Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
मनरी +१००००
मनरी +१००००
virgin mobil आणि टाटा च्या
virgin mobil आणि टाटा च्या अॅड मस्त आहेत,
हि मला आवडते, http://www.youtube.com/watch?v=4UqutXZuBSM&feature=endscreen&NR=1
पारले-जी ची "रोको मत टोको मत"
पारले-जी ची "रोको मत टोको मत" खूप आवडली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साक्षी +१ अगदी हेच लिहायला
साक्षी +१ अगदी हेच लिहायला आले होते.
त्याउलट मला ती 'भाई आज मैने प्रिया से बात करी दो घंटे.....' वाली जाहीरात टाळक्यात जाते.
एकसुरी अॅडस असल्या तरीही बाकिच्या बोर नाहित इतक्या.. पण हा टिन एज मधला मुलगा.. गर्लफ्रेंडसना फोन करतो, दोन तास बोलतो.. एकिला लावायचा होता तर दुसरीला लागला सांगतो... यातून चूकिचा मेसेज जात नाही का? ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी खूप टिव्ही बघत नाही
मी खूप टिव्ही बघत नाही त्यामुळे सगळ्या अॅड्स नाही माहित पण ती हलो हनीबनी अॅड डोक्यात जाते. काय्च्या काय उगाच. इथं रस्ते, पाणी, लाईट नेता नेता मारामार आणि मोबाईल नेट्वर्क अन असल्या सिली ट्युन्स बर्या नेतायत देशभर अस्ले काहीतरी वाटते. त्या भाकरी नाही तर केक खा टाईप.
ते दाग अच्छे है टाईप सगळ्या डिटर्जंट च्या अॅड्स पण. कपडे धुवायचं टेन्शन नाही म्हणून चिखलात लोळा? स्टुपिड्स.
ते लहान मुलं कुठलंही scientific ज्ञान (बहुतेक वेळा अतिशय showy n shallow ) आईबापांना डॉक्टर, डेन्टिस्टस यांच्यासमोर द्यायला लागले की तर फार डोक्यात जाते. विटॅमिन डी, साबुन स्लो आणि टुथपेस्ट.
ते साबुन स्लो आणि उगीच स्मार्ट पोरंपोरी कशावरून तरी तुम्हाला अन्कल आन्टी म्हणून तुमचं हसू होइल अशी भिती दाखवणारे तर प्रॉडक्ट्स स्वतःच्या quality चि स्वतःलाच guarantee नसलेले वाटतात.
साक्षी ही कुठली अॅड?
साक्षी ही कुठली अॅड? :आओ:![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आमच्या गह्री टीव्ही बंद आहे अजून ३-४ महिने
पेप्रात हल्ली कुरकुरेची
पेप्रात हल्ली कुरकुरेची जाहिरात येते.
वाकडा आहे पण माझा आहे!
(No subject)
साक्षी ही कुठली अॅड?>>>
साक्षी ही कुठली अॅड?>>> पारले-जी ची नवीन जाहिरात आहे
Axe effect चि नविन जाहीरात
Axe effect चि नविन जाहीरात सरळ सरळ व्हल्गर आहे. एक माणूस चुकून एक्स इफेक्टचा फवारा मारुन घेतो आणि बाहेर आल्यावर एक बाई आचकटविचकट हावभाव करत त्याचे कपडे काढते.
शापै बॉडी स्प्रे कोणताही असो,
शापै बॉडी स्प्रे कोणताही असो, जाहीरात अश्लिल असलीच पाहिजे, असा दंडक आहे. डोळे बंद करून पहायची जाहिरात, दुसरं काय?
आणि ह्या जाहिरातीत तो
आणि ह्या जाहिरातीत तो म्हातारा त्या मुलाचा बॉस असतो.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Axe effect चि नविन जाहीरात
Axe effect चि नविन जाहीरात सरळ सरळ व्हल्गर आहे. एक माणूस चुकून एक्स इफेक्टचा फवारा मारुन घेतो आणि बाहेर आल्यावर एक बाई आचकटविचकट हावभाव करत त्याचे कपडे काढते.>>>>>
आणि एकंदरीत असे वाटते की ती मुलीची इतर लोकाशी पहिलीच भेट आहे.
काहीही दाखवतात .
काजोल ची bournvita ची
काजोल ची bournvita ची जाहिरात छान आहे. आसमान में अनगिनत तारे होते हें .... वोह तो मेंने कबका पुछा था !!
अमिताभ च्या 'चुपके चुपके' ची आठवण येते.
काजोल ची bournvita ची जाहिरात
काजोल ची bournvita ची जाहिरात छान आहे>>> +१
सगळ्यात हॉरिबल म्हणजे रात्री
सगळ्यात हॉरिबल म्हणजे रात्री १२ नंतर सर्व चॅनेल्स वर दखवली जाणारी हिंदी मधे ट्रान्स्लेट केलेली टेली ब्रॅन्ड्स १.. मै बहुत उदास था.....लोग मेरे गंजेपन पर हसते थे....लेकिन जब से मैने जपानी ऑइल युज किया मेरे बाल बढ गये....अब मुझे बाहर जाने मे तकलीफ नही होती...हां जिंदगी अब खुबसुरत लगती है
किंवा गोरापन पाने के लिये क्रीम....लोकाना काळा रंग लाउन सादर करतात आणि नंतर गोरं दाखवतात....
टेली ब्रॅन्ड्स च्या जाहिरातिच
टेली ब्रॅन्ड्स च्या जाहिरातिच नाही तर त्यांची प्रॉडक्ट्स ही तितकीच 'मनोरंजक' असतात .
परवा बघितला , कानातला मळ काढ्णारा व्हॅक्युम क्लीनर
टेली ब्रॅन्ड्स च्या जाहिरातिच
टेली ब्रॅन्ड्स च्या जाहिरातिच नाही तर त्यांची प्रॉडक्ट्स ही तितकीच 'मनोरंजक' असतात . >> त्या मनोरंजन म्हणूनच बघितल्या तर मजा येते . बाय दा वे , हल्ली नजर रक्षा कवच च्या अॅड बंद झाल्यात , नजरा लागायच्या थांबल्या काय सगळ्याना ;)?
सध्या धन ल़क्ष्मी यंत्र चे दिवस आहेत .
कानातला मळ काढ्णारा व्हॅक्युम
कानातला मळ काढ्णारा व्हॅक्युम क्लीनर>>>>>>>>.. ईईईईईईईईईईईईईईईईईईईई
पार्लेजी ची नवी अॅड मस्त
पार्लेजी ची नवी अॅड मस्त आहे- बचपन से बडा कोई स्कूल नही!
'आल्पेनलिबे' ची नवीन अॅड
'आल्पेनलिबे' ची नवीन अॅड आवडली नाही. 'लालची मॉं'??
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आगाऊ +१०० मला ही आवडली फार
आगाऊ +१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला ही आवडली फार
अनिश्का हे बघ
अनिश्का हे बघ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती उलटपलट वाली अॅड कसली बोर
ती उलटपलट वाली अॅड कसली बोर आहे. शेवटच्या वाक्यापर्यंत ती कशाची आहे ते कळतच नाही.
पार्लेजी ची नवी अॅड मस्त
पार्लेजी ची नवी अॅड मस्त आहे- बचपन से बडा कोई स्कूल नही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>सगळ्याच बाबतीत क्लास आहे ही अॅड. व्हिज्युअल्स, आयडीया, प्रेझेंटेशन आणि प्रॉडक्ट प्लेसमेंट. टेन आऊट ऑफ टेन.
एका दिवाळी अंकात, मिल्टनच्या
एका दिवाळी अंकात, मिल्टनच्या टिफीन बॉक्सची जाहिरात आहे. यातच जेवण गरम करता येते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जाहिरातीतले शब्द, जणू काही आत्ताच बायकोने शिजवले आहे !
जणू काही आत्ताच बायकोने
जणू काही आत्ताच बायकोने शिजवले आहे ! >>
अनिश्का तुझी अख्खी पोस्ट
असंच गोरेपणासाठी पण अॅड लागते, त्यातली एक बाई थँक्स फेअर लूक मेरा कॉन्फिडन्स बढानेके लिये.. और मेरा प्यार लौटाने के लिये.. असं काही तरी बरळतं. का तर हिच्य काळेपणामुळे नवर्याची दुसरी गर्लफ्रेंड होती इ. दाखवलंय त्या अॅडमध्ये. असे रंग उजळून वगैरे नवरे परत येतात का? आणि असं रंगाकडे पाहून परत आलेल्या नवर्याच्या पार्श्वभागावर २ लाथा का देऊ नयेत?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
या जाहिराती असा चुकिचा मेसेज का पास करतात?
त्या अॅडमध्ये. असे रंग उजळून
त्या अॅडमध्ये. असे रंग उजळून वगैरे नवरे परत येतात का? आणि असं रंगाकडे पाहून परत आलेल्या नवर्याच्या पार्श्वभागावर २ लाथा का देऊ नयेत?
या जाहिराती असा चुकिचा मेसेज का पास करतात>>>> +१ दक्षिणा
दक्षे +१
दक्षे +१
कोको कोला ची जाहीरात आवडली
कोको कोला ची जाहीरात आवडली विशेषतः त्याचे गाणे... हा मै क्रेजी हुं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages