आखाजी- सासुरवाशीणींचा सण!
आज अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेउन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेउन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासुन आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.
खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!
इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.
माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.
चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड
माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना, झुयझुय पानी व्हायं वं
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो
बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं
झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.
वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय
इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.
गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा
आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो. माहेरचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते. नवर्याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.
गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी
गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. आईबाबांची लेकीला माहेराहुन देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया,लोणचं अशा सामानाची बांधाबांध. इकडे आपली गौराई पण हुश्शार! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.
काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी
सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."
आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई
सौजन्यः http://books.google.co.in/books?id=xTi0iaalLXcC&pg=PA429&lpg=PA429&dq=ah...,
इंटरनेटवरुन साभार!!
२ पैसे माझे. याच दिवशी
२ पैसे माझे.
याच दिवशी खानदेशात 'सालं फुटतात'
म्हणजे शेतकरी व 'सालदारकी' करू इच्छिणारे मजूर 'भाव' ठरवतात. मजूराच्या इमानदारीची, शारिरिक क्षमतेची परिक्षाही घेतली जाते.
हा फोटो आहे नंदुरबारचा. जुन्या देवळांसमोर असे दगड असतात. ते उचलून दाखविणे हा पहिलवान असण्याचा वगैरे पुरावा. सालं धरायला आलेल्या सालदाराने तितकी ताकत दाखवावी अशी अपेक्षा असते.
सालदार म्हणुन काम स्वि़कारताना ठरलेल्या पगाराव्यतिरिक्त रहाणे, जेवणे, अमुक जोडी कपडे इ. देखिल ठरलेले असते.
आर्या, लेख खुप आवडला.
आर्या, लेख खुप आवडला.
लय लय बेस हय
लय लय बेस हय
मस्त! छान माहीती!
मस्त! छान माहीती!
धन्स
धन्स सर्वांना!!
इब्लुभौ...आखाजीची ही प्रथा माहित नव्हती.
आर्ये, छान लेख आहे. नवीन
आर्ये, छान लेख आहे. नवीन माहिती मिळाली.
झकास, बु.ग.चि. >>>
इब्लिस यांनी लिहीलेली प्रथा
इब्लिस यांनी लिहीलेली प्रथा ऐकली नाही यापूर्वी. (नंदुरबार माझे आजोळ होते.)
मस्त लिहिलय!
मस्त लिहिलय!
आर्याबैन, सालदारास्नं आन बटाई
आर्याबैन, सालदारास्नं आन बटाई धरनारास्नं तुन्ही विपुमा लिखेऽले. तुले पटी तं आठे नक्कल करीसन चिकटवजो!
***
यंदा अॅवरेज ४० हजार रुपये 'साल' फुटले आहे पश्चिम खानदेशात. ३० ते ५०-५५. म्हणजे तितके रुपये कॅश पगार, इयरली पॅकेज.. सालदारकी म्हणजे वर्षभर, रब्बी अन खरीप दोन्ही हंगामासाठी एक वर्षाचे काँट्रॅक्ट करून शेतमजूरी स्वीकारणे.
या मजूरासोबत पूर्वी त्याच्या घरातले इतर मेंबर फ्री काम करीत. जरी ते कंपल्सरी नसले तरी. अन त्यांच्या ही फ्री जेवण्या-रहाण्या-कपड्याची, गरज पडली तर औषधोपचारांची व्यवस्था मालक करीत असे. हे मात्र कंपल्सरी असे. इन शॉर्ट, पॅकेज विथ हेल्थ, अॅकॉमोडेशन अँड सब्सिडाईज्ड कँटीन
व्वा सहीच ..छान लेख व
व्वा सहीच ..छान लेख व माहिती........:स्मित:
चांगली माहीती ! जळगांव जामोद
चांगली माहीती !
जळगांव जामोद येथे याच दिवशी , हजारो लोक जमतात व एका खड्यात घट, सर्व डाळी ठेवून पाऊस पाणी व देशातील घडामोडी विषयी भविष्या सांगीतल्या जाते.
मस्त लिहिलय आर्या. पण
मस्त लिहिलय आर्या. पण गाणास्ना अर्थ समझी नाही राह्यना. अर्थ पण लिहि ना.
इब्लिस हे असेही होते मला मुळीच माहित नव्हते. युपी की बिहारच्या खेड्यात असे दगड उचलुन दाखवावे लागतात किंवा शंभर किलोची पोती पाठीवर घेऊन चालुन दाखवावे लागते असे ऐकल्यावर आश्चर्य वाटले होते. तेच आपल्या आजुबाजुला होते हे ऐकुन धक्का बसलाय
येस खासच आर्ये तुझ्यामुळे
येस खासच आर्ये तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा खानदेशी संस्कृती आणि तीथले खाद्य पदार्थ यांची माहिते मिळतेय
नेक्स्ट गटगला माझी हजेरी फक्त बु ग ची यासाठीच
आर्या, लेख आवडला.
आर्या,
लेख आवडला.
बहिणाबाईंची 'आखाजी'वरील
बहिणाबाईंची 'आखाजी'वरील
कविता
आखाजी
आखाजीचा आखाजीचा
मोलाचा
सन देखा जी
निंबावरी
निंबावरी
बांधला छान झोका
जी
माझा झोका माझा झोका
चालला
भिरभिरी जी
माझा झोका माझा
झोका
खेयतो वा-यावर जी
गेला
झोका गेला झोका
चालला
माहेराले जी
आला झोका आला
झोका
पलट सासराले जी
माझा
झोका माझा झोका
जीवाची भूक
सरे जी
भूक सरे भूक सरे
वा-यानं
पोट भरे जी
आला वारा आला
वारा
वा-यानं जीव झुले जी
जीव
झुले जीव झुले
झाडाची डांग
हाले जी
डांग हाले डांग
हाले
नजर नहीं ठरे जी
झाली
आता झाली आता
धरती खालेव-हे
जी
आंगनांत आंगनांत
खेयती
पोरीसोरी जी
झाल्या दंग
झाल्या दंग
गाऊनी नानापरी
जी
झाला सुरू झाला सुरू
पहिला
माझा पिंगा जी
फुगड्यांचा
फुगड्यांचा
चालला
धांगडधिंगा जी
दारोदारीं
दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी
घरीघरीं
मांडल्या गवराई जी
संगातीनी
संगातीनी
बोलव बोलवल्या जी
बोलवल्या
बोलवल्या
टिप-या झाल्या
सुरूं जी
टिप-याचे टिप-याचे
नादवले
घुंगर जी
कीती खेय कीती खेय
सांगू
मी काय काय जी
खेयीसनी
खेयीसनी
आंबले हातपाय जी
चार
दीस चार दीस
इसावल्या घरांत
जी
आहे पुढें आहे पुढें
शेतीची
मशागत जी
*****
अरे हा धागा कसा मिसला होता?
अरे हा धागा कसा मिसला होता? मस्त हो आर्या
छान
छान
आर्या! आखाजिला पतन्ग उडवायचि
आर्या! आखाजिला पतन्ग उडवायचि प्रथा आहे ना खान्देशात? आमचे एक नातेवाइक सान्गत होते की सक्रातीला नाही आखाजिला पतन्ग उडवतात.
सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक
सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार!
<<आमचे एक नातेवाइक सान्गत होते की सक्रातीला नाही आखाजिला पतन्ग उडवतात.<< हे माहित नव्ह्ते.
सासुरवाशिंणींचा नाही..
सासुरवाशिंणींचा नाही...माहेरवाशिणींचा सण म्हणायला हवे........
आखाजिला पतन्ग उडवायचि प्रथा
आखाजिला पतन्ग उडवायचि प्रथा आहे ना खान्देशात?
नाही. आखाजी म्हणजे मस्त्पैकी कडुनिंबाच्या झाडाला झोके बांधुन त्यावर झोके घेणे आणी गाणी म्हणत मनसोक्त "खावके" खायचे.
>>>>>>>>>>सासुरवाशिंणींचा
>>>>>>>>>>सासुरवाशिंणींचा नाही...माहेरवाशिणींचा सण म्हणायला हवे........
करेक्ट!
लेख आवडला. मस्त आहे.
लेख आवडला. मस्त आहे. माहीतीपूर्ण व रोचक.
माहेराला आलेल्या सासुरवाशीणी.
माहेराला आलेल्या सासुरवाशीणी......
Pages