छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:10

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

************************************************************************

"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."

Ghar 2.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मृ तुझी निळावंती दर गणेशोत्सवात असतेच
Lol आहेच मुळी ती व्हर्सेटाइल! Proud कुठेही खपते.

सशलचं लाडिक जोडपं आणि गाणं, दोन्ही मस्त!!

>>>सैंया बिना घर सूना सूना
इतका तगडातुगडा राकट मासा 'सैय्याबिना' म्हणतोय?? काय्भानगडसेल्तीअसो! Proud

सिंडे, गाणं सहीये!

दिनेश तुमचा दुसरा फोटो चालू शकला असता की इथे. नैसर्गिक मातीपासून बनवलेले घर होते ते मनुष्यप्राण्याचे. गुहा सुद्धा चालायला हव्या Happy संयोजक तुम्ही मनुष्याची घरे चालणार नाही असे लिहिले नाहिये Happy

हह लिहीलय ना
इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ Happy

लालू Lol
सगळ्यांची गाणी आणि झब्बू एक्से बढकर एक
<<इतका तगडातुगडा राकट मासा 'सैय्याबिना' म्हणतोय?>>:D Lol

सिंडरेला ( अंडयातून नुकतीच बाहेर आलेल्या पिलांचा), सशल ( बिळातल्या पिलांचा), रैना (तू घरभर भिरभिरत असतेस; लहान-मोठ्या वस्तुंमध्ये) हे फोटो खूप आवडले.

लालू Proud

लोकहो, मी टाकलेल्या चित्रात लोंबतेय ते घर नसून प्राणी ( पक्षी?) आहे. तुम्ही ओळखलेच असेल पण राहावले नाही म्हणून आपले सांगितले. Proud

लालू खुप आवडीचं गाण टाकलंस पण
फिर तुमको खा लूंगी>> Lol

बाकी सगळ्यांचे फोटो मस्तच.
रैना, कॉरमॉंरंट्स मस्तच. असा एक फोटो माझ्याकडे होता तो काल सापडतच नव्हता.
स्वाती_आंबोळे, ते कोष कुठे दिसले तुम्हाला? मस्तच.
सशल, बिळाचा फोटो छान
सिंडरेला, निळी अंडी सुरेख आहेत. कोणत्या पक्षाची?

मंडळी,

प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

कृपया हे ध्यानात असुद्या Happy

सगळे फोटो मस्त आहेत,
सशलने टाकलेला फोटो जबरदस्त आणि हटके आहे. सशल ते कोणते पक्षी आहेत त्या बिळात ?

लालू ! Lol

झब्बूची सही कल्पना आणि एक से एक फोटो Happy
माझ्याकडे अश्या प्रकारचे फोटो आहेत, पण समर्पक गाणी आठवणे कठीण आहे. त्यामुळे यंदा मी नुसती प्रेक्षक.

सर्वांचे फोटो छान आहेत. आता हा आमचा झब्बू......
BHADEKARU.jpg
सरस्वती ...ये तेरा घर
है मेरा घरSSSSS
नही नही ये तेरा घर
है मेरा घर
किसने किसको दिया दिया है किसने कब्जा किया किया

Pages