किलबिल - टाकाऊतुन टिकाऊ - कार मिरर डँगलर- आदिती

Submitted by लाजो on 22 September, 2010 - 09:12

नावः आदिती
वयः तीन वर्षे ४ महिने
माध्यम: प्लॅस्टिक, कागद, फोम
मदतः सामान गोळा करुन देणे, भोके पाडणे आणि प्रोत्साहन Happy

--------------------------------------------

मी करत असलेल्या टाकाऊतुन टिकाऊ प्लॅस्टिक बाटल्यांच्या कलाकृती बघुन आदितीलाही काहितरी करायचे होते. मधेमधे लुडबुड करत होती. मग विचार केला तिच्याकडुनही काहितरी टातुटि च करुन घ्यावे. सोप्यात सोप्पे, फार वेळ न लागणारे असे काहितरी Happy

--------------------------------------------

कार मिरर डँगलर:

साहित्यः प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणं, पाईप क्लिनर (क्राफ्ट शॉप्स मधे मिळतात) प्लॅस्टिक स्ट्रॉ चे तुकडे, फोम शेप्स, पॅकिंगमधे आलेले थेर्माकोलचे गोळे आणि कागदी मफिन कप्स.

Kilbil-1.jpg

कृती:
- आईने बाटलीच्या झाकणांना, थर्माकोलच्या गोळ्यांना भोके पाडुन दिली, स्ट्रॉ चे तुकडे करुन दिले.
- पाईप क्लिनरचे एक टोक दुमडुन/वळवुन दिले. (पाईप क्लिनर ऐवजी तार देखिल वापरता येइल. फक्त सॉफ्ट असावी, हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी)
- सगळे सामान आदितीच्या समोर ठेवले आणि तिला हवे तसे पाईप क्लिनर मधे ओवु दिले.
- वरती थोडी जागा मोकळी ठेऊन पाईप क्लिनर वळवुन हुक सारखा शेप दिला.
- डँगलर तय्यार Happy अक्षरशः अर्ध्यातासात एक तयार झाला.
- गाडीच्या रियर व्ह्यु मिररला लटकवुन फोटो काढले Happy

Kilbil-2.jpg

बच्ची भी खुष, बच्ची की आई भी खुष Happy

--------------------------------------------

टीपः हा डँगलर गाडीतच लावायला पाहिजे असे काही नाही, घरात दरवाज्यावर, मुलांच्या खोलीत कुठेही लटकवता येइल. तसेच थोडे चकचकीत कागद, टिकल्या वगैरे पण वापरता येतिल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, लेकीला असे प्रोत्साहन दिल्याबद्दल तुझे कवतिक आणि लेकीला शाबासकी! ह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल! Happy

मस्तच झालय हॅन्गींग Happy
ह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल!<<<<<<<<पॉईंट टु बी नोटेड लाजो Proud