Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
एखाद्या मराठी शब्दाचा उगम
एखाद्या मराठी शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे हे बघायचे असल्यास कुठे शोधावे ?
A good dictionary would
A good dictionary would usually explain the etymology too.
'negative feedback' साठी
'negative feedback' साठी वैद्यकीय शास्त्राच्या संदर्भात मराठी शब्दसमूह हवा आहे.
('नकारात्मक अभिप्राय ' हे भाषांतर नको आहे. )
>>एखाद्या मराठी शब्दाचा उगम
>>एखाद्या मराठी शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे हे बघायचे असल्यास कुठे शोधावे ?
https://books.google.com/books?id=jNaNpCjNApIC&lpg=PT25&dq=vyutpatti&pg=...
गुगल बुक्स मधे एक पुस्तक उपलब्ध आहे (मराठी व्युत्पत्ती कोष). पूर्ण पुस्तक नाही पण अर्धा एक भाग आहे. थोडी कल्पना येईल. आवडले तर विकतही घेऊ शकाल.
'नतद्रष्ट' साठी इंग्रजी शब्द
'नतद्रष्ट' साठी इंग्रजी शब्द हवाय
>>negative feedback<<
>>negative feedback<<
दोष आलोचना/वर्णन्/विवेचन किंवा टीका. मराठीत टीका हि नेहेमी निगेटिवच असते. मराठी माणासाला पॉझिटिव टीका करता येत नाहि आणि केलेली पॉझिटिवली घेताहि येत नाहि...
कुमार सर,
कुमार सर,
ऋण/नकारात्म संवेदना/ संवेग?
आ रा रा,
आ रा रा,
नकारात्म संवेदना ठीक वाटतोय. तसे पूर्ण समाधान होणे अवघड आहे.
धन्यवाद
cost effective साठी एक मराठी
cost effective साठी एक मराठी शब्द सुचवा
'सतरंगी' म्हणजे काय ?
'सतरंगी' म्हणजे काय ?
सत्य रंगी असा एक अर्थबोध
सत्य रंगी असा एक अर्थबोध होतोय.
अवांतर,
गुगल केल्यास,
Showing results for सतरंगी
Did you mean सतरंजी ?
असे येईल असे डोक्यात येऊन हसू फुटले.
आभार
आभार
सतरंगी म्हणजे सप्तरंगी नाही
सतरंगी म्हणजे सप्तरंगी नाही का?
हो, सप्तरंगी असाच अर्थ आहे
हो, सप्तरंगी असाच अर्थ आहे
'उकडलेल्या आंब्याचे लोणचे' ला
'उकडलेल्या आंब्याचे लोणचे' ला काय म्हणतात ?
(कसले तरी फळ ?)
उकडांबा ना?
उकडांबा ना?
मागे २७ ऑगस्ट २००८ रोजी Bee
मागे २७ ऑगस्ट २००८ रोजी Bee ह्यांनी विचारले होते की 'यांचे, यांनी ही रूपे बरोबर आहेत की ह्यांचे, ह्यांनी?' त्या प्रश्नाला कोणीच उत्तर दिल्याचे आढळले नाही, म्हणूज हे उत्तर!
ह्याऐवजी 'या' हे बोलीभाषेतले रूप ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातही वापरले जात होते. मराठी- इंग्रजी शब्दकोशकार आणि कंपनीच्या सैन्यात कॅप्टन असलेला थॉमस कॅन्डी हा मराठी सदाशिवपेठी पंडितांनी केलेल्या अशा लिखाणांतले 'या' खोडून दरवेळी तेथे 'ह्या' करीत असे.
'ह्या' हे 'हा'चे प्रत्ययापूर्वी होणारे सामान्यरूप आहे. 'या' हे कसलेच सामान्यरूप नाही, त्यामुळे 'ह्याच्या' ऐवजी 'याच्या' वापरणे व्याकरणदृष्ट्या चूक आहे.
पण आता फार उशीर झाला आहे, हजारो मराठी पुस्तकांतून 'या'ला हद्दपार करणे शक्य नाही. कवितांतून तर अजिबात नाही. उदा०
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी (गायिका आशा भोसले)
या इथे तरुतळी विसरले गीत (कवी वा.रा. कांत)
भाग्यवती मी या संसारी (चित्रपटाचे नाव)
बंदिवान मी या संसारी (गायिका आशा भोसले)
नतद्रष्ट म्हणजे अति कृपण ;
नतद्रष्ट म्हणजे अति कृपण ; पराकाष्ठेचा कंजूष ; कवडीचुंबक. इंग्रजीत अर्थात् Miser, Penny-pincher, Scrooge.
अतरंगी म्हणजे काय ?
अतरंगी म्हणजे काय ?
तुमचा मिपावरचा आयडी?
तुमचा मिपावरचा आयडी?
गोदूताई
गोदूताई
मिपावरचा आयडी? म्हणजे ?
मिपावरचा आयडी? म्हणजे ?
मिपावरचा आयडी? म्हणजे ?
मिपावरचा आयडी? म्हणजे ?
चांदोबा भागलास का ' मधल्या
चांदोबा भागलास का ' मधल्या भागलास चा अर्थ काय . तो अजून कुठे वापरला गेला आहे का
भागणे या क्रियापदाचे इतर अर्थ
भागणे या क्रियापदाचे इतर अर्थ - आकाराने कमी होणे, थकणे.
भागणे या क्रियापदाचे इतर अर्थ
भागणे या क्रियापदाचे इतर अर्थ - आकाराने कमी होणे, थकणे. > धन्यवाद !
. म्हणजे `दमून-भागून' मधे वापरतो तसाच.
comfort zone करता मराठी
comfort zone करता मराठी प्रतिशब्द कोणता, किंबहुना out of comfort zone करता मराठी प्रतिशब्द कोणता
comfort zone >>> सवयीचं
comfort zone >>> सवयीचं वर्तुळ ?
वर्तुळावरून मला परीघ सुचतोय.
धन्यवाद माधव
वर्तुळावरून मला परीघ सुचतोय.
comfort zone म्हणजे नेहेमीच्या परिघातले जगणे
out of comfort zone म्हणजे परिघाबाहेर
Comfort zone = सुखरुपाचा परीघ
Comfort zone = सुखरुपाचा परीघ
Outside of comfort zone = सुखरुपाच्या परीघाबाहेर
अवांतर:
सुखरूप म्हणजे सुरक्षित या अर्थाने आपण बहुतेक वेळा वापरतो. पण सुखरुप म्हणजे comfortable असाही अर्थ होऊ शकतो.
नामदेवांचा एक अभंग आहे - सुखालागी करिसी तळमळ. त्यातील पहील्या दोन ओळी अशा आहेत
सुखालागी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाचि सुखरूप होशी
जन्मोजन्मीचे दुःख विसरशी
यात सुखरुप या शब्दाचा अर्थ स्वतः सुखाचे रुप होणे असा सुरेख लावला आहे. त्यावरून मला हा शब्दप्रयोग सुचला.
Pages