६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा. पण झोप लागतेय कोणाला, सामना सुरू व्ह्यायच्या आधीपासूनच एक्स्पर्ट कॉमेंट ऐकत मी टीव्हीसमोर ठाण मांडून. देवाकडे एकच प्रार्थना, सलामीवीरांना कमीतकमी खेळायची बुद्धी दे रे, अन देवाने ती ऐकली. अर्ध्या तासातच सचिन मैदानावर दिसू लागला. भारताची दुसरी विकेट पडल्यावर टाळ्यांचा एवढा कडकडाट आजवर झाला नसेल. पण आता पुढचे काही क्षण श्वास रोखून बसायचे होते, जो पर्यंत सचिन सेट होत नाही तो पर्यंत टीव्हीवरून नजर न हलवण्याचे होते. ऑन साईडला दोन सुरेख चौकार लगावत मी आज क्रिकेटरसिकांना पर्वणी द्यायला सज्ज आहे असा इशारा त्याने देताच मी जरा रिलॅक्स झालो, अन इथेच नियतीने डाव साधला. कांदेपोह्याचा चमचा तोंडाजवळ नेतो न नेतो तोच अचानक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकच कल्ला. वर पाहिले तर एलबीडब्ल्यूची अपील, स्ट्राईकला सचिन, कॅमेरा अंपायरवर. त्या चेंडूवर नक्की काय घडले हे पाहिले नसल्याने श्वास घशात. जो पर्यंत तो अंपायर नकारार्थी मान हलवत नाही तोपर्यंत. पण त्याने बोट उचलले आणि खेळ खल्लास, रंगात भंग, क्रिकेटप्रेमींचा पचका. पुढचे काही क्षण एकच शांतता. तिथेही आणि इथेही. रिप्लेमध्ये निर्णय संशयास्पद दिसत असल्याने थोडी निराशा, थोडी चीडचीड. मात्र थोड्याच वेळात परिस्थितीचे भान राखून ग्राऊंडबाहेर पडणार्या सचिनसाठी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. कारण एका अपयशी इनिंगने त्याच्या आजवरच्या कामगिरीचे मोल तीळमात्र कमी होणार नव्हते. सचिन निराश मनाने मानवंदना स्विकारत पॅवेलियनमध्ये दाखल..!
- एण्ड ऑफ पार्ट वन -
.
.
.
अॅण्ड नाऊ,
- पार्ट टू -
सचिन बाद झाल्यावर टिव्ही बंद करायचे दिवस आता गेले. नव्या दमाचे खेळाडू या बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात का यावर आता सार्यांच्या नजरा. धवन, विजय, पुजारा हे तिघे सचिनच्या आधीच तंबूत परतले होते तर फॉर्मातला आणि भरवश्याचा कोहली सचिनपाठोपाठ माघारी. बिनबाद ३७ ने झालेली दिवसाची सुरुवात तासाभरात ८३ धावा ५ बाद या स्थितीत परिवर्तित. खेळपट्टीवर संकट मोचक धोनी आणि आपला पहिलावहिलाच कसोटी सामना खेळणारा रोहित शर्मा. वेस्टईंडिज फिरकी गोलंदाज शिलिंगफोर्डने विणलेल्या जाळ्यातना बाहेर पडायच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पाहताना नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वान आणि पानीसरने आपली उडवलेली धांदल सर्वांच्या ताजी स्मरणात. आपल्या सदोष तंत्रासह बचाव करावा की आपले शक्तीस्थान वापरून काऊंटर अॅटेक करावा या चक्रव्यूहात फसलेला कर्णधार माही. इथून आपण एका पराभवाच्या दिशेनेच प्रवास करणार आहोत असे समजून चुकलेला प्रेक्षक. मात्र इथेच सर्वांचे अंदाज चुकवून गेला तो आपला सध्याचा सर्वात लाडका फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा !
पण खरेच तो अंदाज चुकवून गेला का???
माझ्यासाठी तरी याचे उत्तर - नाही.
इतर कोणाला नसेल पण मला त्याच्याबद्दल पुरेपूर खात्री होती.
माझ्या रिकाम्या पोह्यांची प्लेट उचलायला म्हणून आलेल्या वहिनीची स्कोअरबोर्ड वर नजर जाताच ती ओरडली, अरे देवा ..!! जेमतेम क्रिकेट समजणार्या जगातल्या सर्वच बायकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेहमीच अशीच अतिउत्साही असते. त्यातही रोहित शर्माला खेळपट्टीवर पाहताच तिने सरळ पाचाच्या सहा विकेट मोजल्या. कारण एकेकाळी त्याचे खराब दिवस चालू असताना, जेव्हा तो बरेचदा आल्याआल्याच हजेरी लाऊन परत जायचा तेव्हा आमच्या दादाने त्याला "मॅगी नूडल्स" हे नाव दिले होते. मॅगी नूडल्स म्हणजे बस्स, दोन मिनिटांचाच खेळ..! आणि हेच तिच्या लक्षात राहिले होते. कदाचित गेल्या वर्षभरात त्याने केलेली लक्षवेधी कामगिरी त्यांचे लक्ष वेधून घेण्यास कमी पडल्याने अजूनही ते दोघे त्याला त्याच नावाने हाक मारायचे. आज आपल्या कारकिर्दितील पहिल्याच कसोटीत संघातली स्वताची जागा बनवायच्या दडपणाव्यतिरीक्त आता भारताचा डाव सावरायचे अतिरीक्त दडपण पाहता दादा देखील वहिनीच्या हो मध्ये हो मिसळवून मोकळा झाला. पण मला मात्र कमालीचा विश्वास होता की कदाचित स्वताची जागा टिकवण्याच्या दडपणाखाली तो बाद झाला असता, मात्र संघहिताचे दडपण त्याच्या पथ्यावरच पडणार होते. कारण हेच त्याला आवडते, अश्या परिस्थितीत खेळणे हिच त्याची खासियत आहे आणि म्हणूनच इथूनच सुरू होणार होती एक लेझी एलिगन्स असलेली एफर्टलेस फटक्यांनी भरपूर खेळी !
धोनीबरोबर त्याने केलेल्या ७३ धावांच्या भागिदारीने नामुष्कीच नाही टाळली तर सामन्यात आपल्याला थोडेफार परत आणले होते. तरीही धोनीच्या बाद होण्यानंतर डाव पटकन गुंडाळला जाण्याचा धोका होताच. कमी धावांच्या सामन्यात पाचपन्नास धावांचा लीड देखील कोण घेतो याने फरक पडतो. मात्र आश्विनच्या जोडीने त्याने आपला सहजसुंदर खेळ तसाच सुरू ठेवला. बघता बघता त्याचे शतक धावफलकावर लागले तर आश्विनचे अर्धशतक. धावगती कसोटीला अनुसरून असली तरी बघता बघता एवढ्यासाठीच म्हणालो कारण रोहित टोटल चान्सलेस इनिंग खेळत होता, कधीही आता हा पटकन बाद होईल आणि वेस्टईंडिज सामन्यात परत येईल असे वाटत नव्हते. त्यामुळे घड्याळाचा काटा जसा सरकत होता तसे धावांचे चक्र फिरत होते. आपण वेस्टईंडिजचा स्कोअर केव्हाच पार करून आता त्यांना लीड द्यायला सुरुवात केली होती. दडपण दडपण ज्याला म्हणतात ते केव्हाच झुगारले गेले होते, नव्हे आता ते दोघांनी मिळून वेस्टईंडिजच्या माथ्यावर नेऊन टाकले होते. तरीही, खराब होत जाणार्या खेळपट्टीवर चौथ्या डावात कमीतकमी फलंदाजी करण्यासाठी हा डाव शक्य तितका लांबवणे गरजेचे होते आणि नेमके हेच त्याने ओळखून शतकानंतरही कुठलीही घाईगडबड न करता आपली रनमशीन चालूच ठेवली. पलीकडून आश्विनचे शतक झाले आणि इथे रोहित शर्माने रेकॉर्डबूकमध्ये आपले नाव नोंदवले होते. पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणार्या निवडक खेळाडूंच्या पंक्तीत बसायचा मान त्याने थोडक्यात गमावला असला तरी तब्बल १७७ धावांची बोहणी केली होती. ज्या स्थितीतून त्याने सामना खेचून आणला ते पाहता सामनावीराचा बहुमान अर्थातच त्यालाच देण्यात आला. मुंबईकर सचिनचा खेळ पहायला आलेल्या कोलकतावासीयांची नाराजगी कमी कशी करता येईल हे एका दुसर्या मुंबईकराने पाहिले होते !
जे क्रिकेट नियमित फॉलो करतात त्यांना रोहितच्या गेल्या वर्षभरातील कामगिरी बद्दल खोलात जाऊन सांगायला नकोच. तरीही आकड्यांचा खेळ न करता सांगायचे झाल्यास यंदाच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच असाव्यात. त्यातही नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले धडाकेबाज आणि सोळा षटकारांनी सजलेले द्विशतक कोण कसे विसरणार. आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफी या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या फॉर्मेटमध्येदेखील त्याच्या मोक्याचा क्षणी भरभरून केलेल्या धावांमुळेच मुंबईने या दोन्ही चषकांवर आपले नाव कोरले. एक कर्णधार म्हणून दडपण न घेता खेळ उंचावण्याची त्याची क्षमता विशेषच. आता कसोटीत देखील त्याने आपला पहिलाच शिक्का खणखणीत उमटवला आहे आणि हे तो पुढेही करणार यात कोणतीही भविष्यवाणी नाहीये. सामना जिंकवून द्यायची क्षमता असलेल्या एखाद्या खेळाडूला आपण मॅचविनर असे संबोधतो मात्र त्याच निकषावर मी रोहितचा उल्लेख सिरीज विनर म्हणून करेन.
एक गंमतीशीर तुलना करायची झाल्यास, रोहितची आजवरची कारकिर्द मला "कोई मिल गया" चित्रपटातील हृतिक रोशन सारखी वाटते. त्यात हृतिकचे नाव "रोहित मेहरा" होते, तर हा आपला रोहित शर्मा. तेच नाव, तसेच आडनाव बस्स काही अल्फाबेट्स आपली जागा बदलून येतात, पण कमाल मात्र तीच. त्या सिनेमात आधी इतरांपेक्षा दुबळा म्हणून गणल्या गेलेल्या हृतिकमध्ये अचानक जादू’च्या चमत्काराने एवढी ताकद येते की की तो बास्केटबॉलचा बॉल लीलया आकाशात भिरकाऊन देतो. तर इथेही एकेकाळी संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असलेला रोहित आजकाल चमत्कार झाल्यासारखे क्रिकेटचा चेंडू लीलया सीमारेषेच्या पार भिरकाऊ लागला आहे.
पण हा कायापालट चमत्काराने नक्कीच झाला नाहीये ना यामागे कुठली जादू आहे. त्याच्यात असलेल्या टॅलेंटबद्दल सुरूवातीपासूनच कोणालाही शंका नव्हती. क्रिकेटचे जाणकार हे वेळोवेळी बोलून दाखवायचे तर सामान्य क्रिकेटरसिकाला देखील त्याच्या काही खास ठेवणीतल्या फटक्यातून ते जाणवायचे. पण नेमके काय गंडले आहे ते समजत नव्हते आणि त्यामुळे त्याच्यातले फलंदाजीचे असामान्य स्किल धावांमध्ये परावर्तित होत नव्हते. काहींच्या मते त्याचे शॉट सिलेक्शन चुकायचे तर काहींच्या मते टेंपरामेंटचा प्रॉब्लेम होता. पण ते जे काही होते त्याला तो आता दूर भिरकाऊन देऊन सज्ज झाला आहे एवढे मात्र नक्की.
असे म्हणतात की टॅलेंट आणि ग्रेटनेस एका पिढीतून दुसर्या पिढीत पास होत असते. हेच जर फलंदाजीच्या कौशल्याबद्दल असेल तर ते नेहमी एका मुंबईकराकडून दुसर्या मुंबईकराकडे पास होत आलेय. ‘लिटील मास्टर’ सुनिल गावस्करच्या पर्वानंतर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने या खेळावर आपली हुकुमत गाजवली, तर येणारा काळ नक्कीच ‘एफर्टलेस वंडर’ रोहित शर्माचा असेल. सचिनच्या अंतिम कसोटी मालिकेत रोहितचे होणारे पदार्पण हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा नाही का !
.
.
Rohit Sharma becomes first ever captain in the history of cricket to have achieved No.1 ICC team rankings in all three formats at the same time ...
Credit goes to Viraat.
Credit goes to Viraat.
ते 'ओन्ली पर्सन ऑन द प्लॅनेट'
ते 'ओन्ली पर्सन ऑन द प्लॅनेट' म्हणणं काहीच्या काही फनी वाटते.
बोल्टला 'फास्टेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट' म्हणणं समजू शकते पण ईन मीन पाच-सात देशांच्या मध्ये खेळल्या जाणार्या खेळात असे काही म्हणणे अगदीच लेम क्लेम आहे.
पण ईन मीन पाच-सात देशांच्या
पण ईन मीन पाच-सात देशांच्या मध्ये खेळल्या जाणार्या खेळात
>>>>
१०० देशात क्रिकेट खेळले जाते. १०० देशांचे राष्ट्रीय संघ आहेत. नेमका आकडा नंतर सांगतो.
Credit goes to Viraat.
Credit goes to Viraat.
>>>
विराटचे श्रेय आहेच.
पण शर्माचा विजयाचा धडाका मोठा आहे. मालिकांवर मालिका खिश्यात टाकत सुटलाय. मग मायदेशात असो वा परदेशात.
#OnThisDay in 2021
#OnThisDay in 2021
Scored 127 v ENG at Oval
With This Inning, He became
- 1st Opener to Score Century in all formats in England
- 1st Visiting player to Score Century in 7 Different England Venues
- Most Centuries in Eng by Indian (9)
- 1st Indian to Win M.O.M.Award in England in all formats
- Only Asian to Score 10 Centuries in SENA Wins
- 2nd Fastest to 11000 runs as Opener
- 1st player to score Centuries in all formats in 2 different countries (IND, ENG)
Test Centuries against SENA
Test Centuries against SENA in won matches -
• S Tendulkar - 09 (62 Inns)
• Virat Kohli - 07 (60 Inns)
....
Rohit Sharma - 06 (31 Inns)
Hitman - The Test batsman has always been the most underrated player.
Most Centuries By Indians
Most Centuries By Indians after Age 30 :
1. Rohit Sharma - 34
2. Sachin Tendulkar - 34
3. Rahul Dravid - 26
4. Virat Kohli - 18
5. Sunil Gavaskar - 15
Most Man Of The Match after Age 30 :
Rohit Sharma - 28 फार पुढे आहे यात.
Sachin - 19
Virat kohli - 18
Azharuddin - 15
Rahul Dravid - 14
Most runs for India after Age 30 :
13327 - Sachin Tendulkar
12302 - Rahul Dravid
11038 - Rohit Sharma
8555 - Sunil Gavaskar
8417 - M Azharuddin
या सगळ्या after 30 आकड्यात
या सगळ्या after 30 आकड्यात खेळाडु किती मॅचेस खेळला ते पण नमुद करायला हवे योग्य तुलना करण्यास.
मानवमामा, ते आकडे तुलना
मानवमामा, ते आकडे तुलना करायला नाहीयेत.
अश्या आकड्याना घेऊन कोणी रोहीत शर्माला सचिनपेक्षा सरस फलंदाज ठरवत असेल तर ते हास्यास्पद ठरेल.
हे आकडे फक्त रोहितच्या कौतुकात दिले आहेत. यावरून त्याची महानता नक्कीच कळते.
यात एक राहिले.
यात एक राहिले.
तीस वर्षाचे झाल्यानंतर हळूहळू खेळाडूंचा फिटनेस गंडायला लागतो. भले भले खेळाडू एखादा फॉरमॅट निवृत्ती घेऊन एखाद दुसऱ्या फॉरमॅटवर फोकस करतात.
तेच शर्मा मात्र तीस वर्षानंतर स्वतःला सिद्ध करायला कसोटी सिरीअसली घेऊन खेळू लागला. अन्यथा कसोटीत पैसा प्रसिद्धी नाही म्हणून आजकाल पहिली कुऱ्हाड त्यावर पडते.
वयाच्या आणि कारकिर्दीच्या या टप्प्यावर कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली. आयपीएलचे सीजन न चुकता दरवर्षी खेळत आहे.
हा तोच खेळाडू आहे ज्याच्या फिटनेस वर बरेच लोक शंका व्यक्त करतात. त्याने वयाच्या या टप्प्यावर इतके सामने खेळणे आणि खोऱ्याने धावा जमवणे हे कौतुकास्पद आणि कमाल आहे
आणि आज कित्येक विक्रम त्याने फक्त स्वतःच्या नावे केले आहेत.
त्यावर सुद्धा येतो थोड्या वेळाने....
This could be Rohit Sharma's
This could be Rohit Sharma's last game for Mumbai Indians. You never know how exactly things are going to play out after this season, but what an incredible player he has been and a leader for the Mumbai Indians,' Watson said.
मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक
मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक धावा यावर्षी रोहित शर्माच्याच आहेत
अब की बार 400 पार.. याने करून
अब की बार 400 पार.. याने करून दाखवले
.
.
(No subject)
T20 International मधून दोन
T20 International मधून दोन दिग्गज खेळाडू निवृत्त होताना....
जगात सर्वाधिक धावा
No.1) रोहीत शर्मा - 4231
No.2) विराट कोहली - 4188
जगात सर्वाधिक सामनावीर
No.1) विराट कोहली 16
No.3) रोहीत शर्मा 14
जगात सर्वाधिक सिक्स
No.1) रोहीत शर्मा - 205
जगात सर्वाधिक फोर
No.2) रोहीत शर्मा - 383
No.3) विराट कोहली - 369
जगात सर्वाधिक शतके
No.1) रोहीत शर्मा - 5
जगात सर्वाधिक अर्धशतके
No.1) विराट कोहली - 38
No.3) रोहीत शर्मा - 32
जगात सर्वाधिक वेगवान शतक
No.1) रोहीत शर्मा - 35 चेंडू
जगात सर्वाधिक यशस्वी कप्तान
No.1- रोहीत शर्मा
सर्वाधिक 50 विजय
सर्वाधिक 80% विनिंग रेशिओ
आणि
एक वर्ल्डकप
शर्मा जी का बेटा
शर्मा जी का बेटा
हो
हो
शर्माजी का बेटा आणि शर्माजी का दामाद
दोघे एकत्र निवृत्त झाले.
अर्थात अजून वन डे आणि टेस्ट आहेत.
तिथून गेले की एक पर्व संपेल...
आधी सचिन दादा द्रविड यांचे संपताना अनुभवले आहे.
रो को - रोक सको तो रोक लो... इने जानेसे
वर्ल्डकप नंतर नेहमीप्रमाणे
वर्ल्डकप नंतर नेहमीप्रमाणे आयसीसीने बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंचा संघ जाहीर केला. अकरामध्ये सहा प्लेअर भारताचे आहेत. पण मजेशीर गोष्ट अशी की चार मुंबई इंडियन्सचे आहेत जे आयपीएल मध्ये तळाला होते
संघभावना आणि एकजूट किती महत्त्वाची असते हेच यातून दिसते
भारतीय संघ आणि त्या संघाला जोडून ठेवणारा कर्णधार रोहित शर्मा हे सारेच हा विश्वचषक खऱ्या अर्थाने डीझर्व्ह करतात
The team of the ICC Men’s T20 World Cup 2024 (in batting order) is:
Rohit Sharma (captain) - India
Rahmanullah Gurbaz (wicketkeeper) - Afghanistan
Nicholas Pooran – West Indies
Suryakumar Yadav - India
Marcus Stoinis - Australia
Hardik Pandya - India
Axar Patel - India
Rashid Khan - Afghanistan
Jasprit Bumrah - India
Arshdeep Singh - India
Fazalhaq Farooqi – Afghanistan
12th player: Anrich Nortje - South Africa
World Cup Winning Captain
World Cup Winning Captain Rohit Sharma performance
Most Runs
No.1 - Gurbaz - 257 Runs
No.2 - Rohit Sharma - 257 Runs
Highest Score
No.1 - Pooran - 98
No.3 - Rohit Sharma - 92
Most Fifties
No.1 - Rohit Sharma - 3
Most Sixes
No.1 - Pooran - 17
No.3 - Rohit Sharma - 15
Most Fours
No.1 - Head - 26
No.3 - Rohit Sharma - 24
Batting Strike Rate 156.31
Indian Captain Rohit Sharma No.1 for India in all above Categories.
Captain leading from the front
क्रिकेटर निवृत्त होतात..
सध्या पुढची पिढी घडवत आहे..
पूर्ण कुटुंबच रोहीत शर्मा फॅन क्लबात आहेत
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक शून्य = डक्स
रोहित शर्मा १२. संयुक्त चौथा क्रमांक.
या यादीत पहिल्या दहापैकी सात खेळाडू टेस्ट क्रिकेट न खेळणार्या देशांतले आहेत. बांग्ला देशचा एक खेळाडू संयुक्त पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा एक संयुक्त सहावा आहे.
जगात सर्वाधिक मध्ये सर्वाधिक
जगात सर्वाधिक मध्ये सर्वाधिक टी२० सामनेही खेळलाय का ते पाहायला हवं.
सर्वाधिक धावा
शर्मा - १५९ सामने १५१ डाव ४२३१ धावा
कोहली १२५ सामने ११७ डाव ४१८८ धावा
सर्वाधिक सरासरी
६६ रोहित शर्मा ३२.०५
४ विराट कोहली ४८.६९
जगात सर्वाधिक मध्ये सर्वाधिक
जगात सर्वाधिक मध्ये सर्वाधिक टी२० सामनेही खेळलाय का ते पाहायला हवं
>>>
हो
फुल पॅकेज आहे.
सरासरी, स्त्राईकरेत, शतके, अर्धशतके, फोर, सिक्स, सामनावीर, ओपनर, फिनिशर... सगळे करून झाले आहे
Big match Big Player
Big match Big Player
Captain Rohit Sharma never lost a T20 final
5 IPL trophies
1 CL
1 Nidahas Trophy
1 T20 world cup
T20 स्पर्धात 8 वेळा फायनल आणि 8 वेळा विजय!
अविश्वसनीय आकडे आहेत
फायनल मध्ये समोरचा संघ सुद्धा स्पर्धेत सर्वोत्तम असतो. बलाढ्य आणि फॉर्ममध्ये असतो. अश्या संघांशी 8 सामने खेळून आठ वेळा त्यांना मात देणे. 100 टक्के विनिंग रेशिओ ही अदभुत कप्तानी आहे
आणि ते सुद्धा 20-20 अश्या बेभरवशाचा फॉरमॅट मध्ये...
अरे छोट्या किती उंच व छान
अरे छोट्या किती उंच व छान मिस्किल झाला आहे. विज याच्या शुभेच्छा.
मला फक्त एकाच गोश्टीचा वैताग येतो. रोहित शर्मा किती व फार फार श्रीमंत आहे. तर मुलीला सांभाळायला एक किंवा दोन नॅनी का नाही ठेवत करीना कपूर सारखे. जिथे जाइल तिथे ती पोरगी खांद्यावर अंगावर झोपली अवघडलेली दाख वतात. एक दोन दा ठीक आहे. सारखेच काय. किंवा तिला आईकडे का नाही सोपवत. ती आता भरपूर उंच आहे लहान राहिलेली नाही. लेकीचे प्रेम दुसरे काय. तुमचे बोलणे झाले तर सजे स्ट करुन बघा.
अरे छोट्या किती उंच व छान
अरे छोट्या किती उंच व छान मिस्किल झाला आहे.
>>
अमा, मुलगी आहे ती माझी.. परी केस कापलेत.. पण चिंतेचे कारण नाही
Cute cute
Cute cute
शर्मा माणूस म्हणू. न किती
शर्मा माणूस म्हणू. न किती भारी आहे यावर एक लेख वाचण्यात आला..
किंचित मोठा आहे पण जरूर वाचा.. असा आहे..
पुढच्या पानावर शेअर करतो..
Pages