नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

Submitted by रैना on 5 October, 2010 - 04:36

मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...

वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.

गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्या घरीच शिकवावं आणि नंतर बाहेरुन १०वी ची परिक्षा द्यावी... >>> हिम्या मुलांना एकलव्य बनवायच का? :p

बोर्डाला महत्व द्यायच की शाळेला? मुळात आपल्या पाल्याची आकलन शक्ती पाहून निर्णय घेणेच योग्य.

दादरच्या साने गुरुजी शाळेत (SSC बोर्ड) चौकशी करता गेलो होतो तेव्हा तेथील एल के जी आणि यु के जी चे वर्ग तपासले... एका वर्गात २५ छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या... वर्गातील भिंती वेगवेगळ्या चित्रांनी सजविलेल्या होत्या... प्रत्येकी एक खेळण असे खेळण्यांचे विविध प्रकार होते... फळा होताच सोबत एक प्रोजेक्टर पण होता... प्रोजेक्टर असण्याचे कारण विचारले तेव्हा कळले की, पुढिल २ वर्षात शाळेला ICSE ची मान्यता मिळावयची आहे म्हणून आता पासूनच त्याची तयारी...

जर पाल्याला SSC बोर्डाचीच शिकवण द्यायची असेल तर दोन वर्षांनी शाळा बदलावी लागणार... आज हा अट्टाहास प्रत्येक शाळेने धरला तर पुढे SSC बोर्डाची शाळा मिळणे कठीण होईल... शहरातील मराठी माध्यमाच्या शाळा तर जवळ जवळ नसल्यातच जमा आहेत... SSC बोर्डही त्याच वाटेवर जाणार की काय?

ह्या सगळ्या कुतुहलापोटी लोकांना जबरा कामाला लावलंय तुम्ही रैनाताई..

त.टी. स्पष्टोक्तीबद्दल राग नसावा.

मुकुला, मंजिरी, सावली, प्राची, पूनम, आगाऊ, इंद्रा,मवा, मंजू - सगळ्यांचेच धन्यवाद. आपण सगळेच उद्दिष्टांबाबत सहमत आहोत म्हणजे हे पाहून फार बरे वाटले.
आता प्रश्न असा आहे की लढा कसा द्यायचा, द्यायचा का की मुकाट शाळा बदलायची, की आपणच शाळा काढायची. Wink

मला योग्य वाटत नाहीत त्या खालील गोष्टी
- ICSE च्या नावाखाली हे असेच चालणार आणि म्हणूनच पोरं म्हणे रेसमध्ये पुढे जाणार असा आमच्या हापिसात प्रवाद आहे. Angry
- ICSE- ची तत्वे खरेच अशी आहेत? मला आठवतय त्याप्रमाणे, ऑड वन आउट हे पहिल्यांदा चवथीच्या स्कॉलरशीप परिक्षेत असायचे पूर्वी.
-तिन वर्षांच्या आणि त्याहून लहान मुलांवर माझ्यामते दबाव टाकणे योग्य नाही. सॉरी मी आज पहिले घरी जाऊन इथे त्या वर्कशीट आणि नर्सरीची बाजारातील पुस्तकांची पानं स्कॅन करुन टाकते.

मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं. >>
माझा एक प्रश्न आहे की, २००७ डिसें मध्ये जन्मलेली मुलं नर्सरीत कशी?
२००७ डिसें मध्ये जन्मलेली मुलं शाळा सुरु होताना म्हणजे २०१० जूनमध्ये अडीच वर्षाची आहेत, तर तीन पूर्ण न करताही नर्सरीत कशी? अशी मुलं प्लेग्रुपमध्ये असायला हवीत. आणि नावावरूनच स्पष्ट आहे की तिथे केवळ खेळणे हीच मुख्य अ‍ॅक्टीव्हिटी असेल.
हल्ली शाळांचे नियम बदलले आहेत का? शाळा सुरु व्हायच्या वेळी वयाची किती वर्षं पूर्ण असावीत अशी अट आहे?

अगं होना. आमच्या एरियातील शाळा कॅलेंडर इयर २००७ मध्ये जन्मलेली मुलंच घेतात. हा काय प्रकार आहे ते समजत नाही. म्हणजे काही मुलं शाळा सुरू होताना २.५ वर्षाची असु शकतात.

चांगला धागा आहे. पण "इथल्या शाळा कॅलेंडर इयर २००७ मध्ये जन्मलेली मुलंच घेतात" ह्यावर दुमत आहे. माझ्या मुलांना नर्सरीत अ‍ॅडमिशन घेताना रुल स्पष्ट होता की ३० जून २०१० ला ३ वर्षे पुर्ण पाहिजेत.वेगवेग़ळ्या शाळांचे रुल वेगळे असण्याची शक्यता आहे.

हो शक्य आहे चेतन. इथल्या म्हणजे भारतातल्या वगैरे म्हणायचे नव्ह्ते. ते मी आता संपादित केले आहे. Happy
परंतू हा वयाच्या अटीबाबतचा निर्णय शाळानिहाय का आहे ते मला अजून कळले नाही.
तसेच इथे वर सगळ्यांनी परिक्षांबद्दल लिहीले आहे. पण या शाळेत बहुधा परिक्षा आहेत. मी नोटिस पुन्हा वाचून इथे टाकते.

अनुमोदन चेतन. माझ्याही मुलीच्या शाळेत तोच नियम होता, पहीलीत जाताना ६ पूर्ण पाहीजे म्हणून इथे खूप मुलांना सि.के.जी. रीपीट करताना पाहीलं आहे मी. तसेच माझ्या मुलीची शाळा पण ICSE असूनही त्यात मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळे हसतखेळत आहे. काहीच बर्डन नाही. परीक्षाही नाहीत अगदी चौथी पर्यंत.

शिक्षण मंडळाच्या नियमावलीनुसार इयत्ता पहिली सुरू करताना, म्हणजे जूनमध्ये पाल्याचे वय सहा वर्ष पूर्ण हवे. आता back counting करा Happy हा नियम काटेकोर आहे. मध्ये हे वय साडेसहा करण्याचे चालले होते, पण तोवर प्रवेश होऊन गेले होते Uhoh म्हणून सहा वर्ष ही वयोमर्यादा आहे.

ओके. पण मग त्यानुसार मुलांच्या ग्रास्पिंगमध्येही फरक असेल. तीन वर्षाचे मूल एखादी गोष्ट लवकर शिकेल आणि अडीच वर्षाचे जरा सावकाश. अगदी २-३ महिन्यांच्या फरकानेही मुलांमध्ये फरक पडतो असा माझा अनुभव. Happy

आजकालची मुलं फार हुशार आहेत, सगळं पटापट शिकतात- हे वाक्य मला तरी फार फार खोटं वाटतं. पोरं पटापट शिकणारच हो, आपण त्यांना वेळच कुठे देतोय सावकाशपणे शिकायला??? अक्षरलेखन अजून शिकतायेत तोवर शब्दलेखन सुरु करतो आपण. Sad

NCERTच्या मंडळाने लिहीलेले एक पुस्तक आहे माझ्याकडे, त्यात नर्सरी अभ्यासक्रमाविषयी काही गाइडलाइन्स आहेत. त्या लिहीते-
त्यांनी ECE Programme म्हणजे Early childhood education programme' आखलेला आहे. यात साधारण ३ ते ६ वर्षाच्या मुलांचा विचार केला गेला आहे.
३ ते ६ या वयोगटातल्या मुलांचे शिक्षण हे 'प्री-प्रायमरी एज्यु.' म्हटले जाते.
आता याची उद्दिष्टे काय असावीत, तर या तीन वर्षांत मुलांची -
सामाजिक, भावनिक,मानसिक वाढ,
भाषेची ओळख,
सभोवतालच्या वातावरणाची, समाजाची ओळख,
शारिरीक वाढ, तसेच हलचालींमध्ये सुसुत्रता येणे,
विचारशक्ती, निरीक्षणशक्ती,कल्पनाशक्ती यांत वाढ होणे

यासाठी प्रयत्न केले जावेत.

३ वर्षाच्या मुलांचे स्नायु अजून तितकेसे बळकट नसतात. मेंदू आणि हात विशेषतः बोटे यांच्यात समन्वय नसतो. त्यामुळे, या वयात हातात पेन्सिली देऊन त्यांना लिहायला लावणे चुकीचे आहे. पेन्सिलीआधी त्यांना क्रेयॉन्स देऊन त्यांच्या हाताचे स्नायु बळकट करण्यास जरुरी व्यायाम (म्हणजे मोठमोठ्ठे आकार रंगवणे)करवून घ्यावेत. रंगकामाने दोन फायदे होतात. आधी म्हटल्याप्रमाणे व्यायाम होतोच, शिवाय आकारची बाह्यरेघ संपली की हात थांबवायचा हेही हळू हळू लक्षात येते, याचा अक्षरलेखनात उपयोग होतो.

पुस्तकातील गाइडलाइन्सप्रमाणे एल्केजी- युकेजी मध्येही अक्षर लेखन शिकवू नये. केवळ pattern making शिकवावे. म्हणजे \,/,-,|,c, उलटा c अश्या रेघा शिकवून त्यांचे पॅटर्न्स बनवायला शिकवावे. हळू हळू या रेघांचा वापर करून अक्षरे शिकवावीत. म्हण्जे प्रथम I,T,H,L,F,E........ या क्रमाने शिकवावे.

मी आधी लिहील्याप्रमाणे केजीपर्यंत केवळ खेळ, गाणी, गोष्टी झाल्याने १लीत एकदम सगळे शिकण्याचा ताण येऊ शकतो, कारण, १लीचा अभ्यासक्रम खूप आहे. त्यामुळे , आमच्याकडील शाळेत थोडा बदल करून ECEP राबवला जातो. एलकेजीत pattern making आणि युकेजीत अक्षरलेखन करवले जाते.

आर्मी स्कूलमध्ये CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम आहे.

आता प्रश्न असा आहे की लढा कसा द्यायचा, द्यायचा का की मुकाट शाळा बदलायची, की आपणच शाळा काढायची.
>> माझ्या वहिनीने ह्यावर केलेला उपाय. ती लढाही देत नाही, शाळाही बदलत नाही. पण मुलीला काही आले नाही तर तीला दबाव येइल असे काहिच बोलत नाही.शिक्षकांनाही तीने सांगितलय माझी मुलगी १ लीत गेली कि मी करुन घेइन सगळे जे तिला येणार नाही ते, त्यामुळे आत्ता नाही आले तरी चालेल.सुदैवाने ह्याच शाळेत जायचे असल्याने admission interview ही कटकट नाही.

आमच्या एरियातील शाळा कॅलेंडर इयर २००७ मध्ये जन्मलेली मुलंच घेतात.>> हो पुण्यातही vincent ,rosary तत्सम शाळांमधे असाच नियम आहे.vincet चा JK चा अनुभव थोडा तापदायक होता.(हे १२ वर्शंपुर्वी आता बम्द झाले असावे)खुप लहान मुलांना (वय ४) entrance ठेवली होती.काही मुले रडायला लागली. अर्थात त्यात त्या शाळेची चुक नाही. ही नावाजलेली शाला म्हणुन सगळ्यांनाच तिथे यायचे होते. मुलांना कटवण्यासाठी शाळेने केलेला तो उपाय होता.

ICSE च्या नावाखाली हे असेच चालणार आणि म्हणूनच पोरं म्हणे रेसमध्ये पुढे जाणार असा आमच्या हापिसात प्रवाद आहे. >. रागावु नका पण एव्हड्या गर्दीत रेसला पर्याय नाही.जर काही पालकांना वाटत असेल कि ICSE मुळे पोर पुढे जाणार तर ते ह्यात सामील होणारच. u can always opt out of race.निर्णय तुमचा आहे.फक्त तेव्हडी हिम्मत शेवतपर्यंत टीकलि पाहिजे.
मराठी माध्यमात मुलांना पाठविणार असे छातीठोकपणे सांगणारे लोक जेव्हा इंग्रजी शाळांच्या बाहेर अर्ज घ्यायला उभे दिसतात तेव्हा अरे हेच का ते हा प्रश्न पडतो.

शिक्षण मंडळाच्या नियमावलीनुसार इयत्ता पहिली सुरू करताना, म्हणजे जूनमध्ये पाल्याचे वय सहा वर्ष पूर्ण हवे. आता back counting करा स्मित >>>> अगदी बरोब्बर. माझ्या वरच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे प्री-प्रायमरी एज्यु. वयाची तीन वर्षे पूर्ण केल्यावरच सुरु व्हायला हवे.

आजकालची मुलं फार हुशार आहेत, सगळं पटापट शिकतात- हे वाक्य मला तरी फार फार खोटं वाटतं. पोरं पटापट शिकणारच हो, आपण त्यांना वेळच कुठे देतोय सावकाशपणे शिकायला>>> अगदी अगदी.

प्राची तू दिलेल्या NCERT गाईडलाईन्स योग्य वाटतात आहे. म्हणजे लॉजिकल.

पूनम-सहा वर्षे हे खरंच माहित नव्हते. म्हणजे शाळा नियमबाह्य नियम ठेवते?

आणि समजा मुलांना दात उशीरा आले,चालायला/रांगायला उशीर झाला जरा तर आपण काय करतो? वाट पहातो. तसेच काही मुलांना अक्षरओळख उशीरा आली तर काय बिघडले? त्यासाठी त्यांना छळा कशाला?

आर्क- भारी पोस्ट. Now we r talking Happy
रोझरीत आमच्या परिचयाचा एक मुलगा आहे. ५ वर्षाच्या मुलाला डस्टरने हातावर मारतात नियमीतपणे. Sad

u can always opt out of race.निर्णय तुमचा आहे.फक्त तेव्हडी हिम्मत शेवतपर्यंत टीकलि पाहिजे.>> हो. सर्व alternate schools ही पूर्णपणे रेसला टाळु शकत नाहीच.

तसेच वर कोणीतरी म्हणाले आहे तसे आमच्या शाळेत कर्सिव ने सुरुवात नाही. आत्ता माझी मुलगी ज्यु. के.जी. मध्ये आहे आणि तिला सुट्टी अक्शरे, फक्त कॅपिटल तेही H, T, L, I हे एवढेच आहे. त्यातही आधी बरेच दिवस नुसता रेघांचा सराव होता, आणि मागच्या वर्षी नर्सरीत तर अक्षरे लिहायला काय ओळखायलाही नव्हती, फक्त म्हणायला होती.
रैना, मला वाटते, तुमच्या शाळेचे स्वतःचेच काही नियम असतील जे ICSE असल्यामुळेच आहेत असे नसावे, कारण बंगळूरुत जास्त शाळा ICSE च आहेत, आणि त्या सर्व शाळांमध्ये असेच आहे जे मी सांगितले. गाणी-गोष्टी-खेळ्-नाच हे सगळेच आहे.

आणि समजा मुलांना दात उशीरा आले,चालायला/रांगायला उशीर झाला जरा तर आपण काय करतो? वाट पहातो. तसेच काही मुलांना अक्षरओळख उशीरा आली तर काय बिघडले? त्यासाठी त्यांना छळा कशाला?>>>>
आगाऊने म्हटल्याप्रमाणे ही जबाबदारी पालकांची आहे. पण बरेचदा पालकच आपल्या मुलांची दुसर्‍याशी तुलना करून मुलांवर ताण आणतात. Sad
बरेचदा शिक्षकांची चूक नसते, शाळेच्या मॅनेजमेंट्कडून येणारे प्रेशर किंवा पालकांकडून येणारे प्रेशर यामुळे शिक्षक मुलांच्या मागे लागू शकतात.

रोझरी शाळा वाईट आहे. स्वानुभव. मुलाचा सिनियर केजीचा इन्टर्व्ह्यू होता. काहीतरी शब्द लिहायला सांगितला जो त्याने सुट्या लिपीत लिहिला. सिस्टरने 'आ' वासून, मान हलवून धक्का बसल्यासारखे करत you have to teach him cursive in the summer vacation असे सांगितले होते. सध्या फीसाठी आंदोलन हे त्याच शाळेत चालू आहे. मारणे तर कॉमन. शाळेत आपण कोणत्याही कारणास्तव वर्गशिक्षिकेला भेटू शकत नाही, फक्त मुख्याध्यापकांना भेटू शकतो.. असे काही अचाट प्रकार आहेत तिथे. बोर्ड- सीबीएससी. सॉरी, विषयांतर.

शिक्षण मंडळाची जी अधिकृत पुस्तकं आहेत, त्यात प्राचीने दिलेल्या सिलॅबसनुसारच धडे असतात, अगदी सोपे, साधे आणि गोड. हे धडे बराच रीसर्च करून, मुलांची गरज आणि क्षमता ओळखून तयार केलेले असतात. पाल्याला त्या पुस्तकात जितकं आहे, तितकं आलं, तरी पुरे होतं.

या वयात कर्सीव्ह रायटींगचा अट्टाहास का?>>> उलट कर्सीव्ह रायटिंग सोप्पे जाते मुलांना. पुस्तकांमधून ब्लॉक लेटर्स असतात, म्हणून तेही शिकवायचे Happy

पोरं पटापट शिकणारच हो, आपण त्यांना वेळच कुठे देतोय सावकाशपणे शिकायला>>>
आगाऊने म्हटल्याप्रमाणे ही जबाबदारी पालकांची आहे. पण बरेचदा पालकच आपल्या मुलांची दुसर्‍याशी तुलना करून मुलांवर ताण आणतात. >>> प्राचीला अनुमोदन
खरतर आपला पाल्य सगळ्याच गोष्टीत हुशार/माहितगार असावा ही मानसिकता अयोग्य आहे.

बरेचदा शिक्षकांची चूक नसते, शाळेच्या मॅनेजमेंट्कडून येणारे प्रेशर किंवा पालकांकडून येणारे प्रेशर यामुळे शिक्षक मुलांच्या मागे लागू शकतात. >>> फक्त फी वाढी विरोधात आंदोलन करणारे पालक जेव्हा या प्रेशरचा तोटा समजून त्या अनुशंगाने पावले उचलतील तेव्हाच मुलांची खरी प्रगती होईल.

>>रोझरीत आमच्या परिचयाचा एक मुलगा आहे. ५ वर्षाच्या मुलाला डस्टरने हातावर मारतात नियमीतपणे.
असे वागणे पालक चालवून कसे घेतात?
मान्य आहे की गर्दी मुळे रेसला पर्याय नाही पण अकाली ओझे लादून रेस थोडीच जिंकता येते? खरे तर या साठी पालकांनीच संघटीत होऊन प्रयत्न करायला हवेत. कर्सिव लिहायला लवकर शिकवले, वयाला न झेपणारे प्रोजेक्ट आई-वडिलांनी पूर्ण करणे म्हणजे चांगले शिक्षण का?
माझा मुलगा इथे अमेरिकेत प्रीस्कूलला गेला. ३ वर्षाच्या मुलाकडून अभ्यासाची कुठलीच अपेक्षा नव्हती. क्रेयॉन्सही वापरले नाहीत. फिंगर पेंट असायचा. नर्सरी राईम्स सुद्धा नाही. मुलं मस्त खेळायची. वेडेवाकडे क्राफ्ट करायची. गोष्ट ऐकायची. ५ व्या वर्षी लेखनाची सुरुवात स्टॅडिंग लाईन वगैरे ने झाली. करसिव शिकायला तिसरी उजाडली. आज तोच मुलगा १५ व्या वर्षी AP Chem, AP World History, English Hons शिकतोय. केमिस्ट्रीचे कॉलेजचे क्रेडिटही घेतोय. हायस्कूल पास होण्यासाठी आवश्यक असलेली अल्जिब्राची परिक्षा त्याने मिडलस्कूल मधे ८ वीत दिली. आणि असे करणारी त्याच्या वयाची १/४ मुले आहेत. उशिरा लिहायला शिकल्याने काही बिघडले नाही.

खरंच आर्क- भारी पोस्ट आहे.

पालक मुलांवर खुप लहान वयापासुन ताण आणतात हे खरं आहे दुर्दैवानी Sad

विषयांतर : मीना प्रभुंच्या "माझं लंडन" मधे उल्लेख आहे न (संदर्भ काय ते आठवत नाही आत्ता), "सगळ्या आया जॉकी सारख्या असतात. घोड्यानी पहिलं यावं हे जॉकीचं म्हणणं असतं. त्या घोड्याला कुठे वाटत असतं की आपण पहिलं यावं म्हणुन?" Happy

>>तुमच्या शाळेचे स्वतःचेच काही नियम असतील जे ICSE असल्यामुळेच आहेत असे नसावे >>
हम्म खरं आहे. मलाही असं वाटतय. शाळा नियमबाह्य नियम ठेवु शकते. पुण्यात अश्या काही शाळा आहेत ज्या एस एस सी बोर्डाच्या आहेत. पण नववी पर्यंत सीबीएसइ नुसार अभ्यास घेतात. म्हणजे नववी पर्यंत मुलांचा जास्तीत जास्त पोर्शन पुर्ण होतो आणि एस एस सी बोर्डाची परिक्षा सोपी जाते. थोडक्यात बोर्डात येण्याची शक्यता वाढते आणि शाळेचं नाव उज्वल होतं!!! भले बहुतांशी मुलं त्या चक्कीत भरडली का जाईना Sad

हायला....
इतक सगळ असतं का त्या नर्सरीत.... बाप रे!
आपल बर होत ना.... असली काही कटकट नव्हती.... मस्त बालवाडी... बालगीते, भरपूर गोष्टी आणि खुप सारी खेळणी.... बाबांच्या स्कूटरवर पुढे उभारुन यायचे, मस्त मज्जा करायची, डब्यातला खाऊ खायचा तोपर्यंत न्यायला आई हजर Happy
these kids are missing the real fun!

चांगली चर्चा चालु आहे. माझी मुलगी ४.५ वर्षाची आहे, ईथे प्री स्कुलमधे शाळेचा २० वर्कबुकचा सेट आहे. ९ - ११ ह्या
वेळेत वर्गात मुलाना ते वर्कबुक देतात पण त्याचबरोबर तिथेच क्रेयोन, कागद, पपेट असे ठेवलेले असते. मुलांचा मुड बघुन त्यांना हवे ते करता येते. सुरवातीला मुलीने महीनाभर एकाही पुस्तकाला हात लावला नाही पण तीची टीचर मात्र अगदी समजुतीने घेत होती. महीन्याभराने मात्र तीला ते पुस्तक खुप आवडायला लागली. अगदी भराभर तीने प्रगती केली Happy ती पुस्तके खुपच छान आहेत. मुलांच्या लेवलप्रमाणे त्यातला अभ्यास्क्रम असतो जसे पहील्या पुस्तकात भर्पुर चित्र , अक्षर ओळख मग हळुहळु आकडे, घड्याळ.. मुलांना गोडी लागयला जरा वेळ लागतो तोपर्यंत मात्र न वैतागता त्याण्च्या कलाने घेतले पाहीजे. हाच वेळ देणे आणी एवढा संयम ठेवण वर्गात जास्त मुले असल्यावर अवघड असेल.

ह्या त्या वर्कशीटस. यातील ती ऑड वन आउट तुम्हाला योग्य वाटते का? आणि पहिल्या चित्रातली?
(वर्षाच्या शेवटापर्यंत गाळलेल्य जागा भरणे अपेक्षीत आहे बहुतेक. शोधुन सांगते. :फिदी:)

प्राची- ते कर्स्यु रायटिंगचे समजले नाही. मला पण गजाननाचाच प्रश्न आहे.
मंजिरी/मवा- हो पटले. ते बोर्डापेक्षा शाळेचे आहे काय नकळे.

पूनम - रोझरी खरंच महान आहे Sad
स्वाती२, सोनपरी, इंद्रा - अनुमोदन.

Pages