आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 

पाहुनी मेघा मयुर का नाचतो तो
पारध्यांचे आयते मग का न फावे

याचे काय करायचे?>>

हा शेर रद्द केलेला चांगला. कारण त्यात अनेक बाबी बदलाव्या लागतील Happy

ओके.

आज, ह्या निमित्ताने , आम्ही जाहीर करतो आहोत की जामोप्या हे महाजालावरील सगळ्यात लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. Happy
लगे रहो जामोप्याशेठ!

चांगला आशय आहे जामोप्या

============

थोडा बदल सुचतोय का बघतो

छान

जामोप्या, मनाचे तळे ऐवजी 'पण सरोवर आतले केव्हा सुकावे' असे केल्यास बरे व्हावे. (सहसा कैसे स्टाईल नाही वापरत आता). आणि तळेपेक्षा सरोवर किंचित अधिक काव्यबिव्यमय Happy

मलाही सरोवर समुद्र अपेक्षित होते. पण मला बसवता येत नव्हते.

एक अश्रू पापणीपर्यंत गेला
'पण सरोवर आतले केव्हा सुकावे

राम यावे हे बोलताना राम यावेत असे बोलले जाते. ती (किंचितशी) सूट होईल.

म्हणूनः

मी जटायू, पंख ज्याचे छाटलेले
राम यावा वा मुखी हे राम यावे

असे केल्यास?

Happy

मी जटायू, पंख ज्याचे छाटलेले
राम यावा वा मुखी हे राम यावे

>>. ओहोहो! क्या बात है बेफिजी! मस्तच!

कसं सुचतं राव तुम्हाला! कमाल आहे! Happy

मी पक्ष्याचा नाद सोडला, तर पुन्हा पक्षीच आला.
>>

चालाय्चच जामोप्या.. किमान'प़क्षी' गझल चांगली होण्याशी मतलब! Wink

छान.

शामराव...................................
_/\_ !! काही चूक्भूल झालीच असेल तर माफ करा राव >...................

पाच पक्षी पाच शेरातून उडले
वाटते आहे मला मीही उडावे

रावा ,कावळा, राजहन्स, जटायु,गरूड = पाचच
अजून किती आठवतायत बघूच आता ..............

Pages