नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

Submitted by रैना on 5 October, 2010 - 04:36

मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...

वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.

गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच धागा.

केन रॉबिन्सनची ही लिंक शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता इथे द्यावीशी वाटली. बघीतली असेल तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित.

रैना, फार छान धागा सुरु केलास. चर्चा वाचते आहे. माझा ह्या चर्चेला किती हातभार लागू शकेल ते माहित नाही पण आमचा मुलगा तू सांगितलेल्या वयोगटातच बसत असल्याने लिहिल्याशिवाय राहवत नाही.
गेल्या वर्षीपर्यंत ( त्याचे वय वर्ष दोन ते जवळ जवळ तीन ) त्याला शाळा अशी नव्हतीच. Early Childhood Family Education म्हणून एक पब्लिक स्कूलचा प्रोग्रॅम असतो तिथे त्याला घातले होते. आठवड्यातून एकदाच दीड तास शाळा आणि त्यात आम्हीही त्याच्याबरोबर बसणे बंधनकारक होते. त्याला इंग्लिश अजिबातच येत नसल्याने आणि शाळेची वेळ एवढी कमी असल्याने तिथे तो जवळजवळ काहीच शिकला नाही ( म्हणजे लक्षात येण्याइतपत तरी नाही. ) नाही म्हणायला गाणी म्हणणे त्याला आवडायचे आणि मिश्र धान्य, डाळी ओतलेल्या मोठ्या टबात हात घालून खेळायला आवडायचे. वेळ कमी असली तरी अतिशय हलक्याफुलक्या पण निश्चित पद्धतीने दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. फ्लॅशकार्डस वापरुन सोपे विरुद्धार्थी शब्द शिकवणे ( इन्-आऊट, हॉट्-कोल्ड वगैरे ) , कारसीट सेफ्टी, स्वच्छतेच्या सवयी वगैरे. मुलाला इंग्लिश येत नसल्याने हे काहीच समजायचे नाही त्याचे मला फार वाईट वाटायचे पण नियमित रोज काही तास शाळा सुरु झाली की मुलं भराभर इंग्लिश पिक अप करतात असं ऐकून असल्याने आणि त्याच्या शाळेतूनही घरात मातॄभाषा बोलत राहण्याला खूपच सपोर्ट मिळाल्याने इंग्लिश अजिबात बोललो नाही घरात. थोड्याफार र्‍हाईम्स, अल्फाबेट्स, एक ते दहा अंक, थोडेफार रंग ह्याची त्याला घरात खेळताखेळता ओळख झाली होती.
ह्या एप्रिलपासून त्याला माँटेसरीत घातले आहे. शाळा आठवड्याचे पाच दिवस चार तास असते. इथल्या पब्लिक स्कूल च्या प्रिस्कूल प्रोग्रॅमपेक्षा हा अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे. वर्गात तीन ते सहा वयोगटाची मुलं असतात. सुरुवातीला एकत्र बसवून थोडे मूल्यशिक्षण, रोजचा दिवस, वार, महिना, राष्ट्रगीत अशी उजळणी झाल्यावर आठवड्यातून दोनदा स्पॅनिश, दोनदा आर्ट / म्युझिक आणि एकदा काँम्प्युटरसाठी पाऊण तास दुसर्‍या खोलीत नेतात. त्यानंतर वर्गात आलं की प्रत्येकजण आपापली मॅट पसरुन ठराविक अ‍ॅक्टिव्हिटी घेऊन बसतो. प्रत्येक मूल आपापल्या आवडीनुसार आणि कुवतीनुसार पुढे जात राहते. छोट्या मुलांना ( किंवा मोठ्यांनाही ) हवं असल्यास कलरिंग, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे साच्यात बसवणे, एक कापड देऊन त्याच्या नाड्या बांधणे, ड्रॉपरने द्रवपदार्थ बाटलीत ओतणे, मणी ओवणे ( थोडक्यात motor skills developing ) अशा गोष्टी दिल्या जातात. त्यानंतर हळूहळू चित्रांवरुन विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवणे, आधी अल्फाबेट्सचे साउंड्स ओळखणे, मग ते वापरुन वेगवेगळे शब्द तयार करायला शिकवणे, मग चित्र देऊन ते स्पेलिंग स्वतः तयार करणे, अक्षरे ट्रेस करायला देणे, गणिताची ओळख, मणी मोजून त्याप्रमाणे अंक ओळखणे, बेरीज-वजाबाकी, भूगोल- ह्यामध्ये मोठ्या कागदावर खंड ओळखून चिकटवणे, देश ओळखणे वगैरे असते. अर्धा तास लंचरुममध्ये जातो आणि शेवटचा अर्धा तास बाहेर खेळायला नेतात.
अर्थात हे दोन वर्षांच्या काळात शिकणे अपेक्षित आहे आणि शिकलेच पाहिजे हा अट्टहास नाही ही गोष्ट मला फारच आवडली. त्याच्यासाठी कुठल्याही टेस्ट्स पास व्हायचे ओझे नाही. mixed age group असल्याने छोट्या मुलांना मोठी मुलं दादागिरी करतील की काय अशी एक भिती होती. थोड्याफार प्रमाणात सुरुवातीला माझा मुलगा खूप रडत असताना तसं वाटलंही पण एकंदरित दुसर्‍यांच्या कामाला हात लावायचा नाही, दुसर्‍यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर पाय द्यायचा नाही अशी एकूण शिस्त असल्याने ते फारसं शक्य होत नाही.
माझ्या मुलाला परवा एक ते पन्नास आकडे असलेला कागद दिला होता. त्याखालच्या चौकोनात त्याने आकडे काढावे अशी अपेक्षा होती. आकड्यांनाही पहिल्यांदा ट्रेसिंग नको का असे मला वाटले. त्याने बर्‍यापैकी काढायचा प्रयत्न केला आणि चार सगळीकडे उलटा काढला ( mirror image ) येत्या मिटिंगमध्ये हे बोलणार आहे त्याच्या टिचर्सशी. इतक्या लवकर त्याला अंक का काढायला लावले हे ही विचारणार आहे.
रैना, तू दिलेली sheet कठीण वाटली मुलांसाठी. मी एक पुस्तक आणले आहे त्यात अशा बर्‍याच गोष्टी आहेत. त्यात चार चित्रांतले एक वेगळे सर्कल करणे, वेगळ्या रंगाचे सर्कल करणे, डाव्या साईडला एक चित्र देऊन उजव्या साईडला तेच चार वेगवेगळ्या आकारांत देणे आणि डावीकडच्या आकाराशी जुळणारे ओळखणे हे त्याला जमते पण तू दिलेले नाही जमत. our kids learn English as a second language. कदाचित तू तिला माहित असलेले मराठी शब्द घेऊन करुन पाहिलेस तर जमेल का ? ( पण मग त्यांना बाराखडी येत नसते. मग अजून गोंधळ होईल का ? )

बाकी वरच्या भल्यामोठ्या पोस्टचे माझ्यापुरते सार एवढेच आहे की तो अभ्यासात ठराविक वयात किती पुढे जातो ह्याची मला अजिबात चिंता नाही आणि भारतात आलो तरी मार्क्स, ग्रेड्स ह्या मूर्खपणाला बळी पडायचे नाहीये हे कायम मनावर बिंबवत राहणार आहे ( पालकांनाही peer pressure असते Happy ) पण समवयस्कांशी, मोठ्यांशी संवाद साधणे, घरात शिकवू शकत नाही अशा बर्‍याच गोष्टी मुलं शाळेत शिकतात, समूहात असताना पाळायची शिस्त आणि मुख्य म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी facilitation ह्या गोष्टींसाठी शाळेला पर्याय नाही. माझ्या मुलाला अमूक गोष्ट आलीच पाहिजे हा अट्टहास आपणच ठेवला नाही म्हणजे झालं. तसेही त्यांच्यापेक्षा आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत ना ? आता मागे वळून बघताना पहिली-दुसरी सोडाच पण दहावी-बारावीचा बागलबुवाही किती अनाठायी होता असं तुम्हाला वाटत नाही का ? Happy

रैना तु दिलेली वर्कशीट कठीण वाटते आहे.
एवढ्या लहान मुलांना चित्र बघुन , त्याचे नाव सांगुन स्पेलिंग लक्षात घेणे आणी मग पहिल अक्षर सर्कल करणे हे फारच झालं. याला अक्षर अट्टाहास, शब्द अट्टाहास म्हणायला हवं.
दुसरी तर फारच कठीण आहे. शक्यच नाही करणं. हे असलं चौथी स्कॉलरशिपला सुरुवातीला असायचं अस वाटतय.
या वर्कशीट मुलांना आल्या नाही तर काय करतात शाळेत? मुलांना न जमणार्‍या गोष्टी करायला लावणं फारच फ्रस्टेटींग असत त्यांच्यासाठी. त्यांच्या कॉन्फिडन्स वर परिणाम होऊ शकतो अस मला वाटतं.
परत शाळेत गप्पा, गाणी आणी गोष्टी नाहीत ही गोष्ट सुद्धा फारच खटकणारी आहे. मुलांना वेगवेगळी रिदम इंस्ट्रमेंटस हाताळणे, कसल्याही गप्पा, मोकळे खेळणे, गोष्टी सांगणे हे फारच आवडते आणी ते नर्सरीत तरी किमान असावे.
तुला वेळ, एनर्जी असेल, तुझ्या बरोबर अजुन काही पालक असतील तर शाळेशी बोलुन बघ, नाहीतर शाळा बदलायचा विचार कर.

<माझं इथल वैयक्तिक मत काढुन टाकत आहे. उगीच या बाफचा विषय बदलायला नको. बाकी चांगली चर्चा चालु आहे. >

>>त्याने बर्‍यापैकी काढायचा प्रयत्न केला आणि चार सगळीकडे उलटा काढला ( mirror image ) येत्या मिटिंगमध्ये हे बोलणार आहे त्याच्या टिचर्सशी. इतक्या लवकर त्याला अंक का काढायला लावले हे ही विचारणार आहे.>>
उर्मी, मिरर इमेजची काळजी फारशी करु नकोस. बहुतांश मुलं ५ वर्षाची होई पर्यंत ठराविक आकडे किंवा अक्षरांची मिरर इमेज काढतात. माझी मुलगी आणि तिच्या वर्गातली मुलं सुद्धा करायची असं. पण आपण काहीही न सांगता आपोआप त्यांचं त्यांना कळतं आणि ते बरोबर काढतात.

रैना, ऑड वन आउट खरंच त्या वयोगटाला अवघड आहे.

कारकुन निर्माण करायची? की खंडीने इंजिनीअर निर्माण करण्याची आणि मग जॉब नाहीत म्हणुन गळे काढण्याची?>> कारकुन, खंडीभर इंजिनीअर ही सुध्दा रोजचे काम सुरळीत चालण्यासाठी समाजाची गरज आहे,so no harm in it.

आपला कुठला अभ्यासक्रम वेगळ्या वाटा निवडायला मदत करतो? >>> हे वेगळ्या वाटा निवडणारे लोक काय भोगत असतात हे जवळुन बघा आणि मग ठरवा वेगळी वाट निवडायची कि नाही ते.

कितीजण त्यांना निव्वळ आवडतं म्हणुन एखादी गोष्ट शिकु शकतात. >> ज्यांना पैशांची, ते कमवण्याची तमा नाही, किंवा घरचा मजबुत आर्थिक पाठिंबा आहे असे लोक. आकडा उपलब्ध नाही.

सगळ काही शिकताना याचा नोकरी साठी उपयोग होईल का नाही हा एकमेव निकष असतो.>> कारण नोकरीत मिळणार्‍या पैशातुन किरणामालाचे ,दुधाचे ,लाइट चे बिल,घराच्या कर्जाचे हप्ते फिटु शकतात.

या रेसमुळे कित्येक शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक, हरहुन्नरी माणसं आपण निर्माण व्हायच्या आधीच नाहीशी केली असतील.> अशी माणसे समाजात आपोआप तयार होत असतात. they are destined to do it.if your child belongs to this group of creative people he or she will definitely opt out of race ,but make sure you support him.शाळेने त्यांचे काय करावे हे आपण कोण ठरवणार?कसे ठरविणार?त्यामुळे काळजी नको.

या असल्या रेस मधुन ऑप्ट आउट होणं हेच बर असं मलातरी वाटतं.>> हा उत्साह टीकवा म्हणजे मिळवली
अशा मौलिक चर्चा करणारे पालक मुलगा जेव्हा म्हणतो की मी DJ होणार आहे तेव्हा कसे react करतात ते पाहिलय मी.

बाकी चर्चा चांगली चालु आहे.

आता या वर्कशीट् योग्य कश्या??? हे पाहू.

एक तर यात कोठेही मुलांना शब्दाचे स्पेलिंग यावे वगैरे अपेक्षित नाही. हा सरळ सरळ शब्दोच्चाराचा(Phonetics) अभ्यास आहे, similar sound identification म्हणू हवं तर. वरील शीटस््मधली चित्रं ही मुलांना एकदम अनोळखी अशी नसतील. आधी अल्फाबेटस् शिकवताना हीच चित्रं दाखवून शिकवली असतील.

'T' चे उदाहरण घेऊ. 'T' शिकवताना मुलांना Tचे फ्लॅशकार्ड दाखवून 'टी फॉर टायगर, टी फॉर टॅप,टी फॉर टॉप....' असे शिकवले असेल. म्हणजे मुलांच्या मनात चित्र आणि अल्फाबेटचा उच्चार यांचा संबंध लागला असेल. ही मुलं 'T' ला 'T' न म्हणता ' टी फॉर टायगर/टॅप/टॉप....' म्हणतील. टायगरचे चित्र दाखवले तर ' टी फॉर टायगर' म्हणतील. पुढे एल्केजी मध्ये हळूहळू हा 'फॉर...' गाळला जाईल. आत्ता फक्त 'T' चा उच्चार 'ट्'सारखा होतो हेच शिकवले जाते. मग Odd One out सोडवताना पहिल्या उदाहरणात 'टी फॉर टॉप', 'टी फॉर टॅप' आणि 'एक्स फॉर एक्समसट्री' दिले आहे. मुलांना चित्रं ओळखायला लावतात आणि एकदम अक्षराचा उच्चार बदलला तर ते आउट आहे असे समजावले जाते. यात शब्दाच्या स्पेलिंगचा प्रश्न येतोच कुठे??? केवळ उच्चारांतला फरक समजणे आले यात. ते जमतं मुलांना. या वयाच्या मुलांना जास्त डिटेलमध्ये जाऊन समजावायचे नसते. रिपीटेशन करत राहिले की हळूहळू डोक्यात पक्के होत जाते. आता याला काहीजण पोपटपंची म्हणतील, पण या वयाची मुलं अनुकरण, सतत बघून, ऐकूनच शिकतात, हे खरं आहे. Happy

आधी अल्फाबेट्सचे साउंड्स ओळखणे, मग ते वापरुन वेगवेगळे शब्द तयार करायला शिकवणे,>>> ही एक पायरीच आहे शब्दोच्चार शिकवायची. आपण घरातही मुलांना 'या खोलीत Tपासून सुरु होणारे शब्द कोणते आहेत सांग बरं' म्हणून घरीही सराव करवू शकतो. याचा उपयोग लहान, सोप्पीसोप्पी स्पेलिंग्ज शिकायला होतो १लीत. Happy
१ल्या वर्कशीटमध्येही मुलं चित्रं पाहिलं की त्याच्याशी संबंधित अक्षर ओळखू शकतात.

मुग्धानंद तुम्हाला विपू केली आहे.

१० ते १६ वयातील मुलांच्या शिक्षणा बाबतही बीबी उघड्ला आहे. आई मी मोठा झालोय नावाचा. तिथेही भेट देऊन लिहा. सॉरी रैना रिक्षा फिरवली आहे.

इथे विद्यारण्य नावाची वेगळी शाळा आहे तेथील माहिती घेऊन इथे लिहीन. सातवी परेन्त परीक्षाच नाहीत.
बाकी ही बरीच वेगळी शाळा आहे.

आता प्रश्न असा की वर्षाखेरीपर्यंत जर मुलांना हे जमलं नाही तर शाळा काय करणार? एखादा वाईट शेरा देतील आणि पुढच्या वर्गात ढकलतील की परत याच वर्गात बसवतील?

अगदी २-३ महिन्याच्या फरकाने मुलांच्या ग्रास्पिंगमध्ये फरक पडतो हे खरं असलं तरी पूर्ण वर्षाचा वेळ मुलांना दिलेला आहे हेही खरंय. जरा मोठी मुलं लवकर शिकतील आणि लहान मुलं वर्षाच्या शेवटी शेवटी Happy

प्राची- सॉरी पण नाही पटले. वर्कशीटस असण्याला माझा विरोध नाही. पण नर्सरीच्या स्तरावर शाळेला फक्त ३ महिने झाले असताना आणि ३ वर्षाखालील मुलांसाठी हे योग्य नाही. खूप जास्त फोकस रायटिंगवर, रट्टेबाजीवर आणि शब्दांची गंमत नाहीच हे पटतच नाही.
हा अक्षरअट्टाहास आणि त्याही पुढे जाऊन अक्षरदुराग्रह वाटतो.

जिथे हेल्प्ड असा शेरा आहे तिथे पालकसभेत तक्रारी येतात शिक्षकांच्या की पोरांनी हे आपले आपण सोडवणे अपेक्षित आहे. Not at all acceptable. माझ्या मते दुराग्रह धरणे चुकीचे आहे.

तसेच वर अगोच्या पोस्टमधील फ्लॅश कार्ड पद्धत बरोबर वाटते. तुम्ही त्या त्या अक्षराची गंमत सांगा ना वर्कशीट मधुन. पर्यायांची निवड करता येणे ही अपेक्षा धरणे हे perception shape करण्याच्या दृष्टीने चुकीची वाटते.
शर्मिला- उत्तम लिंक. धन्यवाद.

माझे मत सावली,मंजिरी, अगो(उर्मी) सारखे. माझ्यामते पर्याय वगैरे अजून १-२ वर्षांनी सिनियरला योग्य ठरावे.

माझा प्रॉब्लेम मुलीला येणे हा नसुन, मुलीला हे शिकवायची मला गरजच वाटत नाही हा आहे. Happy
आपण पान १ वरील सगळ्यांच्या अपेक्षांशी/मतांशी या वर्कशीट ताडुन पहाता नर्सरीच्या उद्दिष्टांशी तफावत जाणवते. ती फक्त शाळेच्या धोरणांमुळे किंवा आमच्या मतांमुळे यावर मार्गदर्शन व्हावे. आणि हो आमच्या बुद्धीचाही दोष असु शकतो. शाळा ही रमण्याची / आनंदाची गोष्ट आहे पूर्वप्राथमिक शिक्षणापर्यंत अशी समजूत होती.

एक काम करुयात.
१) २.८ वर्ष- ३.५ वर्षातल्या किती मुलांना ही उदारहणं सोडवता येतील असे तुम्हाला वाटते?
(मी केला आहे हा प्रयोग.तुम्ही एकेका मुलाला देऊन पहा आणि लिहा कृपया. आपण निष्कर्ष ताडुन पाहुयात.) Happy

आर्क- टोटली नाही पटले.

ज्यांना पैशांची, ते कमवण्याची तमा नाही, किंवा घरचा मजबुत आर्थिक पाठिंबा आहे असे लोक. आकडा उपलब्ध नाही. >>> नाही. वेगळ्या वाटा चोखाळणे ही आंतरिक गरज असते.

अशी माणसे समाजात आपोआप तयार होत असतात. they are destined to do it.if your child belongs to this group of creative people he or she will definitely opt out of race ,but make sure you support him.शाळेने त्यांचे काय करावे हे आपण कोण ठरवणार?कसे ठरविणार?त्यामुळे काळजी नको.>>> आपोआप??
but make sure you support him.>> ओके.

शाळेने त्यांचे काय करावे हे आपण कोण ठरवणार?कसे ठरविणार?त्यामुळे काळजी नको>>> का ?मुलांवर दबाव न टाकता शिकवावे ही अपेक्षाच चुकीची आहे? का?

हा उत्साह टीकवा म्हणजे मिळवली. अशा मौलिक चर्चा करणारे पालक मुलगा जेव्हा म्हणतो की मी DJ होणार आहे तेव्हा कसे react करतात ते पाहिलय मी.>>> हो. पालकांनाही मर्यादित स्वातंत्र्यच द्यायचे असते ही गोष्ट खरी आहे. पण टोन पटला नाही.
१. विचार करणे
२. त्यानुसार कृती करणे. परिणामांना सामोरे जाणे
३. कृतीच न करंणे
४. विचाराच न करणे
यापैकी फक्त ४ किंवा २ योग्य आहेत असे तुला म्हणायचे आहे का?

रैना
<माझा प्रॉब्लेम मुलीला येणे हा नसुन, मुलीला हे शिकवायची मला गरजच वाटत नाही हा आहे.> अगदी अगदी Happy
आपण निष्कर्ष ताडुन पाहुयात> मी बघते देऊन घरी. पण बहुतेक नाही येणार तीला. कारण अजुन सगळी अक्षरे आणि चित्र झालीच नाहीएत शाळेत. तो एक वर्षाचा प्लॅन आहे.
आर्क चा रिप्लाय माझ्या पोस्ट्ला होता. इथे उगाच वाद होईल आणी विषय भरकटेल म्हणुन मी माझी पोस्ट डिलिट केलीए.

रैना, उत्तम बाफ अन चांगली चर्चा.

माझा मुलगा साडेतीन वर्षांचा असतांना आम्ही सिंगापुरला आलो. त्यामुळे प्लेस्कुल पूर्ण अन नर्सरी अर्ध वर्ष भारतात केली. इथे त्याला अर्धे वर्षे नर्सरी करावी लागली.

भारतात असतांना तो किडझीला जायचा तिथे वर्कशीट्स वगैरे नसायचेत. त्याला भरपूर गाणी शिवाय वन टू ट्वेंटी बोलता अन ओळखता यायचे. ए टू झेड बोलता आणि ओळखता यायचेत. काही सोपी अक्षरे (टी, एच,आय, एल) आणि अंक (वन, झीरो, फोर) लिहिता यायचेत. तिथे खेळता खेळता तो भरपूर शिकला.
पण इथे आल्यावर जाणवले की तिथे नर्सरीत शिकवलेले इथे सिनिअर केजीला शिकवतात. नर्सरी मध्ये फक्त मज्जा Happy गाणी म्हणा, पाणी पाणी खेळा, सॅंड प्ले, प्लेडोने वाट्टेल ते बनवा, रेघोट्या मारत बसा ई.ई. पण त्यामुळे झाले काय की त्याला शाळेचा कंटाळा यायला लागलेला Sad

मला कल्पना नाही की भारतात जी पद्धत आहे ती बरोबर की इथली. तू दाखवलेले वर्कशीट्स त्याच्या शाळेत मागच्या वर्षी म्हणजे सिनिअर केजीच्या लेव्हलला करुन घेताय. मला वाटते नर्सरीच्या मानाने ते वर्कशीट्स खूपच कठीण आहेत. कदाचित तुझी लेक आयसीएसइ सिलॅबस मध्ये आहे म्हणुन एवढे कठीण असावेत (नक्की कल्पना नाही).

सावलीशी सहमत. मला वाटते तू शाळेशी बोलुन घ्यावे. शाळा बदलणे हाही एक पर्याय आहेच.

या निमित्ताने खूप दिवसापासून पडलेला एक प्रश्नही विचारते परत आल्यानंतर मला माझ्या मुलाला एसएससी बोर्डाच्या शाळेत घालायचय. पण माझ्या ओळखीत कुणीच असे केलेले नाही. तर इथे कुणी असल्यास आपले अनुभव शेअर कराल का?
अर्क, तुमची बरीच मते पटली पण आता याधीची पोस्ट पटली नाही. पालकांइतकाच शाळेचाही मुलांच्या प्रगतीत सहभाग असावा. शिक्षण शिक्षा नाही हे मुलांना पटावे एवढे तरी शाळेने करावेच. शास्त्रज्ञ आपोआप तयार होतात हे ही पटले नाही. ते लोक निराळेच असतात हे मान्य पण तरीही त्या वाक्याशी सहमत नाही.

रैना, उत्तम बाफ अन चांगली चर्चा.

माझा मुलगा साडेतीन वर्षांचा असतांना आम्ही सिंगापुरला आलो. त्यामुळे प्लेस्कुल पूर्ण अन नर्सरी अर्ध वर्ष भारतात केली. इथे त्याला अर्धे वर्षे नर्सरी करावी लागली.

भारतात असतांना तो किडझीला जायचा तिथे वर्कशीट्स वगैरे नसायचेत. त्याला भरपूर गाणी शिवाय वन टू ट्वेंटी बोलता अन ओळखता यायचे. ए टू झेड बोलता आणि ओळखता यायचेत. काही सोपी अक्षरे (टी, एच,आय, एल) आणि अंक (वन, झीरो, फोर) लिहिता यायचेत. तिथे खेळता खेळता तो भरपूर शिकला.
पण इथे आल्यावर जाणवले की तिथे नर्सरीत शिकवलेले इथे सिनिअर केजीला शिकवतात. नर्सरी मध्ये फक्त मज्जा Happy गाणी म्हणा, पाणी पाणी खेळा, सॅंड प्ले, प्लेडोने वाट्टेल ते बनवा, रेघोट्या मारत बसा ई.ई. पण त्यामुळे झाले काय की त्याला शाळेचा कंटाळा यायला लागलेला Sad

मला कल्पना नाही की भारतात जी पद्धत आहे ती बरोबर की इथली. तू दाखवलेले वर्कशीट्स त्याच्या शाळेत मागच्या वर्षी म्हणजे सिनिअर केजीच्या लेव्हलला करुन घेताय. मला वाटते नर्सरीच्या मानाने ते वर्कशीट्स खूपच कठीण आहेत. कदाचित तुझी लेक आयसीएसइ सिलॅबस मध्ये आहे म्हणुन एवढे कठीण असावेत (नक्की कल्पना नाही).

सावलीशी सहमत. मला वाटते तू शाळेशी बोलुन घ्यावे. शाळा बदलणे हाही एक पर्याय आहेच.

या निमित्ताने खूप दिवसापासून पडलेला एक प्रश्नही विचारते परत आल्यानंतर मला माझ्या मुलाला एसएससी बोर्डाच्या शाळेत घालायचय. पण माझ्या ओळखीत कुणीच असे केलेले नाही. तर इथे कुणी असल्यास आपले अनुभव शेअर कराल का?
अर्क, तुमची बरीच मते पटली पण आता याधीची पोस्ट पटली नाही. पालकांइतकाच शाळेचाही मुलांच्या प्रगतीत सहभाग असावा. शिक्षण शिक्षा नाही हे मुलांना पटावे एवढे तरी शाळेने करावेच. शास्त्रज्ञ आपोआप तयार होतात हे ही पटले नाही. ते लोक निराळेच असतात हे मान्य पण तरीही त्या वाक्याशी सहमत नाही.

बरोबर आहे, रैनानी दिलेलं वर्कशीट 4 ते 5 वयोगटासाठी योग्य आहे.
आत्ता फक्त सुरुवातीला टी पासुन चालु होणार्‍या शब्दांमधे वेगवेगळ्या माध्यमातुन भर पडणे, आणि मग हळुहळु दिलेल्या वर्कशीट मधे यापैकी टी पासुन सुरु होणारे शब्द कुठले हे मुलांना कळणे, एवढंच अपेक्षित आहे.

३-४ वर्शांपर्यंत काहीच आले नाही तरी हरकत नसावी.

सिलॅबस मात्र सगळिकडे असते. इथल्या माँटेसरीची गम्म्त. जय ५ वर्षांचा होता तेंव्हा त्याच्या रिपोर्ट मध्ये लिहिले होते की त्याने binomial theorem आत्मसात केली आहे. त्याच्या शिक्षिकेला सुद्धा तो काय प्रकार आहे हे माहीत नसावे असा माझा समज होता म्हणुन मला माहित नसल्यासारखे दाखवत तिला विचारले की ते काय असते. उत्तर मिळाले कि ठोकळे कसे रचायचे हे तो शिकला आहे. हसायला आले पण भलत्या सलत्या गोष्टी करुन घेत नाहीत हे समजुन बरेही वाटले.

लहानपणी शिकवाल ते मुले शिकतात - नंतर ते तसेच लक्षात राहिलच असे नाही. खूप जास्त सांगीतले तर घोकंपट्टीची पण सवय लागु शकते.

बापरे रैना, अगं ह्या वर्कशीट्स तर ४.५ च्या पुढच्या मुलांच्या आहेत. माझ्या मुलीला ( jr. k.g. ला) आत्ता हे सुरु होतंय.
मला वाटतं तुझ्या शाळेचे २ प्रॉब्लेम्स आहेत -
१. कमी वय असलेल्या मुलांना नर्सरीत घेणे. त्यामुळे त्या मुलांना नर्सरी च्या लेवल चे ही समजणे अवघड जाते. ४-५ महीन्यांनी पण मुलांच्या आकलन शक्ती मध्ये बराच फरक पडतो.
२. नर्सरी मध्ये ज्यु. के.जी. चा सिलॅबस करायला लावणे.

मला हे बघून असा प्रश्न पडला आहे की असे केल्याने मुले पुढे जातील असे खरंच वाटू शकते का ? ज्या वयात मुलांना जे कळणे शक्यही नाही आणि अपेक्शितच नाही ते करण्याचा अट्टाहास असलेली शाळा आणि त्यात समाधानी असणारे पालक दोन्हीचे खेदमिश्रीत आश्चर्य आणि त्यात भरडलेल्या मुलांबद्दल वाईट वाटते.

छान चर्चा चाललेय.
माझि मुलगीपण याच वयोगटात आहे.तिला नर्सरीला वरिल सर्व अभ्यास आहे(odd one out सोडुन).
प्रथम मलापण भिती वाट्ली की याने तिच्यावर प्रेशर येइल का?पण ती हा अभ्यास फार enjoy करते.

मला वाटते हल्लीचि पिढी खुप स्मार्ट आहे,तसेच sources of knowledge सहज उपलब्ध आहेत.

रैना,तुमच्या समस्येचे कारण कदाचित शाळेचा,शिकवण्याचा फरक असेल.

लहानपणी शिकवाल ते मुले शिकतात >>अनुमोदन.

माफ करा पण ,माझा एक प्रश्न मी इथे विचार्ते.
आम्हि बंगळुरात आहोत. त्यामुळे शाळेत फक्त english syllabus व थोडे हिंदी,कन्नड गाणी शिकवतात.
मी तिला घरी मराठी बाराखडी,अंक शिकवते.पण ती शाळेच्या अभ्यासार्खे मन लावुन करत नाहि. Sad
मला कुणी सांगाल का मराठी कसे शिकवायचे ? वय ३.५ वर्षे.

१. कमी वय असलेल्या मुलांना नर्सरीत घेणे. त्यामुळे त्या मुलांना नर्सरी च्या लेवल चे ही समजणे अवघड जाते. ४-५ महीन्यांनी पण मुलांच्या आकलन शक्ती मध्ये बराच फरक पडतो.
२. नर्सरी मध्ये ज्यु. के.जी. चा सिलॅबस करायला लावणे.>>>
अनुमोदन. बेसिकमेही लोचा है Happy

आता प्रश्न असा की वर्षाखेरीपर्यंत जर मुलांना हे जमलं नाही तर शाळा काय करणार? एखादा वाईट शेरा देतील आणि पुढच्या वर्गात ढकलतील की परत याच वर्गात बसवतील? >>>
हे विचारलं आहेस का शाळेत??? लेक खूप लहान आहे आणि तिच्यावर ताण पडतोय असं वाटत असेल तर तू वर्षं रिपीट करवू शकतेस ना? किंवा शाळा बदलणं हाही पर्याय आहेच.

सकाळी केलेली गडबड लक्शात आल्यावर लगेच पोस्ट टाकली होती, पण ती सेव्ह होण्याआधीच लाइट गेल्याने मग मोबाइलवरून टाकली. त्यामुळे ३दा पोस्ट पडली :फ़िदी:

एका वर्षी नर्सरी आणि एल्केजी दोन्ही वर्गासाठी एकाच वेळी वर्कशीटस बनवल्याने जरा गोंधळ झाला माझा. Happy
नर्सरीत अगोने लिहील्याप्रमाणे त्यात चार चित्रांतले एक वेगळे सर्कल करणे, वेगळ्या रंगाचे सर्कल करणे, डाव्या साईडला एक चित्र देऊन उजव्या साईडला तेच चार वेगवेगळ्या आकारांत देणे आणि डावीकडच्या आकाराशी जुळणारे ओळखणे या प्रकारच्या वर्कशीटस असाव्यात.

जिथे हेल्प्ड असा शेरा आहे तिथे पालकसभेत तक्रारी येतात शिक्षकांच्या की पोरांनी हे आपले आपण सोडवणे अपेक्षित आहे.>>> हे तर एकदम चुकीचं आहे.

रैना प्रथम तू हा बीबी चालू केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद .
प्राची छान माहिती दिली आहेस आणखिन लिहि. माझा मुलगा ३ वर्षाचा आहे तो इथे पुण्यात चॅलेंजर नावाच्या शाळेत जातो. नर्सरीचा सिलॅबस सिबिएस्सी चा असला तरी फार लोड नसतो त्याला . म्हणजे फक्त शुक्रवारीच वही देतात ग्रुहपाठाला . खरेतर अमेरिकेतून इथे आल्यावर तो इथे adjust होइल की नाही ही जरा शंकाच होतीच पण सुदैवाने तसे झाले नाहि . पण हो महिन्याच्या महिन्याला दिलेले सिलॅबस (nursery rhymes,hindi poems) खूपच जास्त आहे असे वाटते. कारण एकच या वयात एका जागी बसणं अवघड असत मुलांसाठी. ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे ती मुले पाठ करून मोकळी होतात (हा पाठांतर प्रकार सध्या तरी आमच्याकडे खूपच आवडीने केला जातो). बाकी जनरल नॉलेज चेही पुस्तक आहे त्यांना राष्ट्रीय पक्षी कोणता?जंगलाचा राजा कोण? इ.इ. साधे सोपे प्रश्न (आपल्या द्रुष्टीने) असतात .
छान विचार करायला लावणा-या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल रैना पुन्हा एकदा धन्यवाद.

Pages