Submitted by दक्षिणा on 11 October, 2011 - 04:25
नविन घरात फर्निचर मध्ये अत्यंत गरजेचं काय काय असावं याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. माझ्याकडे घरातल्या सामानापैकी काहीही नाही हे गृहित धरून सांगावे.
शिवाय तुमच्यापैकी कोणालाही स्वस्तात टिकाऊ फर्निचर मिळण्याची ठिकाणं, बनवून देणारे लोक माहीत असतील तर ते ही इथे सांगा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण एकुणात देव्हारा ही काही
पण एकुणात देव्हारा ही काही कंपलसरी आवश्यक गोष्ट नाही प्रत्येकासाठी.
झोपायला गादी, अन्न शिजवायला गॅस, कपड्याचं कपाट या इतकी आवश्यक नाही.
>>> अनुमोदन. ज्याला देव ठेवायचे आहेत तो एका फळीवर किंवा ओट्यावर किंवा टीपॉयवर किंवा कोपर्यातही ठेवू शकतो. बिल्वाने बोलण्याच्या ओघात ते शिसवी देव्हार्याचा उल्लेख केलाय असं वाटतंय आणि त्याच ओघात मीही बोललेय. शिसवी देव्हारे खरंच खूप सुंदर दिसतात आणि टिकतात.
हिम्सकुल, हे चितालिया कुठे
हिम्सकुल, हे चितालिया कुठे आहे?
आणि काचेच्या बरण्यांची हौस असेल तर मंडई कडून रविवारा त जाताना डाव्या हाताला १ क्रोकरी च दुकान आहे तिक्डे होल्सेल च्या भावात सुंदर माल मिळ्तो..>> अवनी दुकानाचे नाव सांगशील का प्लीज?
देव ठेवणे हे पण ऑप्शनल असू
देव ठेवणे हे पण ऑप्शनल असू शकतं की केश्वे.
हो ना. म्हणून तर म्हटलं
हो ना. म्हणून तर म्हटलं "ज्याला ठेवायचे आहेत तो...".
@अश्विनी के : अनुमोदन..शिसवचे
@अश्विनी के : अनुमोदन..शिसवचे देव्हारे खरेच मस्त दिसतात.
कुलकर्णी पेट्रोलपंपाजवळचा खुप महागडा आहे. भवानी पेठेमधे बर्याच कमी किमतीत मिळतात आणि व्हरायटी सुद्धा खूप आहे.
दक्षिणा, सध्या दिवाळीचे
दक्षिणा, सध्या दिवाळीचे सर्वत्र सेल लागलेले आहेत. त्यामधे चांगले डील कुठे मिळते ते बघून सामान विकत घे. तुला हाऊस होल्ड अप्लायन्सेस नक्की काय लागणार आहेत त्याची लिस्ट कर. त्यामधे प्राथमिकता ठरव. >>
अगदी अगदी. पण मोठ्या शोरुम जाउन प्राइस चेक कर, जनरली तिथे घेण्यापेक्षा छोट्या छोट्या डिलर कडे चेक कर.
हे कालच आमच्या बाबत घडल. जो १ टन स्पिल्ट एसी विजय सेल्स आणि क्रोमा च्या ऑफर मध्ये रु. १६००० (ओरिलीनल प्राइस रु. १९८००) ला येत होता तोच लोकल डिलर कडे रु. ९००० ला मिळाला. शिवाय इन्सटॉलेशन चार्जिसही कमी.
दक्षिणा, अभिनंदन! कधि नवीन
दक्षिणा, अभिनंदन! कधि नवीन घरात शिफ्ट झालीस?
एकुणात देव्हारा ही काही
एकुणात देव्हारा ही काही कंपलसरी आवश्यक गोष्ट नाही प्रत्येकासाठी.>>> व्हयं जी, अणुमोदन
वरती कुणीतरी देव्हारा कुठे मिळेल असं विचारलं त्यावर मनिमाऊ ने त्या दुकानाचं नाव सुचवलं पण शंका व्यक्त केली की ते दुकान आहे का तिथे अजून त्यावर मी माझ्याकडे असलेला एक माहितीचा तुकडा लिहिला ( वरच्या अख्ख्या चर्चेत मला माहिती असलेला तो एकमेव ज्ञानकण असल्याने शिंपडायची हुक्की :फिदी:)
बेसिक फर्निचर निगडीत नव्हती ती पोस्ट.
अश्विनी
मी रुमीज बरोबर रहात असताना
मी रुमीज बरोबर रहात असताना आम्ही मिळून असंच अगदी आवश्यक तेवढं सामान घेतलं होतं. साधारण असं:
फ्रीज - १३०००
गॅस (शेगडी+कनेक्शन) -अंदाजे ५०००
किचन रॅक (मोठं) - १२००
रेडीमेड पडदे - अंदाजे २०० रु.चे ३ (एकुण ६००)
आरशासहित लोखंडी कपाट (गोदरेज सारखं पण ब्रॅंडेड नव्हतं) - २५०० किंवा ३००० प्रत्येकी
लोखंडी कॉट्स - २००० प्रत्येकी
गाद्या - रु. ७०० प्रत्येकी (एक लिविंग रुम मध्ये होती)
२-३ पावडर कोटेड रॅक्स - रु. ७०० प्रत्येकी
१ पावडर कोटेड शू रॅक -रु ७००
नीलकमल मोल्डेड खुर्च्या अन १ टेबल- किंमत आठवत नाही. (टेबल अन २ खुर्च्या लिविंग रुममध्ये अन २ टेरेसमध्ये)
टीव्ही होता पण फारसा वापरला नाही जायचा कारण घरात असलो तर टीव्ही बघणार ना
याशिवाय नाइटलॅम्प, लॅपटॉप, फोटोफ्रेम्स, फ्लॉवरपॉट्स असं चिकार चिल्लर सामान होतं (मित्र म्हणायचे हे सगळं कशाला लागतं तुम्हा मुलींना? ते फक्त गादी, कपाट अन लॅपटॉप एवढ्यावर राहायचे)
एकुणात -> देव - देव्हारा -
एकुणात -> देव - देव्हारा - देवघर - आवश्यक - निकडीचे - गरजेचे... हे शब्द ह्या धग्यावर कृपया एकत्र आणू नयेत..
बिल्वा, मी ते आपलं इतरांना
बिल्वा, मी ते आपलं इतरांना आठवण करण्यापुरतं म्हणाले गं..
@ आस, चितालिया रविवार पेठेत
@ आस, चितालिया रविवार पेठेत आहे... बोहरीआळीत देना बँकेच्या पुढच्या गल्लीत डावीकडे...
मस्त हा धागा निट वाचतेय.
मस्त हा धागा निट वाचतेय. सध्या सर्व लक्ष परिक्षेकडं केंद्रीत केलं आहे. परिक्षा संपली की जोमाने कामाला लागेन.
१ . पहिली बेसिक गरज : मजबूत
१ . पहिली बेसिक गरज : मजबूत 'गोदरेज' स्टाईल कपाट. आरसा असेल तर छान नसेल तर नसेल. पण आत लॉकर, अन बर्यापैकी गेजचा पत्रा. पैसे किती लागले याचा विचार न करता घेणे.
२. दाराला आतून मजबूत कडी/कोंडा/लॅच.
३. स्वयंपाकासाठी आवश्यक गोष्टी : ग्यास, भांडीकुंडी.
४. आंघोळीचे सामान. बादली वै.
५. झोपण्यासाठी गादी. - मग बंक बेड (खाट) / बेड इ. इ. नंतर.
६. खुर्च्या फिर्च्या टेब्लं इ. शेवटी.
अन हो, घराच्या किल्ल्या समोर टांगून ठेऊ नयेत हॉलमधे. नेव्हर.
"अन हो, घराच्या किल्ल्या समोर
"अन हो, घराच्या किल्ल्या समोर टांगून ठेऊ नयेत हॉलमधे. नेव्हर." >>
याचे काही फेंगशुई / वास्तुशास्त्राशी संबंधित कारण आहे का?
आमच्या घरी हॉल मधेच एका वारली पेंटिंग केलेल्या decorative keyholder ला सगळ्या किल्ल्या टांगलेल्या असतात.
याचे काही फेंगशुई /
याचे काही फेंगशुई / वास्तुशास्त्राशी संबंधित कारण आहे का? >>> अशाच प्रथा पडतात.
फेंगशुई वगैरे काही नाही. हॉलमधे अनोळखी लोकांचाही वावर असू शकतो. त्यांनी आपल्या नकळत (आपण पाणी आणायला आत गेलो इ.) किल्ल्या पळवल्या / त्यांचे ठसे घेतले असे सहज घडू शकते. म्हणून ती खबरदारी.
शंका निरसन केल्याबद्दल थँक्यू
शंका निरसन केल्याबद्दल थँक्यू माधव!!
Pages