we made sure of cleaning the place properly. There is byelaw created for the apartments. However people are asking us to remove the dog away from us. Our pet dog is chotu and he is like our small brother to us. We take care of him very well and have emotional attachment with him a lot. We just couldnt bear this thinking of sending him away. its been almost 2 yrs now when we brought him to home at his age of 25 days. Please advise on how to handle this situation without sending my dog away. I tried to convince the people but they are not just agreeing. Any suggestions?
Is there any indian law supporting this? Please advise some methods to have my dog with us...
Expert : ADVOCATE DEFENSE.
Posted 2 years ago
The concept of STRICT LIABILITY pronounced hundreds of years ago by ENGLISH courts is still the law in our country followed by SC and all HC s.
So any facility you maintain which has potential of any harm to others than you are liable for punitive damages.
strict liability
automatic responsibility (without having to prove negligence) for damages due to possession and/or use of equipment, materials or possessions which are inherently dangerous such as explosives, animals, poisonous snakes, or assault weapons. This is analogous to the doctrine of "res ipsa loquitur in which control, ownership and damages are sufficient to hold the owner liable even without proof of specific negligent acts or omissions.
कुत्री पाळणारे (फक्त
कुत्री पाळणारे (फक्त कुत्र्यांचे) प्रेमळ मालक... तुम्ही जेव्हा तुमच्या हातातली तुमच्या कुत्र्याची दोरी सोडून देता व त्याचे कोणीच नसल्यासारखे फिरता तेव्हा तुम्ही नक्की काय विचार करता? चावलेच जर कोणाला, तर घेईल बघून ज्याचा तो..आपण नामानिराळे. नंतर पुढच्या पाच मिनिटात आपले कुत्रे येइलच आपल्याकडे जाते कुठे. त्यावेळेपर्यंत तो कुत्राग्रस्त माणूस कुठला थांबायला. म्हणजे साप भी ना मरें व लाठी भी ना टूटे.
आमचा कुत्रा मुळ्ळीच चावत नाही हो कोणाला. माणसाचा भरोसा नाही कुत्र्याचा कसा वाटतो देव जाणे.
दिवाळीच्या दिवसांत तर ह्या कुत्र्यांकडे बघवत नाही. फटाक्यांचे आवाज सहन नाही होत त्यांना मग मुटकुळे करून बसतात कोपर्यात. पण हेच मालक जीव थंड होईपर्यंत फटाके मात्र उडवत असतात.
थोडक्यात काय् तर हे कुत्रामालक फक्त स्वार्थी. कुत्र्याचाही आनंद नाही बघत व स्वतःच्या समुदायाचाही नाही. मालकांचाच फक्त आनंद असतो त्यात.
मला स्वतःला कुत्र्याचं प्रेम
मला स्वतःला कुत्र्याचं प्रेम नाही, शेजारी पाजारी कुत्रा पाळलेली माणसं राहतात. ती त्यांची व्यवस्थित काळजी घेतात आणि मला अजूनतरी त्रास झालेला नाही. भारतात असताना कुत्र्याची घृणाच होती, घरात बोलताना 'एक तरी कुत्रा माझ्या गाडीखाली येणारे' अशी भविष्यवाणी केली तरी समोर कुत्रा आला की भंबेरी उडण्याची शक्याता अधिक.
गाडीत मान मुरगाळणे हा क्रूरपणा वाटतोय. कुत्र्याने/ वाघाने किंवा कोणीही बाळाला फाडले तर अशक्य वाईटच वाटेल आणि नरभक्षक प्राण्याचा बंदोबस्त करावा असेच वाटेल.
पण,
नी, अशीच वेळ दोन मुलांपैकी एकालाच खाणं देता येईल इतके पैसे असणे, आई आणि मुलगा दोघे आजारी एकाचाच खर्च शक्य, मानसिक दृष्ट्या कमकुवत भावाने घरातील नवीन सुनेला पहिल्याच दिवशी काही त्रास दिला.... अशा सगळ्या सिच्युएशन तयार करता येतील. अशा बाबतील काही माणस दोन्ही गोष्टी थोड्या करतील, आलेला दिवस पुढे ढकलतील... किंवा जास्त प्रयत्न करतील ...काही आत्महत्या. माणूस/ कुत्रा यात माणसालाच प्राधान्य मिळण्याची शक्याता जास्त. कुठल्याही प्राण्याची आपले offspring जीन्स पुढे न्यायाची इच्छा प्रबळ असण्याचीच भावना असणारे.
मला हे सगळे प्रश्न फिल्मी / भडक/ भावना उद्दीपित करणारे वाटले.
Mugdhanand Tumacha english
Mugdhanand
Tumacha english kutra aahe kay ?
बाकावर बसायचा अधिकार माणसाचाच
बाकावर बसायचा अधिकार माणसाचाच का? कुत्र्याचा का नाही? असे जेव्हा विचारले जाते तेव्हा हे प्रश्न येणारच.
दोन मानवी सदस्यांमधे कोण आणि कुत्रा व मानवी सदस्य यामधे कोणास प्राधान्य यात फरक आहे.
तुम्हाला हे प्रश्न कसेही वाटले तरी मी काही करू शकत नाही.
इथे कुत्रे आवडत नाही म्हणल्यावर जी लेबलं लावली जातात, कुत्रे कुत्रे करत सिंपथी टूर काढली जाते त्याचा आता अतीव कंटाळा आलाय आणि कुत्रेप्रेमीमालकांबद्दल माझे मत पक्के बनलेले आहे. मग तुम्ही मला फिल्मी म्हणा, भडक बिडक म्हणा... विचारतो कोण तुमच्या वाटण्याला...
(No subject)
Pages