मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुझुकी हयातेच्या जाहीरातीत सलमानला फुकट घालवलाय. >> करेक्शन
सलमान च्या जाहिरातीत सुझुकीला फुकट घालवले.. Happy

ती गुड डे ची नवी जाहिरात छान आहे. दोन मुलं आणि त्यांच्या आया बसमधून प्रवास करत असतात ती. कितीही वेळा पाहिली तरी आवडते.

ती आयडियाची हॅलो हनी बनी, यू आर माय पमकिन पमकिन काय आहे ती अ‍ॅड
इतक्यांदा लागते ती अ‍ॅड ... Angry
मला जाम इरिटेट होतं आजकाल ते ऐकुन Angry

आणि डेअरीमिल्क सिल्कची किसमी क्लोज योउर आईज
कसली मस्त वाटते ती ऐकायला
माझ्या ओडीसी मध्ये एकाची रिंगटोन आहे.. सगळ शांत असतं आणि अचानक वाजतं... किसमीssss Proud Wink

रिया +१००
सुपर डोक्यात जाणारी अ‍ॅड आहे.
आणि ते पमकिन समथिंग गाणं आहे? त्याला गाणं म्हणायचं हाच मोठ्ठा विनोद असेल

ते गाणं नाहीच्चे. माऊथ पब्लिसिटीने भारतभर पसरत जाणारी रिंगटोन असं आहे ते. आयडीयाची पॅन इंडिया सर्व्हिस दाखवण्यासाठी ते वापरलं आहे. मुद्दाम खूप फेमस अथवा कुठल्याही भारतीय भाषांमधलं गाणं न घेता हे थोडंसं सिली रिंगटोन घेतली आहे.

अच्छा!
मला आताशी अ‍ॅड कळाली
पण काही तरी बरे शब्द तरी घ्यायचे ना त्यांनी
पमकिन पमकिन काय अरे

नी अगदी अगदी!

नी, अ‍ॅड या डोक्यात जाण्यासाठीच बनवलेल्या असतात. अन्यथा त्यांचे ब्रॅंडिंग कसे होणार???

मला जाम क्यूट वाटले ते. हनी बनी. फोनवर जास्त करून आपण लाडाचे प्रेमाचे बोलतो ना. मंजे तरूण पिढी तर नक्कीच पण मला पण सवय आहे. पहिले मला वाटले ते कोणत्यातरी नवीन सिनेमातील गाणे आहे. टर्म्स ऑफ एंडिअरमेंट अ‍ॅक्रॉस इंडिया. आणि कोणत्याही नात्याला अ‍ॅप्लिकेबल आहे. ( नात्या आयडी नव्हे) Happy

सध्या ब्लेण्डर्स प्राईड की कसल्याशा ब्रॅण्डच्या एका नव्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट जाहिरातीत प्रियांका चोप्रा कसली बकवास दिसते... ती जाहिरातही उगीच आहे !!

हनी बनी बेफामच आहे. सोप्पी आयडीया. पम्पकीन हनी बनी एका लोकप्रिय गाण्यावरुन बेतलेलं कॉम्बिनेशन. Happy हिट होणार हे नक्कीच.

आयडीयाच्या जाहिराती या कधीच प्रॉडक्टच्या जाहिराती नसतात. एखादी सामाजिक समस्या घेऊन मग त्यावर आधारित ही जाहिराती अस्तात. जाहिरातीमधून दाखवलेले सोल्युशन कित्येकदा हास्यास्पद वाटू शकते कारण, अर्थातच ती अतिशयोक्ती असते. पण तरीदेखील ती समस्या किमान लोकांना माहित होते. याआधी शिक्षण, आरोग्य, कागद वाचवा अशा अनेक जहिरात येऊन गेल्या आहेत

हो नंदे पण ह्या सगळ्या समस्या ते आपलं प्रॉडक्ट खपवायला कॅश करतात हे इतकं ऑब्व्हियस आहे.
उदाहरणार्थ अब कोई जात पात नही.. सब नंबर्स है.. यात आयडीयाचं स्पेशल काय डोंबल?
किंवा फोनवरून शाळा.... ही काय आयडियाने काढलेली आयडिया आहे का?
किंवा वॉक न टॉक... मेल्यांनो ते तर कुठल्याही सर्व्हिसच्या फोनचे करता येईल...

मेल्यांनो ते तर कुठल्याही सर्व्हिसच्या फोनचे करता येईल...<< हो, पण बाकीचे ते करत नाहीत ना... आयडीयावाले "आयडीया सिम अथवा नेटवर्क" पेक्षा "सेलफोन अथवा मोबाईलफोन" हे फोकस म्हणून वापरतात. जाहिरातींचा मुख्य कणा अर्थात प्रॉडक्ट्स खपवणे हा असणारच. पण त्यातूनही ते "आय अ‍ॅम द बेस्ट" ओरडात राहण्यापेक्षा वेगळे काहीतरी हाताळू इच्छितात; हा मोठा फरक. टाटा आणि बिर्ला या दोन उद्योगसमूहांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब त्यांच्या जाहिरातीतून दिसत असते. व्होडाफोनने "झूझू" मधून एंटरटेनमेंट हा त्यांच्या जाहिरातीचा बेस बनवला आहे. एअरटेल आणि इतर अजून चाचपडतच असतात. त्यापेक्षा आयडीयावाल्यांचा फंडा क्लीअर आहे.

ती "अभी मै शाहरुख बना नही अभी........" आहे त्यात तो सुरुवातीला काय कॉफीन मधे चेहरा तारवटुन पडलेला असतो काय ? प्रत्यक्षात तो दिसायला तसाच आहे ?

बर ती चॉकोलेटची, नवी लग्न झालेली फिरायला गेली की नवरा जेव्हा तिकीटाच्या रांगेत उभा असतो तेव्हा किती घाणेरडेपणाने चॉकोलेट खाते(जस काही ते हॉट मेल्टेड आहे आणी ती २ वर्षाची कार्टी) आणी तो दुसरा नमुना तिचा उष्टा हात लागतो ते ही चाटतो अरे देवा.........
चॉकोलेट चांगले आहे पण जाहिराती किळस आणतात.

ती गुड डे ची नवी जाहिरात छान आहे. दोन मुलं आणि त्यांच्या आया बसमधून प्रवास करत असतात ती. कितीही वेळा पाहिली तरी आवडते.
>>
अगदी अगदी
मला पण खुप आवडते ती अ‍ॅड Happy

आसा हो ना! मलाही नाही आवडली पॉण्ड्सची जाहिरात

आयडियाच्या पुर्वीच्या जाहिराती आवडायच्या मला
स्पेशली ती (मला टॅग लाईन आठवत नाहीये पण) चार मित्रांचं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोस्टींग होतं आणि मग ते एकमेकांशी फोन वर बोलून त्या त्या प्रांतात अ‍ॅडजेस्ट होतात Happy
एकदम रिअल काही तरी वाटायचं त्यात
हे पमकिन पमकिन काहीही आहे

आयडीयाच्या सगळ्याच जाहीराती छानच असतात नेहमी.... अभीषेक वगळता...
हनीबनीचेही पिक्चरायझेशन खुप छानेय... देशाच्या कानाकोपर्‍यात आमचे नेटवर्क पोहचलेय हा मेसेज छानपैकी पोहचतोय... अ‍ॅटलिस्ट माझ्यापर्यंतरी... Happy
धरम जोभी हो... हर त्योहार मनाना जरुरी है... ही टॅगलाईन तितकीशी नाही आवडली... त्याएवजी... त्योहार कोईभी हो... हरएकने मनाना जरूरी है... अशी टॅगलाईन जास्त अपिल झाली असती मला... पण परत एकदा... कॉन्सेप्ट छानचेय...

हिरोहोंडाच्या जाहीराती नाही आवडल्या...
हिरोहोंडा सायकलीची जाहीरात अजुन पाहीली नाहीये... पण दिदी सांगत होती... रय्यान (५) ला विचारले तुला हवीये ती सायकल... तर तो म्हणाला नको त्यावरुन पडायला होतं... त्यात शेवटी सायकल का मुलगा पडताना दखवलेय बहुधा...

गिझरची एक अ‍ॅड येते... बाई दिवसभर काय काय सहन करुन येते... नि शेवटी आंघोळ करुन सगळी घाण धुवुन टाकते... सुरुवातीला डेटॉलची अ‍ॅड वाटलेली... अगदीच बकवास अ‍ॅड आहे ती....

Pages