मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी ती धोनी आणि टिमची अ‍ॅड पाहिलीये का?
(मी काल दुरदर्शनवर पाहिली म्हणजे कदाचित बरीच जुनी असावी )
कशाची आहे ते नेमक्म आठवत नाहीये पण १८ वर्षाखालील टिमने पण विश्वकरंडक जिंकला तर त्याचा कॅप्टन धोनी आणि टिमला सांगत असतो की आपण सेमच आहोत.
त्यावर धोनी म्हणतो तुला काय म्हणायचय की तुझ्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही?
त्यावर हा म्हणतो आहे ना... मी तुमच्या टीममध्ये येऊ शकतो पण तुम्ही माझ्या नाही....
मस्त वाटते ती अ‍ॅड मला आवडली Happy

फ्रुटीची नवीन शाहरुखवाली अ‍ॅड मस्त आहे. त्या लहान मुलांचे एक्स्प्रेशन्स जबरी आहेत.आणि शेवटी लहान मुली कसल्या भारी हसतात. मुळातली संकल्पना पण भारी आहे. रिफ्रेशिंग अ‍ॅड!

मला ती कथकलीवाली अ‍ॅड अजिबात आवडली नाही, प्राचीन भारतीय कलेची टिंगल केली आहे, माझ्या भावना दुखावल्या!>>>>>>>> दुसरी अ‍ॅड ती जपानी बाई ची सुध्दा......त्यात प्राचीन जपानी कलेची टिंगल केली आहे....माझ्या फेसबुक वरच्या जपानी मैत्रीणीच्या भावना दुखावल्या........:)

ACC Cement ची रमेश देवांनी केलेली जाहीरात काल पाहीली. एकदम मस्त झाली आहे. जाहीरात संपेपर्यंत वाटत होते एखाद्या सरबताची जाहीरात असेल म्हणून... मस्त....

ACC Cement ची रमेश देवांनी केलेली जाहीरात काल पाहीली. >>>>>>>>>खरंच मला वाटल ...अजुन कुठल तरी फ्रुर्टी किंवा असच काहीतरी पेयाची जाहिरात असणार..पण मस्त आहे.जेव्हा आजोबा विचारतो.. गाँव कैसा है...तेव्हा तो नातु किती मिश्किल पणे हसतो... Happy

ती अर्जुन रामपालची ग्रीनप्लाय प्लायवूडची जाहिरात खूप आवडली. शेवटच्या सीनमध्ये त्याच्या चेहर्यावरच्या भावना पण मस्त दाखवल्यात.

हो. एसीसी सिमेन्ट आणि ग्रीनप्लाय दोन्ही जाहिराती मस्तच. ग्रीनप्लायची जाहिरात एकदम एका मिनिटात सिनेमा- अशी आहे. संगीत पण भारी आहे तिचं.

>>फ्रुटीची नवीन शाहरुखवाली अ‍ॅड मस्त आहे. त्या लहान मुलांचे एक्स्प्रेशन्स जबरी आहेत.आणि शेवटी लहान मुली कसल्या भारी हसतात

अगदी अगदी. ती छोटी तर टाळी वाजवून त्यांच्याकडे बोट दाखवून मस्त हसते.

मला अमिताभची गोल्ड स्टार कुकीजची अ‍ॅड अजिबात आवडत नाही. कसला खत्रूडपणे 'अच्छा आप सोचने भी लगे है' असं त्या नोकराला म्हणतो. त्याच्या गुजरात टूरिझमच्या अ‍ॅडसनी तर डोकं उठवलंय. काल सीएसआय बघताना तर प्रत्येक ब्रेकमध्ये लावत होते.

दिया मिर्झा wildstone च्या जाहिरातीमधे.. काय वाईट वेळ आली आहे बिचारीवर.. अ‍ॅड पण नाही आनि ती पण नाही आवडली Sad

अ‍ॅक्च्युअली यावेळेचे झुझु नाही आवडले इतके. पहिली त्यांची 'तयारी'ची अ‍ॅड मस्त होती. पण आता ते 'तयार' होऊन जातात- ते नाही जमले खास.

फ्रूटीची अ‍ॅड मात्र एक नंबर आहे. गाणं, लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव एक नंबर.
त्यामुळे त्यात शारूक असूनही टोचत नाही फारसा Proud

कुछ मीठा हो जाए च्याही आयपील सीझनच्या अ‍ॅड्ज आल्या आहेत. त्याही ओकेच आहेत.

दिया मिर्झा- अगदी अगदी!

अ‍ॅक्च्युअली यावेळेचे झुझु नाही आवडले इतके. पहिली त्यांची 'तयारी'ची अ‍ॅड मस्त होती. पण आता ते 'तयार' होऊन जातात- ते नाही जमले खास.++११११११११११११११११११११११११११११११

आणी कॅडबरीची ती टीम बदलनेका शुभारंभ तर मस्तच आहे
(त्यामुळे माझ्या बहिणीने टीम बदलली आणी माझ्या कडुन १२० ची सिल्क घेतली Uhoh उगाच Uhoh )
पण अ‍ॅड मस्त!

फ्रूटीची अ‍ॅड मात्र एक नंबर आहे. गाणं, लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव एक नंबर.
त्यामुळे त्यात शारूक असूनही टोचत नाही फारसा>>> +१ Happy

त्यातली जिन्गल मस्त आहे. वेग हळुहळु वाढतो.

फ्रूटीची अ‍ॅड मात्र एक नंबर आहे. गाणं, लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव एक नंबर.
त्यामुळे त्यात शारूक असूनही टोचत नाही फारसा>> फ्रूटीवालेमूर्ख आहेत. एवढा शाहरूखसारखा सुपरस्टार घ्यायचा (तेपण करोडो रूपये देऊन) आणि अ‍ॅडमधे त्याला काहीच भाव नाही... तिथे शारूखपेक्षा दुसरा कुठलाही पपलू टीव्ही अ‍ॅक्टर चालून गेला असता. कारण, खरी गंमत तर त्या इतरांच्या एक्स्प्रेशनमधेच आहे.

मला सोनीचं आयपीएल कॅम्पेन पण आवडलं. सिर्फ देखनेका नै Happy

शारुख आणि ते पपलू यात फार फरक कुठेय? हां, शारुख खप्पड म्हातारा आहे ते एक जाउद्या!!!
गुजरात टूरिझम अ‍ॅड्स वैताग आहेत, मला सारखं तो एकदम 'एक रहेन इर, एक रहेन बीर' म्हणेल असं वाट्तं!!!

शारुख आणि ते पपलू यात फार फरक कुठेय? >>आगावा, तेच तर म्हणतेय, एवढे पैसे घालून सुपरस्टार घ्यायचा, आणि त्याचा जाहिरातीमधे उपयोग काहीच नाही.. मग त्यापेक्षा एक साधारण ओळखीचा चेहरा घेतला अस्ता तर उरलेल्या पैशात अजून बीटीएल कॅम्पेन्स करता आली नसती का?

जेम्सची ती 'नो एजबार फॉर फेव कलर' वाली अ‍ॅड पण मस्त आहे. ज्यात जेम्सच्या गोळ्यांनी काहीतरी क्राफ्ट बवलेले असते आणि हा माणुस त्यातली फेव रंगाची गोळी काढतो आणि सगळेच स्ट्र्क्चर कोसळते. तो माणुस हळुच गोळी तोंडात टाकतो ते एक्स्प्रेशन भारी!

इन जनरल मला जेम्सची नवीन 'रहो उमरलेस' वाली थीम आवडलीच.

तिथे शारूखपेक्षा दुसरा कुठलाही पपलू टीव्ही अ‍ॅक्टर चालून गेला असता. >>>> Lol
काही डोके त्या अ‍ॅडवाल्यांना सुध्दा आहे हे लक्षात असु द्या नाही तर ते मायबोलीवर प्रतिसाद देत आणि मायबोलीवाले अ‍ॅड बनवत असते.

ते मायबोलीवर प्रतिसाद देत आणि मायबोलीवाले अ‍ॅड बनवत असते.>>स्नेहत८२, मायबोलीवर जाहिरातक्षेत्रातलं कुणीच येत नाही असं तुम्हाला वाटतं का? Wink

Pages