आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 

दोन समविचारी माणसं एकत्र आली की असं होणारच विदिपा Wink

(कोण रे तो शेजारच्या खिडकीतून विघ्नसंतोषी असे ओरडणारा) Proud

आपले खयाल टकरातात म्हणून तर लांब ठेवतात सगळे आपल्याला Proud

जामोप्या, तो मतला अजून हवा तसा नाही झालेला Happy

घरकुलाचे स्वप्न त्यांनी का बघावे (किंवा पहावे)
पिंजर्‍याला मानती आकाश रावे

असे योग्य व्हावे

९४ प्रतिसाद असणारी मायबोलीवरची पहीली गझल असा गौरव प्राप्त करणारी ही पहिलीच गझल आहे

असे कसे काय?

झोपेच्या ओढीने केल्या - १०१ प्रतिसाद

हबांची एक गझल - १५० प्रतिसाद

जानवे - ८० प्रतिसाद

तेव्हा हे बोलला नाहीत ? Proud

किती तपशीलवार लक्षात ठेवता तुम्ही बेफि>>

कारण त्या प्रत्येक गझलेत माझ्यावरच टीका झाली आहे Lol

पदार्पणात म्हणायचे असेल त्यांना>>

तुमच्या का? गझलेवरील प्रतिसादक म्हणून? Wink

तुमच्या का? गझलेवरील प्रतिसादक म्हणून?>>> Lol

असू द्या हो बेफि, टीका मोठ्या माणसांवरच होते Wink

कारण त्या प्रत्येक गझलेत माझ्यावरच टीका झाली आहे >>>> मायबोलीवर एकटे बेफिच असतील जे कधीही कुणावरही अनुल्लेखाचा आरोप करु शकत नाहीत Wink

जामोप्या, हा शेर कुछ खास नाही. मगर हंसाला खाण्यासाठी टपली आहे हे त्या हंसाला माहीत नाही असा ( व सांकेतिकही ) अर्थः

आता अंतरीच का? पाण्यात का नाही? मगर काळी का आहे? हंसालाच का खाणार? एखाद्या इतर जलचराला का नाही वगैरे

आणि पाण्यातीलच प्रसंग का? गवतात चित्ता टपून का नाही? इत्यादी

मग चिडचिड, त्रागा, इत्यादी

नवीन Add आल्ये माबो वर:

"Online Marathi Gazal Making on Maayboli" Proud

लगे रहो जामोप्या! आम्हि पण शिकतोय हातोहात! Wink

मी आधीही प्रतिसाद दिले आहेत की. च्यायला.>>> ते पण असेच आहेत

बंडल

फारच बंडल

स्माईलीज

वगैरे वगैरे

घरकुलाचे स्वप्न त्यानी का बघावे
पिंजर्‍याला मानिती आकाश रावे

अंतरी राही टपुन ती मगर काळी
राजहंसा त्या कसे ते जाणवावे

कावळ्यानी काव आता का करावी
पाहुणा नाही कुणी हे त्या न ठावे

ठरवून खराब प्रतिसाद द्याय्चे कसे ह्याची मार्गदर्शक तत्वे मला ह्यावेळच्या पुणे भेटीत शिकायची आहेत मंदार.

बादवे, १३ ला सकाळी एक गटग आयोजित कर की. अस्मादिक आणि कैलासराव पुण्यात येत आहोत.

मंदार_जोशी | 4 May, 2012 - 17:50 नवीन
ओ बेफी. आवडली असे अनेक प्रतिसाद आहेत. कैच्याकै बोलू नका.
>>

अहो तसे प्रतिसाद नाही आहेत हे मी म्हणत नाहीये, पाटील म्हणतायत. मला माहीत आहे की? की तुम्ही चांगले प्रतिसाद पण दिलेत ते.

उगाच कोल्हापूरला घाबरून पुण्यावर पावशेर काढू नका

Pages