जमलेच तर.......

Submitted by पुरंदरे शशांक on 31 January, 2011 - 05:58

जमलेच तर हसून पाहू कधी तरी खळखळून
नाही तर आहेच की उसने हसू ओढून ताणून

जमलेच तर फुलून येउ कधी तरी रसरसून
नाही तर आहेच की काटे-कुटे इथून तिथून

जमलेच तर गाऊन घेऊ कधी तरी मनापासून
नाही तर आहेच की तप्तसूर सदा उंचावून

जमलेच तर नाचून पाहू कधी तरी मोकळे होवून
नाही तर नाचतोच आहोत कुणाच्या तरी तालावर बाहुले बनून

जमलेच तर रडून घेऊ कधी तरी गदगदून
नाही तर आहेच नेहेमीचे नाटक नुसते मुसमुसुन

जमलेच तर देउ टक्कर कधी संकटा नजर भिडवून
नाही तर आहेच की बुजगावणे मान खाली पाडून

जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत सदैव फाटकी झोळी पसरून

जमलेच तर............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मनस्वी जीवन जगायचा प्रयत्न करायला हवा
हा आशय पोचतोय.
"जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत भिकार्‍यासारखे हात पसरून"

..... छान

सर्वांना धन्यवाद.......आवर्जून..... मनापासून !

अर्रे! मस्त!!
आवडलीच... Happy

पण दोन दोन ओळी दिसल्या की लय शोधायची सवय लागल्यामुळे थोडा अडखळलो... Happy

सर्वांना धन्यवाद.......आवर्जून..... मनापासून !

आहा, काय सुरेख लिहिलंय. मनापासून आवडलं.

" जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत सदैव फाटकी झोळी पसरून".....सुरेख.