घरातील बेसिक फर्निचर

Submitted by दक्षिणा on 11 October, 2011 - 04:25

नविन घरात फर्निचर मध्ये अत्यंत गरजेचं काय काय असावं याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. माझ्याकडे घरातल्या सामानापैकी काहीही नाही हे गृहित धरून सांगावे.
शिवाय तुमच्यापैकी कोणालाही स्वस्तात टिकाऊ फर्निचर मिळण्याची ठिकाणं, बनवून देणारे लोक माहीत असतील तर ते ही इथे सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिमाऊ सारखी भक्कम माहीती खूप उपयोगी पडेल.
मनोज गृहोपयोगी वस्तु चांगल्या भावात मिळतील म्हणजे रेंज सांगितलीस तर बरं होईल.
आत्ता नक्की काय घ्यायचं? ते किती रूपयात बसवायचं? हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी.

ललीची पोस्ट वाचून कॉफी 'फुर्रर्रर्र' झाली Proud

दक्षिणा, रॉट आयर्नचा एक सिंगल दिवाण आतमधल्या स्टोरेजसकट साधारण १२-१५ हजारापर्यंत बसतो. नी म्हणतेय ते गोदरेज स्टोअरेज (टू डोअर, पूर्ण उंचीच्या आरश्यासकट, वर बॉक्स स्टोअरेज) साधारण पंचवीस हजारापर्यंत येतं. त्याच डिझाईनमधे तू अनब्रँडेड घेतलंस तर साधारण १८ ते वीस हजारापर्यंत बसेल. बेसिनच्या वरचं स्टोअरेज एक ते दीड हजार. फोमची एक बॉक्स गादी साधारण दोन ते तीन हजार, यातही ब्रँडेड - अनब्रँडेड प्रकार आहेत. स्वयंपाकघरात छोट्या ट्रॉल्या (ओट्याखालच्या नाहीत, अशाच तीन - चार कप्प्यांच्या, इकडे तिकडे ढकलायच्या - यासारख्या) उपयोगी पडतील. या ट्रॉलीची किंमत साधारण साडेसातशे रुपयांपासून चालू होते. बेसिक प्रकारात एका खणात पाच ते सहा अर्धा किलोच्या पेट बरण्या मावतात.

दक्षिणा, माझ्या नव्या घरात मी किचन ट्रॉली करवून घेतल्या. त्यात साधारण ५ फूटच्या ट्रॉलीज, ओट्याखालचा ईतर सगळा भागला प्लाय लावून शेल्फ, ओव्हर हेड शेल्फ (दरवाजांना काचेचे दार असलेले), बाजुला एक मोठे टॉल युनीट (साधारण ४०'' लांबी व ८ फूट ऊंची, मध्ये ५ शेल्फ असलेले), आणी एक साईड युनीट (३०'' x ५' x 18''). हे सगळे मला ७८,०००/- पडले.
किचनचे सर्व सामान अगदी व्यवस्थीत बसते.

स्वयंपाकघरात छोट्या ट्रॉल्या (ओट्याखालच्या नाहीत, अशाच तीन - चार कप्प्यांच्या, इकडे तिकडे ढकलायच्या) उपयोगी पडतील. ती एक ट्रॉली साधारण साडेसातशे रुपयांना येते. त्यात एका खणात पाच ते सहा अर्धा किलोच्या पेट बरण्या मावतात. >>>
असल्या ट्रॉल्या बाजिराव रोड ल मिळतात का?
दक्षिणा , वि पु बघणे

मी येवढयातच काही खरेदी केली. ती अशी :
सोफा कम बेड (पावडर कोटेड) १०५००/-, फोल्डींग खुर्च्या (पत्र्याच्या,कुशन असलेल्या) ७००/- प्रत्येकी.
किचन ट्रोली चं एस्टीमेट (अगदी लहान जागा आहे ओट्याखाली ऑफसेट भिंत अस्ल्याने) १००००/-

फोमची एक बॉक्स गादी साधारण दोन ते तीन हजार, <<< मी तर फोमच्याही म्हणत नाहीये. कापसाच्या बॉक्स गाद्या म्हणतेय. माझ्याकडे त्याच आहेत.

फर्निचर बाबत अनेक महत्वाचे आणि अनुभवातून दिलेले वरील सल्ले तुला उपयोगी पडतील.
याबाबत आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष बोलू आपण.
एकच लक्षात ठेवणं महत्वाचं की प्रत्येक खोलीचा साइज लक्षात घेऊन त्या साइजला सुटेबल असं फर्निचर
निवडणं गरजेचं. नव्या घरातल्या रिकाम्या खोल्या मोठ्या भासतात. प्रत्यक्ष लांबी-रुंदी मोजून त्यानुसार फर्निचरचा साइज ठरवावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील चर्चेत कुणीच न सांगीतलेली एक महत्वाची गोष्ट :
(जी मी माझ्या घरात अंमलात आणली आहे)

प्रत्येक खोलीतील एक भिंत, शक्यतोवर दरवाज्यालगतची, पूर्ण मोकळी ठेवायचा प्रयत्न केल्यास, भरपूर सामान असूनही खोली मोठी भासते.
या भिंतीवर फोटो फ्रेम्स, छोटंसं वॉल हॅंगिंग, घड्याळ या गोष्टी (मर्यादित संख्येत) चालतील.
परंतु, या भिंतीजवळ वॉर्डरोब/कपाट/कुठलंही फ़िक्स्ड फर्निचर/सोफा इतकंच काय खुर्ची देखील ठेऊ नये.
तसंच या मोकळ्या भिंतीला शक्यतोवर गडद रंग नसावा.
(हाय-लाईट करायची इच्छा असल्यास इतर ३ भिंतींपैकी एकीची निवड करावी)
कीचन/बेडरूम जरी लहान असेल तरी देखील हाच नियम पाळल्यास, त्या खोल्यादेखील मोठ्या असल्याचा आभास निर्माण होऊ शकतो. तसंच वावरायला जागा देखील चांगली मिळते.

कपाटांसाठी सातारा रोड वर पद्मावतीनंतर लगेच डावीकडे बरीच दुकाने आहेत.. अनब्रँडेड पण चांगल्या क्वालिटीची कपाटे मिळतात..

दक्षिणा, मी जी घेतली आहे ती साधारण सव्वा फूट लांब X सव्वा फूट रुंद X अडीच फूट उंच (कारण तीन खणाची आहे) अशी आहे, ती मला साडेसातशे रुपयांना मिळाली होती. इथे ठाण्यात स्टीलची भांडी मिळणार्‍या जवळपास सगळ्या दुकानांत तश्या ट्रॉल्या विकायला ठेवलेल्या असतात. त्यात वरच्या खणात कांदे-बटाटे-लसूण इत्यादी, मधल्या आणि खालच्या खणात पेटजारमधे डाळी-साबुदाणे-शेंगदाणे इत्यादी वाणसामान मावतंय. आकाराप्रमाणे, दर्जाप्रमाणे मला वाटतंय किंमत बदलेल. गूगलमधे Kitchen Utility Trolly शोधलंस तर असंख्य डिझाईन्स मिळतील, कदाचित पुण्यातला उत्पादकही मिळून जाईल.

दक्षिणा, तुझी अवस्था मी समजू शकते. व्हिटॅमिन एम ची कमी असताना खरेदी करायचा दांडगा अनुभव आहे. शक्यतो खरेदी करताना मॉलमधे न करता दुकानदाराकडे कर. ते डिस्काऊंट चांगला देतात.

किंवा रिलायन्स डिजिटल वगैरे शोरूम्स मधे क्रेडिट कार्डवर सहा महिन्याच्या हप्त्यावर वस्तूघेता येतात, इंटरेस्ट शून्य असतो (असे ते लोक म्हणतात) त्याचीपण माहिती करून घेतलीस तर ते सोयीचे पडेल का बघता येइल.

असो, त्यानंतर विंचवाचे बिर्‍हाड ठेवल्याने सध्यादेखील माझ्याकडे फारसे फर्निचर नाहीये.

तरी तुला ही माहिती कदाचित उपयोगी पडेल.

१. स्टीलचे कपाट: गोदरेज ब्रांडचे कपाट खूप महाग पडते. त्यापेक्षा दुसर्‍या चांगल्या ब्रँडचे कपाट घेतल्यास ते स्वस्त पडते आणि चांगले टिकते. आईकडे दुसरे कपाट "कृष्णा"चे घेतले होते आणि अजून सुस्थितीमधे आहे (बारा वर्षे), माझ्याकडे स्टीलचे कपाट "विजय्"चे आहे आणि अजून चांगलेच आहे (तीन वर्षे) त्यामुळे तूदेखील दुकानदाराला विचारून असे कपाट घेऊ शकतेस. कपाट घेताना त्यामधे मोठेमोठे कप्पे असलेले बघून घे. शिवाय लॉकरचा साईझपण एक सलग कप्पा असलेला बघून घे.

२. टेबल: डायनिंग टेबल घेण्यापेक्षा सुताराकडूनच एक छोटे टेबल बनवून घे. लॅपटॉप, अभ्यास अथवा जेवताना त्याचा वापर करता येइल. सोबत प्लास्टिकच्या खुर्च्या घेतल्या की बास. नंतर जेव्हा तुझे बजेट होइल तेव्हा जरी डायनिंग टेबल घेतलास, तरी हा टेबल वापरता येइल. सध्या माझ्याकडे माझ्या वडलानी बनवलेला स्टडी टेबल आहे. त्यावरच मी टीव्ही ठेवलाय आणि तिथेच लॅपटॉप ठेवून टाईप करतेय. Proud

३. किचन: माझ्याकडे किचनचे कुठलेच फर्निचर नाही. तरीपण बजेट नसेल तर आताच स्वस्तातल्या ट्रॉली करण्यापेक्षा थोडे दिवस थांबून केल्यास तर उत्तम. तवर भांडी ठेवण्यासाठी ओट्याखाली एक दोन चांगले प्लायवूड मारून घे. मी सध्या डबे जमिनीवर ठेवलेत. मस्तपैकी रचून. ते डबे घेण्यासाठी-ठेवण्यासाठी जेवढं वाकावं लागतं तेवढ्यात माझा व्यायाम होऊन जातो. Happy अर्थात, तुला जेव्हा सवड होइल तेव्हा किचन कपाट करून घे. सध्या डबे ठेवायची जागा हवीच असल्यास स्टीलचे रॅक मिळतात. त्यामधे भांडी अडकवायला पण जागा असते. ते घेण्याचा विचार जरूर कर.

४. बेड: वरती सजेशन दिल्याप्रमाणे बॉक्स गाद्या बनवून घे. नंतर बेड बनवून घेशील तेव्हा या गाद्या तिथे वपरता येतील किंवा नविन बनवून घेता येइल.

५. इतर: याशिवाय एक-दोन कोठ्या जरूर घे. त्यामधे नको असलेली भांडी/कपडे/पुस्तके/धान्य असं सर्व साठवून ठेवता येतं. या कोठ्या ठेवून त्यावर चांगले कव्हर घातलेस की अजून एक छान टेबल टॉप सारखी जागा मिळते. मोबाईल चार्जिंग, अथवा मेकप सामान इत्यादि ठेवण्यासाठी बेस्ट. Happy
एक स्टूल बनवून घे. टीव्हीसमोर बसून जेवताना ताट ठेवायला/बेडच्या बाजूला मोबाईल, घड्याळ इत्यादि ठेवायला/मिक्सर ठेवायला अशा अनेक उपयोग करता येतात, शिवाय अगदीच कोण पाहुणे आले की पटकन टीपॉयसारखा पण वापरता येतो. Happy
प्लास्टिकच्या खुर्च्या सरळ सहा घे, एकात एक ठेवून जागा वाचते. कुणी आलं तर बसायला होतात, शिवाय पावसाळ्यामधे फॅनखाली ठेवून कपडे सुकवता येतात. Happy

दक्षिणा , तुम्ही दिलेल्या माहितीवरून एका वर्षाने लोन घेऊन तुम्ही मनासारखं फर्निचर बनवून घ्याल असं कळतंय. त्यामुळे सध्या अगदी गरजेपरतं फर्निचर तुम्हाला हवं; तेही असं की विकायची/टाकायची गरज भासली तर फार हळहळ वाटू नये.
फर्निचरची बेसिक गरज : बसण्या/निजण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी.
बसण्या निजण्यासाठी, नीधप म्हणतात त्याप्रमाणे गाद्या-चटया, प्लास्टिकच्या खुर्च्या (एकावर एक राहतील अशा), डायनिंगसाठी पाडता येईल अशी भिंतीला अडकवलेली फळी किंवा छोटे टेबल (आकार घरातला माणसांच्या संख्येवर अवलंबून).
कपड्यांसाठी गोदरेज किंवा तत्सम कपाट.
किचनमध्ये सामान /भांडी ठेवण्यासाठी शेल्फ, स्टील रॅक ज्याला पुन्हा विकताना काही तरी मूल्य येईल.
लाकडाचे /प्लायचे वापरलेले फर्निचर विकायला गेलात तर विकत घेणारा आपल्यावर कधी फिटणार नाहीत असे उपकार करतोय याची खात्री पटते.
शूरॅक इ. बांबूच्या घेता येतील.

मंजूने दिलेल्या लिंक मधील ट्रॉलीसाठी गाठावी भवानीपेठ.. भवानी मातामंदीराच्या पुढची उजवी कडची गल्ली... तिथे ह्याच प्रकारच्या वस्तूंची बरीच दुकानं आहेत.

मी आत्ता अत्यंत गरजेच्या, म्हणजे ज्यांच्याशिवाय अगदीच अडेल अशाच वस्तू घेणार आहे. उदा. गॅस, फ्रिज, वॉशिंग मशिन, किचन ट्रॉलिज, किचनमधली भांडी.
कपडे ठेवायला सध्या माझ्याकडे गोदरेजसारखी तिजोरी आहे, त्यामुळे वॉर्डरोबसुद्धा मी पुढे ढकलून दिलाय. अगदीच बसला तर एखादा टिव्ही घेईन अन्यथा तो ही नाही, पहिल्यापासून जमिनीवर झोपायची सवय असल्याने, नीधप च्या म्हणण्याप्रमाणे अगदीच कोणी पाहुणे आले तर त्यांची गैरसोय होऊ नये व हॉल मध्ये बसण्यासाठी काही असावे म्हणून भाबै करेन.

तुम्हा सगळ्यांचे खूप आभार.. अजून आयडीयाज येतीलच.. पण या सुद्धा खूप उपयुक्त आहेत.

नंदिनी तुझा ५ वा मुद्दा जाम म्हणजे जाम आवडला. Happy

मी पण वाचते आहे उपयोगी होईल. कोरम मॉल ला नक्की कसे जायाचे ते ही लिहा. मला पण एक सोफा कम बेड व एक क्वीन बेड व इतर चिल्लर फर्निचर घ्यायचे आहेच. दक्षे तू तर सेकंड हँड फर्निचरचा का नाही विचार करत. ते फारच स्वस्तात पडेल. मग सावकाश एकेक रूम नवी कर. टीवी घेऊ नको.
मोठा मॉनिटर किंवा लेनोवो चा पीसी असेल तर त्यालाच टीवी कार्ड घालून बघता येइल. सर्व जिंजर हॉटेल्स मध्ये मॉनिटरच भिंतीला लावलेले असतात.

अल्युमिनिईअम किंवा कसले तरी चकाकते ताटाळे एक मिळते त्यात सर्व भांडी बसवून ते किचनात लावता येइल. अवेलेबल फंडसचा एक वॉटर फिल्टर घे. तुझी तब्येत नीट राहील. गॅस नको असेलतर इंडक्षन कुकिन्ग सिस्टिम.

कोरम मॉल ठाण्यातला का?

कॅडबरीच्या सिग्नलच्या आधी आहे. तीन हात नाक्यावरून हायवे पकडून सरळ कल्याणच्या दिशेने जायचं, एक सिग्नल पार केल्यावर डावीकडे दिसेलच.

अमा, रेडिमेड फर्निचर नको घेऊस. पैसे पाण्यात जातील. सरळ कस्टमाईझ्ड बनवून घे. तुला हवं तर खात्रीचा सुतार सांगेन.

हल्ली रॉट आयर्नचे फर्निचर सर्रास मिळते सगळीकडे. चांगले टिकते.

बोरिवलीला साखळकर फर्निचर्स म्हणुन शो रुम आहे नॅशनल पार्कच्या बाजुच्या रस्त्याने आत आल्यावर. कस्टमाईज्ड फर्निचर पण करुन देतात. घरपोच पाठवतात फर्निचर अगदी पुण्यालासुद्धा. तेव्हा त्याचीही चिंता नाही.

दक्षे, संपदाला फोन कर ती देइल नंबर त्यांचा.

अभिनंदन दक्षे!!!
मस्तपैकी भारतीय बैठक कर! थोडक्यात काम होईल! दोन खुर्च्या पण ठेव हॉलमध्ये.

दक्षे, मगाशी फोनवर सांगितलं ना तुला ती माझ्या घरातले प्लास्टिक ड्रॉवर्सचे हे युनिट.
१८ इंच * १५ इंच * २५.५ इंच (+२ इंच व्हील्सची उंची) अशी डायमेन्शन्स आहेत. छान ग्रे कलर आहे जो ३ वर्षांनंतरही तसाच्या तसा टिकलाय. ते ब्राऊन डाग आहेत ते शिफ्टिंगच्या वेळच्या न निघणार्‍या चिकटपट्ट्यांचे आहेत.
pl-dr-2.jpg

खालचे दोन्ही ड्रॉवर्स ६ इंच उंचीचे आणि वरचे दोन ४ इंचाचे. हे तू खालीवर करू शकतेस कारण अक्षरश: प्रत्येक भाग वेगळा होतो. वेगळा करता येतो त्यामुळे अक्षरशः सिंकमधे प्लास्टिकची भांडी घासल्यासारखं सगळं घासून पुसून काढता येतं. वर्षातून दोन वेळा केलं तरी भागतं.
हा माझा कडधान्यांचा ड्रॉवर. सर्व कडधान्ये अर्धा किलो मावतील असे डबे आहेत.
pl-dr-3.jpg

माझ्याकडे अशी ४ युनिटस आहेत. ज्यातलं एक माझ्या ऑफिसमधे आहे आणि बाकी तीन्ही किचनमधे. एक ओट्याखाली आणि दोन एकावर एक ठेवली आहेत.
pl-dr-1.jpg

या तीन ड्रॉवर्समधे मिळून माझं किचनमधलं डाळी, मसाले, मिसळणाचा डबा, चहा, साखर, कॉफी, मीठ प्लास्टिकच्या पिशव्या, फडकी, काही बेसिक कॉमन औषधे, कडधान्ये, लोणची-चटण्या, फ्रीजमधे न ठेवण्याचा सुकामेवा, गोळ्या-चॉकलेटं, बारके खाऊ, काडेपेटी-मेणबत्त्या-अ‍ॅल्यु फॉइल-टिश्यूपेपर व तत्सम, सूप वा सॅलडची नेहमी न लागणारी बोल्स, जास्तीचे चमचे-फोर्क्स व तत्सम आणि बरंच काय काय बारिकसारिक मावलंय.... Happy

भांडीकुंडी, डाळ, तांदूळ, कणिक व तत्समसाठी वेगळी सोय आहे.

१५०० ला एक युनिट. एप्रिल २००८ मधे घेतलंय. पार्ल्यात घेतलं. हे कंपनी प्रॉडक्ट आहे. दुकानदाराचं स्वतःचं नाही. पण दुर्दैवाने ते दुकान आता बंद झालंय त्यामुळे मला इतर कुठे मिळेल ते शोधता येणं मुश्कील आहे.

पण फोटो बघितलायस ना आता. त्याप्रमाणे चौकशी करता येईल फर्निचरच्या दुकानांमधे. जिथे निलकमलची प्लास्टिक कपाटं मिळतात त्या दुकानांच्यात ह्याबद्दलही माहिती असणार.
यातच एरियावाइज मोठा साइझ आणि तीन ड्रॉवर्स किंवा सहा ड्रॉवर्स अशी पण युनिटस होती त्याच्याकडे.
मी ग्रे कलर घेतला. ग्रे सोडून अजून डार्क ब्राऊन कलर पण आहे. एकदम डार्क चॉकलेटसारखा होता.

Pages