"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ
गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."
******************************************************************
पनाह लेगा इस चमन मे किस शाजर
पनाह लेगा इस चमन मे किस शाजर पर तु
हर एक शाख पे मेरा ही आशियाना है
मस्त सुरुवात
मस्त सुरुवात
वा! सुंदर!
वा! सुंदर!
हह,मस्तच
हह,मस्तच
हह मस्तच
हह मस्तच
हे एक रेशमी घरटे जणु
हे एक रेशमी घरटे
जणु स्वप्नामधले वाटे, जणु स्वप्नामधले वाटे
जबरी कल्पना...
जबरी कल्पना...
छान कल्पना आणि उपक्रम.... आता
छान कल्पना आणि उपक्रम.... आता पटापटा फोटू आणि ओळी येऊद्यात!
जहा पे सवेरा हो बसेरा वही है
जहा पे सवेरा हो बसेरा वही है जहा पे बसेरा हो सवेरा वही है
घर थकलेले संन्यासी ह़़ळुहळु
घर थकलेले संन्यासी
ह़़ळुहळु भिंत ही खचते
आईच्या डोळ्यामधले
नक्षत्र मला आठवते
छायाचित्र माझ्या नवर्याने काढलेले आहे. चालत नसेल तर मात्र बाद करावे लागेल.
शँकी मस्त ! घर असावे घरा
शँकी मस्त !
घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेमळ जिव्हाळा नकोत नुसती नाती
या घरट्यातुन पिलु उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंवरठ्यावर भक्ती
(गीत - विमल लिमये. संगीत, गायक - श्रीधर फडके )
सगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त.
सगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त.
काय मस्त फोटो आणि गाणी
काय मस्त फोटो आणि गाणी लिहिताय सगळे. मला मात्र रात्री घरी पोहोचल्याशिवाय संधी नाही !!
वर आभाळ खाली धरती दिस आलाय
वर आभाळ खाली धरती
दिस आलाय माथ्यावरती
मी लिहिलेल्या ओळींत संयोजकांनी दिलेले कळीचे शब्द आलेले नाहीत. तुम्हाला समर्पक ओळी सुचल्या तर लिहा कृपया. संयोजक, चालणार नसेल तर सांगा.
एक घर बनाउंगा तेरे घर के
एक घर बनाउंगा तेरे घर के सामने
दुनिया बसाउंगा तेरे घर के सामने
मस्तच
मस्तच
फोटो टाकायची घाई नडली
फोटो टाकायची घाई नडली
अमृता, इथे फक्त
अमृता, इथे फक्त प्राणी/पक्षी/कीटक (थोडक्यात मनुष्येतर प्राण्यांची) घरे दाखवायची आहेत.
शॅंकी, कुठेतरी वळचणीला
शॅंकी, कुठेतरी वळचणीला चिमण्या कबुतरांची बिर्हाडं असतीलच हो एवढ्या मोठ्या कॉप्लेक्स मधे
मेधा, कबुतरांची असंख्य घरटी
मेधा, कबुतरांची असंख्य घरटी आहेत
मेधा मधमाश्यांची पोळी तर
मेधा
मधमाश्यांची पोळी तर नक्कीच असतील
सुंदर फोटो आणि गाणी.
सुंदर फोटो आणि गाणी.
सर्वांचे फोटो मस्तच तेरे
सर्वांचे फोटो मस्तच
तेरे रास्ते पे हमने इक घर बना लिया है|
तेरी मुस्कुराहटोंसे इस को सजा लिया है|
मस्त फोटो सगळ्यांचे सावली
मस्त फोटो सगळ्यांचे
सावली
मस्त प्रवेशिका. मंडळ, गाणेच
मस्त प्रवेशिका.
मंडळ, गाणेच हवे का? मराठी कविता नाही चालणार?
कविता : शिशिरागम (बा. सी. मर्ढेकर)
शिशिरऋतूच्या पुनरागमे एकेक पान गळावया
का लागता मज येतसे न कळे उगाच रडावया
पानांत जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे
जातील सांग अता कुठे निष्पर्ण झाडित कांपरे?
फुलली असेल तुझ्या परी बागेतली बकुलावली
वाळूत निर्झर बासरी.. किती गोड ऊब महीतली!
जातील ही उडुनी तिथे इवली सुकोमल पाखरे
पानांत जी निजली इथे निष्पर्ण झाडित कापरे
पुसतो सुहास स्मरूनिया तुज आसवे जरि लागले
एकेक पान गळावया शिशिरऋतूच्या पुनरागमे..
गाणे (एच्चेचच्या सौजन्याने ) :
या चिमण्यांनो परत फिरा रे
घराकडे अपुल्या... जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या..
भारी सगळेच
भारी सगळेच
व्वा! क्या बात है!!
व्वा! क्या बात है!!
रैनाचा निषेध करून तिच्या
रैनाचा निषेध करून तिच्या खोप्याच्या फोटोसाठी बहिणाबाईंची ही कविता :
आरं खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलांमधी जीव
जीव झाडाले टांगला
सुगरीन सुगरीन
अशी माझी रं चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागंप्या नर
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा!
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवानं
दोन हात दहा बोटं!
मस्तच गाणी/कविता तर एकसे बढकर
मस्तच गाणी/कविता तर एकसे बढकर एक येताहेत.
दो पंछी दो तिनके कहो लेके चले
दो पंछी दो तिनके कहो लेके चले हो कहां
ये बनायेंगे एक आशियाँ
Pages