Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
मला हे ऐकवू नकोस >>>
मला हे ऐकवू नकोस >>>
Do I look interested?
I wouldn't say that if I were you.
अमेरिकेत वुड फार वापरतात, शुड नाही. You should/shouldn't ऐवजी I would /wouldn't वापरतात.
मिममधला मनुष्य कोणे ? >
मिममधला मनुष्य कोणे ? > हिंदुस्थानी भाऊ. युटूबर सर्च मारल्यास जुने विडिओ सापडतील पण निव्वळ शिवीगाळ असल्याने त्याला सगळ्या समाजमाध्यमांवर ब्यान केले आहे. (हेडफोन अलर्ट)
प्राचीनच्या प्रश्नाला जे
प्राचीनच्या प्रश्नाला जे उत्तर तिला आवडणार नाही त्याला ती जे उत्तर आवडलं त्याने उत्तर देऊ शकते. अशा प्रश्नाला उत्तर सुचवणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा, नाही?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ओके जिद्दु
ओके जिद्दु
Abhijeet Patil
Abhijeet Patil
Teach your granny. म्हणजे मला
Teach your granny. म्हणजे मला बरंच माहिती आहे { तुझ्या आजीपेक्षा}. तिला ऐकव. अर्थात हे ज्याला आपण ओळखतो त्याच्याशी बोलताना वापरता येईल.
मजा आहे! वरचं वाक्य शोधल्यावर
मजा आहे! वरचं वाक्य शोधल्यावर मला 'Teaching grandmother to suck eggs' हे सापडलं. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी व्यक्तीला शहाणपणा शिकवायला जाणे - असा नकारात्मक अर्थ आहे. आपल्याकडे 'बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्' - लहानांकडूनही चांगल्या गोष्टी शिकाव्या असं आहे. मराठीत असं काही आहे का? (दोन्हीपैकी कुठल्याही अर्थाचं... 'आला मोठा शहाणा' सारखं). शब्दार्थ ह्या विषयाशी संबंधित नाही, त्यामुळे अवांतर होत असल्यास दुसरीकडे चर्चा करू.
तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी
तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी व्यक्तीला शहाणपणा शिकवायला जाणे >>>
'लहान तोंडी मोठा घास' ?
तुझा पगार किती, तुझी लायकी
तुझा पगार किती, तुझी लायकी काय, तू बोलतोस काय......
हो, खरंच की!
हो, खरंच की!
बोलतेस किती, उंची किती हे
बोलतेस किती, उंची किती हे वाक्य आहे मोरुची मावशी नाटकात. पण नाटकातल्या पात्राची उंची दिसते, इतर ठिकाणची जाणवते पात्र समोर दिसले नाही तरी.
(कोणालाही लागू नाही फक्त शब्दार्थ.)
"पदराला खार लावून घेणे"
"पदराला खार लावून घेणे"
- फुकटचं काम करायला जाणे आणि नुकसान सोसणे.
चांदणशेला चा नेमका अर्थ ?
चांदणशेला चा नेमका अर्थ ?
शेला हे उंची वस्त्र असते. मग चांदणशेला ही निव्वळ उपमा आहे की काय?
......
या कवितेत आहे हा शब्द:
राधा म्हणते,
"......
.....तुजसाठी पैंजण पायी
तुजसाठी काजळ डोळां
भेटींस तुझ्या मी येते -
घेउनिया चांदणशेला"
गोर्या गोर्या वहीनीची
गोर्या गोर्या वहीनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी
म्हणजे चांदणशेला
....................... असे माझे इन्टरप्रिटेशन
धन्यवाद
धन्यवाद
तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी
तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी व्यक्तीला शहाणपणा शिकवायला जाणे >>>
>>>Don't teach your father how to make children.
चांदणशेला >>> चांदणे पांघरणे
चांदणशेला >>> चांदणे पांघरणे असाही अर्थ होतो. एकाच शब्दात टिपूर चांदण्याचं सौंदर्य आणि भेटीची वेळ (रात्र) दोन्ही दर्शवलं जातंय.
माधव धन्यवाद
माधव धन्यवाद
परवली हा 'परवानगी' याचा
परवली हा 'परवानगी' याचा समानार्थी शब्द आहे का?
परवली (चा शब्द)= पासवर्ड.
परवली (चा शब्द)= पासवर्ड.
परवानगी = परमिशन.
परवली हा 'परवानगी' याचा
परवली हा 'परवानगी' याचा समानार्थी शब्द आहे का? >> नाही
1) परवल (p. S0145) परवल
1) परवल (p. S0145) परवल—स्त्री. संकेत; खूण. परवलीचा शब्द. [इं. परोल]
parole : a watchword given only to officers of the guard and of the day
पॅरोल आणि परवली, हा संबंध
पॅरोल आणि परवली, हा संबंध माहीत नव्हता. मस्तच भरत.
'पाचावर धारण बसणे' - यातले
'पाचावर धारण बसणे' - यातले पाच कोण कोण?
पांचावर धारण बसणें-(भीति इ
पांचावर धारण बसणें-(भीति इ॰कानें) गर्भगळित होणें, घाबरून जाणें. रुपयास पांचशेर धान्य म्हणजे अत्यंत महागाई होणें, दुष्काळ पडणें अशी स्थिति होती त्यावेळचा वाक्प्रचार. बहुधा सैन्यांतील
धन्यवाद भरतजी!
धन्यवाद भरतजी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जी मत जोडो ना!
जी मत जोडो ना!
माझी अशी समजूत होती की,
माझी अशी समजूत होती की, पाचावर धारण बसणे म्हणजे पंचप्राण कंठाशी येतील इतकी भीती वाटणे.
मूळ प्रयोग - पाचही ज्ञानेंद्रिये केंद्रित करून धारणा (अष्टांग योगात ध्यानाच्या आधीची स्थिती) करणे - इथून आला आहे का?
कोल्हटकरांच्या महाराष्ट्र
कोल्हटकरांच्या महाराष्ट्र गीतात शेवटच्या कडव्यात "गिरा" असा शब्द येतो त्याचा अर्थ काय आहे?
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा॥ ५ ॥
गिरा—स्त्री. वाचा; भाषा; वचन.
गिरा—स्त्री. वाचा; भाषा; वचन.
संस्कृत गिर् -
Pages