छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:10

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

************************************************************************

"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."

Ghar 2.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

गाव मागचा, मागे पडला
पायतळी पथ तिमिर बुडाला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे

निराधार मी, मी वनवासी,
घेशिल केंव्हा मज रुदयासी ?

dog.JPG

अजाण भुंगा एका दिवशी
बागेमध्ये भ्रमरत होता
नाजुक सुंदर फुले आगळी
अन थोडिशी कोळी जाळी
अल्लड सावज अवचित आले
भराभरा ते जाळे विणले
कोळी वदला फुला आपला
स्नेह निराळा सख्य निराळे

jale.jpg

मंडळी,

प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

हे ध्यानात ठेवा बरं...

चिमणी चोच चिमणा चारा

aaee.jpg

चोच देईल तो चारा तर देऊ देतच,
पण तो चारा भरवायला आई वडिलांचं छत्र सगळ्यांच्या डोक्यावर असू देत.

कालवांचा खडक. ह्यातील कवचात कालवांचे अस्तित्व असते.

दरिया किनारी एक बंगलो गो पोरी दय जो दय.

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

रैन बसेरा...
चल, उठाले डेरा
हुआ सवेरा
क्या भला यहाँ मेरा
जो कुछ मिला
सब यहीं निबेरा...

zendu ali copy.jpg

(बिचार्‍या अळीला फुलाचा आश्रय सोडावा लागतोय, तर खालच्या वर्तमानपत्रावर फर्निशिंग मॉल व कर्ल ऑन गाद्यांची जाहिरात उठून दिसते आहे!! विरोधाभास की उपरोध??)

अकु Lol अग कसले घाबरतायत? आमच्या जागेत नुसती सगळी बिळ करुन ठेवली आहेत.

अरुंधती अळी चालली फर्निचर पोखरायला Lol

आम्ही ढोलकर ढोलकर
ढोलकर रानाचे पक्षी.
Bulbul9.JPG

Pages