मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा
नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...
वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.
गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.
नीधपला अनुमोदन. पूनम आणि
नीधपला अनुमोदन.
पूनम आणि मिनोती दोघींने वर्णिलेली वस्तुस्थिती पाहता ... मलाही याच प्रकारचे प्रश्न पडले आहेत.
सगळ्यांकरता एकाच प्रकारचे
सगळ्यांकरता एकाच प्रकारचे शिक्षण लादायचा प्रयत्न केल्याने असे होणार. वेगवेगळ्या स्तरांकरता समानता येईपर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. अमेरिकेतील No child left behind ला त्याचमुळे विरोध झाला. (भारतामध्ये अजुनही अनेक ठिकाणी No child's behind left या तत्वाप्रमाणे मारुन मुटकुन शिकविले जाते ते ही अर्थातच अयोग्य आहे).
पण परिक्षा नसणे हे एक योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. 'निशाणी डावा अंगठा' प्रमाणे त्याची हालत होऊ नये याकरता पालकांनी जागरुक रहायची आवश्यकता आहे. अमेरिकेतील अनेक पब्लिक स्कुल्स मधील पालक खेळ व संगीत यांच्याच मागे असतात. आपल्याकडे त्याउलट असते.
दिवसातील निदान १५-२०% वेळ (शाळेतील) हा प्रदेशीक परिस्थीतीनुसार वेगवेगळा हवा. आणि पालकांनी तसे घडवुन आणायला शाळांना उद्युक्त करायला हवे. अर्थातच हे म्हणणे खुप सोपे आहे. अॅड्मीशन करता असलेली मारामार्/री पाहता तसे होणाकरता बरेच काही करावे लागेल ...
नीधप अनुमोदन. तुझे प्रश्न खरच
नीधप अनुमोदन. तुझे प्रश्न खरच विचार करायला लावणारे आहेतच. मला वाटतं कि वेगवेगळ्या शिक्षण पद्धती असणं कदाचित अजुनच ही दरी वाढवतील.
aschig तुमच्या "No child's behind left " आणि "१५-२०% वेळ (शाळेतील) हा प्रदेशीक परिस्थीतीनुसार वेगवेगळा हवा" हे पटलं.
पण यात अजुन एक महत्वाचा मुद्दा आहे अस मला वाटतं.
मुळात बर्याच शिक्षकांना शाळेच्या वेळेत इतर कामे करायला लावणे हे चुकीचे आहे. त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी त्यांना वेळ द्यायची एनर्जीच रहात नसेल.
तसच शिक्षकांचे पगार , त्यांच्या पेशाला द्यायचा आदर हे ही महत्वाचे आहे. जर पेशाला आदर नसेल, पगार कमी असेल तर सगळेच शिक्षक मनापासुन शिकवायला तयार नसतात. (अपवाद आहेतच.) केवळ आपलं काहीतरी करायला हवं या भावनेने शाळेत शिकवलं जात असणारच ना! कुठल्याही विषयातले हुशार विद्यार्थी कधी म्हणतात का की मला शिक्षक व्हायचेय? खरतर मुलांवर शिक्षकांचा किती प्रभाव असतो, पण तरीही एक पेशा म्हणुन निवड करायला कमी मुलं असतात असं मला वाटतं. आणि याचं कारण पगार , आणि शिक्षकांना फारसा न मिळणारा आदर असावा का?
जर मुळातुन शिकवण्याची आवड असलेले, हुषार, चौकस लोक या क्षेत्रात आले तर कदाचित सगळ्यांना एकच शिक्षण पध्दती असुनही "No child's behind left " हे ध्येय साधता येईल.
मिनोतीच्या बोलण्यात/ पहाण्यात
मिनोतीच्या बोलण्यात/ पहाण्यात नक्कीच तथ्य आहे. ग्रामीण, निमशहरी भागातल्या शिक्षकांना अक्षरशः राबवलं जातं आणि त्याचा परिणाम शिक्षणाच्या क्वालिटीवर होतो ह्यात वाद नाही. पण समस्त वर्ग 'साक्षर' आहे हे सिद्ध करण्यासाठी मुलांना चक्क वरच्या वर्गात ढकललं जातं, त्यांना किती आणि काय येतं हा भाग अलाहिदा. काही शाळा/ शिक्षक नक्कीच वेगळे आहेत. मनपाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना चौथीची स्कॉलरशिप मिळाल्याची उदाहरणंही आहेत. नीधपचं म्हणणंही पटलंच. जोवर आर्थिक/ सामाजिक स्तरात तफावत आहे, तोवर सर्व मुलांना एकच मापदंडात बसवणे योग्य नाही. काही भागांमध्ये अक्षर ओळख असणे, अंक मोजणे, हिशोब करता येणे हीदेखील मोठी अचिव्हमेन्ट असू शकेल. पण हे जे 'मूल्यमापन' धोरण आहे, त्यात किमान 'वरच्या वर्गात ढकलणे' ह्या प्रकारांना थोडातरी आळा बसेल असे वाटते. अर्थात, सरकारी धोरण आहे, त्यामुळे त्याची 'अंमलबजावणी' हाच कळीचा मुद्दा आहे!
खरंतर ९०% शिक्षकांना आपल्या पेशाबद्दल कळकळ असते. पण परिस्थितीमुळे, अतिरिक्त कामामुळे, अपुर्या पगारामुळे तेही पिचलेले असतात ह्याबद्दल सावलीला अनुमोदन.
किन्डरगार्डन आणी प्ले होम मधे
किन्डरगार्डन आणी प्ले होम मधे काय फरक आहे?
http://wiser-u.net/blog/tedxw
http://wiser-u.net/blog/tedxwiseru/yogesh-kulkarni/
नर्सरी नाही, पण रिलेटेड चांग्ली लिंक आहे
माझ्या मुली साठी मला भारतातुन
माझ्या मुली साठी मला भारतातुन मटेरीयल मागवायचे आहे तर मराठी / हिंदी/ इंग्लिश चे के.जी साठी चे उपयुक्त पुस्तके, तक्ते कुठल्या प्रकारची मागवता येतील. मला अभ्यासाच्या पुस्तकांची नावे तसेच प्रकार सांगाल का? तसेच अजुन काय मागवता येइल.
निर्मयी, तुला भारतातुन सगळं
निर्मयी, तुला भारतातुन सगळं मागवायची गरज नाही पडणार. निशी ओजिमा मधलं "अपना बाझार" दुकान महित्ये का? (ग्रोसरीचं) त्याच्याकडे आहेत बरीचशी पुस्तकं, तक्ते वगैरे.
हे मला नव्हत माहित
हे मला नव्हत माहित मंजिरी.
आता जायला पाहीजे एकदा
हे मला पण नव्हते
हे मला पण नव्हते माहित.
मंजिरी आता जाउन बघिन मी नक्की.
ही मिलेनियमची यासंदर्भातील
ही मिलेनियमची यासंदर्भातील साईट.
http://www.myshala.com/circulars/KG_unit2_2010.pdf
इथे पुण्याच्या शाळांबद्दल
इथे पुण्याच्या शाळांबद्दल माहिती असलेला धागा होता. लिंक द्याल का प्लीज?
माझी मुलगी पुढच्या महीन्यात ४
माझी मुलगी पुढच्या महीन्यात ४ वर्ष पूर्ण होईल. सध्या ती खूपच कमी वेळ शाळेत जात आहे, फॉल पासून रेग्युलर जाईल. तर येत्या ६ महीन्यात तिच्याकडून घरीच करुन घ्यायला योग्य अशी पुस्तके कुठे मिळतील ? मुख्यत्वे मी प्री-रायटींग रेडीनेस वाली पुस्तके विचारात घेत आहे, ज्यात स्लीपिंग लाईन्स, स्टँडींग लाईन्स, नागमोडी रेघा, अशी नुसती रेघांची प्रॅक्टीस असेल. बाकी अंक, अक्षरे लिहीणे इ. नकोय. बार्न्स अँड नोबल मधे बरीच पुस्तके पाहीली, पण नुसत्या रेघांचे मिळाले नाही. बाकी ट्रेसिंग, सेम-डिफरंट, प्री-केजी इ. दिसली. बाकी प्ले-डो, रंगकाम, पझल्स, कटींग-पेस्टींग वगैरे हे सगळे आहे तिच्याकडे पण प्रॉपर नर्सरी करिक्युलम ला जात नसल्याने मला सतत वाटत राहते की शी इज मिसिंग ऑन समथिंग.
http://www.kidzone.ws/prek_wr
http://www.kidzone.ws/prek_wrksht/dynamic.htm
http://www.hwtears.com/hwt
मवा, पुस्तकच घ्यायचे असा आग्रह नसेल तर वर दिलेल्या साइट्सवर काही मिळते का बघ. पहिल्या लिंकवर शीट्स दिलेत त्याच्या प्रिंट्स घेता आल्या तर सुरुवात करायला बरे पडेल.
रच्याकने, स्कोलॅस्टिक्सची पुस्तकं चांगली असतात.
प्रॉपर नर्सरी करिक्युलम ला
प्रॉपर नर्सरी करिक्युलम ला जात नसल्याने मला सतत वाटत राहते की शी इज मिसिंग ऑन समथिंग. >>> असं काही नाही. इथे किती तरी मुलं प्री-स्कूल सुद्धा करत नाहीत. थेट के जी ला शाळेत.
तुला अगदीच वाटत असेल तर "प्रॉपर" नर्सरी करिक्युलम गूगल कर आणि तिला त्यातले काय येतेय, काय नाही बघून आणखी शिकवायचे की कसे बघ
>> प्रॉपर नर्सरी करिक्युलम ला
>> प्रॉपर नर्सरी करिक्युलम ला जात नसल्याने मला सतत वाटत राहते की शी इज मिसिंग ऑन समथिंग. >>> असं काही नाही.
+१
असं काहीही नाही.
अरे, मस्तच की. हे
अरे, मस्तच की. हे प्री-रायटींग रेडिनेस साठी इंटरनेटवर शोधून प्रिंटआउट्स घेऊनही करता येईल असं डोक्यातच आलं नव्हतं, मस्त आहेत तिथे वर्कशीट्स, तसेच हवे होते मला अगदी बेसिक. थँक्स अ लॉट.
मवा, ही साइटही छान आहे बघा.
मवा, ही साइटही छान आहे बघा.
हो हो, गुगल केलेय नर्सरी
हो हो, गुगल केलेय नर्सरी करीक्युलम, रादर, याच धाग्यावरच्या माझ्या मोठीच्या वेळच्या पोस्टी वाचून आठवलं की ती कशी हवेत हातवारे करुन अक्षरं गिरवायची, पाच सेन्सेस बद्दल बोलत रहायची, आणि हे लाईन्स गिरवणं वगैरे. आता हे असे प्रिंटाअऊट्स घेऊन देते तिला करायला.
स्वाती, थँक्स. :). (पण मला 'बघा' का म्हणले आहे ? ;))
लहान मुलांसाठी पझल्स- शब्द
लहान मुलांसाठी पझल्स- शब्द कोडी इ पण खूप मिळतात ऑनलाइन.
ओके.
ओके.
तू आणि मुलगी - दोघींनी बघा.
तू आणि मुलगी - दोघींनी बघा.
(No subject)
मवा, या पोस्टी मलाही
मवा, या पोस्टी मलाही उपयोगी पडणार आहेत. धन्यवाद सर्वान्ना!
मवा आणि ज्ञाती इथेही बरीच
मवा आणि ज्ञाती इथेही बरीच वर्कशीट्स आहेत
अरे वा, थँक्स डॅफो.
अरे वा, थँक्स डॅफो.
थँक्स डॅफो !!
थँक्स डॅफो !!
अरे वा. हा धागा आत्ता बसून
अरे वा. हा धागा आत्ता बसून पूर्ण वाचून काढला. (आणि आपण सुदैवी आहोत याची खात्री पटली, कसं ते सांगतेच!!)
मंगलोरला असताना सुनिधीला २ वर्षे पूर्ण झाल्यावर जवळच्याच एका प्ले स्कूलला घातलं होतं चार महिन्यांनी इकडे आल्यावर मात्र आजूबाजूला एकही प्लेस्कूल नसल्याचं कळलं. सुदैवाने घराजवळच्याच एका कॉन्व्हेंटमधे प्रीकेजी असा वर्ग भरत होता. तिथे जाऊन चौकशी वगैरे करून घेऊन आल्यावर मला तरी ते एकंदर समाधानकारक वाटलं. इथे सुनिधीला सिलॅबस असा आहे"
१. अक्षर ओळख. इंग्रजी (कॅपिटल) आणी तमिळ अ ते अ:
२. नर्सरी र्हाईम्स: इंग्रजी आणी तमिळ
३. पार्ट्स ऑफ द बॉडी
४.. रंग ओळखणे
५. जानेवारी ते डिसेंबर आणि संडे ते सॅटरडे (नुसते तोंडी म्हणायचंय मी लगे हाथो चैत्र्-फाल्गुन आणि रविवार्-शनिवार शिकवून घेतलंय)
६. आकडे म्हणणे. हे खरंतर ट्वेंटीपर्यंतच आहे. पण मुलं म्हणतात म्हणून मिस फिफ्टीपर्यंत म्हणवून घेते.
७. स्वतःचे नाव, वडलांचे नाव वगैरे माहिती सांगणे (इंग्रजी आणि तमिळमधून)
८. भरपूर रंगकाम आणि बागेमधे खेळणे.
शाळेकडे भरपूर खेळणी आहेत. यांचा वर्ग सकाळी नऊ ते दहा उघड्यावर झाडांच्या सावलीमधे भरतो. मुलं अगदी मनसोक्त बागडून घेतात आणि मग दहा वाजता डबा खाल्ला की मग ओपन बाल्कनीसारखा वर्ग आहे तिथे नेऊन बसवतात. आठवड्यातून दोन दिवस नऊ ते दहा सीसॉ, घसरगुंडी असल्या ठिकाणी खेळायला सोडतात. गृहपाठ म्हणून बर्याचदा रंगकाम असतं. ते केलं नाही तर मिस दुसर्या दिवशी करवून घेते. शाळेच्या नियमानुसार परीक्षा घ्यावी लागते म्हणून अगदी वेळापत्रक वगैरे आखून परीक्षा घेतात, पण मार्कांचं कुणालाच काही नसतं. एकंदरीत शाळेत जाऊन मस्ती करणे, नविन भाषा शिकणे, स्वभान येणे, अशा गोष्टी मला अपेक्षित होत्या, त्या इथल्या वर्गात मिळाल्या.
...
...
Pages