घरातील बेसिक फर्निचर

Submitted by दक्षिणा on 11 October, 2011 - 04:25

नविन घरात फर्निचर मध्ये अत्यंत गरजेचं काय काय असावं याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. माझ्याकडे घरातल्या सामानापैकी काहीही नाही हे गृहित धरून सांगावे.
शिवाय तुमच्यापैकी कोणालाही स्वस्तात टिकाऊ फर्निचर मिळण्याची ठिकाणं, बनवून देणारे लोक माहीत असतील तर ते ही इथे सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी.. त्या चिकटपट्टीच्या डागांवर थोडेसे टर्पेन लावून बघ. जातील... फक्त आधी ट्राय कर आणि मग सगळीकडे लाव.

हो रे ते टर्पेन आणायचेय कधीचे. गेले वर्षभर शिफ्टींगच करत होते ना. त्यामुळे ३ थर चढलेत. Sad
आता आणेन आणि काढेन ते डाग.

ह्म्म..
असे लोखंडी बघितले आहेत बरेच ठिकाणी..
पण ते फारच बोर वाटले मला
प्लॅस्टीक किंवा लाकडी बघेन मिळाले तर...

हे प्लास्टिकचे सगळ्यात उत्तम. एकदम हलके आहेत वजनाला. सामानासकट अतिशय सहजपणे हलवता येतात. हे सर्व बाजूंनी बंद आहेत त्यामुळे धूळ तशी कमी जाते आत.

टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. >> मी फर्निचरबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही पण जर अजून कर्ज घ्यायची तयारी असेल तर फर्निचरसाठी कर्ज मिळू शकेल. बर्‍याचश्या सहकारी बँका फर्निचरसाठी कर्ज देतात. टॉप अप लोनवरती इन्कम टॅक्सची वजावट मिळत नाही त्यामुळं त्यासाठी १ वर्ष वाट न बघता असं सहकारी बँकेकडून कर्ज जर मिळत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही.

दक्षे अग घरी कोण कोण येणारे? आणि रहाणारे?

कारण एकटीच असलीस तर हॉलमध्ये भाबै एका बाजूला आणि सतरंज्या/टांगलेला झोपाळा वै. दुसर्‍या बाजूला असे चालते.

गॅसची शेगडी गॅस सिलिंडर/नळ गॅसवाल्याकडून घेऊ नकोस.. महाग पडते.

रुमी असेल तर हल्ली फोल्डींचे सोफा/बेड मिळतात.. एका किंवा दोन माणसांसाठी तेही विचारात घेऊ शकतेस. गरज नसताना फोल्ड करून सोफ्यासारखे वापरता येते(साधारण ४००० वै होते.. पुन्हा तेरा तू मेरा मैं पैसे भरणे होते) पण यात स्टोरेज नसते.. सो स्टोरेज हवे तर व्रॉट आयर्नचा डबलबेड बघ.. तो असाही १०००० च्या आसपास पडतोच.

किचनची भांडी उगाच आधी विकत घेऊ नकोस.. आई-ताईच्या संसारातले "ज्यादा" सामान उचल आधी. Wink निदान मी तरी तसेच केले होते. उगाच डबल होते. किचन ट्रॉलीज आवश्यक आहेत का बघ. मी वर्षभर सगळं ओट्याखाली मांडून ठेवले होते. एक मोठा खोका आणून त्यात कडधान्यांच्या एक किलोच्या पिशव्या ओळीने मांडून ठेवायच्या.. गरज असेल तेंव्हा तेवढे काढून पुन्हा ठेवणे हा जरा उद्योग होतो. पीठ, डाळ आणि तांदुळासाठी डीमार्टमधून ५ किलोचे प्लास्टीकचे डब्बे घेऊन ठेव (साधारण ११० ते २०० च्या मध्ये) पाण्यासाठी माठ घेऊन ठेव. बजेटमध्ये जागा झाली की पाणीशुद्धीकरण उपकरण घेऊन टाक.

फ्रिज, वॉम तुला स्टँडर्ड भावात मिळेल.. त्याच्या पॅकेज ऑफर्स दिवाळीत येतील्..म्हणजे.. १ फ्रिज + वॉशिन्ग मशिन इतके रुपये, वै. हे पण छोट्या दुकानात घेतलेस तर स्वस्त पडेल.. पण डिल्स सगळी कडे बघ नि मग ठरव.

पडदे मी तर डिमार्ट मधून घेतले होते .. २०० - ४५० रु. एक पडदा.. पुन्हा वॉशिन्ग मशिनेबल.

अभिनंदन! Happy

प्लास्टिकचे ड्रावर आवडले फार वर्सेटाइल वाटत आहेत. त्यावर फळाफुलांची चित्रे चिकटवली तरीही मस्त दिसेल. पुन्नी लहान असताना मी लावली होती अशी. आपण स्वयंपाक करताना मुले पायात पायात करतात तेव्हा त्यांना ते ए फॉर अ‍ॅपल वगैरे शिकिवता येते. नाहीतर आवड्ती कार्टून कॅरेक्टर्स. मी सिंप्सन फेमिलीचे चित्र बनवून नव्या घरात कुठेतरी लावणार आहे. डीमार्ट जानाही पडेगा.

पाण्यासाठी माठ घेऊन ठेव. बजेटमध्ये जागा झाली की पाणीशुद्धीकरण उपकरण घेऊन टाक >> पाणीशुद्धीकरणासाठी टाटा स्वच्छ उत्तम आणि किफयतशिर ! (जर घरात कमी माणस असतील तर)
मझ्याजवळ आहे .. १ वर्ष वापरतोय. १ बल्ब सधारण ६ महिने चालतो ...

हे पहा : http://www.tataswach.com/KnowTataSwach.aspx

मी नविन गावात शिफ्ट जालेले तेव्हा अलमोस्ट सेम परिस्थिति होती

मी ५ बसिक कापसाच्या गाद्या घेतल्या... २ हॉल मध्ये एकावर एक टाकून....मागे ३/४ छोट्या उश्या (१ गादी ४०० रुपये प्रमाणे ) , उरलेल्या ३ गाद्या बेडरूम मध्ये.
बेड्शीत्स आणि पांघरायला ब्लान्केत्स, एक प्लास्टिक चा छोटा स्टूल.
पडदे साधे जाडे भरडे cotton चे - नी त्यालाच मांजरपाट म्हणत असावी पर्त्येक रूम साठी
कित्चेन मध्ये Gas ....
भांडी कुंडी आई आणि सासू बाई नि खूप पाठवली म्हणून तो एक खर्च टळला होता .
वाशिंग मशीन, फ्रीज, एक बेसिक टेबल आणि computer वर लई वेळ जातो म्हणून त्याची खुर्ची
आणि कित्चेन मध्ये २ stand ..... नी ने फोटोत दाखवले त्या टाईप चे पण बंद द्रोवर नाही...त्यात कित्चेन मधले छोटे डबे, चहा साखर आणि असे बरेच काय काय मावले, एक stand कांदे, बटाटे, पुडकी नि काय काय असे वापरले.

ह्यात मी बरेच दिवस सहज काढले खूप काही त्रास झाला नाही

avani1405, नीच्या घरासारखी युनिट्स तुला पुण्यात 'नीलम' नावाचं एक भांड्यांचं (बर्‍यापैकी फेमस) दुकान आहे, तिथे मिळतील. (नाही सापडलं तर विचार इथे, मी रिसिट शोधून सांगते.) त्यांच्याकडचं सगळंच सामान, विशेषतः प्लास्टिक खूप म्हणजे खूप छान: दणकट्+टिकाऊ असतं, असा आमचा अनुभव आहे.
मागल्या वर्षी आम्ही तिथून जवळ जवळ २५,००० ची फक्त किचनमधील वस्तूंची (स्टील+प्लास्टिक) खरेदी केली होती. अशा एकत्र खरेदीने डिस्काऊंट पण तिथे चांगला मिळतो. शिवाय एक स्वतंत्र सेलस्मन तुम्हाला अटेंड करायला देतात ते. फक्त घेताना आपल्या घराचा विचार करून घे, डीझाईनच्या मोहात न पडता. Happy

नंदिनीची पोस्ट खूपच छान. दक्षिणा जमलं तर तुझं घर लावून झाल्यावर अशा छान छान पोस्टांची मिळून एक 'समरीची माहिती पोस्ट' टाक माबोवर. बर्‍याच लोकांना कामास येईल नंतर. Happy

नंदीनीच्या ५व्या मुद्द्यासारखंच आम्ही पण केलंय. फक्त कोठीऐवजी अल्युमिनियुमच्या (किंवा हिंडालियमच्या) आडव्या पेट्या घेतल्यात. त्यात नको असलेले(एरवी कमी लागणारे) सामान ठेवले, त्यामुळे त्या बर्‍यापैकी जड आहेत. आणि हॉलच्या भारतीय बैठकीबरोबर एका भिंतीच्या कडेस एकास-एक लावून त्यावर जाडसर गोढडी/सतरंजीसदृष्य बसकण टाकलीत. आता भाबै आणि हा नविन बसण्याचा बाक-कम-सिटिंग(?)वर सारख्या चादरी टाकल्या की झाले - छान दिसतोय हॉल!

त्याचा महत्वाचा फायदा हा झाला की आजी-आजोबा लोकांना अगदीच वर पण नाही आणि कंप्लेन करावी इतकी खाली पण नाही, अशी सिटिंग अरेंजमेन्ट झाली. Happy लहान मुलांमध्ये पण टोटल हिट्ट आहे तो प्रकार. उड्या मारायला सोप्या पडतात आणि आई-बाबा पण निवांत असतात.

नंतर सोफा आल्यावर त्या पेट्या माळ्यावर ठेवता येतात.

नीधपचे पडदे आणि गाद्यांची आयडिया खरंच छान आहे. पण माझ्याबाबतीत आता थोडा उशीर झालाय. Sad आमचे पडदे असले दणकट(दर्जा आणि किंमतीसकट) घेतले गेलेत की बदलायची हिंमत पुढचे ८-१० वर्षे काही होत नाही माझी. Sad
आणि गाद्या फोमच्या घेतल्यात - त्यांची पण सेम केस: वापरायला खूपच चांगल्या आहेत. पण काहीही म्हणा. कापसाच्या गाद्या नव्याने भरून घेण्याची मजा औरच असते (असं आताशा वाटतंय :अओ:).

नंदीनीच्या ५व्या मुद्द्यासारखंच आम्ही पण केलंय. फक्त कोठीऐवजी अल्युमिनियुमच्या (किंवा हिंडालियमच्या) आडव्या पेट्या >>>
लग्नानंतर पहिलं दीड वर्षं आमच्याकडेही असल्या २ पेट्या (जरा ब्राईट कलरच्या चादरीनं झाकलेल्या) आणि २ नायलॉन पट्ट्यांच्या खुर्च्या एवढंच फर्निचर होतं.

किचनची भांडी उगाच आधी विकत घेऊ नकोस.. आई-ताईच्या संसारातले "ज्यादा" सामान उचल आधी. डोळा मारा निदान मी तरी तसेच केले होते. >>> अगदी अगदी. त्यांच्या स्टीलचा दर्जा पण बर्‍याचदा चांगला असतो.

फोल्डींचे सोफा/बेड बाबत, माझा वैयक्तिक अनुभव अजिबात चांगला नाहिये. एक तर घेतल्यानंतर त्यात काही प्रॉब्लेम निघाला तर करण्यासारखं काही नसतं आणि स्टोरेजसकट घेतलंस तर रोजची साफ-सफाई करायला त्रास होतो. शिवाय रिसेलला/शिफ्टिंगला बराच त्रास पडतो किंवा जास्त भाव येतच नाही. नंतर नुसता सोफा म्हणून वापरला तरी अडगळ ठेवायलाच त्या स्टोरेजचा उपयोग होतो - ते निस्तरणं मला खूप त्रासदायक वाटते - ऑफकोर्स प्रत्येकाचा चॉईस वेगळा असतो.

माझ्याकडे एक लाकडी पेटारा आहे ज्यात आख्खी मी + थोडं सामान मावेल. Happy
दिवसा ऑफिस रात्री घर असं होतं आमचं तेव्हा त्यात आमची पातळशी डबल गादी, बेडिंग सगळं गुंडाळून ठेवायचो. आता एक्स्ट्रॉच्या चादरी, गाद्या, उश्या त्यात आहेत. आणि अक्षरशः मिळेल ते. परत वरती बसता येतं.
यालाही चाकं आहेत त्यामुळे घरात मी हवं तिथे फिरवू शकते. हॉलची रचना पाहिजे तशी फिरवता आली पाहिजे दर ४-५ महिन्यांनी तरी तर जरा फ्रेश वाटतं.. Happy

हायला पोस्टींचा पाऊस पाडलाय लोकांनी. Happy

सगळ्यांची सजेशन्स आवडली.
नी तु माझ्यासाठी ड्रॉवर्सचा फोटो ताबडतोबीने टाकल्याबद्दल अनेक आभार. हे ड्रॉवर फिक्स... असलं एक युनिट आणि आपण निलकमल चं जे बंद कपाट पाहिलं ते पण Happy कारण हे युनिट बसेल इतकीच जागा आहे माझ्या किचनात. Happy

जाजु - आधी सगळी इतरांच्या संसारातली 'ज्यादा' भांडीच उचलणार आहे. Wink Proud त्यासाठी मैत्रिणीच्या आईकडे आधीच वर्णी लावून ठेवली आहे. त्यात पाण्याचे पिंप फिक्स आहे. बाकी त्या घेऊन देते म्हणाल्यात. मी अ‍ॅक्च्यूली विचारात होते की स्टिलच्या पिंपाऐवजी जे वॉटरफिल्टरचं युनिट असेल तेव्हढंच वापरायचं प्यायच्या पाण्यासाठी, उगिच जागा अडणार नाही म्हणजे.

धारा - नी ने टाकलेली युनिट्स नीलम मध्ये मिळतील? पुण्यातच आहे ना ते दुकान? मला प्लिज इथे पत्ता दे.

बाकी मनिमाऊ/नाखु - मी राजस्थानी सुतार बोलावून च बाकी फर्निचर करीन फक्त टॉपअप लोन मिळाल्यावर.

मनिष - तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतर बँकात चौकशी करून पाहते. Happy

स्टिलच्या पिंपाऐवजी जे वॉटरफिल्टरचं युनिट असेल तेव्हढंच वापरायचं प्यायच्या पाण्यासाठी, उगिच जागा अडणार नाही म्हणजे. <<<
येस्स. प्युरिटचा माझा अनुभव उत्तम आहे. त्यांचं एक नळाला अ‍ॅटॅच करण्याचं पण युनिट आहे जेणेकरून पाणी भरत बसायची भानगड नाही. पाणी गेल्यास मॅन्युअली पण टाकता येतेच पाणी त्यात. विजेचा संबंध नाही. साधारण सहा महिन्याने एकदा मला सगळा बॅटरी आणि इतर किट बदलावा लागतो. एकट्या माणसाला अजून जास्त महिने जाईल हा किट.

नीलमचा पत्ता:

http://maps.google.co.in/maps/place?oe=utf-8&rls=org.mozilla:en-US:offic...

जमलं तर वीकडेला जा, फोन करून आणि सकाळी ११ च्या आसपास : गर्दी नसेल आणि निवांत विचार करून खरेदी करता येईल. मी अशा गर्दीच्या ठिकाणी शनीवार-रविवारी गेले, की भंजाळून जाते, म्हणून सांगतेय.

आम्ही तसे युनिट्स त्यांच्याकडे २०१०च्या डिसेंबरमध्ये पाहिले होते. घ्यायचे की नाही यावर बराच खल केला होता तेव्हा, त्यामुळे नक्की आठवतंय. अगदी तसेच नाही पण थोडे साईजला मागे-पुढे पण पॅटर्न तसाच, असे मिळतील तिथे. जमले तर तुझ्या किचनच्या मोकळ्या जागांची मापं घेऊन जा सोबत, मग एक्झॅक्ट मापाचे पण घेता येतील.

आणि हो. पुन्हा सांगते: तिथे प्रत्येकच बाबतीत डिझाईन्स खूप छान छान असतात कधी कधी, पण त्यांच्या खूप मोहात पडू नकोस. या युनिट्सबाबतीत नीचे आहेत तसे साधे प्लेन घे. घासून-पुसून घ्यायला सोपे पडतात. डिझाईनवाले नंतर घासणं म्हणजे वेळ तर जातोच, पण थोडी थोडी पडझडीने म्हण की कशाने, धूळ/बारीक पीठं/तूप-तेलाचे थेंब/शिंतोडे पडतातच त्यावर. मग ते पाहिले की रोजची उगाच चिडचिड वाढते.

क्रोम मध्ये चक्कर मारताना तिथे एक सोफा कम बेड मी पाहिला. केवळ ९००० रू. कदाचित तुझ्या दोन्ही सोयी (कोणी आले तर बसायला व झोपायला) भागू शकतील.

मला एक सांगा, हे जे टाटा किंवा प्युरिटचं वॉटर फिल्टरचं युनिट असतं त्यासाठी नळाला वेगळं कनेक्शन वगैरे लागतं का? आम्ही दर वर्षी घर आणि गावं बदलत फिरतोय (सध्यातरी) त्यामुळे दरवेळेला याचं फिटिन्ग करवून घ्यावं लागेल का?

हे जे टाटा किंवा प्युरिटचं वॉटर फिल्टरचं युनिट असतं त्यासाठी नळाला वेगळं कनेक्शन वगैरे लागतं का? >>> नाही. पुण्याला माझ्या सासरी टाटा-स्वच्छ वापरतात. संपूर्ण पोर्टेबल युनिट आहे ते.
(बाकी, इथे हळूहळू 'स्वयंपाकघरातील भांडी आणि उपकरणे'ची चर्चा सुरू झालीय :फिदी:)

केदार, क्रोम का क्रोमा? कुठे आहे पुणे की ठाणे?

मी पण काल हेच लिहीणार होते कि माझ्या एक्स फौजी मैत्रीणीने त्यांच्या मोठ्या पेट्यांवर गोधड्या टाकून मस्त सीटिन्ग अरेंजमेंट केले होते. शिवाय माझ्याकडे पडद्याचे कापड आहे चांगल्या प्रतीचे. तू साइजेस दिलेस तर मी ते त्याप्रकारे आल्टर करून तुला कार्टन मधून कुरीअर करू शकेन. एक व्हायोलेट शेडचे आहे व दुसरे पिंकिश व्हाइट.

काय सामान सामान करता राव. सब मिथ्या है.
दक्षिणा- सल्ले सगळ्यांनीच छान दिलेत. त्यामुळे मी फक्त गंमत सांगते.

आमचं लग्न झाल्यानंतर (जपानात) सेकंडहँड डायनिंग टेबलावर मायक्रोव्हेव ठेवावा लागायचा. तेव्हा लोकांना जेवायला बोलावले तर मायक्रोवेव्ह आत झोपायच्या खोलीत ठेवावा लागला खाली. त्याच्याच बाजूला खाली ठेवलेला फुतॉन (गादी). खोलीतली टीचभर जागा समाप्त. Proud
काहीही अन्नं गरम करायचं तर होस्टीणबाई सारख्या झोपायच्या खोलीत. पाहुण्यांना तो विनोद बरीच वर्षे पुरला.

मोजून दहा डबे आणि हाताच्या बोटावर मोजता येणारी भांडी आणि एक कुकर हे नवर्‍याच्या मते पुरेसे सामान होते. आणि सगळे सामान आहे आपल्याकडे या वायद्यावर गेलेल्या मला सोडुन जाणार्‍या लोकांच्या बरण्याडब्याइडलीपात्रलाटण्यांवर टपुन बसावे लागायचे. Lol

रैना, माझी सध्या अगदी अश्शीच परिस्थिती आहे किंबहुना त्याहूनही वाईट म्हटलंस तर चालेल. त्यामुळे मला असं वाटतं कशाला ढीगभर भांडी हवीयेत, माझा संसार २ पातेल्यांमधे होतो. Proud

बाकी, इथे हळूहळू 'स्वयंपाकघरातील भांडी आणि उपकरणे'ची चर्चा सुरू झालीय>>>>>>>> Lol

अय्या मी पण अगदी भात शिजविलेल्या भांड्यातच खाते. आमच्या नंदेक्डे साधे अर्धा ग्लास पाणी नैतर चहा प्यायचा तरी तो ट्रे, मग त्यात ग्लासेस, मग साखरेचे भांडे चमचे अन काय काय.

मला इथे एक क्रांतिकारी कल्पना लिहायची आहे. घराचे ट्रेडिशनल भाग न पाडता खालील प्रमाणे विचार करावा.

1) food zone: cooking, storage of dry ration veggies and milk, drinking water, utensils and cleaning of it.
2) comfort zone: sleeping arrangements( futon, single mattress or bed whatever) Ac is better but lets leave it for now.
3) Tech zone: for our tech needs. chargers, laptop( one per person?) ipod charger and dock. printer/ scanner net connection router etc.
4) Emotions zone: Deo ghar or photos of your loved ones, little box containing your favourite emotional items ( I have my father's gol black topi, mothers glasses a cross from a chennai church, and a complete mandir)
5) Utilities space: washing machine, clothes hanger, a box containing things like screw driver, hammer, tapes nails and such.
6) Personal utilities space: clothes cupboard, makeup mirror , shoes cabinet space to keep your bag/ purse umbrella odhni etc.
7) dog space: complete house hahahaha. ( speaking only for myself.)

We can divide the living space into various zones instead of traditional rooms set up.
have fun.

बाकी, इथे हळूहळू 'स्वयंपाकघरातील भांडी आणि उपकरणे'ची चर्चा सुरू झालीय >> त्याची पण गरज आहेच, चर्चा सुरू झाली ते उत्तमच.

Pages