Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
हा प्रचंड मोठा धागा वाचायला
हा प्रचंड मोठा धागा वाचायला घेतला. त्यात पान १४ आणि १६ वर
unitary method साठी मराठी शब्द विचारला होता. 2००९ ची विचारणा आहे. पुढच्या पानांत कदाचित कोणी उत्तर दिले असेल किंवा लोक विसरूनही गेले असतील. पण ' एकमान पद्धती ' असा शब्द आहे. निदान पूर्वी होता.
हा प्रचंड मोठा धागा वाचायला
दुबार प्रेषण. का. टा.
धन्यवाद भरत!
धन्यवाद भरत!
गिरा हा नवा शब्द समजला.
गिरा हा नवा शब्द समजला.
'दिव्या गिर्वाण भारती' आठवले.
'दिव्या गिर्वाण भारती' आठवले.
मधुमधुरा तव गिरा
मधुमधुरा तव गिरा
असं नाट्यगीत पण आहे .
एका जुन्या पाककृतीच्या
एका जुन्या पाककृतीच्या पुस्तकात हरपररेवडी कोशींबीर अशी कृती वाचली.
हरपर रेवडी म्हणजे काय ?
रायआवळा.
रायआवळा.
पुस्तकात रायते आहे बहुदा,
पुस्तकात रायते आहे बहुदा, कोशिंबीर नाही.
आज ऐकण्यात आलेला एक सुंदर
आज ऐकण्यात आलेला एक सुंदर व्हिडीओ..... शांता शेळके या व्यक्तिमत्वाबद्दल एक कुतूहल आणि जिव्हाळा आधीपासूनच आहे..... त्यामुळे स्मृतिगंधच्या गोंदण या शांता शेळकेंवरच्या सिरिजमधले सगळेच व्हिडिओ आवडतायत..... हा विशेष आवडला!!
शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्यात ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना हा आवडेल
https://youtu.be/v2f3_GWEap4
स्वरुप, मस्त ऊकल केली आहे
स्वरुप, मस्त ऊकल केली आहे शब्दान्ची
शिघ्रसिद्धिगणक या शब्दाचा
शिघ्रसिद्धिगणक या शब्दाचा नेमका अर्थ काय? लँड सर्व्हेच्या संदर्भातला आहे. व्हॅल्यूएशन का?
इंग्रजीत नक्की काय म्हणतात? गुगल वेगळेच प्रकार दाखवत आहे.
शीघ्रगणक म्हणजे ready
शीघ्रगणक म्हणजे ready reckoner
हे तुमच्या उपयोगाचे आहे.
https://shabdakosh.marathi.gov.in/
Thank you भरत. ही साईट माहिती
Thank you भरत. ही साईट माहिती नव्हती. उपयोगी पडेल.
हा प्रश्न या धाग्यावर खरंतर
हा प्रश्न या धाग्यावर खरंतर योग्य नसावा पण विचारते इथेच.
'सोज्वळ' शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द कोणता?
Modest?
Modest?
prudish?
prudish?
ओके. हे दोन्ही बरेच जवळ
ओके. हे दोन्ही बरेच जवळ जाणारे शब्द आहेत. धन्यवाद मै आणि सामो.
chaste?
chaste?
हा पण चालेल. धन्यवाद स्वाती.
हा पण चालेल. धन्यवाद स्वाती.
बालकवींच्या "श्रावणमासी हर्ष
बालकवींच्या "श्रावणमासी हर्ष मानसी " या कवितेत
"सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती" अशी ओळ आहे यात पुरोपकंठी म्हणजे काय ?हा प्रश्न आधी विचारला गेला आहे ( व काही जणांनी तो गावकुसाजवळ असा सांगितलं आहे)
त्या संबंधाने असे म्हणता येईल
ही ओळ
सुंदर परडी घेऊनि हाती ,पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला , रम्य फुले पत्री खुडती
असे एकत्र करून वाचल्यास
"पुरोपकंठी या फुलमाला " यात
तर्कानुरूप असा अर्थ की पूर म्हणजे body शरीर , उपकंठ म्हणजे गळ्याभोवती, (पुढे संदर्भात अर्थ आहेत) पुढच्या ओळीत कवीने या फुलमाला असे शब्द पुढे ढकलून काव्यस्वातंत्र्य घेतले आहे त्यावरून याचा अर्थ शरीरावर गळ्याभोवती फुलमाला घातलेल्या अशा (सुंदर बाला)
यातून पुरोपकंठी म्हणजे" शरीरावर गळ्याभोवती" असा अर्थ बालकवींना अभिप्रेत असावा
संदर्भ
उपकण्ठ upakaṇṭha a. Near, proximate. -ण्ठः; -ण्ठम् 1 Proximity, vicinity, neighbourhood; प्राप तालीवनश्याममुपकण्ठं महोदधेः R.4.34;13.48; Ku.7.51; Māl.9.2; आकृष्य चापं श्रवणोपकण्ठे Ś.3.5. to the very ear. तस्योपकण्ठे घननीलकण्ठः Ku. -2 Space near a village or its boundary. -3 One of a horse's paces. -ind. 1 Upon the neck, near the throat; प्रेम्णोपकण्ठं मुहुरङ्कभाजः Śi.3.36. -2 In the vicinity of, near.
आपटे संस्कृत इंग्रजी शब्दकोश
पुर pura a. [पृ-क] Full of, filled with. -रम् 1 A town, city (containing large buildings, surrounded by a ditch, and not less than one Krośa in extent); पुरे तावन्तमेवास्य तनोति रविरातपम् Ku.2.33; R.1.59. -2 A castle, fortress, stronghold. -3 A house, residence, abode. -4 The body; नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् Bg.5.13. -5 The female apartments. -6 N. of the town पाटलिपुत्र; q. v. -7 The calyx of a flower, or any cup formed of leaves. -8 A brothel. -9 The skin. -10 Bdellium. -11 An upper story. -12 A store-house. -13 A fragrant grass (नागरमुस्ता).
आपटे संस्कृत इंग्रजी शब्दकोश
गळ्याभोवती फुलमाला घातल्या
गळ्याभोवती फुलमाला घातल्या आहेत म्हणजे फुले खुडून झाली असावीत?
गावच्या वेशीवर फुल पत्रे खुडण्यास जमलेल्या सुंदर बाला म्हणजे जणु गावानेच कण्ठी फुलमाला घातली आहे असे वाटत आहे असा अर्थ होऊ शकेल का?
ते पुर आहे - पूर नाही.
ते पुर आहे - पूर नाही.
उपकंठ = जवळ; शेजारीं ( गळ्यापर्यंत असाही अर्थ आहे. उप म्हणजे जवळ. कंठ = काठ
तेव्हा या सुंदर स्त्रिया गावाबाहेर पण जवळच फुले वेचायला गेल्या असाव्यात.
तेव्हा या सुंदर स्त्रिया
तेव्हा या सुंदर स्त्रिया गावाबाहेर पण जवळच फुले वेचायला गेल्या असाव्यात. >> शाळेत ही कविता शिकवली तेंव्हा असाच अर्थ शिकवलेला .
किंवा शुध्दमती बालांनी परड्या
किंवा शुध्दमती बालांनी परड्या हाती धरल्या असतील अथवा गळ्यात अडकवल्या असतील.
गावच्या वेशीवर फुल पत्रे
गावच्या वेशीवर फुल पत्रे खुडण्यास जमलेल्या सुंदर बाला म्हणजे जणु गावानेच कण्ठी फुलमाला घातली आहे असे वाटत आहे >> +१. असाच अर्थ वाटतो आहे. "पुरोपकंठी 'शुद्धमती सुंदर बाला' या फुलमाला"
भरत यांनी सुचविलेला अर्थच
भरत यांनी सुचविलेला अर्थच योग्य वाटतो.
ते गळ्यात फुलमाला वगैरे ओढून ताणून अर्थ लावल्यासारखे वाटते.
कारण कवितेतला शब्दांचा क्रम तसा नाही.
पुरोपकंठी या फुलमाला....... असे कुठेही म्हटलेले नाही !!!!
मानव दादांनी सुचवलेला अर्थही फार काव्यात्म आणि सुंदर आहे.
बुन्थ ह्या शब्दाचा अर्थ काय,
बुन्थ ह्या शब्दाचा अर्थ काय, व्युत्पत्ती काय ?
बुन्थ या शब्दानं ही गवळण
बुन्थ या शब्दानं ही गवळण आठवली नाही तर नवलच!
https://youtu.be/5uGfmxBl1uE?si=UPHGAA74QsiSpbsU
खोळ बुन्थी घेऊनी ..... कानडा
खोळ बुन्थी घेऊनी ..... कानडा विठ्ठलू!
लेअर/ आवरण/ झाकायला घेतलेला पदर अशा प्रकारचा अर्थ असावा.
Pages