फोटोग्राफी स्पर्धा.. ऑक्टोबर.. "बिंब - प्रतिबिंब" निकाल

Submitted by उदयन.. on 1 October, 2013 - 07:27

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..

"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.

प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्‍या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अ‍ॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)

1st new.jpgद्वितीय क्रमांक - विभागुन

इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश

2nd 2.jpg

इडली - गोलातिल प्रतिबंब

2nd.jpgतृतिय क्रमांक- विभागुन

नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब

nalini 3rd.jpg

मामी - इंद्रवज्र

3rd.JPGउत्तेजनर्थः

प्रमेय - लहरीची लहर

uttejanarth 1 ne.jpg

आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत

3D 2Panajim 5 December 2011.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियुपरी, पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्यास इंद्रवज्र असे म्हणतात असे जिप्सी गुरुजींनी सांगितले आहे.
>> आभार मामी Happy

मामी इंद्रवज्र म्हणजे काय? >>> पियुपरी, पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्यास इंद्रवज्र असे म्हणतात असे जिप्सी गुरुजींनी सांगितले आहे.
>>>
बहुदा सुर्याभवती आलेल्या पुर्णाकृती इंद्रधनुष्यास इंद्रवज्र म्हणतात का? मी असं ऐकलय
जिप्सी गुरुदेव बरोबर काय ते सांगा पाहु

१.
3.jpg

२.
IMG_0001.jpg

सगळेच फोटो भारी आहेत. हि थीमच भारी आहे त्यानिमित्ताने खुप सुंदर सुंदर फोटो पहायला मिळाले.

Pages