Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40
चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी
जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्या अंकाअखेरी होइ काया नागडी
काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी
ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी
बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
>>ठरवून खराब प्रतिसाद
>>ठरवून खराब प्रतिसाद द्याय्चे कसे ह्याची मार्गदर्शक तत्वे मला ह्यावेळच्या पुणे भेटीत शिकायची आहेत मंदार.
डबल ग्रॅजुएट करुन सोडू क?
अरे किती कलक्लाट.. माझ्या
अरे किती कलक्लाट.. माझ्या डोक्यातले पक्षी सगळे उडून चाललेत.
निंबुडा, १. हा कोणताही
निंबुडा,
१. हा कोणताही धार्मिक अथवा सावरकरी धागा नाही. त्यामुळे कोणालाच दुसर्याशी भांडण्याचे कारण नाही
२. यात एक नवीन गझलकार आपली गझल उभी करत असल्याने जुन्या गझलकारांना अस्तित्व दाखवण्यासाठी हा योग्य धागा आहे.
३. जामोप्या व जोशी या 'जआरंभी' सदस्यांचा वादे या धाग्यापुरता मिटलेला असल्याने येथे निव्वळ मजा होणार हे निश्चीत, तेव्हा आपणही सामील व्हा आणि आनंद लुटा
घ्या, मी वाद होणार नाही
घ्या, मी वाद होणार नाही म्हणतोय तोवर झालेही
रच्याकने, ही गझल आवडली नसली
रच्याकने, ही गझल आवडली नसली तरी जामोप्या चांगल्या रचना करु शकतात असे वाटते. हेमावैम. असो.
मंदार अजून तरी मी गंमतच करतोय
मंदार अजून तरी मी गंमतच करतोय रे.....
हे मात्र खरे आहे मंदार,
हे मात्र खरे आहे मंदार, जामोप्या चांगली गझल करणार
ओ बेफी, कोल्हापुरला कोण
ओ बेफी, कोल्हापुरला कोण घाबरतंय?
म्हणजे निदान गझल की ललित असा
म्हणजे निदान गझल की ललित असा प्रश्न पडणार नाही
नाही नाही बेफि, आज मी काहीही
नाही नाही बेफि, आज मी काहीही झाले तरी भांडणार नाहीये... मंदारशी तर नाहीच नाही.
पण मी रागावलो आहे.
पण मी रागावलो आहे.
'जआरंभी' सदस्य >>>
'जआरंभी' सदस्य >>>
गझल की ललित = गलित
गझल की ललित = गलित
सद्या ललित हा आय डी सुट्टीवर
सद्या ललित हा आय डी सुट्टीवर आहे काय?
पण मी रागावलो आहे.>>> शंभर
पण मी रागावलो आहे.>>> शंभर आकडे मोज मग
जगातल्या कोणीही मंदारशी
जगातल्या कोणीही मंदारशी भांडणे याला आपुलकी, विदिपांशी भांडणे याला निरुद्योगीपणा, विशालशी भांडणे याला प्रकाशचित्रांवरचा राग व जामोप्यांशी भांडणे याला राजकारण म्हणतात. माझ्याशी भांडणे हे निव्वळ भांडणे असते असे मी समजतो
घरकुलाचे स्वप्न त्यानी का
घरकुलाचे स्वप्न त्यानी का बघावे
पिंजर्याला मानिती आकाश रावे
गूढ डोही भूक व्याकुळ मगर राही
राजहंसा त्या कसे ते जाणवावे
कावळ्यानी काव आता का करावी
पाहुणा नाही कुणी हे त्या न ठावे
गलित>>
गलित>>
(No subject)
गूढ डोही भूक व्याकुळ मगर
गूढ डोही भूक व्याकुळ मगर राही
राजहंसा त्या कसे ते जाणवावे
>>
दैव मगरीसारखे पाण्यात लपणे
पोहणार्या भाबड्याला का कळावे
चला आता निघावे. जामोप्या,
चला आता निघावे.
जामोप्या, सगळे पक्षी आणायचेच आहेत का शेरात?
मगर कुठे पक्षीय? मगर म्हणजे
मगर कुठे पक्षीय?
मगर म्हणजे माहितीय ना? ती अशी खडबडीत पाठीची असते बघा.
ती तर सुसर ना
ती तर सुसर ना
कावळ्याची हाक लेकीला
कावळ्याची हाक लेकीला रडवते
न्यायला येतील का कोणा पुसावे?
जगातल्या कोणीही मंदारशी
जगातल्या कोणीही मंदारशी भांडणे याला आपुलकी, विदिपांशी भांडणे याला निरुद्योगीपणा, विशालशी भांडणे याला प्रकाशचित्रांवरचा राग व जामोप्यांशी भांडणे याला राजकारण म्हणतात. माझ्याशी भांडणे हे निव्वळ भांडणे असते असे मी समजतो >>>
भांडा सौख्यभरे!
मगर म्हणजे माहितीय ना? ती अशी
मगर म्हणजे माहितीय ना? ती अशी खडबडीत पाठीची असते बघा. >>> मला फक्त गटगला येवुन दर दहा मिनीटाला सु....शांतपणे आता निघतो बर्का म्हणणारी/म्हणणारा (आणि न जाणारी / जाणारा) मगर माहितीये
तसे मग काय विशाल, तुम्हाला
तसे मग काय विशाल, तुम्हाला अण्णासाहेब मगरही माहीत असतील. हे फाऊल झाले
घरकुलाचे स्वप्न त्यानी का
घरकुलाचे स्वप्न त्यानी का बघावे
पिंजर्याला मानिती आकाश रावे
गूढ डोही भूक व्याकुळ मगर राही
राजहंसा त्या न का ते जाणवावे
कावळ्यानी काव आता का करावी
पाहुणा नाही कुणी हे त्या न ठावे
पाहुनी मेघा मयुर का नाचतो तो
पारध्यांचे आयते मग का न फावे
दुसरा आणि चौथा अर्थाने अगदीच सिमिलर झालेत
तुम्ही सगळेच पक्षी का घेताय
तुम्ही सगळेच पक्षी का घेताय पण? खरच विचारतोय
कावळ्याची हाक लेकीला
कावळ्याची हाक लेकीला रडवते
न्यायला येतील का कोणा पुसावे?
आवडला.
Pages