नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

Submitted by रैना on 5 October, 2010 - 04:36

मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...

वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.

गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माझ्या मुलाला एसएससी बोर्डाच्या शाळेत घालायचय. पण माझ्या ओळखीत कुणीच असे केलेले नाही.>> प्रिंसेस, काय सांगतेस. आजकाल एसएससी बोर्डात घालत नाहीत? का बरं? पूनमने लिहीले आहे बघ एसएससी बोर्डाबाबत.

जयू- मराठी अंकलिपी शिकवायचा अजून अनुभव नाही. कोणीतरी कृपया मार्गदर्शन करा.

स्वप्ना_तुषार- नर्सरीला जनरल नॉलेज?

मंजिरी, मवा- अनुमोदन.

आश्चिग-सिलॅबस मात्र सगळिकडे असते. >>लहानपणी शिकवाल ते मुले शिकतात - नंतर ते तसेच लक्षात राहिलच असे नाही. खूप जास्त सांगीतले तर घोकंपट्टीची पण सवय लागु शकते.>> हे कसे काय?
जास्त कोंबु नये असेच आपण म्हणतोय ना?

प्राची/सावली- आम्ही खालील गोष्टी करणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे ते वर्ष रीपीट करु देत नाहीत. मुलांना आले नाहीच तर ते काय करणार हे माहित नाही. विचारून पहाते. सध्या ते फक्त शेरे मारून, पालक सभेत घरी अभ्यास करवा वगैरे सांगतात. या महिन्याअखेरी रिझल्ट (?) मिळणार आहे म्हणे. Happy
१) पटवून देणे आणि त्यांचा काही दृष्टीकोन (असलाच) तर तो समजून घेणे.२) ते एका मुला/पालकांसाठी कदाचीत काही कस्टमाईज करु श़कणार नाहीत. तेव्हा त्यांना कमीतकमी आमच्यावर दबाव टाकु नये यासाठी गरज पडल्यास लेखी निवेदन देणार. ३) तेही नाही पटले तर ही शाळा सोडणार.

वा वा जबरी जिव्हाळ्याचा विषय आहे. Happy माझा अनुभव लिहावासा वाटतोय.

माझ्या मुलीला शाळेत घातले. CBSC बोर्ड. शिस्तीची,मोठी आणि नावाजलेली शाळा. पहिल्या दिवशी आनंदात गेलेली मुलगी ३ दिवसात शाळेची तयारी सुरू झाली की रडून गोंधळ घालू लागली. सुरुवातीलाच असेम्ब्ली वगैरे साठी या नर्सरीच्या अडीच वय वर्षाच्या मुलांनी नीट (नं रडता, एका जागी नं हलता ई.) उभे रहावे अशा काहीच्या काही अपेक्षा. पहिले ६-७ दिवस क्लासटिचरने तिच्या कलाने घेतले पण मग ४० ईतर मुलांना "शिकवायचे" असल्याने तिने ते बंद करून आमचे बौद्धिक घेणे सुरू केले. मग क्लासटिचरच्या तक्रारी, डायरीवर शेरे, हीला काऊन्सिलींगची गरज आहे वगैरे सगळे यथासांग सुरू झाले. या सगळ्या मधे रडत रडत पोएम्स, कलरींग, स्लॅन्टींग लाईन्स स्ट्रेट लाईन्स असा अबब अभ्यास!!
शेवटी महिना होत आला तरी ती तिथे रुळत नाही हे बघून आम्ही शाळा बदलायची पक्के केले. नशिबाने प्रिन्सिपल उत्तम शिक्षक आणि भला माणूस होता. त्यांनी पण आमच्या निर्णयाला दुजोरा दिला शिवाय आणखी असेच सुरू राहीले तर तिला कायमची शाळा आवडेनाशी होईल असेही मत व्यक्त केले. त्या नंतर त्यांनी आम्हाला आणखी २ दुसर्‍या लहान शाळा सुचवल्या. जिथे फक्त नर्सरी, केजी१ आणि २ इतकेच वर्ग असतात.
पहिल्याच शाळेत गेल्यावर तिथल्या प्रिन्सिपल बाईंना भेटल्यावर त्यांना हे सगळे सांगितले. त्यांनी तात्काळ मी स्वत: तिच्याकडे लक्ष देईन, तसच तिच्या क्लास टीचरला पण पहिले काही दिवस तिच्या कलाने घेण्या बद्दल सांगीन असे आश्वासन दिले. मग मुलीला त्या "चल तुला शाळा दाखवते" म्हणून न्यायला लागल्या त्यावर तिने "मला नाही आवडत शाळा. मी नाही येणार" म्हणून ठामपणे सांगितले. त्यावर त्यांनी तिला "ही दुसरी शाळा आहे. इथल्या टिचर खूप छान आहेत त्यांच्या कडे खूप खेळ आहेत" वगैरे सांगून तिच्या हातावर एक चॉकलेट ठेवले. मला हळू आवाजात विचारले, "हिची काय एखादी गोष्ट फेवरेट आहे ते सांगा." "एरोप्लेन" हे मी सांगितल्यावर ठीक आहे म्हणून तिला बाबापुता करत घेऊन गेल्या. ८-१० मिनिटांनी आमच्या बाईसाहेब हसत हसत हातात कागदी एरोप्लेन नाचवत परत आल्या ज्यावर एक मोठ्ठा A काढलेला होता. वर "इथेना मोठ्ठी घसरगुंदी आहे... आपण उद्या इथे खेळायला यायचं का?" अस विचारल्यावर अगदी भावनाविवश का काय व्हायला झालं Proud त्या नंतर आणखी जास्त विचार करावासा पण वाटला नाही ना दुसरी शाळा बघण्याची गरज. लगेच अ‍ॅडमिशन घेऊन टाकली.

आज या नविन शाळेत जाऊन ३ महिने झालेत. अगदी पहिल्या दिवसापासून ती या शाळेत कधी रडली नाहीये. शिस्त आहे पण नर्सरी साठी आवश्यक तेव्हडीच (वर्गाच्या बाहेर जायचे नाही, जेवणाच्याच वेळात डबा खायचा इतपत.) आधीच्या शाळेत ती एका महिन्यात ८-१० पोएम्स शिकली होती (रडता रडता कशी शिकली याचे मला अजुनही आश्चर्य वाटते.) इथे ३ महिन्यात जेमेतेम ४-५! पण निदान जे शिकली आहे ते आनंदाने शिकली आहे याचे मला समाधान वाटते. बहुदा या वर्षाच्या शेवटी तिला तिच्या वयाच्या त्या पहिल्या शाळेतल्या मुलांना येतात त्यातल्या अर्ध्याअधिक गोष्टी येतच नसतील पण तिला शाळेची आणि अभ्यासाची आवड निर्माण होईल जे मला जास्त महत्वाचे वाटते. अजुनही सांगण्या सारखे बरेच आहे पण फार पाल्हाळ झाले तेव्हा सध्या इतकेच. Happy

एचेच पाल्हाळ नाही हो अगदी उत्तम लिहीले आहे. अडीच वर्षाचे मूल न हलता कसे राहील. मुलांना साच्यात बसवायची धड्पड असते शाळेत. ती बरोबर नाही. तसे म्हणाल तर मी अजूनही पीटीए ला नर्वस असते. टीचर काही सांगायच्या आधीच आपण डिफेन्सीव असतो.

रैना बेस्ट ऑफ लक

जयु मला पण मुलीला मराठी मुळाक्षरे आणी बाराखडी शिकवायची आहे. आपण वेगळा धागा काढुयात का? नाहितर मी काढते आणि इथे लिंक देते.

HH अगदी छान निर्णय. तुम्ही मुलीचं सांगणं वेळेत ऐकलत आणी आता तीला शाळा आवडतेय हे वाचुन छान वाटलं. बरोबर. तुलना करुच नका. किती पोएम्स येतात पेक्षा, किती आवडतात, किती आनंद देतात ते महत्वाचे.

इथे वर काही जणांनी होमवर्क बद्दल लिहिलं आहे. सगळ्याच शाळात अस आहे का? असच असेल तर मग बोलुन काही उपयोग नाही. पण तरी तीन वर्षाच्या मुलांना होमवर्क म्हणजे जरा लोडच आहे ना. होमवर्क असला की बहुतांशी पालक आणि मुलं पाट्या टाकल्या सारखे करणार. पोएम्स तरी एवढ्या पाठ झाल्या पाहिजेत वगेरे नियम कशाला. आल्या तर आल्या, नाही तर नाही. मुलांना आवडल्या तर येतील म्हणता. नाही आल्या पाठ म्हणता तर कुठे फरक पडतोय?

प्रिंसेस, काय सांगतेस. आजकाल एसएससी बोर्डात घालत नाहीत? का बरं? पूनमने लिहीले आहे बघ एसएससी बोर्डाबाबत.
>>>>>>>>>>>>>

कुठल्या पोस्टमध्ये लिहिलय? पूर्ण बाफ पुन्हा एकदा वाचुन काढला. मला दिसले नाही Sad तिने रोझरी बद्दल लिहिलय ना (बोर्ड सीबीएससी)? असो...

माझ्या ओळखीत खरच कुणीच एसएससी बोर्डाच्या शाळेत नाही Sad त्यामुळे कुणाचा तरी सध्याचा अनुभव हवाय. अभ्यास कसा असतो, परिक्षा कशा असतात इ.इ.

विषयाच्या अनुषंगाने सांगायचे तर, खरेतर आजकालचा वाढता अभ्यास बघुन मला खूप टेन्शन येते. माझा मुलगा पहिलीत आहे (सीबीएससी बोर्ड) आणि आतापासुन त्याला इंग्लिश मध्ये नाऊन , प्रोनाऊन,अ‍ॅडजेक्टिव, व्हर्ब्ज ई. आहे. गणितात वर्ड प्रॉब्लेम्स, हिंदी मध्ये भाषांतर, व्याकरण आहे.

इंग्लिश गणित हिंदी इव्हीएस व्यतिरिक्त म्युझिक,तबला, योगा, सगळ्याच विषयाची असेसमेंट असते. होमवर्क देत नाहीत पण परिक्षा मात्र घेतात. घरी अभ्यास नको हे तत्व असेल तर परिक्षा का घ्यायची??? घरी अभ्यास करावाच लागतो Sad ग्रेड्स देणार असे म्हणतात पण रिपोर्ट कार्ड मध्ये मात्र ग्रेड अन गुण दोन्हीही असतात.

शिवाय शाळेचा वेळही मला या वयाच्या मुलांच्या दृष्टीने खूप जास्त वाटतो. शाळेत एवढा वेळ (सकाळी ९ ते ३.३० शिवाय जाण्यायेण्याचा एक तास) घालवल्यावर मुल खेळणार कधी? छंद कसे जोपासणार?

इथे वरती मराठी शिकवण्याविषयी विचारले आहे ना? माझा मुलगा उत्तम मराठी आणि हिंदी वाचु शकतो. मी बाराखडी वगैरे शिकवलेच नाही. मराठी छोटी छोटी जाड अक्षरातली पुस्तक आणुन तीच त्याला वाचुन दाखवत गेले. आता वाचता आल्यानंतर बाराखडी शिकवतेय. हा अ‍ॅप्रोच बरोबर की चूक ते कल्पना नाही but it worked for me.

अरे हो अजुन एक, हवाहवाईच्या अनुभवावरुन आठवले. माझा मुलगा इथे आल्यावर आम्ही त्याला एका छोट्या शाळेत घातले. पण एक दोन दिवसानंतर तो शाळेसाठी अत्यंत नाखुष असायचा. काही सांगायचा ही नाही. पंधरा दिवसांनी त्याने सांगितले शाळेत टॉईजला हात लावला तर टीचर क कान पिळते, छडी देते, वर्गाबाहेर उभे करते. Sad तपास केल्यावर कळले की त्या टीचर विरुद्ध बर्‍याच कंप्लेंट्स आहेत पण ती शाळेच्या ट्रस्टीची मुलगी/ सून असे काहीतरी असल्यामुळे शाळा गप्प बसलीय. मग शाळेत तिच्याविषयी तक्रार केली अन साळा बदलली. हे सांगण्याचे कारण एकच, मुलं शाळेत जायला अचानक नाही म्हणत असतील/ नाखुष असतील तर कारण नक्की शोधा.

>>जिथे हेल्प्ड असा शेरा आहे तिथे पालकसभेत तक्रारी येतात शिक्षकांच्या की पोरांनी हे आपले आपण सोडवणे अपेक्षित आहे.
रैना, मला वाटतं की ह्यामधे आपल्यासारखे पालक आणि ह्या सारख्या शाळा यांच्या बेसिक विचारसरणी मधेच फरक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना लागेल तेवढी मदत करणे हीच तर शिक्षकांची महत्वाची जबाबदारी नाही का? ह्याचा एवढा बाऊ का करतायत ह्या शाळा? आपल्याला काहीही अडलं किंवा आलं नाही तर आपले शिक्षक कायम आपल्यासाठी/आपल्याबरोबर आहेत, हा आश्वासक आधार मुलांनी शिक्षकांमधे नाही शोधायचा तर कुठे? आणि त्यातही मुलं लहान असताना जितका विश्वास टिचर वर ठेवतात तितका स्वत:च्या पालकांवरही ठेवत नाहीत. मग शिक्षक्/शाळा हा विचार करतच नाहीत की मुद्दाम डोळेझाक करतात??
HH तुझी पोस्ट वाचुन मला अगदी "तोत्तोचान" ची आठवण झाली Happy खरंच खुप छान निर्णय आहे तुम्ही घेतलेला.
खरं म्हणजे इतक्या लहान मुलांसाठी आयडियली शाळा कशी असावी तर "तोत्तोचान" च्या "तोमोइ शाळे" सारखी किंवा माधुरी पुरंदरेंच्या "आमची शाळा" सारखी Happy

सावली, मला भारतातल्या शाळांबद्दल माहित नाही आणि वर कुणी वर्कशीट्स टाकल्या असतील तर त्या उघडून बघायची हिंमत माझ्यात नाही. मलाही अगो सारखंच वाटतं.

>>>इथे वर काही जणांनी होमवर्क बद्दल लिहिलं आहे. सगळ्याच शाळात अस आहे का? असच असेल तर मग बोलुन काही उपयोग नाही. पण तरी तीन वर्षाच्या मुलांना होमवर्क म्हणजे जरा लोडच आहे ना. होमवर्क असला की बहुतांशी पालक आणि मुलं पाट्या टाकल्या सारखे करणार.>>>>

सायुरीला ३.५ वर्षची झाल्यावर जपानमध्ये ज्या इंटरनॅशनल शाळेत टाकलेलं तिथून तिला अल्फाबेट्स लिहायचा/गिरवायचं होमवर्क यायचं. त्यावेळी तिचा हात, मनगटं त्याकरता तयार नव्हती. शनिवार्,रविवार तिच्याकडून ही प्रॅक्टिस करुन घ्यायची म्हणाजे आमच्या नाकी नऊ यायचे. त्यात तिची रडारड आणि आम्चं तिच्यावर ओरडणं ह्याने आम्ही अगदी जेरीला आलेलो. मग तिच्या प्रिन्सिपलशी बोलल्यावर तिने माँटेसरीत वापरतात तशी काही टूल्स दिली ज्याने तिचा हात वळेल. त्यामुळे आणि तिच्यावर प्रेशर टाकणं बंद केल्यावर सगळं सुरळीत झालं. त्याने तिचं काहीही नुकसान झालं नाही. योग्य वेळेत तिला लिहिता,वाचता यायला लागलं.

अव्द्य माँटेसरीत जातो. त्याच्या शाळेत वर अगो म्हणाली तशीच पद्धत आहे शिकवायची. प्रेशर अजिबात टाकत नाहीत. जे मूल ज्याकरता रेडी असेल तेच त्याच्याकडून करुन घेतलं जातं. तोवर एखाद्या पेपरवर अल्फाबेट्स लिहून त्यावर कॉर्न चिकटवणं, ट्रेसिंग वगैरे करुन घेतात. शाळेत गोष्टी, गाणी, एक कोच व्यायाम करुन घ्यायला , अशा अ‍ॅक्टिव्हिटी असतात. तो आनंदाने शाळेत जातो, आनंदाने घरी येतो. शनिवार, रविवार शाळेत जायचं म्हणतो यातच काय ते आलं. बाकी शिकायचं ते योग्य वेळी शिकेलच.

प्रिंसेस.... पुण्यातल्या एस एस सी बोर्ड शाळेविषयी मी कुणाला तरी विचारुन तुला सांगीन नक्की काय असतं ते.
बाकी तुझ्या मुलाच्या शाळेत सीबीएससी बोर्ड जरी असलं तरी सुद्धा हे शाळेवर अवलंबुन आहे की त्यांनी कुठली पुस्तकं फॉलो करायची (म्हणजे बोर्डानी मान्यता दिलेल्या अनेक पुस्तकांपैकी). माझी मुलगी सुद्धा सीबीएससी बोर्डच्या शाळेत आहे. पण तिचं पहिलीचं हिंदी अगदीच बेसिक होतं. म्हणजे प्रत्येक धडा एकेका मात्रेवरती आधारीत असा. पहिल्या धड्यामधे सगळे काना/मात्रा/वेलांटी नसलेले शब्द. मग हळुहळु फक्त काना, मग छोटी वेलांटी/मोठी वेलांटी असं टप्प्याटप्यानी होतं. भाषांतर, व्याकरण, एका पेक्षा जास्त ओळींमधे उत्तरं असं काहीच नव्हतं (आत्ता दुसरीतही अजुन ते सुरु झालेलं नाहीये. फक्त २/३ वाक्यात उत्तरं लिहिणं सुरु आहे).
इंग्लिश मध्ये सुद्धा नाऊन , प्रोनाऊन,अ‍ॅडजेक्टिव, व्हर्ब्ज हे सगळं डिटेल मधे आत्ता दुसरीत चालु झालं.

इसकाळचा हा लेखही जरुर वाचा.

http://72.78.249.107/esakal/20100920/5207703064497956861.htm

नर्सरीपासुनच मुलांचा वाढलेला अभ्यास, जड झालेले दप्तर, तणाव, कमी वेळ सगळंच विचार करण्याजोगं. आपापल्या पद्धतीने यावर उपाय शोधणे गरजेचे वाटते.

प्रिंसेस.... पुण्यातल्या कोथरुड्मधल्यातरी बर्‍याच शाळा एस एस सी बोर्ड असलेल्याच आहेत जसे अभिनव , मिलेनियम वगैरे. पण हचिन्ग, रोझरी सारख्या शाळा मात्र सी बी एस सी किंवा आय सी एस सी वाल्या आहेत. कोणाला हवी असेल लिस्ट तर देऊ शकेन.

पण निदान जे शिकली आहे ते आनंदाने शिकली आहे याचे मला समाधान वाटते. बहुदा या वर्षाच्या शेवटी तिला तिच्या वयाच्या त्या पहिल्या शाळेतल्या मुलांना येतात त्यातल्या अर्ध्याअधिक गोष्टी येतच नसतील पण तिला शाळेची आणि अभ्यासाची आवड निर्माण होईल जे मला जास्त महत्वाचे वाटते. >>> अगदी अगदी HH Happy

हवे- लई भारी. (आम्ही चार महिने झेलले आहे पण त्याच निर्णयापर्यंत येणार आहोत.) या सगळ्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची मतं पाहून मला स्वतःला फार वाईट वाटले आहे.

मंजिरी- अगदी अगदी.
ती सेट होईल ही मला काऴजीच नाही, पण असल्या भरड्यात तिला आपण का सेट करु नये ही भूमिका समजण्यास त्रास का व्हावा? शाळा नामांकित झाली म्हणून वाट्टेल ते का खपवून घ्यावे आपण?

'तुम्ही नाही शिकलात? तुमचे काय वाईट झाले?' - पण आम्ही जे भोगले, तेच आम्ही मुलांना का भोगायला लावावे.
'प्रत्येक शाळेत काहीतरी प्रॉब्लेम असतो'- असेनाका. न शिकवणारी अ‍ॅवरेज शाळा, आणि मुलांवर जबरदस्ती करणारी शाळा यातले लेसर इव्हिल ज्याचे त्याने ठरवावे.
'पुढे अ‍ॅडमिशन मिळायला त्रास होईल'- होऊदेना. आत्ता तरी लेकराची ३ वर्षे सुखात जातील ना?
'शाळेला इग्नोर करायचे....'- याने आपण मुलांच्या मनात शिक्षण ही फारशी सिरीयसली घ्यायची गोष्ट नाही हे का बिंबवावे? आणि रडत ओरडत ३ वर्षे का काढायची?
'तुमच्या अपेक्षा जास्त आहेत....' ऑं. शाळेने दबाव टाकु नये ही अपेक्षा जास्त कशी?
'मुलं काय शिकवू ते शिकतात....' - वर हवेने लिहीलेले आहेच. मी अजून काय लिहीणार.

सायो- Happy

रैना, मला पण लेकीच्या बाबतीत नर्सरी चे अनुभव चांगले आलेत
तिथे- सुरवातीला अक्षर ओळख, रंग ओळख, वर्कशीट वगरे असले प्रकार नव्हते, त्या शाळेत भरपूर खेळ, भरपूर रंग, हवे तसे द्यायचे कुठेही कितीही, मधे मधे मस्त गाणी, कविता, मराठी सुद्धा, डबा, खाणे, खाऊ खाणे ह्या गोष्टींना महत्व होत.
सगळे सण साजरे व्हायचे, भरपूर ट्रीप्स जायच्या ,जवळपास ,अगदी, बाग्,देऊळ, एसटीस्टँड सुद्धा. लेकीने खुप एंजॉय केली ती शाळा . तिला २.५ वर्षाची शाळेत घातलेली होती, केवळ बरोबरीच्या मुलां बरोबर खेळायला मिळावे ह्या उद्देशाने. बर्‍याच अंशी हेतु साध्य झाला. मला वाटत ,नर्सरी मधे मुलांवर कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाच ओझ असु नये, फक्त खाऊ , गाणी, गोष्टी एवढच असाव.

हो स्मी. मलाही प्लेस्कुलचा फार चांगला अनुभव आहे. लेक अक्षरशः सुट्टीच्या दिवशी रडायची. मला शाळेत जायचं आहे म्हणून. Happy

आस- मिलेनियम मध्ये भाचा होता. त्याला सकाळी ८ ते संध्याकाळी ४ ह्या वेळा आवडायच्या नाहीत. म्हणजे खूप जास्त वेळ होती ती शाळा. एक वर्ष काढुन त्यांनी अभिनव मध्ये घातले.

मिलेनियम स्कुल ची वेबसाइट
http://www.myshala.com/
ह्या शाळेत सगळा अभ्यास शाळेतच करुन घेतात. म्हणजे मुलगा घरी आला की मोकळा, अशी त्यांची कंसेप्ट आहे.

प्रिंसेस.. माझी मुलगी SSC बोर्डाच्या शाळेतच (Sr. KG) आहे. तिला शाळा खूप आवडती. आजारी पडली तरी शाळेला जायचा हट्ट धरून बसते. तिला पण Jr. KG मध्ये स्लीपिंग लाइन्स, स्टँडिंग लाइन्स आणि अक्षर ओळख अश्या अ‍ॅक्टिव्हिटीज होत्या. आता Sr. KG मध्ये अक्षर लेखन, अंकलेखन सुरू झाले आहे. आता साधे साधे (३ अक्षरी) शब्द वगैरे शिकवतायत. गाणी वगैरे शिकवतात. सगळे सण, मुलांचे वाढदिवस साजरे करतात. एकंदर चांगली शाळा आहे.

आधीच्या एका पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे आधी /,\,-,।,c,उलटा c शिकवून मग आधी ए, ऐ, उ, ऊ, अ, आ,ओ,औ,अं,अ:,इ,ई अश्या क्रमाने शिकवावे. यानंतर कखगघ शिकवावे.

आधी शब्दओळख, वाचन आणि मग लेखन अश्या क्रमाने शिकवल्यास बरे पडते. आपापल्या मुलांच्या सोयीप्रमाणे शिकवावे जर घरीच शिकवत असाल तर.

ह्ह, छान पोस्ट!
रैना,
>>या सगळ्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची मतं पाहून मला स्वतःला फार वाईट वाटले
आहे

वाईट वाटून घेऊ नकोस. या वयात त्यांचा माईंड सेट बदलणे कठिण. आपण फक्त आपल्या मुलांच्या पाठी भक्कम उभे राहायचे. मुलाला एकंदरीतच शाळा आणि शिक्षणाबद्दल नावड/ धास्ती निर्माण झाली तर नामवंत शाळा, कुठले बोर्ड या गोष्टींना काहीच महत्व रहात नाही.

Pages