Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40
चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी
जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्या अंकाअखेरी होइ काया नागडी
काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी
ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी
बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पिंजर्याला मानती आकाश
पिंजर्याला मानती आकाश रावे
घोसल्याचे सूख त्याना काय ठावे
विशाल जामोप्या सुटी शक्यतो
जामोप्या
सुटी शक्यतो घेऊ नयेत. 'सू'ख वगैरे
तसेच घोसला हा शब्द मराठीत तितकासा प्रचलीत नाही.
बाय द वे, भटसाहेबांची ओळ आहे ही.
मूळ शेर असा:
ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू
पिंजर्याला मानती आकाश रावे
विशल्या
विशल्या
विशाल
विशाल
तरी सुरूवातीला दीर्घ ऐवजी
तरी सुरूवातीला दीर्घ ऐवजी र्हस्व अशा सुटी घ्यायला हरकत नाही जामोप्या पण अत्यंत कमी प्रमाणात. विशिष्ट वेळ गेल्यावर शब्दच विनासुटीचे सुचू लागतात.
कुणीतरी एखादी ओळ दिली की आपण
कुणीतरी एखादी ओळ दिली की आपण त्याच्या पुढे ओळ रचायची की मागे? म्हणजे दिलेली ओळ शेराची पहिली ओळ असते का दुसरी? अर्थात ओळीची अलटापालट करता येते, हा भाग वेगळा.
विशिष्ट वेळ गेल्यावर शब्दच
विशिष्ट वेळ गेल्यावर शब्दच विनासुटीचे सुचू लागतात.
>>
हा विशिष्ट वेळ आंतरजालावर गझला प्रकाशित करून त्यांजवर जहरी टीका मिळवण्यात घालवावा लागतो हे विदिपांनी सांगितले नाही. या टीकेतूनच गझलकार सोन्यासारखा तावून सुलाखून निघतो
घरटे शब्द बसेना, म्हणून घोसला
घरटे शब्द बसेना, म्हणून घोसला वापरला.
दुसरी घेतात बहुधा, काही
दुसरी घेतात बहुधा, काही विशीष्ट परंपरेतले लोक पहिलीही घेतात.
हो ते सांगायचे मात्र राहिलेच
हो ते सांगायचे मात्र राहिलेच
कुणीतरी एखादी ओळ दिली की आपण
कुणीतरी एखादी ओळ दिली की आपण त्याच्या पुढे ओळ रचायची की मागे? म्हणजे दिलेली ओळ शेराची पहिली ओळ असते का दुसरी? अर्थात ओळीची अलटापालट करता येते, हा भाग वेगळा.
>>
१. अलटापालट करता येते म्हणजे काय म्हणायचे आहे आपल्याला? गझलतंत्रानुसार जरी मतल्यातल्या ओळींची अलटापालट (की उलटापालट) करणे शक्य असले तरी आशयानुसार ते शक्य असेल असे नाही.
२. जुन्या संकेतात (म्हणे) तरहीची ओळ ही मतल्याची दुसरी ओळ म्हणून घेतली जायची. नक्की त्याच लोकांना माहीत.
येथील तरही उपक्रमात आपण ती मतल्याची दुसरी ओळ म्हणून घेतो.
हा विशिष्ट वेळ आंतरजालावर
हा विशिष्ट वेळ आंतरजालावर गझला प्रकाशित करून त्यांजवर जहरी टीका मिळवण्यात घालवावा लागतो हे विदिपांनी सांगितले नाही.>>> टीका परवडली पण टाकल्या जाणार्या एकेक पिंका खुप काही शिकवणार्या असतात. गझलांच्या विभागात फारसा अनुभव नाही, पण कविता विभागात असे सोहळे खुप पाहीले आहेत. अर्थात जेव्हा उत्सवमुर्ती आप, जिगा, जचौ सारख्या विभुती असत तेव्हा तर खुपच
येथील तरही उपक्रमात आपण ती
येथील तरही उपक्रमात आपण ती मतल्याची दुसरी ओळ म्हणून घेतो.>>> तरीही काही गझलकार ती पहिलीच घेऊन गझल लिहीतात हा ही भाग वेगळाच
कणखर विशाल - मायबोलीवरच्या
कणखर
विशाल - मायबोलीवरच्या कविताही अनेकदा धन्यच असतात की?
गझलांच्या विभागात फारसा अनुभव
गझलांच्या विभागात फारसा अनुभव नाही>>> गझल विभागात नवख्या माणसाला शक्यतो असा जाच होणार नाही हे आम्ही जातीनिशी पाहतो विशाल

फक्त नवखी माणसे आमच्याबाबतीत
फक्त नवखी माणसे आमच्याबाबतीत ते धोरण ठेवत नाहीत
ओके.. मीही मतल्याची हीच प्रथा
ओके.. मीही मतल्याची हीच प्रथा पाळेन.
अलटापालट म्हणजे पहिली ओळ दुसरी, अन दुस्री पहिली.. असे मला म्हणायचे होते. आशाय बदलू शकतो हे तुम्ही सांगितल्यावर जाणवले.
हो, काही परीसस्पर्श लाभलेली
हो, काही परीसस्पर्श लाभलेली नवखी माणसे असे करतात खरे
मिळतील शिष्य लाखाने येथे
मिळतील शिष्य लाखाने येथे चौफेर तुम्हाला
लखलाभ गुरूजी तुमचे पर्यायी शेर तुम्हाला
-'बेफिकीर'!
व्वा
व्वा
व्वा व्वा जामोप्या! वेलकम!
व्वा व्वा जामोप्या! वेलकम! एकदम "कमी-वेलेत" केली तुम्हि गझल म्हणुन "वेल्-कम!"
आणि त्यावर इतके प्रतीसाद? बाप्रेSSSSS!!!
प्रतिसादांचीहि रांग आहे लांबडी!
बेफिजी:
प्रोफेसर भूषण कटककर
'विचारल्याशिवाय गझल सुधारणा विभाग'
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ गझलालॉजी
फोन नंबर - ९३७१० .....
>>>
मायबोलीवरच्या कविताही अनेकदा
मायबोलीवरच्या कविताही अनेकदा धन्यच असतात की?>>> बेफि, अहो म्हणून तर मी उदाहरणे दिली आहेतच की
विदिपा, अहो गझल जामोप्यांची आहे. 'जातीनिशी' वगैरे शब्द नका वापरू, आधीच नाहक (?) बदनाम झालेत जामो
घरकुलाचे स्वप्न नेत्री ना
घरकुलाचे स्वप्न नेत्री ना उरावे
पिंजर्याला मानिती आकाश रावे
नाहक म्हणजे काय? हक्क नसताना
नाहक म्हणजे काय?
हक्क नसताना बदनाम का?
त्या पहिल्या ओळीतल्या 'ना'
त्या पहिल्या ओळीतल्या 'ना' ऐवजी 'का' घ्या जामोप्या, मग एकदम क्लीअर होईल बघा
ना उरावे ऐवजी 'का रुजावे' असे
ना उरावे ऐवजी 'का रुजावे' असे करा जामोप्या, भन्नाट मतला होईल
मला मराठी फारसं येत नाही
मला मराठी फारसं येत नाही विदिपा, मी तसा कच्चाच आहे मराठीत
मला मराठी फारसं येत नाही
मला मराठी फारसं येत नाही विदिपा, मी तसा कच्चाच आहे मराठीत >>
मला वाटायचंच तसं, पण बोललो नव्हतो
लई भारी. घरकुलाचे स्वप्न
लई भारी.
घरकुलाचे स्वप्न नेत्री का उरावे
पिंजर्याला मानिती आकाश रावे
काय खयाल टकराया बेफि बघितलंत
काय खयाल टकराया बेफि बघितलंत ना?
Pages