Submitted by दक्षिणा on 11 October, 2011 - 04:25
नविन घरात फर्निचर मध्ये अत्यंत गरजेचं काय काय असावं याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. सध्या माझं बजेट अजिबात नाहीये त्यामुळे फार कमी पैशात हे सगळं बेसिक बसवायचं आहे. टॉप अप लोन हे नविन घरात रहायला गेल्यानंतर वर्षभराने मिळते त्यामुळे सध्या थोडक्यातच भागवावे लागणार आहे. माझ्याकडे घरातल्या सामानापैकी काहीही नाही हे गृहित धरून सांगावे.
शिवाय तुमच्यापैकी कोणालाही स्वस्तात टिकाऊ फर्निचर मिळण्याची ठिकाणं, बनवून देणारे लोक माहीत असतील तर ते ही इथे सांगा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस्स. प्युरिटचा माझा अनुभव
येस्स. प्युरिटचा माझा अनुभव उत्तम आहे. >>> आणि माझा नीरजातैंच्या घरचं 'डबल-फिल्टर्ड' पाणी पिण्याचा उत्तम अनुभव आहे.
हायला.. नीलम अ.ब. चौका जवळ
हायला.. नीलम अ.ब. चौका जवळ आहे ग्ग..
पण ते जाम महाग आहे.. नीलम च्या बाजुला दुसरं १ दुकान आहे तिकडे जा (याचं नाव लक्सात नाही).. ते स्वस्त आहे जरा असा माझा अनुभव.. आणि क्वालिटि त काही फरक नाही..
दुसरा स्वस्त पर्याय म्हण्जे रविवार पेठ गाठणे.. तिकडे स्टिल वजना वर मिळेल..
आणि काचेच्या बरण्यांची हौस असेल तर मंडई कडून रविवारा त जाताना डाव्या हाताला १ क्रोकरी च दुकान आहे तिक्डे होल्सेल च्या भावात सुंदर माल मिळ्तो..
नवा संसार थाटताना मी तिकडून च केलेली खरेदी.
@अश्विनीमामी : भारी लिहिलय.. आवडेश
अवनी, ते haus असं लिही.
अवनी, ते haus असं लिही.
अश्विनी : एडिट केलं .. धन्यू
अश्विनी : एडिट केलं .. धन्यू
प्लॅस्टीकच्या वस्तूंसाठी
प्लॅस्टीकच्या वस्तूंसाठी रविवार पेठेत चितालिया म्हणून दुकान आहे.... नीलम मध्ये मिळणार्या वस्तूंच्या किमतीपेक्षा ४०% किमतीत वस्तू मिळतील तिथे...
मामी क्रोमच. क्रोमा दुसरं
मामी क्रोमच. क्रोमा दुसरं आहे. पुण्यात हडपसरला बिग बझारच्या जवळ आहे.
मस्त आहे हा बाफ , आजच वाचला,
मस्त आहे हा बाफ , आजच वाचला, रैना आडो...अगदी मनातल बोललात.
माझ्या स्वयंपाक घरात अजुनही एक कुकिंग सेट ( एक मोठे पातेले, त्यात लागलेच तर २० लोकांची पाव भाजी सहज मावेल, एक साधारण ५/७ लोकांना पुरेल असे भांडे, २ चहाची पातेली , एक तवा एक पसरट भांडे आणि एक कढई आहे) आणि हो दोन कुकर एक मोठा आणि एक त्याचे पिल्लु. कुकींग सेट ८ वर्षामधे ३ वेळा बदलला. पण प्रत्येक वेळी भांडी तेवढिच, फक्त मुव्हींग मुळे बदलला.
जास्तिची भांडी म्हणजे ईडली चे स्टँड, चकली पात्र, आणि फुड प्रो ( हे मला तरी मस्टच आहे,) एक कॉफी ग्राईंडर , एक साधा ब्लेंडर .
काही चमचे.तुपा तेलाचे भांडे.
माझा अनुभव, मी तवा, कुकर आणि एक पसरट स्टिल चा पॅन इतकच वापरते. एकाच वेळी काही वेळा इतक्याच जोरावर ७ ते ८ भाज्या केल्या अहेत बरेच वेळा.
जेवण्याच्या सेट बद्दल ६ ताटे, ४/५ बाऊल , आणि ६ कप्स, काही चांगले ग्लासेस.
सर्व्हींग सेटस मात्र दोनच , ( गिफ्ट आलेले). पण त्यात सगळ बसत,
जास्त कोणि आल तर सरळ डिसपोजेबल्स.
सामान ठेवायला कॉफीच्या मोठ्या बरण्या ( मी खुप कॉफि पिते , सो बर्याच बरण्याआहेत).
-------------
मला तरी ईतके सामान पुरते. नेहमी मैत्रिणींकडे पाहिले कि वाटते की खरच लागते का ईतके सामान? त्या पेक्षा कमी सामान वापरुन जेंव्हा बदलावेसे वातेल तेंव्हा नविन ( पण परत कमीच) घेता येते.
हे आपले माझे वै मत.
रिमझिम, दुधाची
रिमझिम, दुधाची पातेली/झाकण्या/विळी/किसणी/चिमटे/झारा/कालथा/मिसळणाचा डबा, अन्न उरलं तर काढून ठेवायला २ छोटी तसराळी हे पण असेल ना?
नाही अश्वे एक चाकु वाला वुडन
नाही अश्वे
एक चाकु वाला वुडन सेट आहे, आणि वर म्हंटल्याप्रमाणे एक चमचा स्टँड. अन्न उरल तर वर लिहिलेल्याच एका सव्हिंग सेट ( काचेचे लहान डबे जे एकमेकात बसतात धुतल्यावर) मधे काढते.
तु येच आता जेवायला
एवढ्या कमी पसार्यात मस्तच
एवढ्या कमी पसार्यात मस्तच जमवतेयस गं
इतक्या प्रेमळ आमंत्रणाबद्दल धन्स
अग माझा पसारा कमी आहे ग, पण
अग माझा पसारा कमी आहे ग, पण लेकिचा ( खेळण्या) आणि नवर्याचा( पुस्तके) खुप्पच खुप आहे, म्हणुन मी माझी बाजु आवरती घेते
आणि हो धन्स कशाला, कोठे आहेस नाही माहिती, पण नक्की ये.
रच्याकने जर कोणाला दक्षा
रच्याकने जर कोणाला दक्षा सारखा प्रश्न असेल तर फ्लोअर प्लॅन पाठवल्यान नक्की मदत करेन. मी स्वतः सॉफ्ट्वेअर मधे आहे, पण बर्याच मैत्रीणींना ईंटीरिअर ला मदत केलि आहे ( माझी आवड आणि वाचन).
आम्हाला नवीन घरासाठी लाकडी
आम्हाला नवीन घरासाठी लाकडी किंवा काचेचे देवघर घ्यायचे आहे. पुण्यात कोठे मिळू शकेल? भवानी पेठेत? नक्कि कोठे?
हिमांगी, लक्ष्मी रोडला
हिमांगी, लक्ष्मी रोडला कुलकर्णी पेट्रोलपंप समोर एक होतं पुर्वी. आता नक्की माहीत नाही. तिथे लाकडी देव्हारे छान मिळायचे. आईबाबांनी माझ्या लहानपणी घेतला होता आणि नंतर तिथुनच एक माझ्या लग्नात ह्याच्या आजोबांना गिफ्ट दिला होता. दोन्ही अजुनही सही आहेत. किंमती माहित नाहीत.
हीमांगी, तुळशीबागेत राम
हीमांगी, तुळशीबागेत राम मंदिराजवळ बरीच दुकानं आहेत, देवघर, पूजेची सर्व उपकरणे, साहित्य मिळते तिथे.
क्रोम म्हनजे भंगार...क्वालिटी
क्रोम म्हनजे भंगार...क्वालिटी अगदी खालची पण किंमत मात्र भरमसाठ. त्यापेक्षा एकबोटेमध्ये उत्तम फर्निचर मिळते. मात्र व्हरायटी खूप अशी नाही.
बाजीराव रोडला व त्याच्या
बाजीराव रोडला व त्याच्या आजूबाजूला असलेली शुक्रवार पेठे/सदाशिव पेठेतील दुकानं येथे वाजवी किमतीत फर्निचर आयटेम्स मिळू शकतात.
केनचे फर्निचर आवडत असल्यास बैठकीसाठी केनचा सोफासेट-खुर्च्या-टीपॉय हा पर्यायही निवडता येतो. फक्त लिविंग रूमचा साईझ पाहून त्याप्रमाणे घ्यावे. केन फर्निचर अगदी कंटाळा येईपर्यंत टिकते. त्यातही त्याला काही वर्षांनी लोक काळा / पांढरा रंग देऊन व्हरायटी आणतात व टिकाऊपणा वाढवतात.
केनची डुलणारी आरामखुर्ची / झोका हा पर्यायही छान आहे.
मला पण ३ बाय ६ चे दोन बेड हवे
मला पण ३ बाय ६ चे दोन बेड हवे आहेत मेटल चे पावडर कोटेड असतात तसे... आणि कॉम्प्यूटर चेअर व बुक शेल्फ पण.. कान्दिवली/बोरिवली मधे फर्निचर ची दुकाने सुचवाल का? रोलेक्स कसे वाटते बोरिवली चे?
ओवी, लिंक रोडवर गोरेगाव
ओवी, लिंक रोडवर गोरेगाव बाजूला बरीच दुकाने आहेत... संपर्कातून एक नंबर देते.. ती व्यक्ती मदत करू शकेल.
चालेल! गोरेगाव पण जवळ
चालेल! गोरेगाव पण जवळ आहे.... मुम्बई मधे नवीन, त्यामुळे त्यातल्या त्यात जवळपासचे बघता येईल सध्या...
अरे वा, दक्षिणा नवीन घराबद्दल
अरे वा, दक्षिणा नवीन घराबद्दल अभिनंदन.
पहिलं वर्ष आम्ही असंच काढलं होतं..स्वयंपाकघरात कोपर्यात डब्यावर डबे, ताटं, वाट्या, चमचे. हॉलमध्ये २ गाद्यांची भाबै. टीव्ही तर दोन वर्ष घेतलाच नाही. दर शनिवारी कपडे/भांड्यांचा पसारा आवरायचा, परत दोन दिवसात होती तीच गत.
किचन ट्रॉलीज लगेच नको करुस.. थोड्या उशिरा पण चांगल्या प्रतीच्या करुन घे. बर्याच प्रत्यक्ष घरात राहायला गेल्याशिवाय अरेंजमेंट कशी असायला हवी ते लक्षात येत नाही.हॉलमध्ये केनच्या खुर्च्या/टीपॉय घेउ शकतेस.. २ वर्षांनी बोअर झालं/नवीन फर्निचर केलं की हे बाल्कनीत मुव्ह करता येइल नाहीतर सरळ विकुन टाकायचं.
आम्ही एका बेडरुममध्ये बिग बाजार वालं पार्टिकल बोर्डचा सेट घेतला.. स्वस्त बघुन. नाही म्हटलं तरी ७-८ वर्ष टिकतं, अर्थात जास्त हलवाहलवी केली की लगेच खराब होतं म्हणे. पण आता ते फर्निचर गेस्ट रुम मध्ये टाकलं आणि नवीन टिकाउ/चांगलं करुन घेतलं.. त्या वेळच्या गरजे/बजेट प्रमाणे ठरवायचं.
'अभिनंदन' दक्षे!!!!
'अभिनंदन' दक्षे!!!!
दक्षिणा, सध्या दिवाळीचे
दक्षिणा, सध्या दिवाळीचे सर्वत्र सेल लागलेले आहेत. त्यामधे चांगले डील कुठे मिळते ते बघून सामान विकत घे. तुला हाऊस होल्ड अप्लायन्सेस नक्की काय लागणार आहेत त्याची लिस्ट कर. त्यामधे प्राथमिकता ठरव.
१. फ्रीज
२. वॉशिंग मशिन
३. मायक्रोवेव्ह
४. टीव्ही अशा वस्तू साधारणपणे लागतात, सध्या काही शोरूम्समधे सर्व वस्तूचे एकत्र कॉम्बी असे मिळतय. जरा शोधाशोध कर आणि स्वस्तात मस्त वस्तू घे.
टीव्ही ही काही जीवनावश्यक वस्तू नाही, ती नंतर घेतलीस तरी चालेल. फ्रीझ आणी मावे मात्र हवाच. त्यामुळे स्वयंपाकातला वेळ वाचतो.
मिक्सर अथवा एफपी नसेल तर सध्या एक छोटा हँड मिक्सी घे.. त्यामधे चटणी/कूट/ज्युस हे सर्व काही बनतं.
दुकानामधे जाऊन दुकानदाराला अमुक रुपयाची लग्नाची भांडी द्या असं सांगितलं की तो बरोबर बजेटनुसार गरजेची भांडी बसवून देतो. मी एकदा स्टीलच्या दुकानात काही खरेदीला गेले होते तेव्हा तिथे काही बायकाची खरेदी चालली होती. दुकानदाराने एक लिस्टच तयार ठेवली होती. पाच हजारात इतके सामान. चार हजारात इतके सामान
अमुक रुपयाची लग्नाची भांडी
अमुक रुपयाची लग्नाची भांडी द्या >>
दुकानदाराने एक लिस्टच तयार ठेवली होती. पाच हजारात इतके सामान. चार हजारात इतके सामान
प्रतिसाद>> डोक्याला ताप नाही..
आज हा धागा नीट वाचायला वेळच
आज हा धागा नीट वाचायला वेळच मिळाला नाही.
उद्या निवांत वाचेन.
दक्षिणा, बाजीराव रोड्ला भरपुर
दक्षिणा,
बाजीराव रोड्ला भरपुर भट्कुन मग सगळे compare करायचे आणि मग purchase करायचे...
मी 12000/- ला ६x६ चा wrott Iron वाला बेड घेतला आहे. (with storage space - hydraulik lift आहे)
माझी परीस्थिती अगदी same होती. काय घ्यावे आणि काय नाहि.... total confusion होते jan11 मधे मी स्वताच्या घरात shift झालो. budget कोलमडला होता.
फ्रिज आनि washing Machine दोघेहि bajaj allianz च्या EMI मधे घेतले. (no Interest for 8 months) बरेच पैसे वाचले. TV घेतलाच नाहि, monitor (17" CRT-Rs1800/- Sec Hand) ला TV tuner card (Rs-700) बसविले आणि TATA SKY घेतले. (Great clearity).
कापसाचि गादि घेतलि. Hall साठि Nilkamalच्या wooden कलर च्या खुर्च्या घेतल्यात -४
किचेन मधे जाड तारेचे racks आहेत ते लावले आहेत.
सौ. adjust करता आहेत. समजुतदार आहेत. किचेन ट्रोली नन्तरच करु म्हनतात...
Rack चे photo घरि जावूण टाकतो...
(माझी पहिलि मोठि post आहे - शुद्धलेखन adjust करूण घ्या..)
हिमांगी, लक्ष्मी रोडला
हिमांगी, लक्ष्मी रोडला कुलकर्णी पेट्रोलपंप समोर एक होतं पुर्वी.>>> हे दुकान अजूनही तिथेच आहे. तिथे खास शिसवी देव्हारे मिळतात. मी २००७ मध्ये घेतला होता.
शिसवी देव्हारे मस्तच असतात.
शिसवी देव्हारे मस्तच असतात. माझ्याकडेही तसाच आहे. जरा महाग असतात पण एकदा घेतला की बघायला नको.
पण एकुणात देव्हारा ही काही
पण एकुणात देव्हारा ही काही कंपलसरी आवश्यक गोष्ट नाही प्रत्येकासाठी.
झोपायला गादी, अन्न शिजवायला गॅस, कपड्याचं कपाट या इतकी आवश्यक नाही.
अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न.
"बिग बझार", कोथरुडच्या
"बिग बझार", कोथरुडच्या "फर्निचर सेक्शन" मधे पण जरूर चक्कर टाक..
कदाचित काहीतरी चांगला मिळून जाईल.... आणि बजेट मधे पण असतं कधीकधी...
Pages