आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 

rejection seems to be under control

which is why you are spending so much time on a gazal>>>

Rofl

हे साहेबाला सांगीतले तर इन्क्रीमेन्ट थांबवेल माझे तो.....

साहेबाला मायबोलीचे वेड लावा, ऑफीसमध्ये येणे थांबवेल तो स्वतःचे

जामोप्या - सुसंबद्ध प्रतिसादाबद्दल दिलगीर आहे

Proud

जोशीबुवा बिन्धास्त लिहा... ( बिन्धास्त लिहून आमचे कितीक आय डी मेले.. तुम्ही का काळजी करताय? )

कागलकर, दिलगीरी मी व्यक्त करतोय आणि बिन्धास्त लिहा हे बुवांना सांगताय?

एकाच गझलेने असे होत असेल तर माझे काय झाले असेल याचा विचार करा

त्याला साहीत्यात रस नाही, गाण्यात आहे... मी मायबोली बघतो हे त्याला माहीत आहे >>>

तरीच तुम्ही गायन शिकलात तर

मी केव्हापासून म्हणायचो की दक्षिण महाराष्ट्रातील अलीकडच्या पिढीत खरे तर ही कला अजिबात नसताना हा माणूस गायन का शिकला असावा

दक्षिण महाराष्ट्रातील अलीकडच्या पिढीत खरे तर ही कला अजिबात नसताना>>> खरे आहे, अपवाद फक्त मंजिरी असनारे-केळकर पण तीही आता उत्तर महाराष्ट्रात(नाशिकला) स्थायिक झाली आहे

तुमची सगळी वाक्ये दक्षिण महाराष्ट्राबद्दलची वहिनींना सांगून त्यांच्या माहेरला नावे ठेवता अशी आवई मी उठवू शकतो.

चूल आणि मूल सोडुन चालते ती वाकडी
मग असो सीता प्रभूची वा बिहारी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीन अंकांच्या अखेरी वास्तवे पण नागडी

काव्य नाही सूर नाही गान यांचे बेसुरे
राष्ट्रगीतासारखे गातात कोलावेरि डी

आसवे ढाळून नाही भार हलका व्हायचा
आठवांची अंतरी या रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
साखळी तुटताच नाळेची.. जगाची कोठडी

-'जामोप्या'!

अरे काय झालं राव?, जामोप्यांनी परवानगी दिलीये की.......

जामोप्या, वरील शेर 'पर्यायी शेर' नसून 'आततायी शेरांना' 'आशयवाही शेर' बनवण्याचा मैत्रीयुक्त प्रयत्न आहे. नोंद घ्यावी.

प्रोफेसर भूषण कटककर
'विचारल्याशिवाय गझल सुधारणा विभाग'
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ गझलालॉजी
फोन नंबर - ९३७१० .....

बेफि, तुम्ही खरेच प्रोफेसर झाले असते तर पोरं मेली असती राव Proud ते अचूकता वगैरे करून त्यांच्या तोंडाला फेस आला असता Proud

सुंदर , अप्रतिम ............

पहिल्या आणि पाचव्या शेरातले बदल तर अगदी आश्चर्यचकीत करणारे आहेत.. कारण त्यांच्या अर्थालाच नवा फॅसेट आला आहे.. तुमच्यासारख्या प्रतिभावंत माणसालाच हे सुचणार.

सॉरी जामोप्या Happy

चला, आता तुम्ही तरहीवर एक रचना करा बघू पटकन

'पिंजर्‍याला मानती आकाश रावे'

Happy

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

प्रोफेसर भूषण कटककर
'विचारल्याशिवाय गझल सुधारणा विभाग'
खुसपट राडा इन्स्टिट्यूट ऑफ गझलालॉजी
फोन नंबर - ९३७१० .....

असं पायजेल Proud

मंदार_जोशी | 4 May, 2012 - 16:57 नवीन
प्रोफेसर भूषण कटककर
'विचारल्याशिवाय गझल सुधारणा विभाग'
खुसपट राडा इन्स्टिट्यूट ऑफ गझलालॉजी
फोन नंबर - ९३७१० .....

असं पायजेल >>>

Lol

मंद्या, हे मी असं वाचलं... Light 1 घे Wink

प्रो. मंदार जोशी
'विचारल्याशिवाय विश्व सुधारणा विभाग'
खुसपट काढा इन्स्टिट्यूट ऑफ रिक्षालॉजी
फोन नंबर - ९३७१० ..... (कृपया आमच्या मिसकॉलला उत्तर न देणारे कॉल एंटरटेन केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी)

Proud

Pages