जमलेच तर...

जमलेच तर.......

Submitted by पुरंदरे शशांक on 31 January, 2011 - 05:58

जमलेच तर हसून पाहू कधी तरी खळखळून
नाही तर आहेच की उसने हसू ओढून ताणून

जमलेच तर फुलून येउ कधी तरी रसरसून
नाही तर आहेच की काटे-कुटे इथून तिथून

जमलेच तर गाऊन घेऊ कधी तरी मनापासून
नाही तर आहेच की तप्तसूर सदा उंचावून

जमलेच तर नाचून पाहू कधी तरी मोकळे होवून
नाही तर नाचतोच आहोत कुणाच्या तरी तालावर बाहुले बनून

जमलेच तर रडून घेऊ कधी तरी गदगदून
नाही तर आहेच नेहेमीचे नाटक नुसते मुसमुसुन

जमलेच तर देउ टक्कर कधी संकटा नजर भिडवून
नाही तर आहेच की बुजगावणे मान खाली पाडून

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जमलेच तर...