घरातील बेसिक फर्निचर

Submitted by दक्षिणा on 11 October, 2011 - 04:25

नविन घरात फर्निचर मध्ये अत्यंत गरजेचं काय काय असावं याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. माझ्याकडे घरातल्या सामानापैकी काहीही नाही हे गृहित धरून सांगावे.
शिवाय तुमच्यापैकी कोणालाही स्वस्तात टिकाऊ फर्निचर मिळण्याची ठिकाणं, बनवून देणारे लोक माहीत असतील तर ते ही इथे सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉलमधे सफेद रंगाच्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या घेतल्यास तर नंतर सोफा वगैरे आल्यावर बाल्कनीत वापरता येतील. किंवा एकात्-एक घालुन ठेवल्यावर जास्तीचे पाहुने आल्यावर वापरता येतात.

हॉल साठी - एक छोटे टेबल, ४ खुर्च्या, ह्याच खुर्च्या डायनिंग टेबलसाठी पण वापरता येतील, एक टीव्ही युनीट,
डायनिंग - एक मध्यम आकाराचे टेबल,
बेडरुम - एक डबल डोअर वॉर्डरोब शक्यतो आरश्या सहीत म्हणजे वेगळे ड्रेसिंगटेबल लागणार नाही.. आणि एक डबलबेड,

आजच्या सकाळ बरोबर आपल्या एरियात एक पॅम्प्लेट आहे आहे फेस्टीव्ह ऑफरचे.. त्यात बर्‍याच गोष्टी आहेत त्या बघ..

सोफा घेशील ना तर कमबेड मध्ये हल्ली खुप व्हरायटीज आल्यात मार्केटात. उत्तम पर्याय आहे तो. अन टी पॉय बनवून घेऊ शकतेस. राऊंड शेपच्या टी-पॉय ला मध्ये जो पिलर असतो, त्याच्या चार खाचांमध्ये बसणारे छोटे स्टूल हा पर्याय दिसायला तर छान आहेच पण जागासुद्धा कमी लागते.

दक्शे लिव्हींग रुम मध्ये सरळ ६x६ ची फोम/कापुस box गादी बनवुन घे... भारतिय बैठक म्हणुन वापरता येइल / नंतर बेड्मध्येही टाकता येईल.
जमल्यास रुम ले-आउट मेल कर ... आणखी डीटेल्स देता येतील

सरळ भारतीय बैठक कर हॉलमधे. ६ इंचाच्या २ बॉक्स गाद्या एकावर एक टाकल्यास की मस्त बैठक होईल. हव्या त्या साइझमधे गादीवाल्याकडून करून घे. उश्या, लोड, तक्के ठेव. कोणी रहायला आलं की झोपायला द्यायला पण होईल आणि एरवी बसायला. ब्राइट कलर्स मधे चादरी, कव्हरं इत्यादी ठेव मस्त दिसेल. बसल्यावर जिथे डोकं टेकतं तिथे चटईच्या (खरी चटई प्लॅस्टिकची नाही) पट्ट्या भिंतीवर ठोकून घे म्हणजे तेलाचे/ घामाचे डाग भिंतीवर नकोत.
खाली बसता येत नाही अश्या ज्ये नां साठी प्लास्टिकच्या/ फोल्डिंगच्या खुर्च्या
एखादी केनची आरामखुर्ची मावण्यासारखी असली तर.
टिव्ही साठी एक साधा स्टॅण्ड आणि एक टिपॉय सदृश काहीतरी.

सध्या गोदरेजमधे वॉर्डरोबसारखी कपाटं आलीयेत. दिसायला एकदम सुंदर. क्वालिटीचा प्रश्नच नाही. त्यातलं एखादं बघून ये. आणि ते घे. बेडच्या ऐवजी परत गाद्याच ठेव जमिनीवर. पण गाद्यांखाली चटया टाक.

डायनिंग टेबलाला जागा नसेल तर भिंतीवर प्लायचा फ्लॅप बसवून घे. हवा तेव्हा उघडून डायनिंग टेबल म्हणून वापरता येईल.

पडदे आधी पण एका ठिकाणी सांगितलं होतं तसे मांजरपाटाचे.

किचनसाठी नीलकमलची प्लॅस्टिकच्या ड्रॉवर्सची युनिटस मिळतात ती मस्त असतात.

सध्या एवढंच लक्षात आहे.

बेसिक फर्निचर मधे .....
हॉलमधे एक दिवाण ज्यात खाली स्टोरेज असेल, नंतर पुढे मागे सोफा घेतला तर दिवाण आतल्या खोलीत हालवता येऊ शकतो, टिव्ही, टेप वगैरे ठेवायला एक ट्रॉली,
किचनचा फ्रिक्वेन्ट वापर होणार असेल तर किचन ट्रॉलीज, (बरेचदा वाटतं, ट्रॉलीजची काय गरज आहे, ओट्याखाली कडप्पा टाकून घेतला तरी भांडी राहतात, पण ट्रॉलीजमधे बरेच वेळा लागणारी भांडी, रोजच्या वापरातली, कधीतरीच लागणारी भांडी अशी वर्गवारी करून नीट अ‍ॅरेंज करून ठेवता येतात.), इतर डबे बिबे ठेवायचं कपाट मस्ट.
बेडरूम मधे एक बेड ज्याला स्टोरेज असेल आणि ते ड्रॉवरच्या स्वरूपात असेल म्हणजे ते गाद्या उचलून वरून उघडून उशा पांघरूणं काढायचं झंझट राहत नाही.
कॉमन बेसिनच्या वर एक आरसा असलेलं छोटं कपाट
आणि बेडरूम मधे एक फुल साईज मिरर ज्यापुढे पूर्ण मागेपर्यंत जाऊन उभं राहता येईल अशी जागा हवी.

अगं बायांनो, हे सगळं आयुष्यात एकदाच केलं की पुन्हा म्हणून फर्निचरचं नाव काढायचं नाही, तरी त्यात मी पडदे लिहिले नाहियेत.. ते नंतर सवडीने किंवा सुरुवातीला बेडशीटच लावायची खिडक्यांना

.......

आयुष्यात एकदाच केलं की पुन्हा म्हणून फर्निचरचं नाव काढायचं नाही<<<
छे यात काय मजा मग.

पडदे मी लिहिलेत की. मांजरपाटाचे पडदे. सस्तेमे मस्ता. Happy

नी, म्हणजे तुझं म्हणणं की दक्षी ने दर ३-४ वर्षांनी हा बाफ मॉडिफाय करायचा? आधी बेसिक फर्निचर, मग बेसिकच्या थोडे अधिक फर्निचर, वगैरे वगैरे Proud

मंजे, तूच वाच जरा नीट दक्षीनं वर काय लिहिलंय ते -
सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे.

माहीतीसाठी धन्यवाद..
टोकुरिका धाग्याचं हेडींग नीट वाच गं जरा.. अत्यंत गरजेच्या वस्तू आणि कमी बजेट या दोन गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. जिथे जिथे कपात करणं शक्य असेल तिथे तिथे करणार आहे मी. पण जे आत्ता घेणार आहे त्याच्या क्वालिटीत काही कमी करणार नाही. कारण गॅस घेईन तर एकदाच, सारखा सारखा कोण घेणार आहे थोडंच? ते LCD/LED बहुतेक आत्ता घेता येणारच नाही मला. Sad

दक्षे म्हणूनच गाद्या करून घे. त्या स्वस्त पडतील आणि कंटाळा आला की रिसायकल करणे पण सोपे जाईल. मांजरपाटाचे पडदे स्वस्त पडतील आणि किमान चार-पाच वर्ष तरी उत्तम जातील.
कपाट मात्र एकदम चांगल्या क्वालिटीचे घे.
जरी हल्लीची स्टाइल असली प्लायच्या वॉर्डरोबची तरी मी त्याच्या विरूद्धच मत देईन. लाकडाचं कपाट असेल तर ठिके अन्यथा स्टीलच्या कपाटाचा ऑप्शन उत्तम.
http://www.godrejinterio.com/godrej/GodrejInterio/products.aspx?id=29&me...
इथे बघ. एकदम स्टायलिश दिसणारी स्टीलची कपाटे आहेत.

कट्ट्या खाली कप्पे नसतील तर ट्रॉलीज फारच गरजेच्या होतात..
मी आताच करुन घेतल्यात हवा असला तर तुला नंबर देइन..
तो मला तरि सगळ्यात स्वस्त आणि मस्त वाटला

दक्षु, अभिनंदन. शिफ्ट झालीस तर ! Happy

क्रोममधे सेल चालु आहे. upto ६६.६६% off. एक चक्कर टाकुन ये. मला तिथली क्वालिटी माहित नाही, पण येता जाताना दिसतं ते dispaly मधलं फर्निचर तरी चांगलं वाटलं. आत गेले नाही कधीही. कदाचित सेल असल्यामुळे बर्‍याच वस्तु तुझ्या बजेटला झेपतील. बाकी एकबोटे वगैरे आहेच, पण महाग आहे.

माझ्या सुताराचा नंबर घे - जेठाराम - ९८२२४४२०८०. याच्या वडिलांनी - जोगाराम - माझ्याकडे फर्निचर केलं होतं. आता ते राजस्थान गेले परत. सुपर्ब फिनिशिंग होतं. मी वॉर्डरोब मधे खालच्या शेल्फमधे चढुन वरचे शेल्फ अ‍ॅक्सेस केले आहेत. पण एकदम मजबुत. सहकारनगरला शो रुम आणि पिरंगुटला फॅक्टरी आहे यांची. बघ बोलुन. वडिलांबरोबर काम करुन जेठापण हुशार असावा. Happy त्याला तुझं बजेट आणि बेसिक requirement सांगितलीस तर तो तुला मदत करेल.

दक्षिणा,

नुकतच रेंज हिल्स (ई स्क्वेअर शि.न जवळ) ला "उत्सव" नावाचे प्रदर्शन पाहिले त्यात बर्‍याच वस्तु, फर्निचर इ.इ बर्‍याच चांगल्या भावात बर्‍यापैकी क्वालिटीच्या दिसल्या. मला वाटते आता दिवाळीच्या आधी परत बहुधा शिवाजी नगर/येरवडा इ. भागात परत लागेल. तसेच दिवाळीच्या सेल्स मधे तुला चांगल्या गृहोपयोगी वस्तु चांगल्या भावात मिळतील. थोडी वाट पहा. (आम्ही परत आल्यावर घाई घाईत अ‍ॅट होम मधे घेतले आणि पुढच्या आठवड्यात तिथेच सेल सुरु झाला..)

अवनी तु किती ट्रॉल्या बनवल्यास? किती खर्च आला?
माझं किचन अगदीच छोटं आहे त्यामुळे फारतर ३ ट्रॉल्या होतील Proud
बाकी इकडे तिकडे कपाटंच कपाटं करावी लागणार आहेत, पण ती आत्ता नाहीच.

मंजे : इथे गरगर डोकं फिरणारी बाहुली टाकता येत नाही मह्णून.. Proud

Pages