मधुरांगण कार्यक्रमाचे वृत्त

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2011 - 07:45
ठिकाण/पत्ता: 
केशवराव भोसले सभागृह - कोल्हापूर

नमस्कार!

मधुरांगणच्या कोल्हापूर शाखेने येत्या २२ सप्टेंबर रोजी, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता माझा 'गझल - कविता - किस्से व कथा' यांचा समावेश असलेला खालील कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.

'मथितार्थ सारी शायरी'

हा कार्यक्रम कोल्हापूर येथील केशवराव भोसले सभागृहात होणार असून तो सायंकाळी पाच ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत होईल. हा कार्यक्रम मधुरांगणच्या सभासदांसाठी आयोजीत केलेला असला तरीही मायबोली सदस्यांनी या कार्यक्रमास येण्यास मधुरांगणच्या पदाधिकार्‍यांची हरकत नाही. हा कार्यक्रम मी एकटा सादर करतो व त्यात वाद्यवृंद किंवा सूत्रसंचालन नसते.

या कार्यक्रमास सदस्यांनी जरूर यावे यासाठी हे निमंत्रण!

कार्यक्रम प्रकाशित करण्यासाठी मी पुणेकर ग्रूपचे सदस्यत्व वापरले आहे व त्याऐवजी दुसरे संयुक्तिक सदस्यत्व असल्यास जाणकारांनी कृपया कळवावे.

वरील तक्त्यात वेळ वेगळी दिसत असल्यास येथे पुन्हा नोंदवत आहे.

२२ सप्टेंबर, २०११ - गुरुवार - सायंकाळी पाच ते सायंकाळी साडे सहा - केशवराव भोसले सभागृह - कोल्हापूर

अवश्य यावेत. धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तारीख/वेळ: 
Thursday, September 22, 2011 - 20:00 to 21:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रम सुंदर झाला. माझ्यासमवेत गझलकार निशिकांत देशपांडे, गझलकारा सुप्रिया जाधव व कवयित्री स्वाती सामक आलेल्या होत्या. वेळेवर सुरू होऊन हा कार्यक्रम ठरवलेल्या वेळेलाच संपला. कार्यक्रमाची बातमी येथे देताना आनंद होत आहे. Happy

http://72.78.249.107/Sakal/23Sep2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page...

मधुरांगण या सकाळ पेपर्सच्या महिला व्यासपीठाच्या कोल्हापूर (शहर) शाखेसाठी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे शीर्षक 'मथितार्थ सारी शायरी' असे असून त्यात माझ्या अनेक गझला, कविता, चारोळ्या व 'सारे आई तुझ्यामुळे' या आईवरील कवितेचे सादरीकरण असते. यात कोणताही वाद्यवृंद नसतो व सूत्रसंचालनही नसते. (मला एकट्यालाच दिड तास सहन करावे लागते Proud ) निशिकांत व सुप्रिया (तसेच आंतरजालीय वर्तुळाशी फारसा संपर्क नसलेल्या स्वाती सामक यांचे) दिड दिवस माझ्यासमवेत राहून बळ वाढविल्याबद्दल मनापासून आभार! Happy

-'बेफिकीर'!

अरे वा? कैलासराव आपण प्रतिसादातच कशी काय बातमी टाकलीत कोण जाणे! खूप आभार! आपली आठवण दर तासाला निघत होती. आम्ही सर्वांनीच तुम्हाला अतिशय मिस केले. Happy

मस्त