मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर जाहिरातक्षेत्रातलं कुणीच येत नाही असं तुम्हाला वाटतं का? > अहो पण जे येतात त्यांना असे प्रश्न नाही पडत ना Wink
त्यांना ब्रँड व्हॅल्यु काय चीज असते हे चांगलेच ठाउक आहे.;)

त्यांना ब्रँड व्हॅल्यु काय चीज असते हे चांगलेच ठाउक आहे>> हो क्का? मग तुम्हाला माहित आहे का ब्रँड व्हॅल्यु? इमेज व्हॅल्यु अथवा ब्रँड रीकॉल.

जरा आम्हा पामरांना पण समजवा जरा प्लीज.

रिया, हसू नकोस. हसण्यावारी नेण्याची गोष्ट आहे का? Light 1

त्यासाठी मायबोलीवरचे जाहिराती क्षेत्रात काम करणार्यांना भेटा. ते व्यवस्थीत सांगतील>>> बरं. धन्यवाद.

नंदीनी सॉरी Proud
तुला जाहिराती क्षेत्रात काम करणारं कोणी सापडलं की मला पण सांग Proud
मी पण माझ्या शंका विचारेन Lol

नी Proud

ते जाहीरातवाले भेटले कि माझा निरोप सांगा त्यांना. अनामिका सिरीयलच्या मधे अधे येणा-या जाहिराती मला बिल्कूल आवडत नाहीत. आमच्या एका चॅनलवर एक हॉरर शो आहे. त्यात माणसं असतात आणि अचानक आडवी येतात असं दाखवलंय. त्याच्या मधे मधे टाका म्हणावं जाहिराती. सलग दाखवली कि घाबरायला होतं खूप.

माझा जाहीरातक्षेत्राशी खूप जवळून संबंध येतो. या फील्डमधला सर्वात महत्वाचा घटक मी आहे असं विधान मी इथे बिनदिक्कतपणे करू शकतो.



























आले लगेच बोटण्या सरसावत. भला पेशन्स भी कोई चीज होती है कि नही ?
तर मी आहे प्रेक्षक Lol
म्हणून मी त्या अधिकाराने सांगू शकतो.
जरा नीट कामं करा. तुम्हाला आवडेल ते नका माथी मारू आमच्या. आम्हाला आवडेल अशा बनवा जाहीराती. कित्येकदा कशाची जाहीरात आहे हे सुद्धा कळत नाही.

वरची पोस्ट मी लिहीली ? Uhoh
मी हे सांगायला आलो ओतो कि तुम्ही जाहीरातदार असाल तर कुठल्या कंपनीला काम द्याल ?
दाग अच्छे है मधे ते वाक्य लक्षात राहतं खरं, पण जाहीरात एरियलची आहे कि सर्फची आहे हे नाही राहत ध्यानात.
निरमाच्या जाहीरातीत मात्र प्रॉडक्ट ठसवलंय. या जाहीरातीला पुरस्कारही मिळालाय. पण लोक नाक मुरडतात. पण पैसे लावणारा याच कंपनीला काम देईल यात शंका आहे का ?

उच्च अभिरूची आणि जाहीरातदार या दोघांचा मध्य साधलाय तो फेव्हिकॉलच्या जाहीरातीत. अफलातून कवीकल्पना आणि प्रॉडक्ट ठसठशीतपणे पुढे आणण्याचं कसब.

कुठली अ‍ॅड कंपनी आहे ही ? खरंच उत्सुकता आहे या माणसांबद्दल जाणून घेण्याची.

तर मी आहे प्रेक्षक
म्हणून मी त्या अधिकाराने सांगू शकतो. <<<
हे पटले.

वाचक, प्रेक्षक, रसिक, आस्वादक याचा प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार असतोच्च. कलाकृती तयार करणार्‍यांना/ सादर करणार्‍यांना किती डोकं असतं किंवा नसतं याचा इथे काहीही संबंध नाही.

एक डॉ पान्डा के लिये पाच पाच पान्डा <<
ती मला पण जाम आवडलेली आहे.

काल अमूल माचोच्या अ‍ॅडस नक्की कशाची जाहिरात करतात ते मुळीच कळत नाही.
कॅडबरी सिल्कच्या बरबटलेल्या अ‍ॅडस आता डोक्यात जायला लागल्यात.

अमूल माचो च्या अ‍ॅडस भरकटलेल्या आहेत. ते थोडस येनकेन प्रकारेण प्रकरण वाटत.

नुसत्या भरकटलेल्या नाहीत येडचाप आहेत आणि डोक्यात जातात. Angry
सैफची ती दुसरी अ‍ॅड पण आहे ना? अ‍ॅपी फिज ची.. ती पण ठार फ्लॉप आहे.

कुठली अ‍ॅड कंपनी आहे ही ? खरंच उत्सुकता आहे या माणसांबद्दल जाणून घेण्याची.
>>ओ एन एम. Ogilvy & Mather. आयडीयेची कल्पना "पियुष पांडे" या भन्नाट माणसाची आहे.

फ्रूटीची शाहरुखवाली अ‍ॅड बघताना (अन ब्रेक मधे पुन्हा पुन्हा दिसत रहाताना) काल मीच नव्हे तर लिम्बी पण जाम भडकली होती! अज्जिबात आवडली नै ती अ‍ॅड.
तो एकेकटा पितोय फ्रूटीची बाटली तोन्डाला लावून, पिताना ओठावरुन ओघळ वहाताहेत (हे म्हणजे स्लाईसच्या कटरिनाच्या ओठावरच्या शिल्लक ठिपक्याची गचाळ नक्कल करायचा केलेला प्रयत्न, कुठे कटरिनाच्या ओठावरचा स्लाईसचा ठिपका, अन कुठे लाळ गळल्यागत शाहरूखच्या ओठाकडेने ओघळणारे फ्रूटी....:P )
"श्शी बै.... असे का पितात कधी? हेच का शिकणार मुले यान्चे बघुन?" हे प्रश्न लिम्बीचे!
अन खरोखरच, लहान मुलात कुणाची तरी लाळ गळताना दाखवलीच्चे.
सगळे लहान थोर आशाळभूतासारखे टुकत बघत बसतात.... लिम्बी जाम करवादते, काय आदर्श घ्यायचा? असे एकेकट्याने पीत रहायचे अन बाकीच्यान्नी लाळगाळत टुकत बघत राहयचे? कधी जन्मात न मिळाल्यागत? भिकार्‍यागत? वगैरे वगैरे.
कधी नव्हे ते लिम्बी अन माझे एकमत झाले की फ्रूटीची शाहरुखवाली अ‍ॅड भिक्कार आहे, अगदी वर त्या थुन्कीवाल्या टुथपेस्टसारखीच गचाळ आहे, पोरान्वर घाणेरडे भिकारडे संस्कार होऊ देणारी आहे.

>>>> कॅडबरी सिल्कच्या बरबटलेल्या अ‍ॅडस आता डोक्यात जायला लागल्यात.>> +१. <<< +१००००००००००००००००००००००००
आताच नाही, पहिल्यान्दा पाहिल्यापासूनच डोक्यात जाताहेत. काय ते हात अन तोन्ड बरबटवुन घेणे! श्शी! य्याक.
आख्खा रायवळ/पायरी चुम्फुन चुम्फुन खाल्ला तरी आमची तोन्डे कधी अशी इतकी बरबटली नाहीत.
कदाचित अ‍ॅडवाल्यान्ना "जरा वेगळाच" संदेश द्यायचा असेल! Wink
किन्वा मग वासराला वात्सल्याने प्रेमाने चाटणारी गाय त्यान्च्या नजरेसमोर असेल Proud

आणि एक जाहिरात माझ्या डोक्यात जाते.
एक पोरगी बापाला भेटायला त्याच्य क्लिनिकात येते सफरचंद खात. आणि बरोब्बर तेव्हा रक्त दिसतं त्यावर. मग बाप एक टूथपेस्ट सुचवतो. आपल्या पोरीचे दात मजबूत नाहीत हे त्या बाबाला आधी माहिती नव्हतं? Uhoh

जाहिरात करून बख्खळ पैसे मिळतील म्हणून पोरीच्या दातातनं रक्त यायची वाट पहात होत नराधम बाप, पोर पण वात्रट, दात हालवणारी फळं खात फिरतेय.. नशिब फणस खात आली नाही Proud Rofl

गंमत म्हणजे तो बाबा डेंटिस्ट असतो ना? वेळच्यावेळ पोरीचे दात चेक करत नाही का? आम्हाला मात्र वर्षातून दोन वेळा दात तपासणी करून घ्या असा सल्ला द्यायला विसरत नाहीत Proud

सैफ करीनाची एक अ‍ॅड आहेना, ज्यामधे सैफ येऊन करीनाचे केस ओढतो वगैरे,,, ती जाहिरात पाहिली की मला रॅटॅटूईचा उंदीरमामा आठवतो Happy

>>>> ज्यामधे सैफ येऊन करीनाचे केस ओढतो वगैरे,,, <<<< अग हो नन्दिनी, ती जाहिरात पाहिली की केस ओढणार्‍या सैफला कानठळावा वाटतो.
शिन्चा बायान्चे केस काय ओढतो? अस्ला कस्ला क्रुर बिभत्सपणा हिडीसपणा? ती अ‍ॅड बघितली की मला अगदी द्रौपदीचे केस ओढत भर दरबारात फरफटवत नेणारा दु:शासन आठवतो!
की बाईचे केसान्ची वा अजुन कशाकशाचि ओढाताण करुन प्रेम व्यक्त करायचे अस्ते हा विकृत संदेश द्यायचा आहे?
असो. स्त्रीमुक्तिवाल्यान्चे लक्ष अजुन कसे जात नाही इकडे काय की.

Pages