फोटोग्राफी स्पर्धा.. ऑक्टोबर.. "बिंब - प्रतिबिंब" निकाल

Submitted by उदयन.. on 1 October, 2013 - 07:27

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..

"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.

प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्‍या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अ‍ॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)

1st new.jpgद्वितीय क्रमांक - विभागुन

इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश

2nd 2.jpg

इडली - गोलातिल प्रतिबंब

2nd.jpgतृतिय क्रमांक- विभागुन

नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब

nalini 3rd.jpg

मामी - इंद्रवज्र

3rd.JPGउत्तेजनर्थः

प्रमेय - लहरीची लहर

uttejanarth 1 ne.jpg

आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत

3D 2Panajim 5 December 2011.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरसपाणी मस्तच.

गिरीश, फोटो मस्तय. पण सगळ्यांची पाऊले रहस्यभेद करत आहेत, सगळ्यात डाव्या बाजूच्या मुलाची उजवी मांडी पारदर्शक झालीये Happy

फक्त २ फोटो एका स्पर्धकाने टाकायचे असतानाही काही स्पर्धक त्यापेक्षा जास्त फोटो का टाकतात? संयोजकांचा त्याला काहीच आक्षेप का नाही?

संयोजकांचा त्याला काहीच आक्षेप का नाही?

संयोजक ते फोटो स्पर्धेसाठी गृहीत धरत नाहीत........... हे आधी सांगितलेले आहे....

मुळा डॅमचं टेल वॉटर. नगरपासून साधारणपणे ५० कि.मि. अंतरावर जांभळी नावाचं गाव आहे तिथलं संध्याकाळचं बिंब प्रतिबिंब!

पहिले दोन फोटो स्पर्धेसाठी.
हा पुरंदर वरील फोटो.
वर एक छोटिशीच चौकोनी विहिर आहे. पाण्याची पातळी खुपच खाली होती.

z

हा शिवनेरीवर काढलेला आहे.
z

हा टिपिकल फोटो.. स्पर्धेसाठी नाही
कोल्हापुरातील आमच्या गावावरुन मामाच्या गावाला जाताना घेतलेला.

z

माधव ,,

लोन्ग शुट आणि flash वापर केला आहे .. भाचा जागा बदलत होता.. एकाच ठीकाणी सारखा flash पडल्याने पाय पुसट दिसताहेत...

(फोटो मस्तय. पण सगळ्यांची पाऊले रहस्यभेद करत आहेत, सगळ्यात डाव्या बाजूच्या मुलाची उजवी मांडी पारदर्शक झालीये .....)

प्रकाशचित्र १.
बिंब एक......प्रतिबिंबे अनेक!
ISO :250
EXPOSURE: 1/30 sec,
f/3.5
Focal length:4.34mm
flash not used

प्रकाशचित्र २.
ISO:640
Exposure:1/200.
f/5
Flash not used

Pages