किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ७२:
जीवधन - घाटघर गावाच्या बाजूने

(पण हा अग्गदी सोप्पा नव्हता ओळखायला... Good one, ओंकार)

प्र.चि. ७३: यात ४ ते ५ दुर्ग/ डोंगर आहेत.. प्र.चि. मध्ये ओळखता येईल, अशी खूण ठेवली आहे..
जिल्हा: नाशिक
Fort1234_DiscoverSahyadri.jpg

प्र.चि. ७३

अंकाई - टंकाई,हडबीची शेंडी,गोरखनाथ डोंगर

प्र.चि. ७३: बरोब्बर सह्याद्रीमित्र!!!
कात्रा किल्ल्यावरून दिसणारे हडबीची शेंडी, गोरखनाथ डोंगर आणि अंकाई - टंकाई

हेम.. 'नगर' लक्षात नाही घेतले.. मला ती जीवधनची करंगळी वाटली.. Happy तरीच म्हणत होतो या संगणक वाल्याचे उत्तर चुकले मग माझे कसले बरोबर असेल... तसेपण जल्ला मला सगळे डोंगर सारखेच दिसतात.. परवाच्या पाबरगडावर रो.मा शी टिपी म्हणून वाद घालत होतो.. तो शेवटी चित्र काढून दाखवतो म्हणत होता.. Proud

यो अरे माझं उत्तर कुठं चुकलंय ?? बरोबर ओळखलाय… मागे दिसतोय तो कात्राकड्याला चिकटलेला अग्निबाण सुळका.

रतनगडाच्या नेढ्याच्या वरती उभा राहुन हा फोटू काढलाय.

यो ... अरे आपण नेढ्याच्यावरती उड्या मारल्या होत्या ना...

समोर रतानगडाचाच भाग... अन त्याच्या मागे कात्रा आडवा पसरलाय.

उजव्या बाजुला खाली पाण्याच्या टाक्या पन दिसतायत.

स्पार्टाकस , तुम्ही दिलेल्या संकेतावरून आणि खालच्या चित्रावरून कोकणदिवा असावासा अंदाज बांधतोय.

https://lh3.googleusercontent.com/-2lvB6CDBvz0/Tf8ZKmEZV1I/AAAAAAAAF0w/T...

But I am not convinced.

आ.न.,
-गा.पै.

Pages