Submitted by पुरंदरे शशांक on 31 January, 2011 - 05:58
जमलेच तर हसून पाहू कधी तरी खळखळून
नाही तर आहेच की उसने हसू ओढून ताणून
जमलेच तर फुलून येउ कधी तरी रसरसून
नाही तर आहेच की काटे-कुटे इथून तिथून
जमलेच तर गाऊन घेऊ कधी तरी मनापासून
नाही तर आहेच की तप्तसूर सदा उंचावून
जमलेच तर नाचून पाहू कधी तरी मोकळे होवून
नाही तर नाचतोच आहोत कुणाच्या तरी तालावर बाहुले बनून
जमलेच तर रडून घेऊ कधी तरी गदगदून
नाही तर आहेच नेहेमीचे नाटक नुसते मुसमुसुन
जमलेच तर देउ टक्कर कधी संकटा नजर भिडवून
नाही तर आहेच की बुजगावणे मान खाली पाडून
जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत सदैव फाटकी झोळी पसरून
जमलेच तर............
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जमेल, जमेल. नक्कीच जमेल
जमेल, जमेल. नक्कीच जमेल मनासारखं कधीतरी.
कविता खूप खूप आवडली.
शशांक दा, मस्तच लिहिले आहे..
शशांक दा,
मस्तच लिहिले आहे.. खूपच आवड्ली.
मनस्वी जीवन जगायचा प्रयत्न
मनस्वी जीवन जगायचा प्रयत्न करायला हवा
हा आशय पोचतोय.
"जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत भिकार्यासारखे हात पसरून"
..... छान
छान्,सुंदर कविता.
छान्,सुंदर कविता.
सुंदर आविष्कार!!
सुंदर आविष्कार!!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.......आवर्जून..... मनापासून !
कविता छान,विषयही छान.कळत नकळत
कविता छान,विषयही छान.कळत नकळत आपण दोन्ही प्रकारे जगतो.
अर्रे! मस्त!! आवडलीच... पण
अर्रे! मस्त!!
आवडलीच...
पण दोन दोन ओळी दिसल्या की लय शोधायची सवय लागल्यामुळे थोडा अडखळलो...
छान कविता.. खूप आवडली.
छान कविता.. खूप आवडली.
जमलेच तर फुलून येउ कधी तरी
जमलेच तर फुलून येउ कधी तरी रसरसून
मस्त
सुंदरच!
सुंदरच!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.......आवर्जून..... मनापासून !
खूप सुंदर कविता
खूप सुंदर कविता
खूप सुंदर कविता
खूप सुंदर कविता
किती छान. !!!
किती छान. !!!
कविता आवडली
कविता आवडली
आहा, काय सुरेख लिहिलंय.
आहा, काय सुरेख लिहिलंय. मनापासून आवडलं.
" जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत सदैव फाटकी झोळी पसरून".....सुरेख.